Submitted by डॅफोडिल्स on 7 April, 2014 - 12:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
रिकोटा चीज
हापूस आंब्याच्या फोडी
२ टेबल्स्पून दुध, केशर काड्या
जायफळ, वेलची स्वादानुसार
ड्रायफ्रूट्स चे काप, बेदाणे चारोळी आवडीप्रमाणे
क्रमवार पाककृती:
- दोन टेबल्स्पून कोमट दुधात केशराच्या काड्या खलवुन ठेवाव्यात.
- रिकोटा चीज, आंब्याच्या फोडी आणि साखर प्रत्येकी एक कप किंवा समप्रमाणात घेउन ब्लेंडर मध्ये एकत्र करुन घ्याव्यात.
- वरिल मिश्रणात केशर काड्या भिजवलेले दुध घालून आम्रखंड चांगले ढवळावे.
- त्यात स्वादानुसार वेलची जायफळ पुड घालावी.
- आम्रखंड एखाद्या डब्यात किंवा मोठ्या बोल मध्ये काढून २ तास फ्रिज मध्ये ठेवावे. छान सेट होते.
- सर्व्ह करण्यापूर्वी आवडी प्रमाणे ड्रायफ्रूट्स चे काप, मनुके चारोळी वगैरे घालून सजवावे
- गरमागरम पुर्यांसोबत फस्त करावे.
वाढणी/प्रमाण:
खाउ तसे
अधिक टिपा:
* फ्रिज मध्ये सेट करण्याचा वेळ ऑप्शनल आहे. ब्लेन्डर मधुन फिरवुन लगेच सर्व्ह केले तरीही छान लागते.
* घट्ट आम्रखंड खाताना घश्याला तोठरा लागतो. म्हणून मी रिकोटा चीज सोबत स्प्रेडेबल ओरिजिनल स्विस क्रिम चे तीन चार क्युब्ज्स ब्लेन्ड केले होते. त्यामुळे मस्त क्रिमी आम्रखंड बनले.
माहितीचा स्रोत:
माझे सत्यासाठी प्रयोग :)
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो कातील आहे.
फोटो कातील आहे.
तिकडे फेसबुकावर बघूनच तोंडाला
तिकडे फेसबुकावर बघूनच तोंडाला पाणी सुटलं होतं
फोटो झकास आलाय..
फोटो झकास आलाय..
डॅफो, फोटो एकदम अल्टिमेट
डॅफो, फोटो एकदम अल्टिमेट आलाय.
स्लर्प.. फोटो क्लासच!
स्लर्प.. फोटो क्लासच!
झकास!
झकास!
यम्म! माहितीचा स्रोत भारी आहे
यम्म! माहितीचा स्रोत भारी आहे
मस्त फोटो! माझे सत्यासाठी
मस्त फोटो!
माझे सत्यासाठी प्रयोग >>
असले जीवघेणे फोटो टाकुन जीव
असले जीवघेणे फोटो टाकुन जीव घेत जाऊ नका.
मस्त कृती.
भूक लागली...
भूक लागली...
फोटो कातिल आहे. हापुस आंबा
फोटो कातिल आहे.
हापुस आंबा नसेल तर टीन मधला पल्प वापरला तर चालेल का ?
भारी फोटो!
भारी फोटो!
धन्यवाद ! मिनी हो चालेल पल्प
धन्यवाद !
मिनी
हो चालेल पल्प वापरला तरी.. गोडाच्या प्रमाणात साखरेचे प्रमाण बदलावे लागेल.
ओके, मग पल्प वापरुन बघते.
ओके, मग पल्प वापरुन बघते. थँक्यु. एकदम मस्त आणि सोप्पी रेसिपी आहे.
झकास फोटो! ट्राय करावसं
झकास फोटो! ट्राय करावसं वाटतंय!
फोटो अक्षरशः कातिल आहे.
फोटो अक्षरशः कातिल आहे.
सही! खरंच झटपट आहे. फोटो
सही! खरंच झटपट आहे. फोटो सुंदर आहे.
मला आम्रखंड श्रीखंड फारस नाही
मला आम्रखंड श्रीखंड फारस नाही आवडत
पण हा फोटो इतका टेम्टिंग आहे की एक चमचा उचलून खावस वाटतेय
मस्त !!!
किलर फोटो, याची चव खर्या
किलर फोटो, याची चव खर्या आम्रखंडाच्या किती जवळ जाते?
सिरियसली झतपट रेसिपी आहे की
सिरियसली झतपट रेसिपी आहे की ही. एका मैत्रिणीकडे रिकोटाचे श्रीखंड खाल्ल्यचे आठवते पण ते माझ्या आवडीपेक्षा जास्तीच पातळ होतं आणी चव श्रीखंडासारखीच होती पण किंचित वेगळी...
याची चव खर्या आम्रखंडाच्या
याची चव खर्या आम्रखंडाच्या किती जवळ जाते?>>> ९५ + नक्की रुपॉ
शूम्पी ब्लेन्ड करुन लगेच खाल्ले तर जरा पातळ वाटेल. म्हणून फ्रिज मध्ये थोडा वेळ सेट करुन बघ. माझ्यामते आंब्याच्या गर घट्ट असेल तर पातळ होणार नाही. मी हापूस च्या फोडी वापरल्या.
भारिच आहे......
भारिच आहे......
छान आहे! पण आम्रखंड जरा
छान आहे! पण आम्रखंड जरा जास्तच गडद झाल आहे. बहुतेक केशर जास्त घातल असाव.
पण खर सांगू मला त्या पुर्याच
पण खर सांगू मला त्या पुर्याच जास्त आवडल्या. सोबत बटाट्याची सुकी भाजी आणि ह्या पुर्या. मला पाठवून दे
पुर्या आम्रखंड कसला कातील
पुर्या आम्रखंड कसला कातील फोटो आहे.. तोंपासु..
अहाहा ! जबरदस्त फोटो आहे.
अहाहा ! जबरदस्त फोटो आहे.
कसला छान फोटो आहे.. आत्ता
कसला छान फोटो आहे.. आत्ता उचलून खावसं वाटतयं..
फोटो जबरी
फोटो जबरी
मस्त फोटो आहे.
मस्त फोटो आहे. तोंपासु!
आम्रखंडात बाकी सुकामेवा नकोच वाटतो.
जबरी फोटो !!
जबरी फोटो !!
Pages