आम्रखंड (झटपट्/इंस्टंट)

Submitted by डॅफोडिल्स on 7 April, 2014 - 12:08
amrakhand puri
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रिकोटा चीज
हापूस आंब्याच्या फोडी
२ टेबल्स्पून दुध, केशर काड्या
जायफळ, वेलची स्वादानुसार
ड्रायफ्रूट्स चे काप, बेदाणे चारोळी आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 
  • दोन टेबल्स्पून कोमट दुधात केशराच्या काड्या खलवुन ठेवाव्यात.
  • रिकोटा चीज, आंब्याच्या फोडी आणि साखर प्रत्येकी एक कप किंवा समप्रमाणात घेउन ब्लेंडर मध्ये एकत्र करुन घ्याव्यात.
  • वरिल मिश्रणात केशर काड्या भिजवलेले दुध घालून आम्रखंड चांगले ढवळावे.
  • त्यात स्वादानुसार वेलची जायफळ पुड घालावी.
  • आम्रखंड एखाद्या डब्यात किंवा मोठ्या बोल मध्ये काढून २ तास फ्रिज मध्ये ठेवावे. छान सेट होते.
  • सर्व्ह करण्यापूर्वी आवडी प्रमाणे ड्रायफ्रूट्स चे काप, मनुके चारोळी वगैरे घालून सजवावे
  • गरमागरम पुर्‍यांसोबत फस्त करावे.
वाढणी/प्रमाण: 
खाउ तसे
अधिक टिपा: 

* फ्रिज मध्ये सेट करण्याचा वेळ ऑप्शनल आहे. ब्लेन्डर मधुन फिरवुन लगेच सर्व्ह केले तरीही छान लागते.

* घट्ट आम्रखंड खाताना घश्याला तोठरा लागतो. म्हणून मी रिकोटा चीज सोबत स्प्रेडेबल ओरिजिनल स्विस क्रिम चे तीन चार क्युब्ज्स ब्लेन्ड केले होते. त्यामुळे मस्त क्रिमी आम्रखंड बनले.

माहितीचा स्रोत: 
माझे सत्यासाठी प्रयोग :)
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिरियसली झतपट रेसिपी आहे की ही. एका मैत्रिणीकडे रिकोटाचे श्रीखंड खाल्ल्यचे आठवते पण ते माझ्या आवडीपेक्षा जास्तीच पातळ होतं आणी चव श्रीखंडासारखीच होती पण किंचित वेगळी...

याची चव खर्‍या आम्रखंडाच्या किती जवळ जाते?>>> ९५ + नक्की रुपॉ Happy

शूम्पी ब्लेन्ड करुन लगेच खाल्ले तर जरा पातळ वाटेल. म्हणून फ्रिज मध्ये थोडा वेळ सेट करुन बघ. माझ्यामते आंब्याच्या गर घट्ट असेल तर पातळ होणार नाही. मी हापूस च्या फोडी वापरल्या.

मस्त फोटो आहे. तोंपासु!
आम्रखंडात बाकी सुकामेवा नकोच वाटतो.

Pages