Submitted by pltambe@yahoo.co.in on 7 April, 2014 - 01:37
मेथीचे पराठे
साहित्य : एक जुड्डी निवडून , धुवून व चिरलेली मेथी , दोन वाट्या चाळलेली कणीक , पाव वाटी ज्वारीचं पीठ , पाव वाटी बेसन पीठ , पाव वाटी तांदळाची पीठी ,पाव वाटी भाजणी ५-६ लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा , दोन चिमूट ओवा तळहातावर चुरडून घेऊन , ३-४ हिरव्या मिरच्या , एक छोटा चमचा हळद, चिमूटभर हिंग , चवीप्रमाणेमीठ , तेल
कृती : आले-लसूण-मिरच्या ह्यांची मिक्सरवर वाटून पेस्ट करून घ्या. सर्व पीठे एकत्र करून त्यात मेथी, आले-लसूण-मिरचीचे वाटण, मीठ, हिंग, हळद, ओवा, २ चमचे तेल व आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून पीठ मळून घ्या. १० मिनिटांनी पीठाचे गोळे बनवून पोळीप्रमाणे लाटा. तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी तांबूस रंगावर भाजून घ्या.
डिशमधून टोमॅटो सॉस , खाराच्या मिरच्या किंवा गोड दह्याबरोबर सर्व्ह करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पराठे अजून भाजले जायला हवे
पराठे अजून भाजले जायला हवे होते असं वाटतंय..
कृतीत पदार्थही खुप सारे आहेत..
ताम्बेकाका, आधी सर्व इतर
ताम्बेकाका, आधी सर्व इतर पदार्थ घालून चिरलेल्या मेथीमध्ये मिसळून थोडी पाणी सुटेपर्यंत ठेवले तर मेथी पीठांमधे जास्त मुरते व चव अधिक येते. शिवाय तेल सोडून भाजायची गरज नाही. नुसतेच भाजले तरी पौष्टिक व चविष्ट होतात
सई >>>+१
आधी सर्व इतर पदार्थ घालून
आधी सर्व इतर पदार्थ घालून चिरलेल्या मेथीमध्ये मिसळून थोडी पाणी सुटेपर्यंत ठेवले तर मेथी पीठांमधे जास्त मुरते व चव अधिक येते. >> बरोबर! फक्त मेथी जास्त बारीक चिरू नये.
पराठे अजून भाजले जायला हवे होते असं वाटतंय..>> हो मलाही तसंच वाटलं.
कृतीत पदार्थही खुप सारे आहेत..>> पराठा हा प्रकार एरवी खायला बोअरिंग असलेले नावडते पदार्थ एकत्र ढकलून खाण्याचा, पोटभरीचा पुन्हा खमंग असा पदार्थ हीच व्याख्या मनात रूजलीये त्यामुळे मी सुद्धा जास्तीत जास्त पीठे (ज्यांच्या भाकर्या वै. करून खाल्या जात नाहीत, आवडत नाहीत..) व भाज्या (कधी कच्च्या तर कधी स्टफ करून) ढकलून पराठे करते. जेवढी जास्त वेगवेगळी पीठे तेवढा पराठा खमंग
१ टिप : पराठे भिजवण्यासाठी गरज असल्यास ३ भाग पाणी आणि १ भाग दूध वापरल्यास पराठे जास्त मऊ, खुसखुशीत होतात.
थोडे बिनपॉलीश तीळही घालावेत पीठ मळताना तसेच वरून जास्त तेल लावायचे नसल्यास पीठ मळतानाच तेलाचे थोडे मोहन घालावे.
मेथीचे प्रमाण कमी झाले
मेथीचे प्रमाण कमी झाले काय??
मेथी जास्त घेऊन थोडेसे पाणि टाकुन मिक्सरमधुन एकदम पातळ मिश्रण करुन त्याच मिश्रणात कणिक भिजवल्यास अधिक चांगले लागतात.
मेथी मिक्सरला?? कडू नाही
मेथी मिक्सरला?? कडू नाही लागत??? मी तर मेथी जास्त बारीक ही चिरत नाही.
मेथी मिक्सरला?? कडू नाही
मेथी मिक्सरला?? कडू नाही लागत??? मी तर मेथी जास्त बारीक ही चिरत नाही.
>> नाही लागत. असेच पालकाचेही करता येतात.
हो गं ड्रीमगर्ल मेथी
हो गं ड्रीमगर्ल मेथी मिक्सरमधे काढली की जाम बोअर होतात पराठे (माझेतरी). मेथी मोठी मोठीच हवी पराठ्यात
हे जर मेथांबा, टक्कूसमवेत सकाळी बाहेरगावी जाताना बनवून नेले तर पोटभरीचे होतात.
शिवाय दहीभात न्यायचा, की कुठे बाहेर खायची गरजच नाही.