US मधील शाळा,अ‍ॅडमिशन ह्याची माहीती हवी आहे.

Submitted by मनःस्विनी on 29 June, 2009 - 15:35

हॅलो,
मला एका जवळच्या मैत्रीणीसाठी माहीती हवी होती. ती अमेरीकेत सेटले होण्यासाठी भारतातून येणार आहे पुढच्या आठवड्यात. तिची कंपनी नूजर्सीतच आहे piscataway मध्ये बहुधा. तेव्हा रहाणार तिथेच व जवळपास भागात. तिच्या मुलीची शाळेची चिंता तिला आहे.
मुलगी 8th grade CBSE Board च्या शाळेत जात होती भारतात. आता 9th grade मध्ये गेली पण पुढच्या महीन्यात इथे येणार म्हणून तिचे अ‍ॅडमिशन कुठे घ्यायचे तिला माहीत करून घ्यायचे आहे.
काही तिचे प्रश्ण इथे पोस्ट करते आहे, मदत मिळेल ह्या आशेने. Happy

1)piscataway or nearby अश्य कुठल्या शाळा चांगल्या आहेत? खास करून त्यांचा रेकॉर्ड चांगला आहे मुलांच्या प्रगतीसाठी?
2) शाळेच्या अ‍ॅडमिशनचा general criteria(Foreign students, scholarship, total expense ability, only county specific based admission given or what? ) काय आहे जर direct 9th grade मध्ये घालायचे आहे? इतक्या उशीरा अ‍ॅडमिशन मिळेल का?
3) सहसा काय procedure असते? व काय काय documents लागतील 9th grade मध्ये अ‍ॅडमिशन घ्यायचे असेल तर?
4a) last but not least, आता ह्या ग्रेड मध्ये मुले अ‍ॅडजस्ट होतात का इथील अभ्यासक्रमाशी?

4b) कोणाला अभ्यासक्रमाविषयी माहीती आहे? compare करायला गेलो तर मुलाना जड होतो का इथे आल्यावर? एक उलट उदाहरण पाहीलेय की, १२ वर्षी भारतात परतल्यावर भारतातील अभ्यस झेपत न्हवता.

१८ वर्षी येणे वगैरे समज असते. १३ वर्ष म्हणजे ना इधर का ना उधर का(असे माझे मतानुभव). Happy
कृपया कुणाच जो काही experience असेल तो पोस्ट केल्यास मदत होइल तिला. मुलगी एकदम मधल्या वयाची (१३ वर्षाची) असल्याने तिला चिंता लागलीय की emotionally ती हा change accept करेल का? तो ही अनुभव कुणाला असल्यास लिहिला तर बरे. माझ्याकडून माबोचे कौतुक खूप एकून असल्याने तिनेच मला विचारले, बघते का ग तुझ्या तिथे विचारून? Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनु, ३) चं उत्तर : त्यांनी घर किंवा अपार्टमेंट घेतलं की त्याचं लीज (प्रूफ ऑफ रेसिडेन्स म्हणून) लागेल. तुमच्या रहाण्याचं ठीकाण जर त्या पर्टीक्युलर शाळेसाठी झोन्ड असेल तर इथे शाळेत कधीही घेतात. तसंच (फ्लोरिडात तरी) आई-वडलांचं ड्रायव्हर लायसन्स ची कॉपी मागतात.
मुलीचे काही इम्युनायझेशन रेकॉर्ड्स लागतील. मेनिंजायटीस आणि टिटॅनस इंजेक्शन्स आवश्यक आहेत.
बाकी राज्याप्रमाणे पब्लिक स्कूलचे नियम बदलतात.

निषादच्या शाळेत गेल्या वर्शी भारतातून (साडेबारा वर्षाचा) मुलगा आला. सुरवातीला जड गेलं. पण टीचर्सशी बोलून, गायडन्स काउन्सेलरला भेटून बोलून, आपल्या समस्या सांगून त्या मुलाने ३-४ महीन्यात मित्र गोळा केले. आता तर उत्तम रमलाय. सुरवातीला अ‍ॅक्सेंट आणि शिकवण्याची पध्दत ह्या दोन गोष्टींत अ‍ॅडजस्ट व्हावं लागलं. (तो पण CBSC चा.)

मृ,
धन्यवाद क्वीक उत्तरबद्दल. ते इमुनायझेशन्चे भारतातील फ्रेश रेकॉर्ड्स लागतील का?
तिला तीच काळजी आहे की कसे काय अ‍ॅडजस्ट होणार?

१)compare schools here : www.greatschools.net
माझी माहिती : मी बारा मधे आता ४+ वर्षे आहे, त्यात दीड वर्ष एडिसन मधे होते. पिस्काटावे पासून अगदी जवळ. पिस्काटावे मधल्या शाळा विशेष चांगल्या नाहीत्.तिथून जवळच रहाणार असलात तर एडिसन मधल्या शाळा चांगल्या आहेत तुलनेने. तेही नॉर्थ एडिसन मधल्या. साउथ मधल्या नाहीत तेवढ्या.
बारामधे मला माहिती असलेल्या भागापैकी सेन्ट्रल/ साउथ भागात west windsor plainsboro, south brunswick, montgomery, नॉर्थ पैकी मला वाटते livingston, bergen या ठिकाणचे स्कूल डिस्ट्रिक्ट चांगले आहेत. बहुधा पालक आधी शाळा कुठे चांगल्या आहेत ते बघून तिथे अपार्टमेन्ट घेतात, कामावर थोडे कम्यूट करून जावे लागले तरी.
२) अ‍ॅडमिशन चा काही प्रश्न येऊ नये, इथे आता समर वेकेशन सुरु आहे, शाळा सप्टे. पहिल्या आठवड्यात सुरु होईल. त्यामुळे योग्य वेळ आहे.
३)डॉक्युमेन्ट्स जास्त लागत नाहीत. माझ्या मुलाला कॅलिफोर्निया हून इथे आलो तेव्हा आधीच्या शाळेचे मार्कशीट्स, अ‍ॅड्रेस प्रूफ, जन्म दाखला, इम्युनायझेशन रेकॉर्ड एवढेच लागले होते. सगळ्या मुलांना त्यांना अ‍ॅडमिशन द्यावीच लागते, इर्रिस्पेक्टिव ऑफ इमिग्रेशन स्टेटस. अ‍ॅडमिशन मिळाली नाही असा प्रश्न च येत नाही. प्रोसिजर अगदी सोपी. फॉर्म्स स्कूल डिस्ट्रिक्ट वेबसाइट वरून डाउनलोद करून भरायचे . स्कूल डिस्ट्रिक्ट च्या ऑफिस मधे जाउन ही डॉक्युमेन्टस अन फॉर्म्स द्यायचे. झाले. Happy
४) याबद्दल मला फारसे सांगता येणार नाही.

www.greatschools.net
www.publicschoolreview.com
www.schooldigger.com
ह्या (किंवा गूगलवरून अश्या अजुन काही मिळतील) वेबसाईट्स वरून, शाळा आणि school districts च रँकींग समजेल. चांगली शाळा बघून त्या डिस्ट्रीक्ट मधे घर शोधता येईल.

टिटॅनस शॉट दर १० वर्षांनी घ्यावा लागतो. मेनिंजायटीस न व्हावा म्हणून 'Menaactra' हा शॉट १२-१३ वर्षांचं असताना देतात. काही शाळात लहानपणच्या इंजेक्शन्स्बरोबर ही पण द्यावी लागतात अ‍ॅडमिशन आधी.
अ‍ॅडजस्ट होईल. काही वेळा मुलांच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीवर पण अवलंबून असतं.

सर्वांना भरपूर धन्यवाद.

मृ,
हे सर्व शॉट्स भारतातून घेवून यायचे की इथे'च' द्यायचे अशी requirement आहे? कारण प्रूफ विचारतात म्हणून? insurance मधून कवर होतात का जर इथे द्यायचे असतील तर?
तिची कंपनी डब्बा आहे(तिचे म्हणणे). जेमतेम सॅलरीवर असणार आहे ती.(IT consultant company exploitation.. ):).
त्यामुळे मुलगी व ती असा खर्च कसा चालेल ह्या विचारत आहे ती.

हे पान नॉन मेंबर्सना दिसते ना? तिला ही लिंकच पाठवते.

आमच्याही शाळातून बरीच मुलं वेगवेगळ्या वेळी भारतातून आलेली आहेत. (परवा एक मुलगा मे ३० ला शाळेत आला.. भारतात वर्ष संपले तेव्हा इथे Practice म्हणून).
शाळा सुरू व्हायला अवकाश आहे. सप्टेंबरमधे पुढचं वर्ष सुरू होणार.
शाळेत जाताना Residency चे फारसे नियम नसतात. Immunization ला मात्र महत्व आहे.
Adjust होणे हे प्रत्येक व्यक्ती वर अवलंबून. तशी न्युजर्सीच्या शाळातून भरपूर भारतीय मुलं आहेत. त्यामुळे Adjust होणं थोडं सोप्पं जाईल.
इथल्या शाळांतून आठवी पर्यंत अभ्यास सोप्पा असतो. नववीपासून जर तुम्ही Honours /A.P. Courses घेत असाल तर M.Sc. Part I ची तयारी असावी लागते. अर्थात हे त्या School District वर अवलंबून असतं. इथे एका वर्षात सगळं Biology (उदा. नववी), दुसर्‍यावर्षी सगळं Chemistry (उदा. दहावी) असं असू शकतं.
(माझ्या मुलांची Science ची पुस्तकं बघून सांगतोय मी...)

२. Public School Free असते... English कच्चे असल्यास ESL ला पाठवतात.

एक एक प्रश्न विचार .. उत्तर देणे सोप्पे जाईल...

एकदा दिलेला Shot परत द्यायचा नसतो. त्यामुळे भारतात दिलेले Shots चालायला हवेत. पण हा प्रश्न शाळेत विचारावा लागेल... (Certificate from India may have to be validated)...

विनयः)

इथे देता येतात. पब्लिक हेल्थ सर्विस च्या ऑफिसात फुकट असतात.

मनु
हे पान काढतांना तू ते सार्वजनिक वर टीकमार्क केले असेल तर सगळ्यांना दिसेल नाही तर फक्त गृपमधल्यांना. नसेल तर आता सार्वजनिक करण्यासाठी संपादन मध्ये जावुन ग्रूप्स दिसेल तिथे जावुन सार्वजनिक हा पर्याय स्विकारता येईल.

विनय, मृ धन्यवाद.

तुमच्या सर्वांच्या मदतीचा फायदा होइलच नक्की.

रुनी, ओह अच्छा असे आहे का ते ऑप्शन. हे न्हवते माहीती. आताच करते मग तिला दिसेल का हे पान?

मनु,
immunization चे certificates नसले तर इथे रक्त तपासुन titre बघुन कुठली लस द्यायला लागेल ते ठरवता येत. ( स्वानुभवः "मोठ्या"च्या शाळेत पण लागत प्रमाण पत्र, तेव्हा ह्या प्रक्रियेतुन गेले आहे ) .

एक मुलगी,
धन्यवाद. अग मोठ्यांना लागतच गं पण इतक्या वर्षात काय बदललय काय नाही ते विचारलेले बरे. दुसरे म्हणजे इथल्या foreign natinality च्या लहान मुलांच्या शाळेचा अ‍ॅडमिशनची काहीच कल्पना नाही ना.

शाळेच्या रँकिंग बघताना गेल्या तीन ते पाच वर्षातले ट्रेन्ड दाखवत असतील तर त्या कडे लक्ष द्यायला सांग. मुलं अन शिक्षकांचं प्रमाण, प्रत्येक मुलामागे शाळेचं बजेट किती आहे ? त्या पैशांची स्पोर्ट्स/ शिक्षण्/फॅसिलिटीज अशी विभागणी कशी होते ? शिक्षकांमधे व विद्यार्थ्यांमधे डायव्हर्सिटी किती आहे ? किती टक्के मुलं दरवर्षी कॉलेजात जातात ? किती मुलांना स्कॉलरशिप्स मिळतात ? प्रत्येक राज्याच्या अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट्स असतात - त्या टेस्ट मधे शाळेचा रँकिंग किती आहे - वाढतंय की कमी होतंय या सगळ्या बाबींकडे लक्ष द्यायला सांग मैत्रिणीला.

मनु, हे सर्व शॉटस अमेरिकेतच घेतलेले असावे लागतात. बाहेरच्या देशात घेऊन आलेले शॉटस व्हॅलिड धरत नाहीत.. स्वानुभव. जपानमधून अमेरिकेत आलो तेव्हा इथल्या गरजांप्रमाणे लेकीला एकाच दिवशी ८ शॉटस घ्यावे लागले.

असं का गं सायो? निषाद इथे आला तेव्हा पावणेतीन वर्षांचा होता. त्याच्या भारतातल्या डॉक्टरांकडून मिळालेला इम्युनायझेशन रेकॉर्ड आम्ही इथल्या डॉक्टरांना दिला. त्यांनी तो तसाच्या तसा आपल्या फाइलमधे न ठेवता त्यांच्या डेटामधे नोंदवून घेतला. आणि निषादला एकही इंजेक्शन जास्तीचं घ्यावं लागलं नाही. (खरं तर काही इंजेक्शन्स पुन्हा देता येत नाही धोक्याचं असतं!)
वरच्या एका पोस्टमधे मी ज्या मुलाबद्दल बोलले त्याच्या आईला विचारते आज की त्याला हे शॉट्स पुन्हा घ्यावे लागले का.

ओह, सायो हे पहिल्यांदाच ऐकतेय. आर्यक पण इथे आला तेव्हा वय दीड होता. पण त्या आधीचे सगळे शॉट्स भारतातले च होते. ते फक्त रेकॉर्ड कॉपी केले इथल्या पेडिअ‍ॅट्रिशियन ने.

धन्यवाद सर्वांना.
मला वाटते tetanus चे shots दहा वर्षात एकदाच देतात ना? मृ म्हणते तसे काही vaccines पुन्हा पुन्हा देणे चांगले नसते ना.

Exactly .. Shots वारंवार देता येत नाहीत. तेव्हा त्याना आधीचे Record बघावेच लागेल..

विनय Happy

माझ्या मुलीला पब्लिक स्कूल मध्ये घालायचे आहे या वर्षी (सप्टेंबर) तिच्या सध्याच्या शाळेतून रजिस्ट्रेशन साठी पत्र मिळाले आहे. वरच्या वेबसाईट बघून जर्सी सिटीतल्या एकूणच शाळांचे रेटिंग कमी असल्याचे दिसतेय. एडिसनला शाळा उत्तम आहेत असे समजले आहे. पण तिकडे शिफ्ट झालो तर नवर्‍याला ऑफिस फारच लांब पडेल. इथे प्रायव्हेट किंवा charter शाळांमध्ये फी किती असते? कोणाची मुले जर्सी सिटीमधे पब्लिक स्कूल ला आहेत का?

Private school च्या फिया वर्षाला २५ ते ४० हजार डॉ. असतात..
ऑफिसच्या अंतरापेक्षा मुलांचे शिक्षण महत्वाचे म्हणून बहुतेक लोक Internal New Jersey मधे रहातात...

Charter शाळांची माहीती नाही...

मुलीला पब्लिक स्कूल मधे घालण्याकरता फोर्म आणलेत , त्यात result of mantoux TB skin test completed within past 12 months or risk assessment as recommended by public health असा १ मुद्दा आहे.
भारतात जन्मलेल्या मुलाना BCG ची लस दिलेलीच असते, जी अमेरिकेत देत नाहीत. मग ही लस दिलेल्या मुलान्चे हे टेस्टीन्ग करतात का , केल्यावर टेस्ट + येते का? आल्यास काय करतात? लेड डीटेक्शन टेस्ट तिची २ वर्षाची असताना इथे आल्या आल्या झाली होती तर ती परत करतात का ??

परदेसाई, बापरे खूपच फी आहे कि.. ह्म्म नॉर्थ एडिसन मध्ये कोणता एरिया राहण्यासाठी/शाळेसाठी चांगला आहे? तिकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे की कारच घ्यावी लागेल? म्हणजे मग तसे आता घर बदलावे असा विचार चालू आहे.

लेड डीटेक्शन टेस्ट तिची २ वर्षाची असताना इथे आल्या आल्या झाली होती तर ती परत करतात का ??
>> मोस्टली नाही तरी ते स्टेट आणी टाउन प्रमाने डिफर करते.काही टाउन किंवा स्टेट प्रमाणे ४ थ्या वर्षी परत टेस्ट करतात.तुमच्या पेडिला विचारु शकता.

माझ्या मते लेड डिटेक्शन किंवा टिबी टेस्ट केल्याला ६ महिने झाले असतील तर परत करावी लागते.

अंजली, न्यू पोर्ट ना, मग भरपूर चॉईस आहे की तुला. इथे बास्किंग रिज वगैरेही चांगले ऑप्शन्स आहेत शाळेकरता.

Pages