US मधील शाळा,अ‍ॅडमिशन ह्याची माहीती हवी आहे.

Submitted by मनःस्विनी on 29 June, 2009 - 15:35

हॅलो,
मला एका जवळच्या मैत्रीणीसाठी माहीती हवी होती. ती अमेरीकेत सेटले होण्यासाठी भारतातून येणार आहे पुढच्या आठवड्यात. तिची कंपनी नूजर्सीतच आहे piscataway मध्ये बहुधा. तेव्हा रहाणार तिथेच व जवळपास भागात. तिच्या मुलीची शाळेची चिंता तिला आहे.
मुलगी 8th grade CBSE Board च्या शाळेत जात होती भारतात. आता 9th grade मध्ये गेली पण पुढच्या महीन्यात इथे येणार म्हणून तिचे अ‍ॅडमिशन कुठे घ्यायचे तिला माहीत करून घ्यायचे आहे.
काही तिचे प्रश्ण इथे पोस्ट करते आहे, मदत मिळेल ह्या आशेने. Happy

1)piscataway or nearby अश्य कुठल्या शाळा चांगल्या आहेत? खास करून त्यांचा रेकॉर्ड चांगला आहे मुलांच्या प्रगतीसाठी?
2) शाळेच्या अ‍ॅडमिशनचा general criteria(Foreign students, scholarship, total expense ability, only county specific based admission given or what? ) काय आहे जर direct 9th grade मध्ये घालायचे आहे? इतक्या उशीरा अ‍ॅडमिशन मिळेल का?
3) सहसा काय procedure असते? व काय काय documents लागतील 9th grade मध्ये अ‍ॅडमिशन घ्यायचे असेल तर?
4a) last but not least, आता ह्या ग्रेड मध्ये मुले अ‍ॅडजस्ट होतात का इथील अभ्यासक्रमाशी?

4b) कोणाला अभ्यासक्रमाविषयी माहीती आहे? compare करायला गेलो तर मुलाना जड होतो का इथे आल्यावर? एक उलट उदाहरण पाहीलेय की, १२ वर्षी भारतात परतल्यावर भारतातील अभ्यस झेपत न्हवता.

१८ वर्षी येणे वगैरे समज असते. १३ वर्ष म्हणजे ना इधर का ना उधर का(असे माझे मतानुभव). Happy
कृपया कुणाच जो काही experience असेल तो पोस्ट केल्यास मदत होइल तिला. मुलगी एकदम मधल्या वयाची (१३ वर्षाची) असल्याने तिला चिंता लागलीय की emotionally ती हा change accept करेल का? तो ही अनुभव कुणाला असल्यास लिहिला तर बरे. माझ्याकडून माबोचे कौतुक खूप एकून असल्याने तिनेच मला विचारले, बघते का ग तुझ्या तिथे विचारून? Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोषवी, लस दिली असेल तर टेस्ट पॉझिटिव्ह येते. लस दिली आहे असं आधी सांगा डॉक्टरना मग ते टेस्टऐवजी एक्स-रे काढतील.

बास्किंग रीज, बर्कले हाईट्स वगैरे टाऊन्स आहेत बारात. त्यांची स्कूल डिस्ट्रीक्ट्स चांगली आहेत नी फार कम्युटही नाही तसंच मॉरीस काऊंटीमध्येही पहा हवं असल्यास.

न्यूयॉर्कात तरी लस दिल्याचं सांगूनही टेस्ट करून घ्यायला लावतात. Sad पॉझिटिव येतेच. मगच एक्स रे काढतात आणि सर्टिफिकेट देतात. (भारतातून आलेल्या मुलांना तर नक्कीच करून घ्यावी लागते.)

लेडचं प्रमाण किती आहे ते बघायला. Happy मला एकतर ब्लड टेस्टचं (मुलांच्या) भयंकर टेन्शन येतं त्यामुळे मी टाळाटाळ करतेय पण आता करावीच लागेल.

चला म्हणजे आता परत पेडी ची अपॉ . घ्यायला हवी. २ महीन्यापूर्वीच तिचे फिजिकल रूटीन चेकप झाले तेव्हाच हे सारे करून घ्यायला हवे होते , आता परत जा , सुया टोचा आणि रडारडः(

माझ्या लेकाचं रुटीन, इम्युनायझेशन आत्ताच फेबमध्ये झालंय. तेव्हाच डॉक म्हणाली की आता शाळेच्या वेळी नव्याने काही लागणार नाही. फक्त डेंटल, लेड टेस्ट आणि टीबी टेस्ट करायचं आहे जूनच्या आत.

Pages