अंडेदिन - कॅसरोल

Submitted by लोला on 13 October, 2011 - 21:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ ते ३ अंडी (मोठी असतील तर २ पुरेत.)
३ कप ब्रेडचा चुरा (ब्रेडचा चुरा मोकळा असावा. कडा काढून हलक्या हाताने चुरा करावा.)
पाऊण कप दूध
३ ब्रेकफास्ट सॉसेजेस (चिकन किंवा इतर), फ्लेवर्ड चालतील
पालक, टोमॅटो, ढबू इ. इतर भाज्या ऐच्छिक.
मीठ
मिरपूड
साखर
१ मोठा चमचा किसलेले चीज (cheddar)
तेल

क्रमवार पाककृती: 

- सॉसेजेस ५-१० मिनिटे ग्रिल करुन घेऊन त्यांचे तुकडे करावेत. कुक्ड असतात त्यामुळे ग्रिल केले नाहीत तरी चालेल.
- ब्रेडच्या चुर्‍यात अंडी फोडून घालावी.
- हळूहळू दूध घालत नीट फेटून घ्यावे.
- त्यात सॉसेजेस घालावीत.
- भाज्या, मीठ, मिरपूड, साखर घालून मिसळावे.
- बेकिन्ग डिशला सढळ हाताने तेल लावून मिश्रण त्यात ओतावे. वरुन चीज पसरावे. (दिलेल्या प्रमाणाला ८ इन्च स्क्वेअर डिश पुरेल)
- ४०० डिग्री फॅ. ला १५-२० मिनिटे बेक करावे
- फुगून वर आले आणि बाजूने सुटू लागले की oven बंद केला तरी चालेल. मग थोडावेळ भांडे आतच ठेवावे.

फोटोतल्या पदार्थात भाजी म्हणजे फक्त पालक वापरला आहे.

casserole.jpgcasserole2.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ किंवा १च व्यक्ती
अधिक टिपा: 

झटपट ब्रेकफास्ट होतो किंवा सूपबरोबर डिनरला चालतो. आवडीनुसार कांदा, भाज्या इतर मसाले घालू शकता. पण न्याहरीसाठी असाच चांगला लागतो.

लाजोच्या 'अंडीदिन' कार्यक्रमांतर्गत माझ्यातर्फे हा पदार्थ. Happy

माहितीचा स्रोत: 
सहकर्मचारी (माजी)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्रेकफास्ट साठी चांगले आहे. सर्व पदार्थ आहेत घरात. मुख्य म्हणजे सॉसेजेस संपवायचे आहेत. तरी करून बघीनच. सध्या शाळा सुरू झाल्याने सकाळी साडेसहालाच ब्रेकफास्ट रेडी ठेवावा लागतो.

सेंटिग्रेड मध्ये किती ला ठेवायचे माझे केकचे सेटिंग २२० डिग्री सें आहे. पिज्झा चे १८० डिग्री फॉर १५ मिन. मी पहिले ४०० डि. सें वाचले व आपल्यात हे सेटींग नाही कि गडया असा विचार आला डोकेमें. फोटोत
सालीसकट बटाटा आहे का?

मामी, २०० चालेल.
बटाटा सालासकट आहे. अमेरिकेतले ब्रेकफस्ट पोटॅटोज म्हणजे आपली बिनतिखटाची बटाट्याची भाजी. Proud

ही जुन्या माबोत होती.

झब्बू. यात झुकीनी आणि ब्लॅक ऑलिव्ह्ज पण घातलेत.

Optimized-DSC07863.JPG

अंड आवडत नाही. केक शिवाय कशातच. त्यामुळे माहित नाही कसा लागतो ते.

अमेरिकेतले ब्रेकफस्ट पोटॅटोज म्हणजे आपली बिनतिखटाची बटाट्याची भाजी>> आम्ही हॅश ब्राउन व मॅश्ड पोटॅटोचे जबरी फॅन आहो. वजनाकडे लक्ष न देता ते खरपूस हॅश ब्राउन खात असतो. ( ते ब्रेकफास्ट मध्ये गोल गोल बटाट्याचे करून देतात ते काय गं असे विचारून लिहीण्यात आले आहे त्यामुळे हॅश ब्राउनच बहुतेक.)

आज अंडयानेच पोपट केला एकच अंडे घरी. उद्या घेउन येणार रविवारी करणार.

अन्कॅनी मी पण हा प्रकार करते नेहेमी. झटपट, चवदार आणि सगळ्यांना सहजी आवडणारा.
मागच्या वर्षीचा फोटु डकवते.
Fritata.jpg

छान