२ ते ३ अंडी (मोठी असतील तर २ पुरेत.)
३ कप ब्रेडचा चुरा (ब्रेडचा चुरा मोकळा असावा. कडा काढून हलक्या हाताने चुरा करावा.)
पाऊण कप दूध
३ ब्रेकफास्ट सॉसेजेस (चिकन किंवा इतर), फ्लेवर्ड चालतील
पालक, टोमॅटो, ढबू इ. इतर भाज्या ऐच्छिक.
मीठ
मिरपूड
साखर
१ मोठा चमचा किसलेले चीज (cheddar)
तेल
- सॉसेजेस ५-१० मिनिटे ग्रिल करुन घेऊन त्यांचे तुकडे करावेत. कुक्ड असतात त्यामुळे ग्रिल केले नाहीत तरी चालेल.
- ब्रेडच्या चुर्यात अंडी फोडून घालावी.
- हळूहळू दूध घालत नीट फेटून घ्यावे.
- त्यात सॉसेजेस घालावीत.
- भाज्या, मीठ, मिरपूड, साखर घालून मिसळावे.
- बेकिन्ग डिशला सढळ हाताने तेल लावून मिश्रण त्यात ओतावे. वरुन चीज पसरावे. (दिलेल्या प्रमाणाला ८ इन्च स्क्वेअर डिश पुरेल)
- ४०० डिग्री फॅ. ला १५-२० मिनिटे बेक करावे
- फुगून वर आले आणि बाजूने सुटू लागले की oven बंद केला तरी चालेल. मग थोडावेळ भांडे आतच ठेवावे.
फोटोतल्या पदार्थात भाजी म्हणजे फक्त पालक वापरला आहे.
झटपट ब्रेकफास्ट होतो किंवा सूपबरोबर डिनरला चालतो. आवडीनुसार कांदा, भाज्या इतर मसाले घालू शकता. पण न्याहरीसाठी असाच चांगला लागतो.
लाजोच्या 'अंडीदिन' कार्यक्रमांतर्गत माझ्यातर्फे हा पदार्थ.
मस्त साधारण फ्रिटाटा सारखे
मस्त
साधारण फ्रिटाटा सारखे आहे.
मी झब्बु देऊ????
ब्रेकफास्ट साठी चांगले आहे.
ब्रेकफास्ट साठी चांगले आहे. सर्व पदार्थ आहेत घरात. मुख्य म्हणजे सॉसेजेस संपवायचे आहेत. तरी करून बघीनच. सध्या शाळा सुरू झाल्याने सकाळी साडेसहालाच ब्रेकफास्ट रेडी ठेवावा लागतो.
सेंटिग्रेड मध्ये किती ला ठेवायचे माझे केकचे सेटिंग २२० डिग्री सें आहे. पिज्झा चे १८० डिग्री फॉर १५ मिन. मी पहिले ४०० डि. सें वाचले व आपल्यात हे सेटींग नाही कि गडया असा विचार आला डोकेमें. फोटोत
सालीसकट बटाटा आहे का?
मस्त!! फोटोतला कॅसरोल उचलून
मस्त!!
फोटोतला कॅसरोल उचलून तोंडात टाकावासा वाटतो आहे.
खमंग वास आला बरं का !
खमंग वास आला बरं का !
तो.पा.सु. एकदम.
तो.पा.सु. एकदम.
खरच एकदम देखणा पदार्थ आहे
खरच एकदम देखणा पदार्थ आहे
'अंडीदिन' संपला नसेल तर मी पण एक पा.कृ. टाकेन म्हणते.
वा वा, मस्त!
वा वा, मस्त!
नक्की करुन पाहीन..मस्त दिसतो
नक्की करुन पाहीन..मस्त दिसतो आहे..तो.पा.सु.
छान दिसतेय.
छान दिसतेय.
सोपी दिसतेय. सॉसेजेस वगळून
सोपी दिसतेय. सॉसेजेस वगळून मुलांकरता करुन बघणेत येईल.
मस्त!
मस्त!
मामी, २०० चालेल. बटाटा
मामी, २०० चालेल.
बटाटा सालासकट आहे. अमेरिकेतले ब्रेकफस्ट पोटॅटोज म्हणजे आपली बिनतिखटाची बटाट्याची भाजी.
ही जुन्या माबोत होती.
झब्बू. यात झुकीनी आणि ब्लॅक
झब्बू. यात झुकीनी आणि ब्लॅक ऑलिव्ह्ज पण घातलेत.
अंड आवडत नाही. केक शिवाय कशातच. त्यामुळे माहित नाही कसा लागतो ते.
अमेरिकेतले ब्रेकफस्ट पोटॅटोज
अमेरिकेतले ब्रेकफस्ट पोटॅटोज म्हणजे आपली बिनतिखटाची बटाट्याची भाजी>> आम्ही हॅश ब्राउन व मॅश्ड पोटॅटोचे जबरी फॅन आहो. वजनाकडे लक्ष न देता ते खरपूस हॅश ब्राउन खात असतो. ( ते ब्रेकफास्ट मध्ये गोल गोल बटाट्याचे करून देतात ते काय गं असे विचारून लिहीण्यात आले आहे त्यामुळे हॅश ब्राउनच बहुतेक.)
आज अंडयानेच पोपट केला एकच अंडे घरी. उद्या घेउन येणार रविवारी करणार.
"टेटर टॉट्स" का अमा?
"टेटर टॉट्स" का अमा? (http://www.flickr.com/photos/limegreeney/1204386350/in/pool-849792@N21) छान लागतात.
मस्तच. किती सुरेख सोनेरी /
मस्तच. किती सुरेख सोनेरी / लाईट ब्राऊन रंग आलाय
अन्कॅनी मी पण हा प्रकार करते
अन्कॅनी मी पण हा प्रकार करते नेहेमी. झटपट, चवदार आणि सगळ्यांना सहजी आवडणारा.
मागच्या वर्षीचा फोटु डकवते.
छान
छान
तिकडे ब्रेडचे काय करु म्हणुन
तिकडे ब्रेडचे काय करु म्हणुन विचारतायत. त्यात ही वाचली. ही पण मस्तय. तळण नसले की सोपे वाट्ते.
मलाही करुन पाहायची आहे. बघुया
मलाही करुन पाहायची आहे. बघुया कधी मुहुर्त निघतो तो....
अंड्प्रेमी.