Br Ba

Submitted by तृप्ती आवटी on 5 December, 2013 - 10:46

If you aren't watching "Breaking Bad" at the moment, you need to reconsider your life choices!

Braking-Bad--620x400.jpg

"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्‍या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!

ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch

ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm

ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad

http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki

साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music

गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/

http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0

ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.

brba.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृ, Lol

>> क्रिस्टलमेथ म्हणून कसले तुकडे आणतात देव जाणे! किती सुंदर दिसतात ते!

जपून .. न जाणो अशीही सुरूवात होत असेल हां .. Lol

लोकहो इथे वाचून ब्रेबॅ बघायला सुरवात केली आणि आता कंट्रोल करणे शक्य होत नाहीये Proud
एक दोन किळसवाणे सीन पाहिल्यावर काय पाह्तोय आपण असेही वाटले पण जेसी आणि वॉल्टसाठी पाहणारच! एक कळले नाही पहिल्यापासून वॉल्टर ज्यु. ला वडिल आवडत नसतात का?
हँक डेड बॉडीशेजारी फोटो काढून घेताना हसत असतो... कधीतरी हा माणूस नॉर्मल दाखवलाय का?

बापरे, सिझन ४ चे शेवटचे काही एपिसोडस काय घेतलेत.. आज सि४ए१३ पाहणार. ड्रामा कमालीचा सुंदर घेतलाय.
स्कायलर मला पहिल्यापासून डोक्यात जाते. आता तर फारच.

ते लिली ऑफ द व्हॅलीचे काय झाले नक्की. आय मिन, वॉल्टचेच उद्योग हे कळतंय. पण नक्की काय कधी नाही कळले.. असो.. गस काय ड्यांजर दिसला बापरे. मी खरोखर हादरले.

+१ बस्के. मला फार आवडलं गस फ्रिंगचे काम. त्याला इतर सिनेमांमध्ये पाहिलाय पण गस फ्रिंग म्हणून जबरी वाटला.

मला आता सीझन ३, ४ म्हटल्यावर काही आठवत नाही पटकन. ब्रे बॅ नंतर लॉस्टचे सहा सीझन आणि हा ऑ का चा दुसरा सीझन बघून मेमरी पुसट झाली Wink

तो गस चा भाग अ आणि अ नाही का वाटला?

*स्पॉयलर अलर्ट*
असं अर्धंच डोकं शिल्लक राहिलेला माणूस चालत बाहेर येऊ शकेल का? Wink

***************स्पॉयलर!*****************************

अ आणि अ असला तरी इट वॉज ऑसम! मी थबकलो होतो, मला वाटलं खोलीतला बार फुसका निघाला.

** स्पॉयलर अलर्ट कंटिन्युज् ** Wink

थबकले मीही पण आधीच जेव्हा तो म्हातारा वरचे वर घंटी वाजवत होता .. मला वाटलं त्यानेच मन बदललं की काय स्वतःचं ..

नंतरचं ड्रॅमॅटिक आहे नक्कीच पण अ आणि अ आहे ..

कमाल म्हणजे इतकी वाईट हालत झालेली असूनही नेहेमीप्रमाणे शांतपणे बाहेर येऊन कोटाबिटाचे बटण लावले. हेहे.. अचाट आणि अतर्क्य आहेच. पण मस्त इनोव्हेटीव्ह कल्पना आहे! Biggrin

zala pahun...

itka marathon kelay ata doka bhanbhantay. ashaky gripping ahe last season. mala tya confession chya veles pasun walt chya vagnyaachi chid yeu lagli hoti.. holly chya scene la tar vaitagun laptop band kela.. aur kitna giroge...

काल झाले बघून. साधारण तिसर्‍या सीझन पासून खतरनाक झाले एपिसोड्स. हे 'लाइव्ह' न पाहिल्याने वेगळा अनुभव येतो असे मला वाटते. अजून इतके एपिसोड्स बाकी आहेत म्हणजे सध्याच्या पेचातून हे नक्की सुटणार हे माहीत असते (त्यामुळेच गाय रिचीच्या चित्रपटांसारखे वाटत राहते - ज्यात मुख्य हीरो लोक स्वतः छोटे मोठे गुन्हेगार असतात, ते एखाद्या मोठ्या अडचणीत सापडून शेवटी बरोबर सुटतात. देल्ही बेली हा तसाच). तरीही त्या त्या वेळेस ज्या अडचणीत वॉल्ट, जेसी ई. सापडलेले असतात त्यातून नक्की कसे बाहेर पडतात याचे कुतूहल राहतेच. कारण कोणतेही सोप्पे उपाय ("प्लॉट डिव्हाइस") न वापरता हे केले जाणार आहे हे ही आपल्याल लेखनाचा टोन पाहून माहीत असते - आणि त्यात शेवटपर्यत निराशा होत नाही. एक दोन वेळेस स्क्रिप्ट मधे गोच्या वाटल्या थोड्याश्या, पण पहिल्यांना बघताना त्यावर विचार करत न बसता आपण पुढे काय होते आहे ते बघत राहतो.

ब्रायन क्रॅन्स्टन चे काम भन्नाट झाले आहे. सुरूवातीचा सॉफ्ट नेचर वाला प्रोफेसर ते नंतरचा अवतार तो बदल खतरनाक आहे.

हायझेनबर्ग प्रिन्सिपल वाल्या हायझेनबर्गचा फोटो लक्षात नाही पण यापुढे हे नाव दिसले की काळी टोपी घातलेला वॉल्टच समोर येणार कायम Happy

नमस्कार मंडळी....मी हा बाफ आज पाहतोय.....ब्रेकिंग बॅड कधीच बघून झालंय....खरंतर पारायणं करून झालीयत....इथे इतक्या सगळ्या पंख्यांना एकत्र बघून अभिमानानं भरून आलं मला.....सगळ्याच प्रतिक्रिया मस्त आहेत!! वाइट मात्र वाटतंय की ही चर्चा अ‍ॅक्टीव्हली चालू असताना मी त्यात नव्हतो म्हणून....

Bryan says, "You never saw bags zip up ... Never say never! Walt may be alive and survived gunshot wound". Wink

'बेटर कॉल सॉल' हायजनबर्गपासून सुरू होईल? नाही झालं तरी, परत एकदा रायटर्सना दंडवत. शक्यता नक्कीच ठेवली आहे.

लिली ऑफ द व्हॅली काय होतं समजलं का बस्केला? वॉल्टनेच त्या मुलावर विषप्रयोग केलेला असतो आणि जेस्सीला मात्र हे गसचं काम असणार असं वाटतं.

मी अजून पाचवा सीझन बघतेच आहे Uhoh

पाचवा म्हणजेच शेवटचा ना? पुर्वी त्याचे शेवटचे भाग अ‍ॅमेझॉन वरच होते फक्त .. त्यांनां काही लोक सहावा सीजन म्हणायचे ..

(मागच्या वर्षी ब्रे बॅ मध्ये लिलीज् ऑफ द व्हॅली चा उल्लेख ऐकला, त्याआधी रे मधल्या डेब्राची ती आवडती फुलं हे माहित होतं पण कधी बघितली नव्हती .. कॉस्टको मध्ये त्याचे बल्ब्ज् दिसले आणि फुलंही खूप आवडली दिसायला म्हणून कौतुकाने लावले तर ढिम्म काही आलं नाही .. :|)

अगं ते वॉल्टचेच उद्योग हे कळले होते तेव्हा.. पण काय कळले नव्हते ते आता आठवत नाही. Proud
असूदे हे काय आज एकदम. मला परत तिकडे ओढू नकोस! ब्रेकींग बॅड परत पाहायला लागले तर अवघड होईल.. Proud

येस्स्स्स...आता बेटर कॉल सॉल... रच्यकने, ब्रेबॅ चे दिवस असा लेखच लिहीता येईल... इतकी head over heels बघितली ही मालिका!

वाचलं Biggrin आयड्या भारी आहे. पण थोडं विस्कळीत लिहील्यासारखं वाटलं. या मालिकेतले पुढचे "थोर" आले की सांग नक्की.

पाचवा म्हणजेच शेवटचा ना? >>> हो, नेटफ्लिक्सवर आहेत सगळे सीझन.

मो | 5 December, 2013 - 12:40

मी टायटल 'बेकींग ब्रेड' असं वाचलं आणि सिंडीने ब्रेड बेकींग वर बाफ काढलाय म्हणून बघायला आले फिदीफिदी

अलीकडे बर्‍याच काळात (म्हणजे उदा. 'लॉस्ट' संपल्यानंतर) कुठलीच मालिका इतकी उत्कंठावर्धक/थरारक आणि हृदयस्पर्शी वाटली नव्हती. >> लॉस्ट बद्दल +१. मी ब्रेबॅ सुरु केली नाहीये अजुन, पण घरी त्याची पारायणं झाली आहेत फिदीफिदी
>>>>

केली रे केली, फायनली पहायला सुरुवात केली. सव्वा वर्षानंतर का होईना!! Happy
इथलं फार वाचत नाही कारण आजून पहिल्याच सिझनवर आहे.

Pages