ओले खोबारे,शेंगदाणे व कोथिंबीर यांची परतून सुकी चटणी

Submitted by pltambe@yahoo.co.in on 23 March, 2014 - 05:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सांगणार आहे.
साहित्य : एक वाटी नारळाच्या करवंटीस आतील बाजूस शिल्लक (न खवलेले) राहिलेले ओले खोबरे (बारीक करून घ्यावे), ५-६ लसणाच्या पाकळ्यांचे बारीक तुकडे , चवीपुरते चिंचेचे बुटुक ,चमचाभर भाजलेले तीळ , चवीनुसार ४-५ हिरव्या मिराचांचे तुकडे व मीठ आणि साखर , कढीपत्त्याची ४-५ पाने (बारीक चिरून) , फोडणीसाठी तेल , जिरे , मोहोरी , हिंग व हळद .

क्रमवार पाककृती: 

कृती : गॅसवर एका कढईत फोडणीसाठी दोन चमचे तेल तापत ठेवून तेल तापल्यावर त्यात चवीनुसार हिरव्या मिरच्यांचे तुकडे,लसणाच्या पाकल्याचे तुकडे,जिरे,मोहोरी,हिंग,हळद,कढीपत्त्याची पाने ,तीळ घालून परतवून घ्यावे व मग त्यातच ओले खोबरे घालून पुन्हा एकदा परतावे,मग चवीनुसार साखर व मीठ घालून साखर विरघळेपर्यंत पुन्हा परतत राहावे पाच मिनिटे परतल्यावर गॅस बंद करून , गार झाल्यावर ही चटणी एका काचेच्या बाउल मध्ये काढून ठेवावी.
ही चटणी दोन तीन दिवस छान टिकते. नंतर मात्र सुक्या खोबर्यास व त्यामुळे ह्या चटणीस खवट वास येण्याची शक्यता आहे

वाढणी/प्रमाण: 
५ व्यक्तिसाठी
अधिक टिपा: 

नारळ फोडून त्यातील चव खवून काढून झाल्यावर करवंटीच्या आतील भागास न खवलेले जे खोबरे चिकटून शिल्लक राहेलेले असते ते दुसर्याूदिवशी सुरीने अगर चमच्याने काढून घ्यावे व त्याचाच उपयोग करुन छान खमंग अशी चटणी होते व चार-पांच दिवस छान तिकतेसुद्धा.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ही खायची कशाबरोबर? त्याहि पदार्थाची कृति सांग ना!
बहुतेक सुरळीच्या वड्या, कमी तिखट उपमा वगैरेवर? अळूच्या वड्या?
लग्गेच कुणाला तरी करायला सांगतो.

अरे ही खायची कशाबरोबर? त्याहि पदार्थाची कृति सांग ना!>>... कमाल आहे झक्की तुमची.:फिदी: अहो इडली, डोसा याबरोबर दह्यात कालवुन , भाकरीबरोबर तेल घालुन झकास लागेल ना.

अहो प्रमोद ताम्बे हे चटणीचे जिन्नस वाटायचे नाही का? आणी चिन्च कधी घालायची? वाटणातच ना?

कमाल आहे झक्की तुमची.फिदीफिदी अहो इडली, डोसा
मला वाटले नुसतीच खायची, एकामागून एक तोबरे भरायचे!! Happy

मी एकदा तरी प्रमोद तांबेकडे जाणार आहे नि तो मला आठवडाभर निरनिराळे पदार्थ करून खायला घालणार आहे!
मज्जाच आहे माझी न काय?

नक्की ना प्रमोद?

Happy