मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे. आम्ही (आम्ही म्हणजे अस्मादिक आणि सौभाग्यवती) चक्क झोप्या मारुतीच्या देवळामागे असलेल्या भाजी मंडईत आतपाव मिरच्या आणि कोथिंबीर-कडीपत्ता आणावयास गेलो होतो. (आमच्याकडे आजकाल प्रत्येक वळणावर आढळणार्या भाजीच्या गाडीला मंडई म्हणण्याची प्रथा आहे. कसं भारदस्त वाटतं). आम्ही आमच्या घरातून बाहेर पडलो. आधी सौ बाहेर पडल्या नंतर मी. (लोक म्हणतात बायकोच्या तालावर नाचतो, पण हा जमाना Woman Empowerment चा आहे याचा कोणी विचारच करत नाही). दाराला कुलूप लावून शेजारीच असलेल्या लिफ्टचे बटन दाबले. तशी सौ ने हाक दिली, "अरे, आपले आता नेहमी जिन्यानेच उतरायचे आणि चढायचे ठरलेय ना. शेजारच्या गोडबोलेकाकूंनी ,"तुझ्या नवर्याची तब्येत सुधारलीय हो आजकाल." असे सांगितल्यापासून सौ. कायम सारख्या माझ्या पोटाकडे (त्याला ती ढेरी म्हणते) नजर ठेवून असतात. चक्क दोन इंच आणि दिड सेंटीमीटर वाढलीय तुझी ढेरी. असे ती मला येता जाता सांगत (हिणवत) असते. मी विरोध करायचा प्रयत्न केला पण या आधी कधीच मी माझ्या पोटाचा आकार मोजलेला नसल्याने ते आधी किती इंच आणि किती सेंटीमीटर वगैरे होते हे नक्की माहीत नाही. त्यामुळे खात्रीने नक्की किती वाढलेय हे मी सांगू शकत नाही. ती याचाच गैरफायदा घेते.
असो तर आम्ही (थोड्या-थोडक्या नव्हे) तब्बल साडे तेवीस पायर्या उतरून खाली आलो. जिन्याची सगळ्यात खालची पायरी अर्धी तुटलेली आहे म्हणुन साडे तेवीस. शेजारच्या गोडबोलेकाकूंच्या हातातून सुटलेला त्यांच्या मुलीचा गाऊन त्या पायरीवर पडला होता म्हणे. ( आमची ही फणकार्याने म्हणते, त्या गाऊनमध्ये गोडबोल्यांची सुमी पण होती हे नाही सांगत मेली) असो, तर साडे तेवीस पायर्या उतरून आम्ही आमच्या दुचाकीकडे निघालो. रस्त्यात मध्येच पसरलेल्या जगतापांच्या टिप्या*कडे पाहात आम्ही हळूच स्मित केले तर त्याने चक्क मान फिरवली.
(जगतापांची सुशी वाईट्ट मारु दिसते आणि ती कायम टिप्याबरोबर खेळत असते).
सौ.ने अर्थातच मला खिजवण्याची एकही संधी न सोडण्याची शपथ घेतलेली असल्याने, ही संधीदेखील सोडली नाही आणि टोमणा मारुन घेतलाच...
"परवा तू देशपांडे काकांना ऐकवण्याच्या मिशाने त्या चकण्या सुशीला आपली नवीन कविता (खरे तर सौ. 'नव-कविता' म्हणाली होती) ऐकवत होतास ना, तेव्हा ती कविता टिप्याने पण ऐकली होती. त्यामुळेच कदाचित त्याने मान फिरवली असावी.
(कधी कधी मला शंका येते, मी हापिसाला गेल्यावर आमची ही त्या 'गुप्तहेर खमणरावांची'** सेक्रेटरी म्हणून पार्टटाईम काम करते की काय? कमाई बरी होत असावी. कारण गेल्या आठवड्यात माझ्या पायजम्याच्या खिश्यात असलेल्या अकरा रुपये पंचाहत्तर पैशापैकी फक्त ९ रुपये आणि ३५ पैसेच गायब झालेत - ** खमणराव)
असो, दुचाकी पाशी पोचल्यावर लक्षात आले की कुलूपाची चावी वर घरातच राहिली आहे. आमच्या दुचाकीचे कुलूप गेल्यावर्षी चोरीला गेले, तेव्हापासून मी दुचाकी नेहमी साखळीने बांधून ठेवतो. (खरे सांगायचे तर मी चावी मुद्दामच विसरून आलो होतो. दुचाकीचे टायर खुप लवकर झिजतात हो आजकाल. गुणवत्ता म्हणून कसली ती राहीलेली नाहीये बघा). सुदैवाने आमच्या बिल्डींगीपासून भाजी मंडईपर्यंत यायला कुणीही टांगेवाला यायला तयार नसल्याने आम्ही चालतच जायचे ठरवले. तसेही आमच्या कॉलनीच्या फाटकाबाहेर पडले की डाव्या हाताला शंभुसाचे मिरची कांडप यंत्र आहे, त्याच्या शेजारीच झोप्या मारुती. (नाही..नाही, इतिहास वगैरे काही नाही. रिकामटेकडे लोक दुपारची जेवणं झाली की तंगड्या पसरायला या मारुतीचा पार गाठतात म्हणून तो झोप्या मारुती) तर आम्ही तेथपर्यंत चालत जाऊन (तेवढ्येच क्यालरी बर्नींग पण होते हो) भाजी आणायची असे ठरवले. चालत चालत, रमत गमत, आजुबाजुचे निसर्गसौंदर्य (म्हणजे ती निसर्ग पाहत होती आम्ही सौंदर्य पाहात होतो) न्याहाळत आम्ही मंडईपर्यंत येवून पोचलो.
त्या कोपर्यावर बसलेल्या आज्जीबाईला मिरच्या आणि कोथिंबीर कडिपत्ता मागताच...
"मुडद्या, आतपाव मिरच्या मिळाचे दिस हायेत का हे? आन रुपयात कोतमीर कडिपत्ता तुझ्या काकानं तरी दिला व्हता का रे?" असे तीक्ष्ण शरसंधान करत चारचौघात आमची XXX काढली.
आम्ही पण अजिबात ऐकून घेतले नाही. "थांब थेरडे, तुझी तक्रारच करतो मुक्तपिठल्याच्या चौकीत म्हणजे कळेल तुला?" असा सज्जड दम दिला आणि सौभाग्यवतीच्या चेहर्यावरचे कौतुकाचे भाव बघत पुनश्च घराच्या दिशेने परतीच्या प्रवासास लागलो. त्यानंतर काही दिवसांनी त्यावेळी आमच्या सौभाग्यवतींच्या डोळ्यातले भाव कौतुकाचे नसुन कुत्सीतपणाचे असतील असा अतिकुत्सीत शेरा गोडबोलेकाकूंनी मारलाच. त्यावर मीही त्यांना ,"आजकाल तुमच्या सुमीचे वजन कमी झाल्यासारखे वाटतेय" असे म्हणून सुड घेवूनच टाकला. तर अशाप्रकारे आमचे हे मंडईप्रवासाचे प्रवासवर्णन पुर्ण झाले.
*टिप्या : हा जगतापांचा अतिशय गोंडस कुत्रा आहे.
*********************************
आगामी आकर्षणः पुढच्या वेळी, मागच्या वेळेस आम्ही दुचाकीच्या चाकात हवा भरून घेण्यासाठी शेजारच्या गल्लीतल्या वरल्ड्फेमस "मर्चीडेस सायक्ल शॉप' मध्ये गेलो होतो, त्या प्रवासाचे साद्यंत प्रवासवर्णन सादर करु.
तळटिप : प्रस्तुत लेख आम्ही सकाळ वृतपत्राच्या मुक्तपीठ या काही अभ्यासु लेखकांनी चालवलेल्या उपक्रमाने प्रेरीत होवून लिहिलेला होता. पण त्यांना आमचा हा लेख बहुदा जखमेवर मीठ वगैरे वाटल्याने साभार परत आला.
वि.सु. : आमच्या शेजारच्या गोडबोलेकाकुंचा जर तुम्हाला फोन आला तर त्या सांगतील की आमच्या बिल्डींगीला लिफ्टच नाहीये. तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवा कारण ते खरेच आहे. बिल्डींगीला लिफ्ट असली की स्टेटस वाढतो असे एका थोबडापुस्तिकेवरच्या स्नेह्याने सांगितल्याकारणे आम्ही तसा उल्लेख केलेला आहे. पण गोडबोलेकाकुंचा तुम्हाला फोन येणारच नाही कारण त्यांच्याकडे फोन नाहीये आणि त्या शेजार्यांकडे फोन करायला गेल्या की लगेच शेजार्याचा (आमचा पण) फोन बिघडतो. ठेंगा !
ईरसाल म्हमईकर
लोल.. विशाल कुलकर्णी हा
लोल..
विशाल कुलकर्णी हा माझ्या नाना वाडयातल्या शाळेचा विद्यार्थी ..................................................
--पो पा मॅडम
आपल्या आयुष्यात नाही एक दिवशी
आपल्या आयुष्यात नाही एक दिवशी तरी विनोदी प्रसंग (ढेरीवरचाही चालेल) घडावा असं तुम्हाला वाटतंय का ?
Srd माफ करा, पण मला तुमचा
Srd माफ करा, पण मला तुमचा प्रतिसाद कळला नाही. माझ्या आयुष्यात यापेक्षाही खुप विनोदी प्रसंग येवून गेलेले आहेत. त्यापैकी काही तर इथे माबोवरच आलेले आहेत.
आवडेश!!!
आवडेश!!!
:-)
असच कधितरी आगामी आकर्षणात
असच कधितरी आगामी आकर्षणात वर्तुळ पण येउ द्या
हे! अजून वाढवता आला असता
स्वाती ठकार, शुक्रवार- १६:३९
हे सर्व वाचुन माझे डोळे गरगर फिरायला लागलेत, मान्जरी सारख्या नखानी मी फुत्कारत सित्कारत माझेच केस विन्चरत आहे. विचारान्चा आणी सन्शयाचा कल्लोळ माजून वटवाघुळसारखे मी झोप्या मारुतीच्या मागच्या पिम्पलाच्या पारावर स्वतला उलटे टान्गुन घेतले आहे. विशाल आणी त्याची बायको नेहेमीच माझा अन्नुलेख करतात, हे सहन न झाल्याने मी पोतदार- पावसकर मॅडमला तक्रार करणार आहे.
"तळटिप " लिहीलीस बरे केले.
"तळटिप " लिहीलीस बरे केले. नाहीतर हा तुझा लेख आहे हे पटतच नव्हते. पुन्हा एकदा नाव कंन्फर्म केले. पण तळटीपेमुळे तुझे "गुरुस्थान" टिकलेय. तेव्हा तळटिपेला धन्स म्हण
(No subject)
नाही तसं काही नाही विशाल
नाही तसं काही नाही विशाल कुलकर्णी जरा गंमतीने ( फेसबुकचे Poke सारखं) लिहिलं .
(No subject)
लुनावले ब्रह्मे, शुक्रवार-
लुनावले ब्रह्मे, शुक्रवार- ६:५४
विशालकडे लुना नाही म्हणून तो माझ्यावर जळतो. मागे एकदा मी जगतापांच्या सुशीला माझ्या लुनावरून लिफ्ट दिली होती. आणि तिच्यासाठी कोपर्यावरच्या आजीबाईकडून ४००० रूपयांची मिरची-कोथिंबीर विकत घेतली होती. हे पाहून टिप्या खवळला आणि आमच्या मागे लागला. आजही मी दिसलो की टिप्या दुरूनच मागे लागण्याची धमकी देतो.
अजून येऊ द्या. चन्दुलाल
चन्दुलाल सुराणा, पगला गजोधर पण यायचेत.
झक्कास, खुसखीत .... ! >>
झक्कास, खुसखीत .... !
>> मुक्तपिठल्याच्या चौकीत <<< ........हा.... हा... हा.... एकदम कडक !!!
स्वाती ठकार, लुनावाले ब्रह्मेंनी इथेही पदार्पण केलेय म्हंजे धमाल येणार दिसतेय ! ही मुक्तपीठीय माणसे लिजंड होणार बहुतेक !
लिखते रहो, विकुभाई !
मस्तच.. फोटो हवे होते नै,
मस्तच.. फोटो हवे होते नै, निदान त्या वृद्ध भाजीवेक्रेतीचा तरी.. भाज्यांचे नसतील तरी चालतील !
बबनः वेगळा विदर्भ झालाच
बबनः
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे.
----------------------------------
लेख मस्तच.
(वेगळा विदर्भ घेवून काय वेगळे दिवे लावणार?)
"थांब थेरडे, तुझी तक्रारच
"थांब थेरडे, तुझी तक्रारच करतो मुक्तपिठल्याच्या चौकीत म्हणजे कळेल तुला?"
मेले हसुन हसुन
मस्त लेख. एकदम खमंग आणि खुसखुशीत..
तुमच्या फाइव स्टार लिफ्टवाल्या टॉवरचे वर्णन वाचुन तुमच्या हायर मिडल क्लास राहणीमानाची कल्पना आली. म्हंजेच तुमच्यावर पिठाचा गिरणीवाला, इस्त्रीवाला, रद्दीवाला इत्यादी उच्चभ्रु मंडळींच्या फायव स्टार मॉलमध्येही जाण्याचे प्रसंग वारंवार येत असतील. तेही प्रवासवर्णन येऊ द्या....
झकास... ब्रम्हेचे नातेवाईकही
झकास... ब्रम्हेचे नातेवाईकही येतीलच लौकर

अजुन येउ द्या....(= लिहायचा त्रास घ्या, आमच्या बापाचे काय जाते)
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
(No subject)
(No subject)
साधनादेवी, चिंता नसावी. लवकरच
साधनादेवी, चिंता नसावी. लवकरच आम्ही गुदस्ता साली केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचे (रवीवार पेठ ते चिंचवड) प्रवास वरणन इथे टाकणार आहोत.
लवकरच आम्ही गुदस्ता साली
लवकरच आम्ही गुदस्ता साली केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचे (रवीवार पेठ ते चिंचवड) प्रवास वरणन इथे टाकणार आहोत. >>>प्रवासवरणन छा.चि. शिवाय पुर्ण होत नसते, तस्मात फोटो हवेत.
नया है वह! कारण मुपि मध्ये
नया है वह!
कारण
मुपि मध्ये लेख लिहीणारी लेखक मंडली प्रतिक्रिया द्यायला परत परत येत नाही.

छान लिहले
छान लिहले
वत्सला.... रच्याक हे मायबोली
वत्सला....

रच्याक हे मायबोली आहे ना
विशाल. बायदवे आतपाव म्हणतात
बायदवे आतपाव म्हणतात का तुमच्या इथे?
माझ्या मते तो शब्द आधपाव (पाव किलोच्याही अर्धे ) असा आहे बहुतेक.
दक्शे, हा शब्द मी पेठेत ऐकला
दक्शे, हा शब्द मी पेठेत ऐकला होता. आम्ही सरळ-सरळ सव्वाशे ग्राम म्हणतो. उच्चारणे बदलत राहतात गं माणसा-माणसानुसार
तुमचा आतरराष्ट्रीय प्रवास
तुमचा आतरराष्ट्रीय प्रवास लवकर येऊ दे .पासपोर्ट कधी काढला ?
बाकी मलाही आहे अनुभव आंतररा० प्रवासाचा. मागच्या महिन्यात गाडीतळावर (पुणे रेल्वे स्टेशन) उतरून बाहेर पडून फळे/कपडे/पादत्राणे विकणाऱ्यांना नाना पेठ चा पत्ता विचारतांना भाषेची अडचण जाणवली .त्यांना मराठी येत नव्हते .पुढे आंबेडकरपुतळा दिसला आणि जिवात जीव आला .मोठया धैर्याने पिवळ्या टेलिफोन खोकड्यातल्या माणसास पत्ता विचारता झालो . एक मिनीट दुर्लक्ष करून आणि फोन करायला आलेलं गिऱ्हाईक नाही हे त्याने तिरप्या नजरेने ओळखले .धुळ झटकून जोराने खेकसला ,"ते इकडे कुठे ?तिकडे कैंपात".हात डोक्यामागे एवढा लांब केला की बहुतेक दुसरे विमान पकडायला लागेल .मी काकुळतीने म्हटले "इकडे दिसत नाही म्हणूनच विचारत होतो .रस्ता तरी दाखवा ".
आश्चर्य आणि चिडून दुसरा हात लांब करून "जावा तिकडं ".
मला चालण्याची सवय असल्यामुळे तिकडे लगेच वळलो .आणि काहीतरी पुटपुटला ते ऐकले नाही .राषट्रीय बारीक सूक्ष्मजीव (?आम्ही?)संशोधन संस्था आणि सी लाई (सिंगापूर ?)ला वळसा घालून पंचवीस मिनीटात पत्ता गाठला .मागचा रिक्षावाला ओरडत होता चला पुण्णे स्टेशन स्वाऽरगेऽट !
तुम्ही पुण्यातले नसलात तरी
तुम्ही पुण्यातले नसलात तरी डोंबिवलीतले आहात, तरी देखील पासपोर्ट काढला का म्हणून विचारताय शरदराव?
तसल्या फालतू अडचणी आम्हा (?) पुणेकरांना येत नाहीत म्हटलं
Pages