Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नंद्या, फक्त दुसर्या
नंद्या, फक्त दुसर्या भागांबद्दल लिहायचे का?
फा.. क्विन पाहिला.. मला आधी
फा..
क्विन पाहिला.. मला आधी काहीच माहित नव्हतं आणि वाटलं असं होतं की एकदम जड वगैरे चित्रपट असेल.
खूप मस्त सिनेमा आहे. संदेश दिला आहे पण एकदम हलक्या फुलक्या शैलीत. शेवटही आवडला. इमोशनल अत्याचार, रडारडी न करता अगदी मोजक दाखवून अपेक्षित परिणाम साधलाय. कंगना आणि तिच्या चार मित्रांची अॅक्टींग मस्त! कंगना म्हटलं की तिचे फॅशन छाप ड्रगी लुक्सच डोळ्यासमोर येतात. ह्या चित्रपटात खूपच बदल आहे. तरीही काही काही दृष्यांमध्ये तस वाटतच (जसं, अजूनही कधी कधी श्रीदेवी 'सदमा' स्टाईलनेच बोलते की काय असं वाटतं तसं.. :P) चित्रपट बघताना मधे मधे 'इंग्लिश विंग्लिश' ची आठवण होते.
चित्रपट आवडलाच एकदम !
क्विन : सॉलीड आवडला , स्टोरी
क्विन :
सॉलीड आवडला , स्टोरी नवीन काहीच नाही.
पण कंगनाची सहज अँक्टींग केलीय, खरे तर तिला मूळचे लूक्स तसे आहेत, व ते तिची बोलण्याची मूळची पद्धत
बोलणे त्यामुळे ते जमून जाते एका साध्याश्या घरातील मुलगी म्हणून.
छोट्या जोकमधून मस्त टाईमपास आहे. एकदा तरी बघावा.
पुरा लंडन ठुमकदा मस्त गाणं आहे. (उठून नाचावसं वाटेल असं)
(मध्ये तनू वेड्स मनू ची आठवण होते... साडे गली .... गाण्याची)
चित्रपट आवडलाच एकदम ! >
चित्रपट आवडलाच एकदम ! > +१००००
क्वीनची स्टोरी एका वाक्यात
क्वीनची स्टोरी एका वाक्यात लिहिता येईल का ? ' एकट्याने करावयाचे उद्योग '

बायदवे कंगणाला पापण्यांचे केस नाहीत का ? तिचे डोळे पापण्यांचे केस नसल्यासारखे दिसतात
क्वीन छान आहे.
क्वीन छान आहे. अनुमोदन.
क्वीनची स्टोरी एका वाक्यात लिहिता येईल का ? ' एकट्याने करावयाचे उद्योग>>
अगदी तसेच काही नाही. पाणीपुरी खिलवून बघ कोणालातरी.
कंगनाला एका ड्रंक सीन साठी अवार्ड तो बनता है.
क्वीन!!! येस. आवर्जून बघावा
क्वीन!!! येस. आवर्जून बघावा असा चित्रपट.
खूप खूप दिवसांनी असा हलकाफुलका सिनेमा पाहिला. कंगना -- हॅट्स ऑफ!! मला तिची मैत्रिण, ते परदेशी मित्र आणि तिचा परिवार पण आवडला. सगळेच कलाकार आपापल्या भूमिकेत चोख आहेत.
साधी पण सशक्त स्टोरी आणि कसलाही अतिरंजितपणा न करता निखळ करमणुकीचा अनुभव होता. जरूर बघा.
आवडती अभिनेत्री आहे कंगना,
आवडती अभिनेत्री आहे कंगना, तिचा हा चित्रपट चालावा अशीच इच्छा होती. आनंद झाला.
क्वीन!!! येस. आवर्जून बघावा
क्वीन!!! येस. आवर्जून बघावा असा चित्रपट.
खूप खूप दिवसांनी असा हलकाफुलका सिनेमा पाहिला. कंगना -- हॅट्स ऑफ!! मला तिची मैत्रिण, ते परदेशी मित्र आणि तिचा परिवार पण आवडला. सगळेच कलाकार आपापल्या भूमिकेत चोख आहेत.
साधी पण सशक्त स्टोरी आणि कसलाही अतिरंजितपणा न करता निखळ करमणुकीचा अनुभव होता. जरूर बघा. >>> १०० वेळा अनुमोदन..
मस्तच आहे हा चित्रपट..
क्वीन!!! येस. आवर्जून बघावा
क्वीन!!! येस. आवर्जून बघावा असा चित्रपट.
खूप खूप दिवसांनी असा हलकाफुलका सिनेमा पाहिला. कंगना -- हॅट्स ऑफ!! मला तिची मैत्रिण, ते परदेशी मित्र आणि तिचा परिवार पण आवडला. सगळेच कलाकार आपापल्या भूमिकेत चोख आहेत.
साधी पण सशक्त स्टोरी आणि कसलाही अतिरंजितपणा न करता निखळ करमणुकीचा अनुभव होता. जरूर बघा. >>> १०० वेळा अनुमोदन..>>>> +१००
क्वीन चित्रपटासाठी + १०००००
क्वीन चित्रपटासाठी + १००००० मस्ट वॉच मुव्ही
'शादी के साईड इफेक्टस्'
'शादी के साईड इफेक्टस्' ठिकठाक आहे.
दुसरा ऑप्शन असेल तर हा दूरचित्रवाणीवर आल्यानंतर पाहिला तरी चालेल.
सुजाने लिहिलंय तेच लिहायला आलो होतो ('नीट बांधताच आला नाहीये').
हल्ली पराडकर चित्रपटांचे रिव्ह्यू टाकत नाहीत का?
मी थेटरात जावून क्वीन दोनदा
मी थेटरात जावून क्वीन दोनदा पाहिला.
मजा आहे त्या ड्रंक सीनची.... टाईमपास.
काल मूव्ही ऑन डिमाण्डमधे
काल मूव्ही ऑन डिमाण्डमधे 'जॉब्ज' पाहिला. ठीकठाक वाटला. स्टीव्ह जॉब्जच्या आयुष्याचा धावता आढावा घेतला जातोय असं वाटत होतं. तुकडे तुकडे जोडलेले...एकापुढे एक घटना उलगडत होत्या.
१९७६/८४/८६ सालांतल्या घटना प्रामुख्यानं दाखवल्या आहेत. तिकडे ८४साली स्टीव्ह जॉब्ज आंतरराष्ट्रीय टेक-फेस्टमधे अॅपल-मॅक सादर करत होता, तेव्हा आपण इकडे काय करत होतो - असे विचार सिनेमा पाहताना अनेकदा केले गेले.
अॅपल कंपनीची सुरूवात कशी झाली तो घटनाक्रम आणि स्टीव्ह जॉब्जला जेव्हा अॅपल सोडावं लागलं तेव्हाच्या घटना प्रभावी वाटल्या.
एका लहानशा दृष्यात जॉब्ज आणि बिल गेटस यांच्यातलं फोनवरचं भांडण दाखवलं आहे.
अॅश्टन कुचर (उच्चार :अओ:) मला फारसा आवडत नाही. यातला त्याचा अभिनय ओके वाटला.
सर्वच पात्रांची वेषभूषा आणि वातावरणनिर्मिती मात्र आवडली.
विकएण्ड करमणुक: club 60: एकदा
विकएण्ड करमणुक:
club 60: एकदा बघायला ठीक आहे. फारुख शेख, सारीका, रघुवीर यादव (खुप वर्षांनी ), सतिश शहा असे oldies पण कसलेले अभिनेते आहेत. सारीकानेही चंगले काम केले आहे. स्टोरी काहीशी predictable आहे. दोघेही डॉक्टर असलेल्या फा.शे आणि सारीका यांचा शिक्षणाकरीता डेनव्हरला गेलेला मुलगा, तेथे सिनेमागृहात माथेफिरूने केलेल्या गोळीबारात जातो. सारीका ह्यातुन सावरते पण फा शेखला ते कठीण जाते. सिनेमा तसा सिरीयस आहे. ह्यात रघुवीर यादव आणि कं चा स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन कदाचीत न रुचण्याची शक्यता आहे. तरीही फा शेखचा शेवटचा सिनेमा एकदा बघायला हरकत नाही.
White House Down: Third Class Movie. C graded version of "Die Hard"
Misery: James Cann Kathy Bates यांचा Stephen King च्या पुस्तकावरुन घेतलेलाअ हा सिनेमा बघता बघता Psychlogical thriller होतो. Must Watch Movie.
शोले: एक शंका...... धर्मेंद्र आणि हेमामालीनीला जेंव्हा अभिताभ गब्बरच्या तावडीतुन सोडवतो तेव्हा आपल्याबरोबर गब्बरला "जिंदा" का ठाकुरकडे नेत नाहीत.
काल 'आंखो देखी' पाहिला.
काल 'आंखो देखी' पाहिला. म.टा.त साडे-तीन स्टार्स आले होते, शिवाय ज्यानं-त्यानं आपल्या परिनं अनुभवायचा सिनेमा, काहीतरी वेगळं दाखवणारा - असा रिपोर्ट होता.
त्यानुसार सिनेमा खरंच वेगळा आहे. काहीसा अॅब्स्ट्रॅक्ट आहे. ज्यानं त्यानं आपापला अर्थ काढावा त्यातून. (हे मला आवडतं.)
डोळ्यांनी समोर दिसेल त्यावरच केवळ विश्वास ठेवायचा, बाकी कश्यावरही नाही असं ठरवून जर माणसानं जगायचं ठरवलं तर अंतिमतः त्याच्या हाती काय येईल? - अशी साधारण थीम आहे.
सर्वांची कामं छानच आहेत. पण त्यापेक्षाही जुनी दिल्ली अशी काही सादर केली आहे, की त्या कॅमेरावर्कला आणि प्रकाशयोजनेला तोडच नाही. पार्श्वसंगीतातल्या शास्त्रीय आलापी म्हणजे केवळ मेजवानी.
कथानकात प्रेमप्रकरण आहे, लग्न आहे, भावाभावांतले गैरसमज आहेत, जुगाराचा अड्डा आहे, वाममार्गाला लागलेला घरातला तरूण मुलगा आहे...पण त्यावरचे दिग्दर्शकीय संस्कार, प्रतिक्रिया, हे सारं अमूर्ततेकडे झुकणारं आहे.
आज बघणार आहे 'आंखो देखी'.
आज बघणार आहे 'आंखो देखी'.
शोलेच्या बाबतीत अनेक शंका
शोलेच्या बाबतीत अनेक शंका आहेत.
रामगडमध्ये वीज नसते. मग इतक्या उंच पाण्याची टाकीत पाणी कसे चढवत असतील?
वीजच नाही तरीही पाण्याची टाकी बांधली.
रामगडमध्ये वीज नसते. मग
रामगडमध्ये वीज नसते. मग इतक्या उंच पाण्याची टाकीत पाणी कसे चढवत असतील>>>>
लगो बाकी अनेक शंका काय आहेत?
लगो बाकी अनेक शंका काय आहेत? वरची एम्भुरे ची रास्त आहे. टाकीबद्दल आधीच लिहून झाले आहे - जेथून त्या टाकीत पाणी आणले जाते ती जागा उंचावर असली म्हणजे झाले, वीजेची गरज नाही.
लगो, लई भारी शंका फारएण्ड मग
लगो, लई भारी शंका
फारएण्ड मग पाणी डोंगरावरून धावणा-या झ-याचेच हवे.
वीज नव्हती तर सांबा / गब्बर
वीज नव्हती तर सांबा / गब्बर गँग लोकांच्याकडून धान्य का गोळा का करत होते? मग ते जात्यावर दळत कोण होते? डायरेक्ट पीठच मागून न्यायचे की.
क्वीन आवर्जून बघावा असा
क्वीन
आवर्जून बघावा असा चित्रपट.
कंगनाचा अभिनय अप्रतिम
हलकाफुलका आणि विनोदी, बर्याच दिवसांनी असा चित्रपट पाहिला
क्विन सिनेमा मला आज्जिबातच
क्विन सिनेमा मला आज्जिबातच आवडला नाही.
क्विन सिनेमा मला आज्जिबातच
क्विन सिनेमा मला आज्जिबातच आवडला नाही.>>>>>>+१११११११११११............
क्विन सिनेमा मला आज्जिबातच
क्विन सिनेमा मला आज्जिबातच आवडला नाही.>>>>>> OK aahe... पण Overrated वाटला,
क्वीन मला आवडला. एकदम
क्वीन मला आवडला. एकदम एन्टरटेनिंग होता जे मला अपेक्षित होते. खूप दिवसांनी मजा आ गया असे वाटले हा सिनेमा बघून.
क्वीन रिफ्रेशिंग वाटला परत
क्वीन रिफ्रेशिंग वाटला
परत बघायला पण आवडेल. कंगणा मला तशी अजिबात आवडत नाही पण ह्यात तीच असायला पाहिजे होती असंच बघणार्याला वाटतं.
काल दुसर्यांदा पहिला क्वीन!
काल दुसर्यांदा पहिला क्वीन! टोटली वर्थ इट !!
खूप खूप दिवसांनी एवढा हलका फुलका चित्रपट पहिला असेन मी.
क्विन आवडला . धमाल आहे .फक्त
क्विन आवडला . धमाल आहे .फक्त आधी ते होणार्या नवर्याने लग्नाच्या आदल्या दिवशी नाही म्हणणे .आणि अचानक तिने मॉड फोटो पाठवल्यावर एकदम तिच्या प्रेमाबद्दल साक्षाकार झाल्यासारखा तिच्या पाठी पाठी येणे पटले नाही. पण ठीक आहे. तसा प्रसंग घालण्याची जरुरी नव्हती. ती घरी आल्यावर त्याच्या आई वडिलांना जरी तिने अंगठी परत केली असती तरी चालली असती. पण त्याला जळवून तिला करायचे होते ना. म्हणून त्याचे पाठी पाठी पडणे .
सिनेमा एकदम एन्टरटेनिंग. भन्नाट " हंगामा हो गया "
Pages