'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
<<.....ग्रीनरूफ ला जाऊया
<<.....ग्रीनरूफ ला जाऊया म्हणून..>> - अहो, दुसरी-चौथीतल्या मुलांचं काय घेवून बसलाय -
मराठी मालिकावाले किती बोअर
मराठी मालिकावाले किती बोअर आणि टिपिकल आहेत!! तुषार दळवी अमेरिकेतून आलाय म्हणून त्याला मोठाच्या मोठा फोन दिला का? टॅब फोनसारखा धरून बोलणे कसलं विनोदी असतं! आणि आकाशी रंगाचा कोट????? प्लीज! (सारेगमपमध्येही अभिजित परवा गुलाबी रंगाचा कोट घालून आला होता. चक्क गु ला बी! कोण कपडे पुरवतं यांना????) आणि अमेरिकेत होतास ना बाबा इतकी वर्ष? किती वेळा एखाद्याला फोन करावा, किती वेळा दाराची बेल वाजवावी, कोणाच्याही घरी कधी जावं याला काही संकेत असतात की नाही? म्यानरलेस!!
थोडक्यात काय, तर ओमचे बाबा अतिशय बोअर आहेत
ओम मात्र गोऽऽऽड. यात शंकाच नाही
उमेश खरंच गोऽऽड आहे
उमेश खरंच गोऽऽड आहे
एक मात्र आहे, तुषार दळवी आण
एक मात्र आहे, तुषार दळवी आण शिल्पा यांना जर मुलगा झाला तर तो ओमसारखा किमान दिसेल.
नाहीतर इतर वेळी आईअबाबा आणि मुलं यांच्यामध्ये काहीही साम्य नसतं!!!
उमेश खरंच गोऽऽड आहे>>>> येस्स्स.
<<उमेश खरंच गोऽऽड आहे>>>>
<<उमेश खरंच गोऽऽड आहे>>>> खरंय. ओमचे संवाद लिहीताना पण हा गोडवा जपण्याचा लेखकाने विशेष प्रयत्न केल्याचंही जाणवतं .
<<... तर तो ओमसारखा किमान दिसेल. >> बापरे ! 'कास्टींग' करताना इकडेही लक्ष द्यावं लागतं !!
तुषार दळवींच्या अभिनयाला साजेशी भूमिका त्याना बर्याच वर्षांत मिळाली नाहीय, असं सहजच वाटून जातं. इथं तरी त्यांच्या अभिनयाला वाव असावा अशी अपेक्षा !
बायको सोडलेल्या नवर्याच्या
बायको सोडलेल्या नवर्याच्या भूमिकांची मक्तेदारी >> कार्टुन >>
ते तसले टॅबसारखे फोने घेऊन बोलणारी माणसे दिसतात बरे. कसले विचित्र दिसते ते.. अशा लोकांना गदागदा हलवौन अरे बाबा ब्लुटुथे घे असे सांगावेसे वाटते मला.
पुण्यात ग्रीन रूफ नावाचं
पुण्यात ग्रीन रूफ नावाचं हॉटेल अजिबात नाहिये.
करी ऑन द रूफ आहे भांडारकर रोडला..
त्या ओमचा तो हिरवा शर्ट होळीत
त्या ओमचा तो हिरवा शर्ट होळीत जाळतील का? कंटाळा आला हो!
भाऊकाका छानच as usual.
भाऊकाका छानच as usual.
शिल्पा तुळसकर आणि तुषार दळवी
शिल्पा तुळसकर आणि तुषार दळवी हे उमेश कामत चे आई- बाबा म्हणून नक्कीच तरुण आहेत. आणि आज काल उमेश कामत पण मोठ्ठा दिसायला लागलाय .लग्नाचा मुलगा वाटतो का तो ?
<<कोणाच्याही घरी कधी जावं याला काही संकेत असतात की नाही? >> पौ अग तो बाबा स्वताच्याच घरी येतोय. त्याचच घर आहे ते. ते काय ओम च घर नाहीये . ओम मात्र आज काल खूप मोठ्ठा दिसायला लागलाय. तीन - चार वर्षाच्या मुलाचा बाप दिसतो तो
आगावा इशीचे पण सगळे ड्रेस
आगावा इशीचे पण सगळे ड्रेस जाळणं तर मस्टच आहे मग.
<< आगावा इशीचे पण सगळे ड्रेस
<< आगावा इशीचे पण सगळे ड्रेस जाळणं तर मस्टच आहे मग.>> त्या 'भिकार पर्स'सकट !!
पण, मीं म्हणतो, ओम आणि ईशाला जर एकमेकांचे ड्रेस नसतील खटकत , तर आपण तरी कशाला अकारण होळी बाटवायची ?
<< पौ अग तो बाबा स्वताच्याच घरी येतोय. >> इथं 'अॅग्रीमेंट' करून ११ महिन्यांच्या 'लीझ-रेंट' वर दिलेल्या जागेच्या मालकीहक्काबद्दल शाश्वति नसते; हे रावसाहेब तर एक-दीड तपानंतर अचानक उगवताहेत व घराचा सध्याचा 'ऑक्युपन्ट' त्याना बाप म्हणूनही मानत नाही तर मालक म्हणून थोडाच मानणार आहे ?
<<घराचा सध्याचा 'ऑक्युपन्ट'
<<घराचा सध्याचा 'ऑक्युपन्ट' त्याना बाप म्हणूनही मानत नाही >> मानण्या /न मानण्या वरती बाप नाही अस सिद्ध होत का ? भाऊ तुम्ही पण ना
अरे बापरे, म्हंजे 'आधी लगीन
अरे बापरे, म्हंजे 'आधी लगीन कोंढाण्याचं ' या न्यायाने शि.तु आणि तु.द. यांचं लग्न लावणार की काय ईशा ३ महिन्यात ! छ्छ्या बुवा....फारच बोअर होईल ते....(शि.तु.व तु.द.जोडी छान दिसेल.... तीन तीन लग्नं लागतील आज्जी आजोबांचं धरलं तर.... पण दॅट्स बिसाईड्स द पॉईंट)
<< मानण्या /न मानण्या वरती
<< मानण्या /न मानण्या वरती बाप नाही अस सिद्ध होत का ?>> अहो, मानत नाही हें 'मान देत नाही' किंवा 'जुमानत नाही' या अर्थाने म्हटलंय मीं; ' तो माझा मूर्ख बाप', असं म्हटलंय ना ओमनेच त्याच्याबद्दल !!
काल तुषार दळवीनीं केवळ एका एपिसोडमधे [ मोठे 'ब्रेक' घुसडल्याने अगदींच छोट्या होणार्या एपिसोडमधेही ] बापाची व्यक्तीरेखा स्पष्टपणे उभी केली [ अमेरिकन 'अॅक्सेन्ट'मधे इंग्लीश बोलण्याचा प्रयत्न फसूनही !]. मालिकेत खरं नाट्यमय द्वंद्व सुरूं होण्याची शक्यता दिसतेय .
मला एकदम लक्षात येतंय की काही
मला एकदम लक्षात येतंय की काही मालिका फक्त मोठ्ठी कुटुंब, गोड गोड नाती आणि गैरसमजातून होणाऱ्या वाद विवाद, मानापमान ह्यापलीकडे जाऊन सध्या समाजात असलेल्या गंभीर प्रश्नांना हात घालत आहेत! म्हणजे घटस्फोट होणे ही एक दुःखद घटना असतेच पण त्यात बरेचदा कोणाचीच पूर्ण चूक नसते आणि त्या पुढे जाऊन ह्या निर्णयाचे मुलांवर त्यांच्या भविष्यावर काय आणि कसे परिणाम होऊ शकतात ही पुढची स्टोरी ह्या मालिकेत सांगितली जात्येय! आणि मुलीच्या घरचे कितीही पुरोगामी विचारांचे असले तरी ह्या अशा broken family मध्ये आपली मुलगी जाऊ नये असाच विचार करतात. आणि ह्यात देखिल १००% चूक किंवा बरोबर म्हणणे अवघड आहे! अशा grey areas मध्ये मालिका नेणं हे एक धाडसच आहे.
अवांतर: त्या होणार सून मध्ये देखिल आईआजींना पूर्णपणे बरोबर न दाखवता त्यांच्या योग्य निर्णयांचे देखिल त्यांच्या सुनांच्या आयुष्यात काय बरे वाईट परिणाम झाले ते दाखवत आहेत.
बे दुणे दहा मध्ये single parenting, आजच्या काळात मुलांना वाढवताना येणाऱ्या समस्या ह्या गोष्टींना न्याय देणारे कथानक आहे. थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारे बदलत्या समाजाचं खरखुरं चित्र आपल्या मालिकांमध्ये डोकावायला लागलं आहे!
काल तुषार दळवीनीं केवळ एका
काल तुषार दळवीनीं केवळ एका एपिसोडमधे [ मोठे 'ब्रेक' घुसडल्याने अगदींच छोट्या होणार्या एपिसोडमधेही ] बापाची व्यक्तीरेखा स्पष्टपणे उभी केलींं <<< अत्यंत आवडलेली एक गोष्ट म्हणजे "मी अमेरिकेला पैसा कमवायला गेलो नाही, तर माझ्या टॅलेंटसाठी गेलो" हे स्पष्टपणे सांगितले.
अन्यथा "बायकापोरांना गावात सोडून अमेरिकेत पैसा कमवायला गेलेला वाईट्ट माणूस" अशी एक व्यक्तीरेखा हिंदीमराठी वाल्यांची फार आवडीची आहे. अधिक माहितीसठी पहा: आ अब लौट चले.
पण जुन्या एका एपिसोडमध्ये
पण जुन्या एका एपिसोडमध्ये ओमचा काका सांगतो की ओमच्या बापाने विवाहबाह्य संबंध व त्या स्त्रीशी दुसरा विवाह असं सगळं केल्यामुळे घटस्फोट झाला. तो काका असंही म्हणतो की वहिनी खूप चांगली होती व तिला घटस्फोट घ्यायचा नव्हता पण भावाने असा सगळा प्रकार केल्यामुळे तिचं काही चाललं नाही.
त्यामुळे याच्यात तुषार दळवीचीच पूर्णपणे चूक असते व अमेरिकेला जाण्याचा वा न जाण्याचा काही संबंध नसतो असं आधी दाखवलेलं.
आता कदाचित होसुमीमध्ये श्रीचा बाप अमेरिकेहून आला म्हणून तु.द.लापण अमेरिकावाला दाखवलं असेल. आणि आपण आधी काय दाखवलं होतं (तु. द. चं लफडं) ते विसरुन घटस्फोटाचं कारणही दुसरंच काहीतरी दाखवत आहेत का?
नंदिनी....अनुमोदन....ए.ल.दु.ग
नंदिनी....अनुमोदन....ए.ल.दु.गो.मध्ये ही हिरोला लग्न झाल्यावरही अमेरिकेला जायची इच्छा आहे कळल्यावर त्याच्या घरच्यांची जगबुडी आल्यासारखी रिअॅक्शन पाहून हसू आलं होतं. त्याला बराच पिडला होता, तिकडे काय ठेवलंय, इकडेही मिळेल की तसं काम वगैरे, ह्यात वैचारिकरीत्या फॉरवर्ड असणारी राधाही होती. आता तिकडे जे काम मिळतं / शिकायला मिळतं ते इथेच करणं शक्य असतं तर हा ऐदी 'घनगोलगट्टू' जागचा हलला तरी असता का? तसंही हे सगळं समजलेलं / उमजलेलं असतं परदेशस्थ मुलांच्या आईवडिलाना. प्रश्न असतो तो एकटेपणाचा, आजारपणांचा. ह्या हिरोच्या घरी हा प्रश्न नव्हताच, लहानमोठी मुलं आणि बरेच इतरही मोठ्ठेपणीं शैशव जपणारे लोक असं भरलं घर होतं, तरीही रडारड होतीच. असो. विषयांतराबद्दल क्षमस्व.
.
.
<< ....."बायकापोरांना गावात
<< ....."बायकापोरांना गावात सोडून अमेरिकेत पैसा कमवायला गेलेला वाईट्ट माणूस" अशी एक व्यक्तीरेखा हिंदीमराठी वाल्यांची फार आवडीची आहे. >> नंदिनी, हें खरं असलं तरीही 'अमेरिकेत पैसे कमवायला गेला कीं टॅलंटला वाव आहे म्हणून ', हा एकमेव निकषही ठरूं शकत नाही ना माणूस चांगला कीं वाईट हें ठरवायला. कालच्या एपिसोडमधे दळवीनी जी एक आत्मकेंद्रीत, इतराना तुच्छ लेखणारी व्यक्तीरेखा उभी केली [ निदान प्रथमदर्शनी तरी] तिच्याबाबतीत हा निकष लावूनही काय फरक पडणार आहे ? पत्नी किंवा ओम यांच्याशीं तो जें वागला त्या संदर्भातील त्याची भूमिका हीच - व फक्त हीच- केवळ औचित्यपूर्ण ठरते, असं नाही वाटत ?
शी इ इ इ .इतका काय तो ओम
शी इ इ इ .इतका काय तो ओम बापाशी बोलताना फाफलतोय काहीही. इतका मोठा झाल्यानंतर?
मग बरोबर आहे. इशा डॉमिनेटींग दाखवलेय त्यामुळे तिच सगळी सूत्र हातात घेईल आणि लग्न झाल्यावर ओमच्या डोक्यावर मिर्या वाटेल:)
उत्तम वकील असलेला ओम,
उत्तम वकील असलेला ओम, लहानपणापासून बाबांना घाबरतोय आणि त्या दडपणाखाली आहे अजूनही, हा अभिनय उमेशने चांगला केला.
सुजा तू म्हणते ते खरं वाटतं, लग्नानंतर ती ईशा ओमच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार आहे.
<< शी इ इ इ .इतका काय तो ओम
<< शी इ इ इ .इतका काय तो ओम बापाशी बोलताना फाफलतोय काहीही. इतका मोठा झाल्यानंतर? >>
गांवीं आमच्या शेजारींच एक मस्त गॄहस्थ रहात. हाडाचा निधडा शिकारी. रात्री-बेरात्री कुठेही जंगलात बेडरपणे फिरत. अशाच एका शिकारीच्या वेळीं अचानक अकाली आकाशात ढग जमले , गडगडाट झाला व वीजा चमकूं लागल्या. बरोबरचे लोक ह्याना हांका मारताहेत तर हे गॄहस्थ हातातला टॉर्च पडला याची पर्वा न करतां त्या कांट्याकुट्यांतून त्या काळोखात अक्षरशः वेड्यासारखे गांवाच्या दिशेने पळत सुटले. लोक मागून कसेबसे त्यांच्या घरीं पोचले तेंव्हा बंद खोलीत डोक्यावरून ब्लँकेट घेवून हे गॄहस्थ थरथरत बसले होते.
नंतर कळलं, लहानपणींचा गडगडण्याच्या भितीचा पगडा अजूनही त्याना कासावीस करतो !
"कांहीही " म्हणण्याइतपत ओमचं वागणं कदाचित अशक्यकोटीतलं नसावंही !
<<"कांहीही " म्हणण्याइतपत
<<"कांहीही " म्हणण्याइतपत ओमचं वागणं कदाचित अशक्यकोटीतलं नसावंही !>> नसेल कदाचित . मी अशी माणस आजूबाजूला कधीच बघितली नाहीत म्हणून मी म्हटलं.
आणि आत्ता मालिका आहे म्हणून ठीक आहे पण प्रत्यक्षात जर वयाच्या सत्ताविशीला किव्वा अठाविशीला जर वडिलांसमोर लहान पणासारखीच चड्डी ओली होण्या इतपत वेळ येत असेल तर त्याला मानासोपचाराचीच मदत घ्यावी लागेल.
भाऊ तुम्ही जे खरे उदाहरण दिले आहे त्या माणसाला लहानपणीच्या भीतीचा पगडा मोठेपणी सुटायला पाहिजे ना ?. कारण आपण मोठे झालेलो असतो म्हणून मानसोपचार घ्यायला पाहिजेत
बाकी उमेशच्या अभिनायाबाबातीत मला काहीच बोलायचे नाही. कारण तो काम चोखच करतो
उमेश कामतचा आजचा अभिनय छान
उमेश कामतचा आजचा अभिनय छान होता. मस्त अभिनेता आहे तो.
उमेश कामतचा कालचा अभिनय
उमेश कामतचा कालचा अभिनय आवड्ला.
उका खरचं ग्रेट आहे ...
उका खरचं ग्रेट आहे ...
<< लहानपणीच्या भीतीचा पगडा
<< लहानपणीच्या भीतीचा पगडा मोठेपणी सुटायला पाहिजे ना ?. कारण आपण मोठे झालेलो असतो >> ओमला त्या भितीची जाणीव आहे व ईशाकडेसुद्धां ती प्रांजळपणे कबूल करण्याचं त्याला धैर्य आहे, हें महत्वाचं. लहानपणानंतर ओमची ही प्रथमच वडीलांबरोबरची प्रत्यक्ष भेट आहे व म्हणूनच ती भिती घालवण्याची पहिली संधीही; त्या भितीवर मात करण्याचा त्याचा प्रयत्न उमेशने प्रभावीपणे दाखवला आहे व 'तुमच्याबरोबर न येण्याचा चॉईस मीं निवडला आहे' , या निर्धाराने उच्चारलेल्या वाक्यावरून तो या प्रयत्नात यशस्वीही झाला आहे. [ आणि हो, कॄपा करून मानसोपचाराचा मुद्दा ईशाच्या कुटूंबाच्या कानावर जाणार नाहीं एवढं बघूंया; नाही तर ईशाला मोठ्या बाबांची आणखी एक चॅलेंज घ्यावी लागायची व त्याकरतां आणखी सहा महीन्यांची मुदत ! ]
<< इशा डॉमिनेटींग ..... आणि लग्न झाल्यावर ओमच्या डोक्यावर मिर्या वाटेल:)>> आपण तर बुवा आतां बघतोच आहे म्हणून ही मालिका कशी तरी फक्त ईशा-ओमच्या लग्नापर्यंत बघूं; पुढचं मात्र त्या दोघानी त्यांचं काय तें त्यानीच बघून घ्यावं !
भाऊ ईशा ओमच्या लग्नापर्यंत तर
भाऊ ईशा ओमच्या लग्नापर्यंत तर मालिका दाखवतीलच. पण निर्मात्याला जर जास्त भागांची परवानगी मिळाली तर मात्र ओमचा घाबरटपणा आणि ईशा त्याच्या टकल्यावर मिर्या वाटता वाटता त्याला कशी सुधारते/त्याचा घाबरटपणा कसा घालवते हे ही दाखवतील .ईशा ओमला एकदम निधड्या छातिचाच करून सोडेल बघा
Pages