'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
भाऊकाका मस्तच
भाऊकाका मस्तच नेहेमीप्रमाणे.
उमेश नेहेमीच सुंदर अभिनय करतो आणि कालतर त्याने स्वतःची भूमिका खूप मोठ्या उंचीवर नेली. आई-बाबांचं सेपरेशन झालेल्या घरातील एक मुलगा होस्टेलमध्ये वाढलेला, छान रंगवला त्याने, त्याची ती तडफड पोचली, अगदी काळजात.
त्याच्या शिवाय का त्या ओमच्या
त्याच्या शिवाय का त्या ओमच्या सायंटीस्ट मित्राला युएस मध्ये पाठवलंय/ठेवलंय >> मॅक्सवा बहुत दूरकी सोचत है!+1
आज ईशाची आई ' हो.सू.मी.या.घ.
आज ईशाची आई ' हो.सू.मी.या.घ. फेम इंदूवहिनी मोड' मध्ये होती.
... आणि ईशा 'अति झालं ,हंसू
... आणि ईशा 'अति झालं ,हंसू आलं' मोडमधे ! चांगला अभिनय होतोय तिचा !!
आता लपवा छपवीचा जरा अतिरेक
आता लपवा छपवीचा जरा अतिरेक होतोय. मजा नाही येतेय . किती ते ताणायचं ?
<< आता लपवा छपवीचा जरा अतिरेक
<< आता लपवा छपवीचा जरा अतिरेक होतोय.>> सहमत. आणि , त्यांत फारशी कल्पकताही नाही दिसत; नुसते बालीश हावभाव व मठ्ठ सारवसारव ! ईशाचं ' अति झालं , हंसूं आलं' हेंही आतां प्रेक्षकाना रडूं आणायच्या बेतात अहे ! चांगल्या व कामचलाऊ एपिसोडसचं प्रमाण आतां १:३ व्हायला लागलंय या मालिकेत !! निर्मात्याना "पाण्याचा अपव्यय टाळा ",सांगायची पाळी आलीय !!
भाऊ.... अनुमोदन....जssssरा
भाऊ.... अनुमोदन....जssssरा कुठे प्रेक्षकांना वाटलं की बरी चाललीये मालिका, की घाल पाणी, आणि लाव वाट....
भाऊ.... अनुमोदन....जssssरा
भाऊ.... अनुमोदन....जssssरा कुठे प्रेक्षकांना वाटलं की बरी चाललीये मालिका, की घाल पाणी, आणि लाव वाट....
अरे देवा....दोनदा पोस्टलं
अरे देवा....दोनदा पोस्टलं गेलं....
<< अरे देवा....दोनदा पोस्टलं
<< अरे देवा....दोनदा पोस्टलं गेलं....>> जोरदार अनुमोदन म्हणून हें खपूनही जाईल, पण संभाळा.... इथंही मालिकांसारखा पाणी घालायचा प्रकार सुरुं झाला, असं नको वाटायला लोकाना !!
उमाकाकूचा अभिनय आवडतो, पण
उमाकाकूचा अभिनय आवडतो, पण तिचे नको त्या वेळी प्रश्न विचारणं आता जरा अति होतंय. कालचा हॉस्पिटलातला प्रसंग अगदीच बेकार गंडला होता.
ओमच्या आईने काकेला फोन करणं आणि ओमची माहिती विचारणं हे अगदी लॉजिकल वाटलं, अन्यथा इतके दिवस आपला मुलगा काय करतोय हे या बाईला माहितच नसणं पटत नव्हतं.
उमेश कामत गोड आहे!!!!
भाऊ..... ....म्हणूनच अरे देवा
भाऊ.....:खोखो: ....म्हणूनच अरे देवा म्हटलं मी....
नंदिनी....अनुमोदन....सहज जमलंय उ.का.ला ओमचं पात्र....
भाऊ फारच भारी
भाऊ फारच भारी
आता लपवा छपवीचा जरा अतिरेक
आता लपवा छपवीचा जरा अतिरेक होतोय.+१
घरच्यांपासुन लपवण्यात काय पॉईंट आहे की मोठ्या बाबांनी अशी अट ठेवली आहे आणि ती नाही पुर्ण झाली तर त्या अमेरिकेतल्या मुलाशी लग्न करावं लागेल.
घरातल्या बाकी पुरुषांना काही देणं घेणं नाहिये इशाच्या लग्नाशी. कोणी येत नाही ओमचं घर बघायला, त्याच्या नातेवाईकांना भेटायला..
आधी मुळात वडील, दोन काका आणि
आधी मुळात वडील, दोन काका आणि एक भाऊ इतके दाखवलेत. त्यातल्या त्या दोन लहान मुलांचे आई-वडील तर बहुतेक एकदाच दाखवलेत खूप जास्त पात्र घेऊन ठेवायची असतात हातच्याला. मुख्य पात्र आली नाहीत की बरी पडतात दोनचार सीन्ससाठी
खूप ताणत आहेत>>+१! आणि एकदा नाटकच करायचं म्हटल्यावर सवय होते की. सारखं कसं गोंधळायला होईल?
उमाकाकूचा अभिनय आवडतो, पण
उमाकाकूचा अभिनय आवडतो, पण तिचे नको त्या वेळी प्रश्न विचारणं आता जरा अति होतंय >> +१
आणि मोठेबाबा कसले शहाणे आहेत
त्यांना माहीत आहे ही खोटी फॅमेली आहे. पोरीची सांभाळता संभाळता त्रेधा तिर्पिट उडत असणरेय तरीही कोण्या डॉक्टरचा रेफर्न्स देऊन ठेवला आईला
एकीकडे आई म्हणते, 'पोरगी
एकीकडे आई म्हणते, 'पोरगी कोर्टात आहे...'
पण दुसरीकडे अपेक्षा करते, 'की रिसेप्शनला येऊन तिने उभं रहावं..'
दिग्दर्शक झोपतो मधेच....
<< दिग्दर्शक झोपतो मधेच....>>
<< दिग्दर्शक झोपतो मधेच....>> त्या बिचार्याला वाटत असतं आपणही झोपेतच बघतो सिरीयल्स !
पुण्यात एकच हॉटेल आहे का?
पुण्यात एकच हॉटेल आहे का? ग्रीन रूफ?
इशाच्या पर्सचे बारा वाजलेत, एक बक्कल गायब झालय तरी तीच भिकार पर्स वापरतेय सिरियलीत. शी :
<< पुण्यात एकच हॉटेल आहे का?
<< पुण्यात एकच हॉटेल आहे का? ग्रीन रूफ?>> रात्रीं सर्व हॉटेलं बंद झाल्यावर शूटींगसाठी मोफत /स्वस्तात मिळणारं तेंच एकमेव असावं !
<<... तीच भिकार पर्स वापरतेय सिरियलीत. शी : >> सध्यां प्रॅक्टीस तर बंदच आहे आणि घरीं पैसे मागायला तोंड नाहीय. काय करणार बिच्चारी !
ओम चे बाबा तुषार दळविन्ची
ओम चे बाबा तुषार दळविन्ची एट्री झालेली आहे मालिकेत . ईशाला आणायचं आहे ना ओमच्या आईवडिलांना एकत्र आईची एट्री झालेलीच आहे आत्ता बाबा
बहुतेक तुषार दळवी. अजून चेहरा
बहुतेक तुषार दळवी. अजून चेहरा नाही बघितला
एपिसोडभर त्याला काळोखात ठेवून
एपिसोडभर त्याला काळोखात ठेवून "पुढच्या भागात" मध्ये त्याचा चेहरा दाखवला. तुषार दळवीच.
आजच्या भागात ओमने वडलांचा फोन आल्यावर केलेला अभिनय छान होता.
<< तुषार दळवीच. >> नक्कीच !
<< तुषार दळवीच. >> नक्कीच ! सध्यां बायको सोडलेल्या नवर्याच्या भूमिकांची मक्तेदारी त्यांच्याकडेच आहे [ लेटेस्ट उदाहरण ' राधा ही बावरी ] !
आज ईशाची ती 'भिकार पर्स' बघायच्या नादात आजचा एपिसोड नीट पाहिलाच नाही !
भाऊ काय हे ? त्या ईशाच्या
भाऊ काय हे ? त्या ईशाच्या भिकार पर्स वर लक्ष ठेऊन होतात कि काय ?
<< ...त्या ईशाच्या भिकार पर्स
<< ...त्या ईशाच्या भिकार पर्स वर लक्ष ठेऊन होतात कि काय ? >> " ती ईशा बघ, बक्कल तुटलं तरी तीच भिकार पर्स वापरते; आणि तूं मात्र अजूनही नवनवीन पर्स आणतच असतेस ", असं बायकोला सुनवायचं होतं म्हणून !
भाऊ
भाऊ
मंडळी, पुण्यात खरंच ग्रीनरूफ
मंडळी, पुण्यात खरंच ग्रीनरूफ हॉटेल आहे का? दोन महिन्यांपूर्वी एका लग्नासाठी केलेल्या ६ दिवसांच्या धावत्या देशवारीत नागपूरहून आलेल्या भाचरांनी (इ. दुसरी व चौथी) प्रचंड भंडावून सोडलं होतं, ग्रीनरूफ ला जाऊया म्हणून.... माहेरी सीरियल्स अजिबात पहात नाहीत, त्यामुळे आईला किंवा कुणालाच काहीही पत्ता नव्हता....भाचरांनी टोटल नापास केलं मला....
तुषार दळवी आणि शिल्पा तुळसकर
तुषार दळवी आणि शिल्पा तुळसकर हे उमेश कामतचे आईबाबा म्हणून जरा जास्तच तरुण नाही का वाटत आहेत? त्याचे मोठा भाऊ-वहिनी शोभतील खरं तर.
शि. तु. आणि तु. द. !! मला
शि. तु. आणि तु. द. !! मला आवडलेत हे ओम चे आई बाबा! हो, त्याचे आई बाबा म्हणून जरा 'यंग'च आहेत. पण आता त्या ईशाच्या खोगीरभरती family पेक्षा ही talented family च भारी वाटतेय नै?! अगदीच logic ची अपेक्षा नसली, तरी ह्यांची पण बाजू निदान नीट उभी करावी लेखक - दिग्दर्शकानी.
आणि उ. का. गोड आहेच. मधून मधून ईशा ही आवडतेय !
Pages