Submitted by A M I T on 12 March, 2014 - 06:53
डॉ. कैलासरावांच्या दारूवर आमचा उतारा.
कातरवेळी अंग आंबते... 'तिकडे' नकळत जातो
नुसती दारू घसा जाळते...काजू चघळत जातो
कोण प्रकारची दारू सांगा तीव्र एवढी आहे?
वेड लागावे तसाच हल्ली मीही बरळत जातो
दुर्गंध येतो तोंडाला हल्लीहल्लीच कळाले
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?
फुटेल हे कपाळसुद्धा काळ्या दगडावरती
सावरणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो
किती जरी तू चुकवशील बेवड्या वाट अड्ड्याची
बार दिसताक्षणी मनीचा इरादा बदलत जातो
* * *
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमित, छान! आता इथे पण
अमित, छान! आता इथे पण पोहोचलास का?
व्वा! आता लाटण्याकडुन काजुकडे
व्वा! आता लाटण्याकडुन काजुकडे प्रगती केली का?
(फारच लाटणी पडलेली दिसतायतं तुला?) 
क्या बात
क्या बात है!

अमित्राव,
<<दुर्गंध येतो तोंडाला हल्लीहल्लीच कळाले
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?,<< ढिंगचॅक!!
दुर्गंध येतो तोंडाला
दुर्गंध येतो तोंडाला हल्लीहल्लीच कळाले
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?>>>>:हहगलो:
किती जरी तू चुकवशील बेवड्या वाट अड्ड्याची
बार दिसताक्षणी मनीचे इरादे बदलत जातो>>>>>:हाहा: सही!!
फुटेल हे कपाळसुद्धा काळ्या
फुटेल हे कपाळसुद्धा काळ्या दगडावरती
सावरणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो
>> क्या बात है
सहीच जमले आहे विडंबन!
दुर्गंध येतो तोंडाला
दुर्गंध येतो तोंडाला हल्लीहल्लीच कळाले
हे भारीच!! 
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो? -->
भारी जमली !
भारी जमली !