"खरा"सावरकर(भाषण) -श्री.शेषराव मोरे..

Submitted by अत्रुप्त आत्मा on 6 March, 2014 - 02:11

दिनांक २ फेब्रुवारी २०१४ ... ठिकाण:- सिंहगड रोड..सनसिटी जवळील एक ग्राऊंड.. वेळः-संध्याकाळी साडेसहाची, आणि स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान तर्फे... मोरे सरांचं सावरकर या विषयावरील भाषण. माझ्या सारख्यासाठी हा क्षण आयुष्यातील मोलाच्या क्षणांपैकी एक. का म्हणता?
आमचे सावरकर प्रेम? = नाही

त्यांच्या बुद्धीवादाचे वेड = अजिबात नाही

मग उरलं काय? त्यांचा हिंदुत्ववाद ? = तत्वतः होय . अता तत्वतः होय.. असे का? याचे कारण सावरकरांनी हिंदुत्ववाद मांडला तसा शिवाजी सारख्या काही माणसांनी तो जगला जागवला आणि आमच्या पर्यंत पोहोचेल एव्हढी ऊर्जाही निर्माण करून ठेवली. असेच श्रेय भारतमातेच्या अनेक क्रांतिविरांना ,समाजसुधारकांनाही देता येइल. हे सगळं झाल्यावर उरलच काय मग??? आता उरला तो मोरे सरांनी दाखवलेला बव्हंशी अप्रीय सावरकर...म्हणजेच त्यांच्या भाषेत-"खरा" सावरकर! त्याचे आंम्हाला मात्र भरपूर वेड.. होय अजून तरी वेडच! झालय असं की सावरकरांना गांधिजिंप्रमाणे अनेक संघटनांनी,नेत्यांनी,जेत्यांनी,व्यक्तिंनी एव्हढच कशाला त्यांच्या समर्थक/विरोधकांनीही हवे तसे वापरले/राबवले आहे.
प....ण

सावरकरां सारखी,एखादी अशी व्यक्ति आणि तिचा जीवनकलह याचा नक्की..खरा अर्थ काय? बीज काय? मार्ग कोणता? ध्येय्यवाद कोणता? अंतिम दिशा कोणती? याचं उत्तर शोधायचं असेल तर त्या व्यक्तिच्या या जीवनकलहाचं प्रत्येकबाजुनी(म्हणजे एकही बाजू राहू न देता) अभ्यास,परिक्षण,मूल्यमापन करायला लागत. आणि त्याचा पाया "जसे आहे तसे" त्या व्यक्तिला मांडणे.म्हणजेच, मला काय वाटतं??? या विचारसरणीला फाटा देऊन, त्या व्यक्ति/विचाराचं काय म्हणणं आहे??? हे पहाणे आणि जास्तीत जास्त निर्दोष पद्धतीनी त्याची मांडणी करणे. पुढे काळाच्या ओघात त्यातील चुका/दोष कुणी सप्रमाण पुराव्यानी दाखवून दिले,तर तसा पुन्हा त्यात बदल करणे. अता या भुमीकेकडे एकंदर पाहिलं तर ही भूमीका विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाची भूमीका आहे. जास्तीत जास्त सत्य .. शोधण्यासाठी स्वतःचा अहंकार..वैयक्तिक विचारसरणी बाजूला ठेऊन बुद्धीविवेकानी सत्य शोधणे.. मांडणे, हा या शोधनाचा पाया आहे. ही पद्धती श्री.शेषराव मोरे यांची केवळ अभ्यासाची पद्धती नसून त्यांची स्वतःची जीवनपद्धतीही आहे,जीवनमूल्यही आहे. हे मी स्वतः आजवर पाहिलं अनुभवलं आहे. एखादा माणूस समाजासाठी स्वतःचे अर्धे आयुष्य खर्च करुन काही विषयांच्या अभ्यासात स्वतःला वाहून घेतो. ही गोष्ट नेहमीच फार दुर्मिळ असते..आणि असणारही!

मोरेंचं सावरकरांच्या बाबतीतलं वेगळेपण,,नेमकं इथेच आहे!

मोरे सर त्यांच्या पुस्तका/भाषणांमधून सावरकारांच्या हिंदुत्ववादाची बाजू सांगतात त्याची गरज अधोरेखित करतात..ही जशी एक,अनेकांना प्रीय असणारी गोष्ट आहे,तशीच मोरे सर सावरकारांचे समाजकारण (समाजसुधारक सावरकर) त्यांची विज्ञान निष्ठा-हा एक मनुष्यत्व आणि त्यांच्या हिंदुत्वाकडे जाणारा एक अत्यावश्यक आचरणीय मार्ग आहे, ही दुसरी अनेकांना अप्रीय असणारी बाजूही सांगतात. कारण पहिल्या बाजुकडे जाऊ इच्छिणार्‍यांची ही दुसरी बाजू समजाऊन घेऊन आचरणं .. ही पूर्वअट आहे... हेच आजपर्यंत अंधारात राहिलेलं आहे. ही दुसरी महत्वाची बाजु सोडून उरलेला सावरकर आहे..तोच लोकगंगेत प्रीय आहे.अनेक संघटनांना हवा आहे. म्हणून तोच जास्त मांडला गेला आहे.आणि त्यामुळे सावरकरांवर अनाठाई हेतुपुरस्सर टीका तसेच त्यांच्या व्यक्तित्वाचे हनन करण्याची संधी अनेक सावरकर विरोधकांना मिळालेली आहे.

आज आपण हे दोन्ही सावरकर,मोरे सरांच्या भाषणात ऐकणार आहोत. सदर भाषण इथे मी ध्वनीफीत-रूपानी (लिंकमधे) लावत आहे. आपण ते ऐकावे.या भाषणात जे काहि आहे, ते व्यापक रूपानी मोरे सरांच्या दोन पुस्तकांमधे यापूर्वीच येऊन गेलेले आहे.

१) सावरकरांचे समाजकारण-सत्य आणि विपर्यास

२) सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंन्दुत्ववाद

पुस्तकात हे सर्व येऊन गेलेलं असलं,तरिही या भाषणातील त्याचं वेगळेपण म्हणजे- या सार्‍याची मांडणी मुख्यत्वे आजच्या काळातील सावरकर विरोधकांना डोळ्यासमोर ठेऊन केलेली आहे.

भाषणाचे तीन टप्पे आहेत..प्रथम मोरेसरांनी सावरकरांचा त्यांच्या आयुष्यात "प्रवेश" कसा झाला? हे थोडक्यात मांडलं आहे. पुढे त्यांच्या बुद्धीवादाचा परिचय..आणि महाराष्ट्रातल्या अनेक खोडसाळ व धूर्त (शासन पुरस्कृत) सावरकर विरोधकांचा समाचार घेतलेला आहे,त्यानंतर शेवटच्या टप्प्यात त्यांचा (आपल्या पर्यंत विशेषत्वानी न पोहोचलेला) हिंन्दुत्ववाद..त्यातील प्रमुख मुद्दे आणि सावरकरांच्या भाषणांच्या उद्धृतांसह आलेला आहे. भाषणाची शैली ही तेजस्वी तशीच मार्मिकही आहे. त्यामुळे काहि ठिकाणी आपलं मन दुखावलं तरी मेंदू सुखावेल अशी काहिशी अवस्था भाषण ऐकताना होते.
चला तर मग...(खालील लिंकवर) ऐकू या..मोरे सरांचं भाषण

http://www.mediafire.com/listen/ki4h6ig1xnz1542/sheshrav_more_-khara_sav...
========================================================
@ सदर भाषण इथे लावण्यासाठी मोरे सरांची परवानगी घेतलेली आहे. Happy
(भाषणाला-"खरा"सावरकर-हे नाव मी दिलेलं नसून ते मोरे सरांच्या मनातलं असं नाव आहे. मी ते इथे मांडणीच्या सोइखातर डकवलेलं आहे. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता इथे सावरकरान्वर खालच्या थरावर जाऊन कोणी टिका नाही केली म्हणजे मिळवले.:अरेरे:

अतृप्त आत्मा धन्यवाद लिन्क दिल्याबद्दल.

@खालच्या थरावर जाऊन कोणी टिका नाही केली म्हणजे मिळवले. >>> त्यांनी भाषण नीट ऐकलं तर असं काहि होणार नाही,असं वाटतं! Happy

या विषयावर या आधी एक धागा येऊन गेल्याचे आठवते.
जो नियम सावरकरांबाबत विचार करायला लावला जातो तो गांधी आणि इतर प्रसिद्ध व्यक्तींबद्दल लावला आणि मते मांडली तर लोक अगदी अंगावरच येतात. हा दुटप्पीपणा कसा काय चालतो त्यांचे त्यांनाच ठाऊक.
नियम = प्रिय आणि अप्रिय दोन्ही बाजुंवर बोलणे

>>बुद्धिवादाचे वेड नाही
>>वैयक्तिक विचारसरणी बाजूला ठेऊन बुद्धीविवेकानी सत्य शोधणे.. मांडणे, हा या शोधनाचा पाया आहे
काही गडबड आहे असे वाटत नाही का ? Happy

अत्रुप्त आत्मा, किती वेळ चालणारं भाषण आहे? माझ्याकडे या धारिकेची थेट मैफिल (ऑनलाईन प्लेयिंग) जमत नाहीये. त्यामुळे २२४ एम्बी उतरवावे (डाऊनलोड करावे) लागतील. हा जरा मोठा आकडा आहे. या भाषणाची लेखी प्रत मिळेल काय? धन्यवाद!
आ.न.,
-गा.पै.

''बुद्धीविवेकानी सत्य शोधणे.. मांडणे, हा या शोधनाचा पाया आहे. ही पद्धती श्री.शेषराव मोरे यांची केवळ अभ्यासाची पद्धती नसून त्यांची स्वतःची जीवनपद्धतीही आहे,जीवनमूल्यही आहे''
१००% सहमत.

गापै, अहो लेख ?? आक्खे पुस्तकच लिहिले आहे मोर्‍यांनी या विषयावर ?
ते पुस्तक वाचणे किंवा येथे दिलेली ध्वनिफित ऐकणे झालेले नाही त्यामुळे काही बोलता येणार नाही अजुन तरी.
पण एकंदरीत वरच्या लेखावरून सूर विरोधीच दिसतो आहे.

@गामा_पैलवान>>> साधारण दिड ते दोन तासांचं भाषण आहे. लिखित प्रत नाही. तुंम्हाला ते वेळ काढून ऑनलाइन ऐकणे ,अथवा माझ्या लिंकवर जाऊन डाऊनलोड करून नंतर ऐकणे..हेच पर्याय आहेत. आणि भाषण वाचण्यापेक्षा ऐकणे जास्त उपयुक्त आहे.

@महेश>>> लेख/पुस्तके/भाषण- हे एकाच विषयावरचे..परंतु वेगवेगळे आविष्कार आहेत. आपण विरोधी वाटले..तरी वाचुन/ऐकून पहा. Happy (आणि मगच मत बनवा.)

अत्रुप्त आत्मा अशा रितीने तृप्त झालेला प्रथमच पाहीला Happy
ऐकेन आणि वेळ मिळाला आणि उर्जा रहिली तर प्रतीक्रिया देईन.

>>साधारण दिड ते दोन तासांचं भाषण आहे. लिखित प्रत नाही. तुंम्हाला ते वेळ काढून ऑनलाइन ऐकणे ,अथवा माझ्या लिंकवर जाऊन डाऊनलोड करून नंतर ऐकणे..हेच पर्याय आहेत.

ठीके. डाऊनलोड करून घेतली आहे.

शेषराव मोरे यांचेबद्दल मुद्दामून लिहायची गरजच नाही. त्यांचा अनुभव, अभ्यास, वाचन, आवाका, 'तळमळ' सर्वसिध्द आहेच!.
ऊत्कॄष्ट भाषण आहे. लिंक दिल्याबद्दल धन्यवाद!

भारताच्या इतीहासातील जे राष्ट्रपुरूष झाले, त्यापैकी स्वातंत्र्यवीर सावरकर, यांच्याबद्दल ज्यांना सारांशात जाणून घ्यायचे असेल त्यांच्यासाठी अतीशय उपयुक्त असे भाषण आहे.

ता.क.: पाठींब्याचा वा विरोधी असा काही सूर शोधणार्‍यांनी याच्या वाट्याला जाऊच नये.. हाती काही लागणार नाही.

ध्वनीफीत ऐकली. ऊत्कॄष्ट आहे.

ता.क.: पाठींब्याचा वा विरोधी असा काही सूर शोधणार्‍यांनी याच्या वाट्याला जाऊच नये.. हाती काही लागणार नाही.
> > +१

@ता.क.: पाठींब्याचा वा विरोधी असा काही सूर शोधणार्‍यांनी याच्या वाट्याला जाऊच नये.. हाती काही लागणार नाही.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy019.gif +++++++++++++१११११११११११११११ बरोब्बर हेरलेत अगदी! http://www.freesmileys.org/smileys/smiley-gen014.gif

प्रियकर हिंदुस्थान

सकल जगामधि छान / अमुचा प्रियकर हिंदुस्थान
केवळ पंचप्राण / अमुचा सुंदर हिंदुस्थान // ध्रु. //

बहुत पाहिले बहुत ऐकले देश परी ते सान
सान मिसर पाताल आंग्लभू सान चीन जापान // १ //

बहुत गिरी, परी तुझाच गिरीवर हिमालयाचा मान
कवण नदी दे श्रीगंगेसम पूत-सुधाजल-पान // २ //

कस्तुरी-मॄग-परिमल-पूरित जिचे फुलावे रान
प्रभात-कालीं कोकील-किलकिल-कुजित आम्रोज्ञान // ३ //

यज्ञ-धूम-सौगंध मनोहर जिचें सामरव गान
ऐकुनी येती जिथे कराया देव सोमरसपान // ४ //

कालिदास कवि गाती, गौतम शिकविति सांख्य्ज्ञान
म्लेंच्छ-विनाशक विक्रम दे तुज स्वातंत्र्यश्रीदान // ५ //

जिजा जन्म दे शिवा, जिच्यास्तव गुरू पुत्रांचे प्राण
जिच्यास्तवचि त्या कुमारिकांसी विस्तवांत ये न्हाण // ६ //

तुझ्या जलांही अनंत पितरां दिले तिलांजली दान
पुण्यभूमी तूं ! पितत्रुभूमी तूं ! तूं अमुचा अभिमान // ७ //

जननि ! जगत्रयीं शक्त कोण जो करिल तुझा अपमान
प्राणदान-संसिध्द असुनी तव कोटी-कोटी संतान? // ८ //

जननि ! तुझ्या सन्मान-रक्षुणीं अर्पु रणीं हे प्राण
शत्रुकंठ भंगोनी घालुं तुज दारुण रक्तस्नान // ९ //

सकल जगामधि छान / अमुचा प्रियकर हिंदुस्थान
केवळ पंचप्राण / अमुचा सुंदर हिंदुस्थान //