एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इशा ओमला सांगुन का नाही टाकत मोठ्या बाबांनी काय अट घातलीये? त्याचं चिडणं थोडं तरी कमी होईल. मोठ्या बाबांनी सांगितलंय म्हणून इशा करतीये हे सगळं. नाहीतर त्याला असंच वाटतं राहील, काय जबरदस्ती आहे इशाची आईला भेटण्याबाबतची?
ही आधी त्याला न सांगता त्याच्या आईला भेटणार आणि मग येऊन सॉरी म्हणणार..!

मुलाला सांभाळण्याची जबाबदारी आई - वडिलांची दोघांची आहे. एकट्या आईची नाही.>>>> तो दोघांवरही चिडलेला आहे. पण समहाऊ, मला आईवडील विभक्त झाले म्हणून मुलाची काळजी दोघांनाही नाही, हा प्रीमाईस फार कच्चा वाटतो. ओमची व्यक्तीरेखा ज्या प्रकारे आहे त्यावरून तर फारच. आईला इतके दिवस मुलगा कसा आहे हे जाणूनदेखील घ्यावंसं वाटत नाही हे देखील पटत नाही. त्यातही एन जी ओ मध्ये वगरिए काम करणार्या बाईला आपलाच मुलगा कसा वाढतोय हे समजत नाही? वडील अजून दाखवलेलेच नसल्याने त्यावर बोलणार नाही.

त्यात ते इशाचं "ती त्या लहान मुलांमध्ये ओमला शोधतेय" हे फार डोक्यत जाणारं वाक्य. ती तिला आवडतं ते काम करतेय. त्यातून तिला काय समाधान मिळत असेल ते "ओमची आई या भूमेकेपेक्षा वेगळं असू शकत नाही का?

आजच्या भागात ओम आपल्या मनातील सल उघड करत असताना ईशा त्याला कुठेही अडवत नाही. ती ओमकडे फक्त सहानूभूतिपूर्वक पहात राहून त्याला मोकळं होऊं देते. इथं दिग्दर्शन व अभिनयातील प्रगल्भता जाणवली !

ओम वडलांबरोबर रहात असता तर आईचं त्याला न भेटणं समजू शकतं, पण अनेक वर्षं तो एकटा रहातो आहे तरी आईचं त्याच्याशी संबंध न ठेवणं अजिबात पटत नाही. हे सिरीयलवाले लॉजिक तर नाहीच पण टाइमलाइन सुद्धा नीट जुळवत नाहीत.

sanwaad kase agadi gholat ghol ghalata yetil ase lihile aahe, ata ishane adhich sangayala harakat hoti ka , ki ticha ani omcha lagna zala nahie, tyachya gharatli aai tyachi khari aai nahie etc.. ugich fukatcha timepass kela

नंदिनी....+१
मुंबईतच होती ना ओमची आई, काय सातासमुद्रापार नव्हती गेली....हॉस्टेलमध्ये जाऊन वर्षातून ५-६ वेळा मुलाला भेटणं काही अशक्य नाही....
भाऊ ....तुमच्याही पोस्टीचे अनुमोदन....
रच्याकने.... क्रांती सोसायटी, सहकारनगर नं.२....म्हणजे आमच्या शेजारची गल्लीत ओमचे घर आहे म्हणायचे ...:)

<< ओमच्या आईने त्याच्यापासून दूर राहणे हे मलापण समहाऊ पटले नाही. >> त्याचं कांहीं तरी समर्थन- ओढून ताणून आणलेलं कां असेना- ओमच्या आईकडून अपेक्षित आहेच. [ तें मिळेलच याची सिरियलच्या निर्मात्यांकडून गॅरंटी मात्र नाही; अर्थात,कधींच नसते ! Wink ]
<< म्हणजे आमच्या शेजारची गल्लीत ओमचे घर आहे म्हणायचे ... >> म्हणजे ओमच्या आई-बाबांचीं कडाक्याचीं भांडणं पूर्वीं तुमच्या घरच्यांच्या कानावर आदळलीं असतीलच ! Wink

अरे पण राहुदे ना त्या आईला जिथे रहायते आहे तिथे आणी काय वाटायचे ते वाटुदेना. एवढे का पर्सनली घेत आहात सगळे?

मुळात इशा का गेली भेटायला?? खरं कारण काय आहे हे नको का विचारायला?? ते विचारले आणी इशाने प्रामाणीकपणे खरे सांगीतले तरी अजून ४-५ महीने चालवता येईलच की सिरीयल. Proud

भाऊ Lol

नव्वद टक्के केस मध्ये नवराबायकोच पटत नसल कि नवरा मुलांना आणि बायकोला वार्यावर सोडून देतो. अक्षरशः वार्यावर सोडून देतो .त्यामुळे ओम च्या आईवर एकटीवर जबाबदारी पडली असेल . त्यातून तिला देशोदेशी ( पैसे कमवायला ) फिरावं लागत असेल तर ती त्याला होस्टेल मधेच ठेवणार ना?. तिच्या आईवडिलांनी पण जर ओम ला सांभाळायची जबाबदारी घेतली नाही तर ती काय करू शकते.? तिनी मुलाची जबादारी झटकली तर नाहीये ना? ओमच्या वडिलांसारखी.

ओमला वार्यावर तर सोडलं नाहीये ना? तिच्या वरचा अन्याय ( नवरा दुसर्या बाईबरोबर निघून गेला )/ तिच दुखः सहन करतच तिने मुलाच शिक्षण पूर केल ना? का कुठल्या शिक्षणाशिवाय ओम नी कमवायला सुरवात केली? मग तुला तिच पाच मिनिट ऐकून घ्यायला काय झाल ? तिची पण काही मजबुरी असू शकते कि नाही?

इतके दिवस तुला वाटत होत ना ईशानी तुझ ऐकून घ्याव म्हणून मग तू पण तुझ्या आईच ऐकून घेशील कि नाही? तू पण जर तीच म्हणण ऐकून घेत नसशील /तिला भेटायचच नाकारत असशील तर तुझ्यात आणि ईशात फरक तो काय राहिला ?

भाऊ....:हाहा:...सा.बा. व सा.बु. दोघाना फोन करून विचारते नक्की या शनिवारी....:)

परिस्थिती अनेकांवर येते, पण मुलाना विश्वासात घेऊन थोडेसे बोलले, थोडा वेळ दिला तरी पुरे असते. तेही ओमच्या आईने हॉस्टेलमधे ठेवून टाळलेले दिसते. मुलानाही पालकांचे प्रश्न आपल्या आकलनशक्तीनुसार समजून घ्यायचे असतात, सुख दु:खात सहभागी व्हायचे असते.

माझ्या मते सिरियल वाल्यांना आत्ता ओमच्या आईची बाजू प्रेक्षकांना समजाऊन द्यायची असेल म्हणून ओम च्या आईला आणलाय. नाहीतरी काही तरी ड्रामा पाहिजे ना . नाहीतर इस्टोरी पुढे कशी जाणार ? परत इशाच्या आजोबांनी घातलेली अट आहेच ओमच्या आईच क्यारेक्टर घुसवायला Happy

काय अट घातलीय एवढी ईशाच्या आजोबांनी ?
मी ही सिरियल रोज बघत नाही पण कधीतरी एखादा सीन बघितला गेला तर चॅनल बदलावासा वाटत नाही एका मिनिटात, तेवढा सीन पूर्ण करावासा वाटतो Happy

अगो ,अग ईशाच्या आजोबांनी अट घातलेली असते तू ओमच्या खर्या आईवडिलांना तीन महिन्याच्या आत आणून दाखव . तरच मी ओमशी तुझ लग्न लाऊन देईन. ईशानी पण आजोबांचं च्यालेंज स्वीकारलाय.
मग तिला आत्ता ओमच्या आईचा शोध घ्यायला नको का ? मग थोडे दिवसांनी वडलांना पण शोधेल. मग आणखीन काही तरी नाट्य मालिकेत Happy

तू ओमच्या खर्या आईवडिलांना तीन महिन्याच्या आत आणून दाखव <<< आणून काय लोणचं घालायचं आहे? परत त्यांचं मनोमोलन वगैरे की काय??? की दुसृयांदा लग्न करायला लावताय त्या दोघांना??

म्हणजे काय ओमिशाच्या आईवडलांचं लग्न ही "एका लग्नाची तिसरी गोष्ट????????"

की दुसृयांदा लग्न करायला लावताय त्या दोघांना?? >> अरे , पण त्या ओमच्या वडीलांचे आधीच दुसरे लग्न झालेले आहे ना? मग तो संसार मोडायला लावून परत पहिला जुळवणार का?

खसाबा नंतर आता खसाबु
इशाला तिचे खसाबु लवकरच भेटणार... त्याच्या शिवाय का त्या ओमच्या सायंटीस्ट मित्राला युएस मध्ये पाठवलंय/ठेवलंय Happy

...

त्याच्या शिवाय का त्या ओमच्या सायंटीस्ट मित्राला युएस मध्ये पाठवलंय/ठेवलंय >> मॅक्सवा बहुत दूरकी सोचत है! करेक्टे. पटलंच मला.

भाऊ Lol तुमची व्यंगचित्र एक नंबर असतात! जियो!

काल आमच्या ओमचा अभिनय काय झाला लोखो! उमेश कामत गोऽऽऽड आहे Wink

<< जियो! >> पौर्णिमा, माझ्या वयात कुणी मला 'जियो' म्हणणं, याचं आत्यंतिक महत्व मला काय आहे हें मींच जाणतो ! Wink
ह्या ष्टोरीचं काय होईल तें होवो, पण सध्यां त्यांच्या गांठीशीं असलेल्या इतक्या प्रचंड, जळजळीत अनुभवामुळे, ओम-ईशाची फॅमिली कोर्टातली प्रॅक्टीस मात्र तुफान चालणार यांबद्दल दुमत नसावं ! Wink
वरची मस्करी हा माझ्या जुन्या खोडीचा भाग झाला. पण ही मालिका बव्हंशीं बर्‍यापैकीं आहे, हें मान्यच.

काल आमच्या ओमचा अभिनय काय झाला लोखो! उमेश कामत गोऽऽऽड आहे>>>> हो. मस्त सीन होता. आवडला/

भाऊकाका, Lol एक नंबर आहे व्यंगचित्र.

Pages