क्रिकेट ह्या खेळाने जगाला अत्यंत दर्जेदार असे खेळाडू दिले. त्यात प्रामुख्याने समावेश होतो तो सचिन, कॅलिस, पोंटिंग , लारा यांचा.खाली त्यांचे कसोटी क्रिकेट मधील रेकॉर्ड दिले आहेत येथे प्रामुख्याने कसोटी क्रिकेटचेच रेकॉर्ड लक्षात घेतले आहेत. कारण कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे जिथे खेळाडूचा खरा कस लागतो. तर ह्या चौघा मधला महान खेळाडू कोण हे पाहूया .
कॅलिस--- सामने-१६२ धावा -१३,१२८, शतक -४४ अर्ध शतक-५८ सरासरी-५६.१० बळी-२८८
सचिन-- सामने-१९८ धावा -१५८३७ , शतक -५१ अर्ध शतक-६७ सरासरी-५३.८६ बळी-४५
लारा ---सामने-१३१ धावा -११९५३ , शतक -३४ अर्ध शतक-४८ सरासरी-५२.८८ बळी----
पोंटिंग ---सामने-१६८ धावा -१३३७८ , शतक -४१ अर्ध शतक-६२ सरासरी-५१.८५ बळी-५
हि आकडेवारी पाहून लगेच कळते कि ह्यातला महानतम खेळाडू हा कॅलिस आहे त्याची सरासरी सर्वोत्तम आहे त्या शिवाय त्याने गोलंदाजीत हि २८८ विकेट घेतले आहेत मला तर सचिन, पोंटिंग आणि लारा ह्यांच्या तुलनेत कॅलिस सरस वाटतो .हे तिन्ही खेळाडू फलंदाजीचे देव असतील तर कॅलिसला क्रिकेटचा महादेव म्हणावे लागेल.
कॅलिसला ४४ शतके झळकावली त्या सामन्यात गोलंदाजी हि करावी लागली. त्यामुळे मला ह्या सर्व खेळाडूत कॅलिस हा ग्रेट वाटतो .असा हिरा भारताला मिळाला असता तर मला नाही वाटत ६० व्या वर्षापर्यंत त्याला कोणी निवृत्त होवू दिला असता.
सचिन हा उत्कृष्ट खेळाडू आहे
सचिन हा उत्कृष्ट खेळाडू आहे ह्यात वादच नाही. धाग्याच्या सुरवातीलाच ते दिलेले आहे क्रिकेट ह्या खेळाने जगाला अत्यंत दर्जेदार असे खेळाडू दिले. त्यात प्रामुख्याने समावेश होतो तो सचिन, कॅलिस, पोंटिंग , लारा यांचा.
तसेच सचिन बद्दल हेहि लिह्लेले आहे कि
मोहम्मद अझहरुद्दीन हा हि भारताचा यशस्वी कर्णधार होता त्याच्या कर्णधारपदाच्या काळात सचिनचा खेळ खऱ्या अर्थाने बहरला .अझहरच्या यशस्वी कारकिर्दीत सचिनचाही सिंहाचा वाट होता.
यामुळे सचिनचा अनुल्लेख केलेला आहे असे नाही.
असामान्य प्रतिभा, शारिरीक व
असामान्य प्रतिभा, शारिरीक व मानसिक कणखरपणा, प्रचंड मेहनतीने मिळवलेलं तंत्रावरचं प्रभुत्व इत्यादींशिवाय जागतिक स्तरावर दीर्घ काळ सातत्यपूर्ण भरीव कामगिरी निव्वळ अशक्य आहे. त्यामुळें असा प्रत्येक खेळाडूच बर्याच अंशीं "सर्वश्रेष्ठ" संज्ञेला पात्र ठरतो. पण त्यांतही सर्वोत्तम खेळाडू निवडण्याचा आग्रहच धरला गेला तर मात्र अनेक व्यक्तीनिष्ठ निकष गोंधळ घालूं शकतात; उदा. सामने जिंकून देण्यात हातभार अधिक कोणाचा , आंकडेवारीत सरस कोण , इ.इ. माझा स्वतःचाही एक खास निकष असा आहे कीं या महान खेळाडूंपैकीं किती जणानी अशी कामगिरी करताना स्वतःची अशी एक कलात्मक, सहजसुंदर शैली निर्माण करून क्रिकेट ही एक आनंददायी अनुभूति करण्यात मोलाची भर टाकली. या माझ्या वैयक्तीक कसोटीला उतरणारे ठळक खेळाडू आहेत - गॅरी सोबर्स, गुंडप्पा विश्वनाथ, कपिल, झहीर अब्बास, लारा, सचिन, शेन वॉर्न. [ सुनील, द्रविड, पाँटींग, कालीस, मुरली, अझर, लक्ष्मण इ. इ . सर्वच प्रचंड ग्रेट आहेत व त्याना खेळताना पाहायला मिळालं हें माझं भाग्यच समजतो मीं. पण कधी आठवणींच्या दुनियेत रमतों तेंव्हा मात्र नजरेसमोर येतात ते खेळाडू मीं प्रांजळपणे सांगितले ].
अर्थात, मला वाटतं सोबर्स हा 'ऑल टाईम ग्रेटेस्ट'च असावा व त्याबद्दल फारसा मतभेदही नसावा. खेळापेक्षां खेळाडू मोठा होऊं शकत नाही पण सोबर्स मैदानात उतरे तेंव्हां ' क्रिकेट माझ्यासाठी आहे , मीं क्रिकेटसाठी नाही', असा एक बेदरकार आत्मविश्वास त्याच्या देहबोलीतून ओसंडतच असायचा. किंचित पुढे वांकून , शर्टाची कॉलर वर ठेवून तो सहजसुलभ रुबाबात मैदानात वावरत असे. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण असामान्य दर्जाची असूनही त्यांत कलात्मकता, सहजता व खेळाचा आनंद खच्चून भरलेला असे ! कदाचित, लहानपणीच अशा सोबर्सला पाहिल्याने मीं तीच फूटपट्टी लावून इतर महान खेळाडूंकडे बघत असेन . इतरानीही तीच फूटपट्टी वापरावी असा मात्र आग्रह तर नाहीच पण अपेक्षाही नाही.
<<भारतात एकदिवसीय क्रिकेट
<<भारतात एकदिवसीय क्रिकेट रूजलं तेच १९८३ च्या विश्वचषकानंतर. तोपर्यंत हे क्रिकेट कुणालाही माहीत नव्हतं. >>
१९७५ आणि १९७९ मध्ये भारतीय टिम सुद्धा होती... मॅचेस पाहिल्याचं आठवतंय.
आयला भाऊ, सुनिल तुमच्या "ए" लिस्ट मध्ये नाहि हे पाहुन आश्चर्य वाटलं. या लिस्टवरुन, व्यंगचित्रातुन भाउकाकी तुमच्यावर करवादते आहे असं चित्र डोळ्यासमोर आलं...
कधिकधि अझरुद्दीन हि सोबर्स सारखी कॉलर टाइट करायचा...
<< तुमच्या "ए" लिस्ट मध्ये
<< तुमच्या "ए" लिस्ट मध्ये नाहि हे पाहुन आश्चर्य वाटलं.>> कृपया गैरसमज नको; पंचतारांकित हॉटेलातल्या जेवणाची मजा मनापासून चाखली तरीही खास स्वतःच्या आवडीची चपाती भाजीही वेगळी असूं शकतेच ना !!
<< कधिकधि अझरुद्दीन हि सोबर्स सारखी कॉलर टाइट करायचा...>> साम्य तेवढ्यावरच मर्यादित नसून अझरही मैदानावर फलंदाजी व क्षेत्ररक्षणात 'ग्रेसफुल'ही होताच.
<<... भाउकाकी तुमच्यावर करवादते आहे असं चित्र डोळ्यासमोर आलं...>> सचिनचं नांव वगळलं नसलं तर सध्यां तरी कोणतीही काकी, मावशी, आई ,ताई इ.इ. अंगावर खेंकसण्याची शक्यता नाही !
<१९७५ आणि १९७९ मध्ये भारतीय
<१९७५ आणि १९७९ मध्ये भारतीय टिम सुद्धा होती... मॅचेस पाहिल्याचं आठवतंय.>
हो पण तेव्हा ते एकदिवसीय सामनाही पाच दिवसांच्या(किंवा रणजी) सामन्यासारखेच खेळायचे. ६० षटकांत नाबाद ३६ धावा काढायचे
<< हो पण तेव्हा ते एकदिवसीय
<< हो पण तेव्हा ते एकदिवसीय सामनाही पाच दिवसांच्या(किंवा रणजी) सामन्यासारखेच खेळायचे.>>याला, मला वाटतं, दोन महत्वाचीं कारणं होतीं- १] कांहीं देशांत मर्यादित षटकांच्या स्पर्धा असत तशा आपल्याकडे नव्हत्या व २] आपल्याकडे पारंपारिक तंत्रशुद्ध खेळाबाबत प्रशिक्षक, ज्येष्ठ खेळाडू फारच चोखंदळ असत व त्यात जराही ढिलाई दिसली तर खेळाडूला फैलावर घेतलं जाई; मला आठवतं कीं इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटच्या अनुभवामुळें पतौडीने इथं जेंव्हा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 'सेफ' फटके मारणं सुरूं केलं तेंव्हा 'ग्राऊंड स्ट्रोक' हाच फक्त क्रिकेटींग शॉट आहे असं ठामपणें मानणार्यांच्या अगणित भुंवया वर गेल्या होत्या. वे.इंडीजच्या विजयी दौर्यावरून आल्यानंतरच्या एका रणजी सामन्यात एक 'शॉर्ट पिच' चेंडू दिलीप सरदेसाईने टपली मारून स्लीपच्यावरून सीमापार केला होता, तेंव्हा कॉमेंटरी करत असलेल्या विजय मर्चंट यांनी त्या फटक्यावर परत परत ताशेरे ओढले होते व एका कसोटी फलंदाजासाठीं असे फटके मारणं निषिद्ध असल्याचं जाहीर केलं होतं [आज हाच फटका सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधे शिष्टसंमत झाला आहे !]
मग १९८३लाच अशी काय जादू झाली ? माझा अंदाज - वाडेकरने पूर्वीचे सर्व संकेत धुडकावून फिरकीचा एक नविनच धाडसी प्रयोग करत वे.इंडीज व इंग्लंडमधे विजय मिळवले ; सुनील, दिलीप, अमरनाथ इत्यादींमुळे फलंदाजीलाही एक प्रतिष्ठा आली होती. कपिलच्या साथीला बर्यापैकीं मध्यमगती गोलंदाज / ऑलराऊंडर्स आले होते. त्यामुळें अगदींच परंपरेत जखडून न रहाता नवीन प्रयोग करण्याची हिंमत खेळाडूंत नेमकी १९८३च्या विश्वचषकाच्या उंबरठ्यावर रुजली होती. त्यांतच कपिलसारखा जिंदादिल कर्णधारही लाभला होता. शिवाय, ही 'लिंबुटींबू' टीम आपलं काय करणार या विरुद्ध संघांच्या बेसावधपणाचाही फायदा कपिलच्या संघाला मिळालाच. १९८३च्या विश्वचषकाचं विजेतेपद या सर्वाचा एकत्रित परिणाम असावा.
सर्वोत्तम active क्रिकेटर -
सर्वोत्तम active क्रिकेटर - कयालिस
सर्वोत्तम active फलंदाज - सचिन
माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ
माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ क्रिकेटर राहुल द्रविडच आहे. त्याच्या तुम्ही समावेश नाही केलात हेच आश्चर्य
सामने-१६४ धावा -१३२८८, शतकं -३६ अर्ध शतक-६३ सरासरी-५२.३१ झेल - २१० खेळलेले चेंडु - ३१२५८
जेव्हां कसोटी क्रिकेटबद्दल बोलतो तेव्हां नुसते धावा, सरासरी बद्द्ल बोलून चालत नाहे. खेळाडू किती चेंडु खेळला, तो कोणत्या क्रंमाकावर खेळतो, देशात आणि परदेशातीला कामगिरी ही तितकीच महत्वाची असते. राहूल सर्वश्रेष्ठ आहे कारण -
१. त्याच्या करियरच्या बर्याचश्या काळात ओपनिंग तितपतच होती. (आणि परदेशात तर तो फक्त औपचारीकपणे ३ नंबरला फलंदाजी करे)
२. नेहमी सरासरी धावांची काढतात, पण जर खेळलेल्या चेंडूची काढली तर राहून नं. १ ला असेल.
३. कसोटी म्हणजे बरेचदा बचाव, अनिर्णित राखण पण महत्वाचं म्हणून राहुल चं महत्व आणखी वाढतं कारण पीच वर सर्वात जास्त वेळ त्याने काढलाय.
४. झेल पण महत्वाचे असतात न?
५. आणि लारा. सचिन. रिकी, कॅलिस सर्वांची घराची कामगिरी परदेशी कामगिरीपेक्षा सरस होती, एकटा राहुलची परदेशातीला कामगिरी अव्वल आहे.
भाऊ नमसकर | 10 June, 2013 -
भाऊ नमसकर | 10 June, 2013 - 01:53
असामान्य प्रतिभा, शारिरीक व मानसिक कणखरपणा, प्रचंड मेहनतीने मिळवलेलं तंत्रावरचं प्रभुत्व इत्यादींशिवाय जागतिक स्तरावर दीर्घ काळ सातत्यपूर्ण भरीव कामगिरी निव्वळ अशक्य आहे. त्यामुळें असा प्रत्येक खेळाडूच बर्याच अंशीं "सर्वश्रेष्ठ" संज्ञेला पात्र ठरतो.
...
भाउंशी १०० टक्के सहमत. गेल्या २० वर्षातील सर्वश्रेष्ठ खेळाडु निवडायचा असेल तर प्रत्येक खेळाडुचे काही अधिक उणे आहेत.
१) कॅलिस हा त्याच्या ऑलराऊंड परफॉरमन्स्मुळे सध्या सर्वात पुढे आहे हा त्याचा अधिक पॉइंट असला तरी त्याची फलंदाजी तेव्हढी भक्कम नाही त्याची बरीचशी शतके(सचिन पेक्शा पण जास्त) कमकुवत गोलंदाजीपुढे झाली आहेत (त्याचे ऑस्ट्रेलिया इंगंड्विरुद्ध अॅव्हरेज चक्क ३८ आणि ४० आहे. सचिनचे असे कमी अॅव्हरेज अफ्रिकेविरुद्ध ४२ आहे). अर्थात आपल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर तो सध्या सर्वात पुढे आहे हे नि:संशय.
२) सचिन ९० ते २००२ या काळात अत्यंत श्रेष्ठ असला तरी प्रदीर्घ कालावधीत, दीर्घ बॅड्पॅचेस मुळे त्याची सरासरी कमी झाली आहे. बरेचदा हे लक्षात येत नाही पण सचिनने ४५ च्या सरासरीने एकदिवसीय सामन्यात ४९ शतके आणि ९५ अर्धशतके झळकावली आहेत. ४५ ही सरासरी एकदिवसीय सामन्यात १५० गेम खेळलेल्या कोणत्याही ओपनरसाठी सर्वोत्कृष्ठ असावी. धावांच्या सुकाळ असणार्या युगात घातक खेळ्या करणार्या सेहवागचीही सरासरी ३६ च्या आसपास होती.
२ worldcups मध्ये सर्वात जास्त धावा (आणि २०११ मध्ये) रनर्स अप. असा उत्कृष्ठ परफॉर्मन्स सचिनने दिला आहे.
ipl t20 मध्ये देखिल २०१० मध्ये जोरदार खेळ्या करुन मुम्बैला फायनल्मध्ये आणण्यात सचिनचा मोठा हात होता (फायनलमध्ये मात्र तो संथ खेळला) आतापर्यंत ipl मध्ये ऑरएन्ज कॅप मिळवणारा तो एकमेव भारतीय आहे.
३) अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत प्रदीर्घ खेळ्या करुन संघाला अडचणीतुन बाहेर काढणे ह्यात लाराचा हात धरणारा दुसरा कोणीही नाही. लाराचे नशिब फुटके की तो ज्या काळात खेळला त्या काळात त्याला पुरेशी साथ इतर कोणा फलंदाजाकडुन मिळाली नाही अन्यथा आपल्याला अजुन जास्त परफॉर्मन्सेस दिसले असते. अर्थात लारा एकदिवसीय आणि टी २० त सचिन आणि कॅलिसपेक्शा मागे येतो.
४) पॉन्टिन्ग माझ्यामते या सर्वात कमकुवत फलंदाज पण सर्वोत्कृष्ठ स्ट्रॅटेजिअन आणि कप्तान होता. धोनी हा इतर कुणापेक्षा पॉन्टिन्गचा वारसदार आहे. पॉन्टिन्गला अर्थात ऑसीजच्या सुवर्णकाळात फलंदाजी करायला मिळाली. nothing succeeds like success
हे खर्या अर्थाने पॉन्टिंगने अनुभवले. सतत (एखाद्या सामन्यात नाही) दबाव असताना तो कसा खेळला असता हे मात्र अनुभवता आले नाही.
फक्त टेस्ट्मध्ये गेल्या २० वर्षात क्रमवारी अशी लागेल.
शेन वार्न, लारा, मुरली, कॅलिस, सचिन, द्रवीड, पॉन्टिंग (कारण लाराने एकट्याने जितके सामने जिंकुन दिलेत वा ड्रॉ केलेत तेव्हढे कोणीच नाही)
फक्त एक्दिवसीय सामन्यात क्रमवारी अशी लागेल
सचिन, बेवन (फार पुढे आहेत), (पॉन्टिंग कॅलिस ) , लारा
२० वर्षात सर्वोत्कृष्ठ खेळाडु पहावयाचा असेल तर माझ्या मते
सचिन, शेन वार्न, कॅलिस, लारा, पॉन्टिन्ग.
डीडीजी, राहुलच्या महानतेबद्दल
डीडीजी, राहुलच्या महानतेबद्दल कुणीही शंका घेऊंच शकत नाही. फक्त, मीं म्हटल्याप्रमाणे 'सर्वश्रेष्ठ' ठरवताना वेगवेगळे निकष लावले जाणार व त्यामुळे गोंधळ होणारच. उदा. पाँटींगची आंकडेवारी १६८कसोटी, १३,३७८ धांवा, ४१ शतकं, ६२ अर्धशतकं [सरासरी ५१.८] व १९६ झेल अशी आहे. या कामगिरीला << सर्वांची घराची कामगिरी परदेशी कामगिरीपेक्षा सरस होती >> याने कमीपणा येत नाही कारण त्याच्या घरच्या विकेटसवर धांवा करणं हें कोणासाठीही कठीणच होतं [ फक्त आपल्या उपखंडातल्या 'पाटा' खेळपट्ट्यांवर केलेल्या धांवानाच कांहीसं कमी लेखणं समर्थनीय होऊं शकतं.] सोबर्सची आंकडेवारी आहे - फक्त ९३ कसोटीत ८०३२ धांवा [ उच्चतम ३६५], २६ शतकं, ३० अर्धशतकं, झेल- १०९ व २३५बळी [३४ धांवांच्या सरासरीने]. फक्त आंकडेवारीच्या जोरावर पाँटींग, राहुल व सोबर्स यांची तौलनिक महानता कशी ठरवतां येईल ? हें झालं फक्त आंकडेवारीच्या निकषाचं. इतर निकष मधेच घुसले तर गोंधळच उडणार ना !
म्हणूनच, आपल्याला सर्वांत आवडतो तो सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणावं ,हें उत्तम !!
sulu | 10 June, 2013 -
sulu | 10 June, 2013 - 13:32
सर्वोत्तम active क्रिकेटर - कयालिस
सर्वोत्तम active फलंदाज - सचिन
>>
ही पोस्ट पाहिली नव्हती. ही कदाचित बरोबर असेल. फक्त एकच गोष्ट आहे. जसा सचिन, सेहवाग वा लारा किंवा पाँटिंग (आणि टेस्ट मध्ये द्रविड) टिकला तर काही खैर नाही असे वाटणारा दीर्घ कालखंड होता. त्यांच्या खेळ्या सहकार्यांच्यात पण उत्साह निर्माण करत अशा खेळ्या कॅलिसच्या फारच कमी आहेत. किंवा असा दबदबा कॅलिसचा कधिच वाटला नाही. कपिल, इम्रान च्या दर्जाचा ऑलराउंडर पण कॅलिस नव्हता असे मी म्हणेन सोबर्सची तर गोष्ट सोडुन द्या. आकडेवारी कधी कधी फसवी असु शकते.
हे वैयक्तिक मत आहे.
किरण्यके (पहिली पोस्ट) आणि
किरण्यके (पहिली पोस्ट) आणि निलिमा यांच्याशी सहमत आहे.
जगातला सर्वश्रेष्ठ क्रिकेटर
जगातला सर्वश्रेष्ठ क्रिकेटर कोण ? सचिन, लारा, पोंटिंग कि कॅलिस.
>>>>>>>>>>
तुम्हाला फलंदाज म्हणायचे आहे का?
एकदिवसीय क्रिकेटचा विचार केला
एकदिवसीय क्रिकेटचा विचार केला तर सचिनच्या जवळपासही कोणी फिरकत नाही. कदाचित पुढे-मागे आलाच तर विराट कोहलीच येऊ शकेल.
कसोटी सामन्यांचा विचार केला तर निव्वळ फलंदाज म्हणून सचिनच्या तुलनेत फक्त लारा आणि काही प्रमाणात कॅलीस. पाँटींग भारतीय उपखंडात साफ अपयशी ठरलेला आहे.
सचिनच्या करिअरच्या सुरवातीच्या काळात तो निव्वळ वन मॅन शो होता. १९९६ मध्ये द्रविड-गांगुली आणि त्यांच्यानंतर लक्ष्मण आल्यावरही ते स्थिरावेपर्यंतचा काळ हा बराचसा सचिनवर अवलंबून होता. भारताविरुध्द खेळताना द्रविड-गांगुली-लक्ष्मण यांच्यापेक्षाही सर्वांना सचिनची विकेट महत्त्वाची वाटणं आणि त्याच्यासाठी वॉर्न, डोनाल्ड आणि मॅकग्राथ यांनी खास व्यूहरचना करणं यातच सगळं आलं. नंतरच्या काळात ऑस्ट्रेलियाच्या पत्रिकेत 'लक्ष्मणयोग' आला तरीही सचिनची विकेट अनन्यसाधारणच होती.
सर्वात महत्त्वाचं, सर्वांच्या आशा-अपेक्षांचं ओझं घेऊन जितकं सचिनला खेळावं लागलं, तितकं गावसकरसकट इतर कोणालाही खेळावं लागलेलं नाही. शतकापेक्षा कमी म्हणजे अपयश मानणारे अतिउत्साही चाहते, हातात कधी बॅट न धरता त्याला फुकटचे सल्ले देणारे 'एक्स्पर्ट्स' आणि मांजरेकर, इयन चॅपल आणि तत्सम कॉमेंटेटर्स यांचं एकत्रीत दडपण घेऊन खेळणं हे खायचं काम नाही. लारा, पाँटींग किंवा कॅलीस यांना अशा दडपणाचा सामना करावा लागलेला नाही.
पाँटींग भारतीय उपखंडात साफ
पाँटींग भारतीय उपखंडात साफ अपयशी ठरलेला आहे.
>>>>>>>>>
भारतात अपयशी.. भारतीय उपखंडात नाही..
भारतीय उपखंडाचा विचार केल्यास त्याची सरासरी खालीलप्रमाणे
श्रीलंका - ४८.२०
पाकिस्तान - ११९ (एकच सामना)
बांग्लादेश - ९५.५० (दोनच सामने)
एकदिवसीय मध्ये मात्र पंटर भारतात देखील ४० ची सरासरी राखून आहेच
तसेच,
श्रीलंका - ४२
पाकिस्तान - ८० (चार सामने)
असा सर्वसाधारण रेकॉर्ड आहे
भारतात एकदा हरभजनने त्याला बेक्कार बकरा बनवला होता, मात्र तो काळ आला आणि निघून गेला. दरवेळी हरभजनचे त्याने तसले लाड नाही करवले. खरे तर असे होते एखाद्या गोलंदाजाच्या बाबतीत. खुद्द सचिनला सुद्धा सईद अजमलच्या गोलंदाजीवर चाचपडताना पाहिलेय. गुगली नाही कळायचा त्याला त्याचा सुरुवातीला. पुढे या दोघांतला सामना रंगायच्या आधी सचिनने एक्झिट घेतली. श्रीलंकेच्या अजंथा मेंडीसने ही आल्याआल्या हवा केली होती त्यात फिरकीला सरस खेळणारे भारतीय फलंदाज सुद्धा गळपटले होते. मात्र पुढच्याच मालिकेपासून चित्र बदलले, त्याचा फारसा त्रास झाल्यचे आठवत नाही..
Pages