Submitted by पीनी on 5 March, 2014 - 07:02
मला बाल्कनीला छत करायचे आहे. फ्लॅट शेवटच्या मजल्यावर आहे.
मिळालेली महिती -
१. पत्रा - पावसाळ्यात तसेच खूप वार्यामुळे आवाज होतो. काही काळाने गंजतो.
२. फायबर - आवाज कमी पण कमी टिकतो. मेंटेनन्स लागतो.
यात फिक्सड आणि रिक्ट्राक्टेबल (काढता येतील असे) टाईप आहेत.
कोणी सुचवू शकतील का अजून पर्याय? खर्च किती येईल?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मलापण घरातील बाल्कनीला असे छत
मलापण घरातील बाल्कनीला असे छत करून घ्यायचे आहे. माझ्या माहितीनुसार फायबरचे रिट्रॅक्टेबल जास्त चांगले. पण आधिक माहिती मी शोधून सांगतो.
काही आगाऊ सूचना: १. आपल्या
काही आगाऊ सूचना:
१. आपल्या घराच्या आहे त्या स्ट्रक्चरमधे कोणतेही बदल करण्याआधी कृपया चांगल्या व इमानदार इंजिनियर/आर्किटेक्टकडून खातरजमा करून घ्या, की तुमच्या इमारतीस या बदलामुळे नुकसान होणार नाही.
२. बाल्कनीची साईझ किती? शेवटचा मजला म्हणजे ८वा? १०वा? कितवा? तिथला वार्याचा वेग किती? दिशा कोणती?
यानुसार किती हेवी छत बनवावे लागेल ते ठरेल.
३. रिट्रॅक्टेबल्स महाग असतात. वारंवार हलवले गेले नाहीत, तर गंजून नॉन रिट्रॅक्टेबलच होऊन जातात.
४. छत फक्त सावली म्हणून हवे आहे की पावसापासून बचाव म्हणून?
सावलीसाठी हवे असेल, तर पत्र्या ऐवजी आजकाल हिरव्या रंगाची एक जाळी मिळते प्लॅस्टिकची, शेतांत वगैरे सावली बनवायला वापरतात. ही लाईटवेट व वार्याला आरपार जाऊ देणारी असते, त्यामुळे व्हेंटिलेशन होत रहाते, प्लस हवेच्या जोराने उडून जाऊ नये म्हणून फार हेवी लोखंडी काम करावे लागत नाही.
धन्यवाद!
१. आपल्या घराच्या आहे त्या
१. आपल्या घराच्या आहे त्या स्ट्रक्चरमधे कोणतेही बदल करण्याआधी कृपया चांगल्या व इमानदार इंजिनियर/आर्किटेक्टकडून खातरजमा करून घ्या, की तुमच्या इमारतीस या बदलामुळे नुकसान होणार नाही.
>> धन्यवाद.
२. बाल्कनीची साईझ किती? शेवटचा मजला म्हणजे ८वा? १०वा? कितवा? तिथला वार्याचा वेग किती? दिशा कोणती?
यानुसार किती हेवी छत बनवावे लागेल ते ठरेल.
>> साईज - ६.५ * १०.५ फूट. बिल्डिंग सात मजली आहे. आमचा सहावा मजला. पण सातव्या मजल्याची बाल्कनी पलिकडच्या बाजूला येते म्हणून शेवटचा मजला म्हणाले मी. बाल्कनी पुर्वेकडे आहे. वारा फार जोरात नसतो.
४. छत फक्त सावली म्हणून हवे आहे की पावसापासून बचाव म्हणून?
सावलीसाठी हवे असेल, तर पत्र्या ऐवजी आजकाल हिरव्या रंगाची एक जाळी मिळते प्लॅस्टिकची, शेतांत वगैरे सावली बनवायला वापरतात. ही लाईटवेट व वार्याला आरपार जाऊ देणारी असते, त्यामुळे व्हेंटिलेशन होत रहाते, प्लस हवेच्या जोराने उडून जाऊ नये म्हणून फार हेवी लोखंडी काम करावे लागत नाही.
>> बाल्कनीत शोभेची छोटी (नाजूक) झाडे लावली आहेत. ती ऊन पावसामुळे खराब होतात. तसच, पाऊस पडून गेला कि बाल्कनीत फार चिकचिक घाण होते. प्रत्येक वेळी धुवून घासून घ्यावी लागते, तरच बाल्कनीत जाता येते.
आणि मला बाल्कनीत केनचा छोटा झोपाळा लावायचा आहे. तोही पावसामुळे खराब व्हायला नको.
ही हिरव्या रंगाची जाळी पावसाचा जोर कमी करते का? तिच्या आत अर्ध्या भागात पत्रा लावुन घ्यावा का? म्हणजे तिथे झोपाळा लावता येईल. पण मग पावसाचा आवाज खुप होईल का?
मी ज्या डीलर्सना विचारले ते म्हणतात की पत्र्याचा फार आवाज होत नाही. पण ज्यानी पत्रे बसवले आहेत, ते आवाजाचा बराच त्रास होतो असे म्हणतात. कुठले वेगळ्या प्रकारचे पत्रे असतात का?
Polycarbonate sheet लावू
Polycarbonate sheet लावू शकता.
Ciear sheet लावली तर प्रकाशही छान येतो..दिसायलाही छान वाटतात.
Apartment च्या elavation मध्ये हा बदल चालणार आहे का? याची खात्री करुन घ्या.
पत्र्यांचा आवाज येतो.
पत्र्यांचा आवाज येतो.
आँनिंग चा विचार कसा
आँनिंग चा विचार कसा वाटतो?
मलाहि पावसा साठी तात्पुरुता उपाय व इतर वेळेस आकाश दिसावयास हवे असे पाहिजे होते. आप्ल्या वाटेला आलेल्या तुकड्यात्ल्या खुल्या जगेतुन आकश, चंद्र, चांदणे, सुर्यप्रकाश दिसणे अगदी आवश्यक.
थोडे खर्चिक पण खुपच सोइचे.
बघा विचार करून....!
रिट्रॅक्टेबल्स महाग असतात.
रिट्रॅक्टेबल्स महाग असतात. वारंवार हलवले गेले नाहीत, तर गंजून नॉन रिट्रॅक्टेबलच होऊन जातात. - हे मात्र खरे
आँनिंग चा विचार कसा वाटतो? - खर्चिक तर आहेच. उघडणे आणि बंद करण्याचा उत्साह किती आहे हे पण तपासून बघा. नाहीतर आहेच " तुझीच हौस तूच संभाळ "
वाईट नका वाटून घेवू पण अनुभव आहे.
बाल्कनीला छत हा माझ्याही
बाल्कनीला छत हा माझ्याही डोक्यात अलिकडे वारंवार घोळत असलेला विषय आहे.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
रिट्रॅक्टेबल्स महाग म्हणजे असे किती महाग असतात? समजा ६X१० च्या बाल्कनीला करायचं असेल तर? इब्लिस तुम्ही कोणती गीन जाळी म्हणताय? इथे चित्र देता येऊ शकेल का?
माझ्याकडे बाल्कनीत उन अजिब्बात येत नाही. पण कबुतरांचा अमाप त्रास आहे
पत्र्यांचा प्रचंड आवाज येतो.
पत्र्यांचा प्रचंड आवाज येतो. तुमच्या इथे फार पाऊस पडत नसेल तर चालण्यासारखं आहे. नाहीतर इथे पावसाळ्यात अखंड दिवस-दोन दिवस पाऊस पडत असतो, तेव्हा डोकं जाम उठतं त्या आवाजानं.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
फायबर, अॅस्बेस्टॉस, साधा पत्रा - सर्व प्रकार सर्व घरांमध्ये करून पाहिलेले आहेत.
गीन जाळी म्हणजे अशी का? (नेट
गीन जाळी म्हणजे अशी का? (नेट वरुन घेतले आहे.)
ललिता-प्रीति - मी पुण्यात रहाते.
रंगासेठ, शाम्भवी, झकासराव, यक्ष, मृणाल १ - धन्यवाद.
आमचा पण टॉप फ्लोअर (तिसरा)
आमचा पण टॉप फ्लोअर (तिसरा) आहे. बेडरूमची बाल्कनी पश्चिमेला आहे त्यामुळे उन्हाळ्यात उन्हाचा खूप त्रास होतो. ६-६:३० वाजेपर्यंत ऊन असते. वरच्या प्रचितली हिरवी जाळी उपयोगी पडेल का? मी वाळ्याचा पडदा लावायचा विचार करत होते.
मी नताशा > हो. ती हीरवी जाळी
मी नताशा > हो. ती हीरवी जाळी फारच मस्त. व्यवस्थित बसवून घेतली तर अजिबात त्रास नाही होत उन्हाचा. वारही खेळतं राहातं अन झाडाना ही उन्हाची झळ नाही बसत.
दक्षिणा, तुझा कबुतरांचा त्रास
दक्षिणा, तुझा कबुतरांचा त्रास अजून संपुष्टात आला नाही का? ते बर्ड नेट तू लावून घेतले नाहीस का?
मंजूडे सोसायटीने परवानगी दिली
मंजूडे सोसायटीने परवानगी दिली नाही. नेटवाले येऊन एस्टिमेट वगैरे देऊन गेले होते. तरिही.
मग मी फालतूची एक जाळी लावून घेतली. कबुतरं त्यावर बसतात. आणि पुर्वी फक्त कडांवर बाल्कनी घाण व्हायची आता संपूर्ण होते. पण त्याचं इतकं काही वाटत नाही. झाडं वाचतायत माझी. कोणत्याही प्रकारे घाण पण आत येता कामा नये असं काहीतरी पाहतेय मी. बाल्कनी रोज धुणं मला पटत नाही, कारण पाणी फार वाया जातं त्यात.
मग सोसायटीने त्या फालतूच्या
मग सोसायटीने त्या फालतूच्या जाळीला कशी परवानगी दिली? आणि त्या ग्रीन जाळीला तरी कशी परवानगी देतील?
बाल्कनी रोज धुणं वैतागवाणीच आहे.
मि कुणालाच न विचारता लावून
मि कुणालाच न विचारता लावून घेतली. कारण सोसायटी ने नंतर येऊन काढून टाका म्हणलं तर जास्ती नुकसान नको म्हणून. २००० ची जाळी. ते नेट १२ हजार सांगितलं होतं.
मी वाळ्याचा पडदा लावायचा
मी वाळ्याचा पडदा लावायचा विचार करत होते. - मी वापरला आहे म्हणून माझा अनुभव सांगते १ वर्ष छान राहतो. पण नंतर खूप कचरा पडायला लागतो. खूप अंधार वाटू शकतो. पावसाळ्यात पाऊस त्यावर पडत राहिला तर ओला राहून त्रास होतो. माझ्या मते वाळ्याचा पडदा फक्त उन्हाळ्यात लावा .इतर वेळी काढून ठेवावा लागेल . त्याची गुंडाळी खूप जड & जाड होते. कचरा तर होतोच.
चटई चे पडदे मिळतात. ते बघ. त्याला गुंडाळायची पण सोय असते (roll on blind ) हे हिरवे पडदे तसे गुंडाळता आले तर मस्तच होयील.
योकु - ती हीरवी जाळी फारच
योकु - ती हीरवी जाळी फारच मस्त. व्यवस्थित बसवून घेतली तर अजिबात त्रास नाही होत उन्हाचा. वारही खेळतं राहातं अन झाडाना ही उन्हाची झळ नाही बसत.
>> या जाळीमुळे पावसाळ्यात पावसाचा जोर कमी होतो का? मला बाल्कनीत केनचा छोटा झोपाळा लावायचा आहे. तोही पावसामुळे खराब व्हायला नको आणि झाडं सुद्धा खराब व्हायला नको.
"व्यवस्थित बसवून घेतली तर" म्हणजे कशी? तुम्ही लावून घेतली असेल तर फोटो टाकता येईल का?
दक्षिणा,
तुम्ही कुठली जाळी लावली आहे? फोटो टाकता येईल का?
धन्यवाद.
पत्रा - पावसाळ्यात आवाज येतो.
पत्रा - पावसाळ्यात आवाज येतो. शिवाय (तुमच्या केसमध्ये नसले तरी) वरच्या मजल्यावरील लोकांनी आपल्या बाल्कनी धुतल्या की ते पाणीही अभिषेकासमान तुमच्या बाल्कनीच्या पत्र्यावर पडून आवाज येऊ शकतो. सोसाट्याचे वारे सुटले तरी पत्रे थडाथडा आवाज करू शकतात.
ऑनिंग - मुसळधार, सोसाट्याच्या वार्याच्या पावसात काही लोकांच्या बाल्कनीजची ऑनिंग्ज उडून गेल्याच्या घटना गेल्या काही महिन्यांमध्ये घडल्या आहेत.
वाळ्याचे पडदे - सुगंधी, गार, सावली देणारा, पाणी खर्चणारा आणि कचरा भरपूर होणारा उपाय. शिवाय पडद्यावर मारलेले पाणी खाली गळत राहाते व त्याचा (काहींना) उपद्रव होतो. खालच्या मजल्यावरचे लोक तक्रार करू शकतात. सतत पाणी मारावे लागत असल्यामुळे इमारतीच्या बाहेरच्या बाजूचा रंग खराब होऊ शकतो. तुमच्या भागात डास असल्यास पडद्यातून ठिबकणारे पाणी कोणत्या ठिकाणी साचून राहात नाही ना, त्याचा योग्य निचरा होत आहे ना, हेही पाहावे लागेल. वाळ्याच्या पडद्यातील वाळा (आणि सुतळ्या) पक्षी लोक्स (खास करून कबूतरे, चिमण्या इ.) घरटी बांधण्यासाठी पळवून नेतात.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हिरवी जाळी तुमच्यासाठी चांगला
हिरवी जाळी तुमच्यासाठी चांगला ऑप्शन राहील असे वाटते.
दुहेरी लावली तर पावसापासून जास्त बचाव होईल. पण पाणी आत येणारच. पावसाळ्यापुरता त्यावर प्लॅस्टिक कागद अंथरण्याचा पर्याय आहे. (इथेही वापरून वाया गेलेले फ्लेक्स बोर्ड्स जुन्याबाजारातून मिळाले तर उपयोगी पडतात.)
फ्लेक्स बोर्ड लावण्यासाठीच्या लोखंडी फ्रेम्स असतात तश्या लाईटवेट ट्यूबच्या चौकटी तयार करून त्यावर बांधून मिळाल्यात तर छान काम होईल. बिजागरी बसवून चौकटी फोल्डेबलही बनवता येतात. (मी केल्या आहेत. पण कारागीर ओळखीतला असल्याने असे कस्टम काम त्याने केले. तुमच्या आसपास असे करून देणारा कुणी फॅब्रिकेटर शोधायला हवा.)
जाळी असल्याने वारा आरपार जातो, व फ्रेमसकट जाळी उडून जाण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे जास्त हेवी लोखंडकाम करावे लागत नाही. त्याचमुळे बिल्डिंग स्ट्रक्चरला धोका पोहोचण्याची शक्यताही कमी होते.
ही आयडिया भारी वाटत आहे. पण
ही आयडिया भारी वाटत आहे. पण मला "बिजागरी बसवून चौकटी फोल्डेबलही बनवता येतात." हे नजरेसमोर आणता येत नाहिये.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
तरी एखादया फॅब्रिकेटरला हे सांगुन बघते त्याला कळतयं का ते? तुमचा फॅब्रिकेटर पुण्यातला आहे का? त्याचा नंबर मिळेल का? आणि साधारण खर्च किती येईल?
धन्यवाद.
महागाची कुठलेही कायमस्वरुपी
महागाची कुठलेही कायमस्वरुपी छत करण्यापुर्वी आपल्या सोसायटीची नियमावली वाचा.... म्हणजे नंतरचा मनस्ताप कमी होईल.... शक्यतो सोसायटी फोर्म झाली नसेल तर ती होइपर्यंत वाट बघा आणि मग सर्वसहमतीने छतासंदर्भात नियम बनवून घ्या!
बर्याचदा उन पाऊस यापेक्षा प्रायव्हसी हा मुख्य उद्देश असतो कारण सध्याच्या डिझाइन्सनुसार ओपन टेरेसच्या लगेच वर वरच्या फ्लॅटची खिडकी असते![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आँनिंग चा विचार कसा वाटतो? +१
आँनिंग चा विचार कसा वाटतो? +१
>>मी वाळ्याचा पडदा लावायचा
>>मी वाळ्याचा पडदा लावायचा विचार करत होते. - मी वापरला आहे म्हणून माझा अनुभव सांगते १ वर्ष छान राहतो
पुण्यात वाळ्याचे पडदे कुठे मिळतील याची माहिती देऊ शकाल का? - धन्यवाद...
मनकवडा - लक्ष्मी रस्त्यावर
मनकवडा - लक्ष्मी रस्त्यावर सिटी पोस्टाजवळ हसनभाईचे दुकान. तिथे कोठेही विचारा.
धन्यवाद अरुंधती...
धन्यवाद अरुंधती...
कबुतरांचा त्रास किती महागात
कबुतरांचा त्रास किती महागात पडू शकतो, याची कल्पना देणारा लेखः http://www.loksatta.com/chaturang-news/pigeon-allergy-1009785/
लिंक शेअर करण्यासाठी हा धागा योग्य वाटला, पण अजून कुठे कबुतरांच्या त्रासाविषयी चर्चा झालेली असल्यास तिथे ही लिंक डकवेन.
मुंबईत चटईचे पडदे (roll on
मुंबईत चटईचे पडदे (roll on blind) किंवा वाळ्याचे पडदे कुठे मिळतील? गॅलरीत बसवून घ्यायचे आहेत. साधारण किती खर्च येतो याचा ही अंदाज मिळाला तर जरूर द्या. धन्यवाद!
चिकाचे पड्दे हा वाळ्याच्या
चिकाचे पड्दे हा वाळ्याच्या पडद्यांना पर्याय आहे. पण छत म्हणून कल्पना नाही.
एका बाल्कनीत अँगल्स टाकून त्यावर कौलं बसवून घेतलेली आहेत. कुणी आक्षेप घेतलेला नाही. कौलांमुळे थंडावा मिळतो, दिसायला सुरुवातीला सुंदर दिसतात. पुसून घेणं नंतर होत नाही आणि काळा रंग जमा होत जातो.
लावण्याची पद्धत
https://encrypted-tbn1.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRbxBjyxR8VCJIM9ogS...
काही ठिकाणी बांबूच्या अर्धगोलाकार पट्ट्या लावतात. त्या एकमेकांना बांधण्यासाठी ज्या क्लिप्स वापरतात त्याची माहिती सध्या माझ्याकडे नाही. गुगळून पहा.
बाल्कनी मोठी असेल तर लाकडी सांगाडा बनवून जपानी पद्धतीने लाकडाचेही छत बनवता येते. गुगळून पाहील्यास अनेक पर्याय आढळतील. काही ठिकाणी सल्ले देण्याचीही सोय उपलब्ध आहे.
(No subject)
Pages