जावई विकत घेणे आहे

Submitted by रश्मी. on 4 March, 2014 - 00:54

कालपासुन झी मराठी वर नवीन सिरीयल सुरु झाली. जावई विकत घेणे आहे ही. तर तिच्याविषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा. इथे बाकी गोष्टीन्ची चर्चा केली तरी चालेल.:फिदी:

काल जास्त पहाता आली नाही, ज्यानी पाहिली त्यानी इथे जमल्यास लिहावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग दक्षिणा तसे हेडिन्गमध्ये टाकणे मला जरुरीच वाटले, नाहीतर नुसत्या वर्णनाने मिळमिळीत वाटली असती चर्चा.:फिदी: आणी मला जे सान्गायचे आहे, ते पण राहुन गेले असते.:डोमा::फिदी:

बाय द वे, कुणी निदान टिव्हीवर तरी अशोक सराफ, पद्मा चव्हाण आणी रन्जनाचा चित्रपट पाहिला आहे का ज्यात अशोक सराफ पद्मा चव्हाणचा घरजावई दाखवलाय. तुफान विनोदी होता तो पिक्चर. शेवटी बायकोच्या छळाने वैतागलेला सासरा म्हणजे निळू फुले अशोक सराफची मदत करतो.

आता ही सिरीयल तशा विनोदी वळणाने जातेय की वादावादीतच रन्गतेय ते कळेलच. जरा फ्रेश चेहेरे दिसतायत. पण हिरो एवढा खास नाही वाटला, कदाचीत अ‍ॅक्टिन्गमधे पुढे असेल.

बाय द वे, कुणी निदान टिव्हीवर तरी अशोक सराफ, पद्मा चव्हाण आणी रन्जनाचा चित्रपट पाहिला आहे का ज्यात अशोक सराफ पद्मा चव्हाणचा घरजावई दाखवलाय. तुफान विनोदी होता तो पिक्चर. शेवटी बायकोच्या छळाने वैतागलेला सासरा म्हणजे निळू फुले अशोक सराफची मदत करतो. >>>
सासू वरचढ जावई.

हो रश्मी तो चित्रपट (सासू वरचढ जावई) मी शाळेत असताना चक्क थेटरात पहिला होता. हेमामालिनीचा जमाईराजा टीव्हीवर पहिला.

मस्त चित्रपट होता, मी भारतमातामध्ये पाहिलेला Happy

अशोक सराफ, पद्मा चव्हाण आणी रन्जना तिघांचीही कामे जबरी होती त्यात. निळू फुलेचा सस्पेन्स शेवटी उघडतो. Happy

रंजना त्यानंतर दिसली नाही, त्याच सुमारास अपघात झाला बहुतेक.

अरे धन्यवाद प्राची, अन्जू.:स्मित:

जमाईराजा नाही पाहिला मी.

आता येता ही सिरीयल बघता येईल.

साधना+१ आजकाल सगळ्याना एकुलती एकच मुले असतात. जसे मुलाच्या आईबाबान्चा प्रश्न येतो, तसेच मुलीच्या येणार नाही का? दोन्ही बाजूने पुढाकार घेतल्यास दोघान्चे आईबाबा आणी मुले- मुली कायमचे सुखी होतील.

चला त्या निमित्ताने तुम्ही लोकांनी सामाजातील नविन समस्येला वाचा फोडली आहे. Proud
होऊ दे चर्चा (होऊ दे खर्च च्या तालावर. :खोखो:)

चर्चा तर होणारच! Biggrin
चर्चा काहीही आणि कितीही करा. कृती कोणीच करत नाही, सिरियलवाले तर मुळीच नाही. तरीपण, होऊद्या खर्च! Proud

तुम्ही लोकांनी सामाजातील नविन समस्येला वाचा फोडली आहे.>>> Biggrin

आईग्गं... आम्हाला मोठ्या घराचा विचार करावा लागणार आता... इतके दिवस लेक सासरी जाईल म्हणून निश्चिंत होतो आम्ही Proud

५० हजार रुपयात ५ फुट उंची ५० किलो वजन
८० हजार रुपयात ५.५ फुट उंची ६० किलो वजन
१. ते १.२५ लाख ६ फुटा पेक्षा जास्त ( दर इंच बरोबर दर वाढत जातील)

बिनव्यसनाचे एक्स्ट्रा चार्जेस..

बिनादारुचा - ४९५०० /- ( एका वर्षासाठी )
बिना गुटख्याचा - २६७५०/- ( ६ महिन्यासाठी )
बिना तंबाखुचा - २१३४०/- ( २ वर्षांकरीता )
बिना विबांस चा - ५९६८०/- ( दर २ महिन्यासाठी )

दाढी मिशांसाठीचे दर वेगळे.. ते प्रॉडक्ट वर अवलंबुन आहे. ( तेवढी सुविधा त्याला दिलेली आहे)
सर्विज चार्जेस एक्स्ट्रा -
व्हॅट सीएसटी ५% +

प्रॉडक्ट बिघडला अथवा फाजिल लाडाने बिघडल्यास "आम्ही" जवाबदार नाही.

रिप्लेसमेंट होउ शकेल.. त्याचे चार्जेस आपल्या बिलातुन वजा केले जातील

धन्यवाद.

पुरुष विकाव / बचाव समिती.

Rofl

आजचा भाग पाहिला का? राया ची आई व मुलीची आई दोघींचे संवाद व अ‍ॅक्टिंग एकदम १९५० च्या काळातील वाट्त्ते. ह्यातही एक स्टुपीड सून आहे. भिंग घेउन तांदूळ निवड्णारी. राया हा हीरू चिट्णवीस परिवारातील आहे
भलतेच बो अरि ग आ जी आजोबा आहेत. मु लगा उत्तम स्व यंपाक करतो. मुलीच्या बहिणीची काही बॅक स्टोरी आहे. सविता प्रभु णे एकदम भिकार अ‍ॅक्टिन्ग. अर्धा वेळ खाण्या त व प दार्थांचे वर्णन कर्ण्यात गेला. मुलीला मोठे कुटुंब हवे आहे. ओ नो नॉट अगेन.

पहिला भाग पाहिला.... अँकरसकट सगळ्यांची अ‍ॅक्टिन्ग अत्यंत कृत्रिम वाटली (खासकरून मुलाची आई, आजी व सविता प्रभुणे)....नाही आवडली....

एका आठवडयापेक्षा जास्त हि मालिका माझ्याने पाहिली जाईल असे वाटत नाही आहे. पहिल्यापेक्षा दुसरा भाग आणखी बेकार होता.

स्मिता तळवलकर च्या घरात असेच सगळे एकत्र राहतात अस तिच्या मुलाखतीत ऐकल होत. मुलगा सून /सुनेचे आई वडील सगळे एकाच घरात . त्यामुळे सगळ सुरळीत चालत अस तीच म्हणण. सुनेच्या आई -वडिलांना पण म्हातारपणी मुलीकडे राहता येत. नातवंडाना दोन्हीकडचे आजी -आजोबा एकाच घरात मिळतात. .मस्त ना ?

मु लगा उत्तम स्व यंपाक करतो. >>>>..बहुतेक इथेच तर गोम असावी.:फिदी: त्या मुलीला स्वयपाक येत नसेल, येत नसेल म्हणण्यापेक्षा आईनेच शिकु दिला नसेल. ( पुढे घरजावई आणणे हा दृष्टीकोन असावा) मग हा भाऊ ( हिरो ) उत्तम पाककलातज्ञ असेल तर बरच की सासुबाईना.

लेक कुठे पाठवायची नाही आणी तिच्या ढिगारभर मागण्या ( टाटा, बिर्लाची इस्टेट असल्यागत) पैसा ओतुन पुरवायच्या.

तळवलकर वरुन आठवले, ती होसुयामीघ मधली बेबी आत्या स्मिता तळवलकरची दुसरी सून आहे का? पहिली ती सुलेखा आहे बुगुशु मधली.

बेबीआत्या, स्मिता तळवळकर यांची पुतणे-सून आहे. एकदा कुठल्यातरी मराठी वाहिनीवर, पोर्णिमा तळवळकर familyसह आली होती (नवरा आणि सासू-सासरे).

त्या मुलीत आणि सविता प्रभुणेत खूप साम्य वाटते.
कथा, मांडणी, अ‍ॅक्टिंग ह्या सगळ्याच बाबतीत अगदीच सुमार वाटली त्यामुळे ही सिरियल बघायचा प्रश्नच येत नाही. 'मला सासू हवी' ची आठवण येते ( तीही कधीच बघू शकले नव्हते )

प्राजक्ता_शिरीन, ती आनंदी नाही. तन्वी पालव असे नाव आहे तिचे.

Pages