Submitted by रश्मी. on 4 March, 2014 - 00:54
कालपासुन झी मराठी वर नवीन सिरीयल सुरु झाली. जावई विकत घेणे आहे ही. तर तिच्याविषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा. इथे बाकी गोष्टीन्ची चर्चा केली तरी चालेल.:फिदी:
काल जास्त पहाता आली नाही, ज्यानी पाहिली त्यानी इथे जमल्यास लिहावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
’मला सासू हवी’ , किंवा ती
’मला सासू हवी’ , किंवा ती अतिषा नाईकवाली सिरीयल (ज्यात तिचं नाव चोरगे होतं)- किंवा आता ही ’जावई विकत’- या अतिशय regressive, मूर्ख व काळाच्या मागे असणाऱ्या मालिकांचाही स्वत:चा असा प्रेक्षकवर्ग असेल का? रादर तो आहेच!
म्हणजे एका बाजूला ’दाटूनिया येता मेघ भरे आकाश ओंजळ....माळ हि व्रताची जपता झाले घराचे देऊळ’ या ऒळींचा विचार करणार ’उंच माझा झोका’चा प्रेक्षकवर्ग, स्वप्नील-मुक्ताचा ’एलदुगो’चा यंगिस्तान फॅनबेस आणि दुसऱ्या बाजूला ’मला सासू हवी’ सारख्या मालिका बघणारी मंडळी. यात ज्यांची मेजॉरिटी त्यांच्यासाठी झी मराठी जास्त मालिका बनवणार.
ती हिरॉईन आणि हिरो बवळट
ती हिरॉईन आणि हिरो बवळट दिसतात.....आवडले नाही....
अगदी बरोबर.. पहिला भाग
अगदी बरोबर.. पहिला भाग बघितला, तेव्हाच कळला भंगार सिरियल असणार ही आणि ती सविता प्रभुणे तर कसली भिकार अॅक्टींग करतीये. तशीही ती मला कधीच आवडली नाहि.
सविता प्रभुणे आईच्या
सविता प्रभुणे आईच्या कॅरॅक्टरमध्ये दाखवली तिथेच मालिका अर्धी गंडलीये... (येथे मला रोहीणी हट्टंगडीच परफेक्ट वाटली असती, पण ती आईआज्जी मधे रमलेय, आणि अतरंगी जावई म्हणून सुमीत राघवन. जास्त स्वप्नरंजन झालं का? किंवा आतिषा नाईक पण मस्त खमकी सासू वाटली असती. जावयाचा सासुरवास करणारी!) अशोक सराफ, पद्मा चव्हाण, रंजना, निळू फुले यांसारख्या सरस अभिनेत्यांमुळे घरजावई या कथाबीजाचे सोने झाले. इथे पात्रनिवडच धन्य आहे तिथे कॉमेडी, कथा वै. बाबी अगदीच गौण आहेत. सिरीयल बघणार नाहीच!! पण अधूनमधून या धाग्यावर फेरी मारेन... (मालिका पाहण्यापेक्षा येथील अपडेट्स जास्त रंजक असतात.)
बाकी मुलीच्या आईवडीलांची काळजी संदर्भात साधनाच्या मताशी सहमत.
मुलीच्या आईवडीलांची काळजी हा आमच्याकडे प्रचंड वादाचा विषय आहे. (लग्नानंतर माहेर विसरायचं असं मला ठणकावून सांगणार्या साबांनी मात्र फक्त माहेरचेच नातेवाईक जोडून ठेवलेत
)
नवरा मात्र मनापासून म्हणालेला गर्भश्रीमंत सासर असतं तर मी हसत हसत घरजावईच कशाला घरगडीही झालो असतो
मुलीच्या आईवडीलांची काळजी हा
मुलीच्या आईवडीलांची काळजी हा आमच्याकडे प्रचंड वादाचा विषय आहे. (लग्नानंतर माहेर विसरायचं असं मला ठणकावून सांगणार्या साबांनी मात्र फक्त माहेरचेच नातेवाईक जोडून ठेवलेत डोळा मारा )>>>लोका सांगे ब्रह्म ज्ञान .... असे बरेच लोक असतात .
नवरा मात्र मनापासून म्हणालेला गर्भश्रीमंत सासर असतं तर मी हसत हसत घरजावईच कशाला घरगडीही झालो असतो फिदीफिदी>>>

आता आपल्याकडे सुनांनी सासरी
आता आपल्याकडे सुनांनी सासरी गपचूप राहण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. ज्या सासरी राहायला तयार असतात त्यांना स्वत:च्या टर्म्सवर राहायचे असते- उगाच सासुरवास खपवून कोणी घेत नाही. त्यामुळॆ काही वर्षांनी बहुधा ’घरसून’ नावाची मालिका काढावी लागेल.
त्या मुलाला बरोब्बर स्वप्नात
त्या मुलाला बरोब्बर स्वप्नात ती प्रांजल प्रधान कशी काय दिसते?
त्याची ती येडचाप आई का वहिनी कोण प्रांजलला बघितल्यावर जगातली एकमेव मुलगी बघायला मिळाल्यासारखी का चेकाळते?
प्रधान म्हणजे सीकेपी असं ती म्हणते म्हणजे प्रत्येक मुलगी घरी आली कि ती आडनाव विचारुन जात पडताळते कि काय?
त्या रायाला पहिल्या रात्रीची कसली स्वप्न पडतात?
राया आणि प्रांजल "सुकांता" हा जगातला एकमेव हॉल असल्यासारखा का भांडतात?
सविता प्रभुणे ह्या १९५० सालातली मालिका असल्यासारखी अॅक्टिंग का करतात?
रायाची एक वहिनी पिठाच्या गिरणीत कामाला असल्याइतकी पावडर का लावते?
तोंडीलावणं म्हणुन ती प्रांजलची आतेबहीण घेतलीये ती नसती घेतली तर नक्की काय बिघडले असते?
काल या सिरियल्सचे प्रोमोज
काल या सिरियल्सचे प्रोमोज पाहिले. हिरोचा आवाज काय म्यांव म्यांव आहे.
महिलादिनाच्या निमित्ताने,
महिलादिनाच्या निमित्ताने, बायकांचे बिनडोक , बालीश , कारस्थानी अतिरंजित चित्रण करणार्या अशा सर्व मालिकांचा निषेध !!
पियू फारच मार्मिक प्रश्न
पियू फारच मार्मिक प्रश्न आहेत..! पण उत्तरं कोण देणार..?
मलाही हा प्रश्न पडतो. मुलगी
मलाही हा प्रश्न पडतो. मुलगी जर सासरी राहु शकते तर मुलगा का नाही त्याच्या सासरी राहु शकत? मुलगा मुलगी एक समान असे वाटणा-यांना तरी घरजावई या कल्पनेत कहीच वाईट दिसायला नको...>>>>>>+११११
वरच्या सगळ्यांनाच
वरच्या सगळ्यांनाच अनुमोदन....
सविता प्रभुणे कपाळावर आठ्या काढून लाडे-लाडे बोलतात, तेव्हा विचित्र दिसतात.
रायाच्या घरचे सगळेच मानसिक रोगी वाटतात.
राया आणि ती प्रांजल दोघेही दिसायला आवडले नाहीत मला. आणि अभिनयाशी त्यांचा दूर-दूरवरही काही संबंध असेल, असेही अजिबात वाटत नाही.
कुठलीही सुंदर (अर्थात त्यांनी तसे दाखवले आहे म्हणून 'सुंदर', बाकी गैरसमज नसावा...) मुलगी आपल्या मुलाला भेटायला आली, म्हणून त्याची आई आणि घरचे इतक बावळटसारखं वागतील का?
--------------------------------- महत्वाची सूचना ----------------------------------------------------
अश्या घरात कोणी पाहुणे म्हणूनही जाऊ नये.....जर तुमची उष्ट खाण्या-पिण्याची तय्यारी नसेल तर!!!!
मी एकच एपिसोड पाहिला
मी एकच एपिसोड पाहिला आहे
सविता प्रभुणे फार वाईट अभिनय करते
मला वाट्त्त तिची वाटचाल अभिनयातील रामगोपाल वर्मा होण्याच्या दिशेने चालू आहे
बाकी मसाह मधला संदीप देशपांडे इथे पण आहे
हिरोचा आवाज काय म्यांव म्यांव
हिरोचा आवाज काय म्यांव म्यांव आहे.>>>>:हहगलो: हे भारी आहे.
आजकालच्या जमान्यात सिनेमात दाखवतात तो पहिल्या रात्रीचा पलन्ग का सजावतात हे हिरोला माहीतही नाही हे ऐकुन हसावे का रडावे ते कळेना. आजकालची लहान मन्डळी एवढी फास्ट आहे, तर हा माठ्या घरच्या बाकी मेम्बर्सना विचारत बसलाय. कारण आजी आजोबान्चा लग्नाचा वाढदिवस आहे म्हणे.:फिदी:
पण त्या मुलीला सर्व
पण त्या मुलीला सर्व सुंदर......... का?? का???? का???????????????????? म्हणतात????????
अनिश्का....'त्या' मुलीला सर्व
अनिश्का....'त्या' मुलीला सर्व (म्हंजे सीरियलीतले लोकच फक्त) सुंदर का म्हणतात ? >>>> कारण ती हिरवीण हाये.....आSSSSणि हा जागतिक पातळीवर सुद्धा बर्याच अंशी (म्हंजे याला अपवाद आहेत) लागू होणारा नियम आहे की हिरवीण फक्त (ती अॅक्च्युअली कशीही असली तरी) 'सुंदर' च असू शकते....
माझ्या हापिसात मालिकेच्या
माझ्या हापिसात मालिकेच्या नावावरूनच समस्त पुरुष मंडळी आरडाओरड करत आहेत. म्हणे जावई (पुरुष) हि काय मोबाईल सारखी वस्तु आहे का विकत घ्यायला? विनोदी म्हणुन काहिही मालिका काढतात आणि लोक हे खपवुन घेतात. जावई ऐवजी इथे जर मुलगी किंवा सुन शब्द वापरला असता तर समस्त स्त्री संघटना हुंडयाला प्रोत्साहन देणारी मालिका म्हणुन निषेध करायला पुढे आल्या असत्या. आम्हा पुरूषांच्या अश्या संघटना नाहीत याचा फायदा घेऊन अश्या मालिका काढण्याची हिंमत करतात. -- इति, आमच्या हापिसातले पुरुष कलीग.
सहसा मालिकेतल्या हिरवणीला कोणी नावे ठेवत नाहीत पण मालिकेच्या नावाचा राग तिच्यावर काढायचा म्हणुन सगळे तिलाच माठ, मुर्ख म्हणत आहेत. हिरोला पहिलेच बायल्या म्हणुन झाले आहे.
मला आवडली कॉमेडी म्हणून..
मला आवडली कॉमेडी म्हणून..
शिरेलची नायिका सप्र ची मुलगी
शिरेलची नायिका सप्र ची मुलगी आहे का? छाप वाटते दिसण्यात तिची.
८०) < इथे बाकी गोष्टीन्ची
८०) < इथे बाकी गोष्टीन्ची चर्चा केली तरी चालेल> पडत्या फळाची आज्ञा घेऊन :
होसूयाघ मध्ये गोखले गृह उद्योगात क्वालिटी कंट्रोल चेकरच्या पोस्टसाठी श्रीरंग गोखलेंचे जन्मदाते वडील अॅप्लाय करतील का?
शिरेलची नायिका सप्र ची मुलगी
शिरेलची नायिका सप्र ची मुलगी आहे का? छाप वाटते दिसण्यात तिची.>>>>>>>>>>> दक्ष तीचं नाव तनवी पालव आहे
सप्र ?
सप्र ?
सप्र : सविता प्रभुणे
सप्र : सविता प्रभुणे
होसूयाघ मध्ये गोखले गृह
होसूयाघ मध्ये गोखले गृह उद्योगात क्वालिटी कंट्रोल चेकरच्या पोस्टसाठी श्रीरंग गोखलेंचे जन्मदाते वडील अॅप्लाय करतील का?>>>>>:अरेरे: नेमक्या ह्याच सिरीयल पहायला सध्या वेळ होत नाहीये. काल येता जाता थोडी पाहिली. सविता प्रभुणेने कुठल्या बेसवर ही सिरीयल स्विकारलीय देव जाणे.:अओ: चान्गली अभिनेत्री आहे ती. पण काल अगदीच पाचकळपणा चालला होता.
प्रान्जल ( मुलगी) थोडा वेळ बाहेर जाते, तर ही तिला सतत कॉल करत रहाते, आणी फोन का उचलत नाही म्हणून नको त्या शन्का काढते. मुलगी घरी आल्यावर चक्कर आलीय असे सान्गते तर ही लगेच म्हणते अगबाई, कुठे तोन्ड काळे करुन आली?:अओ: विचारान्चा आगा पिच्छा काहीच नाही.
सिरिअसलिच विचारत आहे.. सविता
सिरिअसलिच विचारत आहे.. सविता प्रभुणे कधीच आवडल्या नाहित .. य मालिकेत तर त्यानी कहरच केलाय.. "अस कस अस कस" अस सारख म्हणतात आणि अगदी फालतु पदद्ध्तीने...
तर त्यानी बघाव अस छान काम नक्की कशात केल आहे .. म्हणजे एखादा सिनेमा किंवा नाटक????
निष्पाप नाटक कोशिश एक आशा :
निष्पाप नाटक
कोशिश एक आशा : मालिका
कळत नकळत पण
कळत नकळत पण
जूनी कुसुम सिरीयल होती की.
जूनी कुसुम सिरीयल होती की.
पवित्र रिश्ता
पवित्र रिश्ता
ह्या मालिकेतील सगळ्या
ह्या मालिकेतील सगळ्या कलाकारांची नावं कुठे कळू शकतील ? त्या रायाच्या भावाची बायको जी आहे ती ओळखीची वाटत्ये, ते कंफर्म करायचे होते
Pages