Submitted by रश्मी. on 4 March, 2014 - 00:54
कालपासुन झी मराठी वर नवीन सिरीयल सुरु झाली. जावई विकत घेणे आहे ही. तर तिच्याविषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा. इथे बाकी गोष्टीन्ची चर्चा केली तरी चालेल.:फिदी:
काल जास्त पहाता आली नाही, ज्यानी पाहिली त्यानी इथे जमल्यास लिहावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हम्म. पहिला भाग बघितला.
हम्म. पहिला भाग बघितला. ठिक-ठाक वाटला. मालिका पाहण्याचि सवय नाही म्हणुन असेल, अत्यंत रटाळ वाटलं. असो. कन्सेप्ट चांगला आहे, बघु.
जावई विकत घेणे आहे >> टायटल
जावई विकत घेणे आहे >> टायटल तर Interesting आहे
इथे पहा
इथे पहा
काल स्वप्नील जोशीने
काल स्वप्नील जोशीने अॅन्करीन्ग केले, इतपतच पाहिले. त्या हिरोला त्याचे लग्न झाल्याचे स्वप्नात दिसते, आणी तो उम्बरठ्यावरील तान्दळाचे माप ओलान्डत असल्याचे त्याला दिसते. तो जागा होतो तेव्हा जाम घाबरलेला असतो.
सिरीयल विनोदी वाटतेय, पण अती तिथे माती न होवो म्हणजे झाले.
पाहिली... सगळ्यांच्या ओळखी
पाहिली... सगळ्यांच्या ओळखी करून दिल्या गेल्या...
आईचा बेत (जावई विकत घेण्याचा) आम्हाला कळला पण पोरीला माहित नाही आहे..
जावई विकत घेणे
जावई विकत घेणे आहे..................... चालु घडामोडी?

ते योग्य त्या ग्रुपात हलवा की कृपया.
अरे ते चुकून झाले. खाली एन्टर
अरे ते चुकून झाले. खाली एन्टर मारायला गेले आणी गडबडले.:फिदी:
जावई विकत घेणे
जावई विकत घेणे आहे..................... चालु घडामोडी? >>>>>>>
अरे चालुच घडामोडी आहे. ही..
अरे हे उपग्रह वाहिनीत दिसतेय,
अरे हे उपग्रह वाहिनीत दिसतेय, पण सार्वजनिक होत नाहीये.:अओ: काय झाले काय माहीत, अॅड्मिनना विपु केलीय.
मायबोलीकर वैभव जोशीने टायटल
मायबोलीकर वैभव जोशीने टायटल साँग लिहिलय का?
आय एम नॉट व्हेरी शूअर!
माहीती करुन सांगा प्लिज
हो माबोकर वैभव जोशींचे
हो माबोकर वैभव जोशींचे शिर्षकगीत आहे...
जावई विकत घेणे आहे
जावई विकत घेणे आहे >>>>पुरुषाला भोगवस्तु समजणार्या या असल्या घृणास्पद मानसिकतेचा मी निषेध करतो, आज २१ व्या शतकातही पुरुशाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोण बदलेला नाहीच हेच यातून सूचीत होते.. पुरुष आज स्त्रीच्या खांद्याला खांदा लावून घरकाम करतात ,पोरं सांभाळतात ,तरी आजही ती लिंगभेद करणारी मानसिकता सोडायला आपण तयार आहोत काय हा एकच प्रश्न समाजासमोर आ वासून बसलेला आहे...
ग्रेटथिन्कर
ग्रेटथिन्कर

ती सविता प्रभुणेची आई बघणे
ती सविता प्रभुणेची आई बघणे म्हणजे असय्य आहे. पवित्रा रिश्ता खूप्च बोर वाटायची.(त्या प. री मधला प्रो़जेक्ट संपला काय?)
चला म्हणजे लिलाव सुरु आहे
चला म्हणजे लिलाव सुरु आहे आयपीएल सारखा...........
मला हे प्रोमो, सिरीयल चे नाव
मला हे प्रोमो, सिरीयल चे नाव लिहिण्याची स्टाइल वगैरे बघून मसाह ची आठवण आली ...त्यातून स.प्र पण आहे... दोन्हीचे दिग्द. निर्माते मंडळी सेम आहेत का?
वयस्कर आईवडिलांची काळजी
वयस्कर आईवडिलांची काळजी घेण्यासाठी लग्न झाल्यावर एकुलत्या एक मुलीने आपल्या नवऱ्याला आपल्या आईवडिलांबरोबर घरी रहाण्यासाठी सांगणे (घरजावई) अश्या काही अपवादात्मक परीस्थिती व्यतिरिक्त आज कोणाताही मुलगा घरजावई बनणे पसंद करणार नाही. मुळात घरजावई ही संकल्पनाच अपवादात्मक परीस्थितीत दिसुन येते. मनोरंजन करण्यासाठी याचा अवास्तव वापर होतो हेच दुर्देव.
आधीच तिकडे रेशिमगाठी मध्ये सतिश घरजावई दाखवला असताना आता या विषयावर मालिका काढणे केवळ हास्यास्पद. कदाचित 'सासू' मालिका संपल्यावर तिथल्या काही कलाकारांची सोय म्हणुन हि मालिका काढली असावी.
कदाचित 'सासू' मालिका
कदाचित 'सासू' मालिका संपल्यावर तिथल्या काही कलाकारांची सोय म्हणुन हि मालिका काढली असावी.>>> तेच ना ... मलाही दोन्ही सिरीयल मध्ये साम्य वाटत आहे
इथे बाकी गोष्टीन्ची चर्चा
इथे बाकी गोष्टीन्ची चर्चा केली तरी चालेल. >> रश्मे हे वाक्य टाकलंस ते बरं झालं

मुलीच्या आईवडिलांची काळजी
मुलीच्या आईवडिलांची काळजी घेणे ही आता काळाची गरज आहे.
एकच मुलगी असेल किंवा मुलगा नसेल (किंवा असून विचारत नसेल) तर त्यानी जायचे कुठे?
पण घरजावई ही कल्पना थोडी वेगळी आहे.. माझे मत..
घरजावई होण्यात इतकं काय वाईट
घरजावई होण्यात इतकं काय वाईट आहे?(अ. आ. मा. म.) आणि सिरियलमधून फक्त मनोरंजनच असावे हाच बोध. त्यातून काय वाईट अर्थ निघणार.
रश्मी..,, काहीही चर्चेची सुरुवात झाली आहे हे लक्षात आले असेलच.
त्यात आता नायिकेच्या आईची साडी, दागिने होतील अॅड हळूहळू...
मला आता नवीन सिरीयल सुरु झाली
मला आता नवीन सिरीयल सुरु झाली की बघायचे डेरिंगच होत नाही, आधी बरी वाटते मग भरकटत नेतात, मी आपली इथे चर्चा वाचायला येईन.
मराठी त्या सिरियलीत नायक
मराठी त्या सिरियलीत नायक मेला, जिवंत झाला, जुळा आला असे प्रकार नाहीत ना?
काही तरी जरा विनोदी /बिनोदी
काही तरी जरा विनोदी /बिनोदी दाखवा बुवा. मालिकेच्या शीर्षकावरून तशीच असेल अस वाटतंय
हि मालिका 'उपग्रह वाहिनी -
हि मालिका 'उपग्रह वाहिनी - मराठी' या ग्रूपमध्ये यायला हवी ना?
घरजावई होण्यात इतकं काय वाईट
घरजावई होण्यात इतकं काय वाईट आहे? >>> करेक्ट. आता करोडोंचे शेअर्स असलेली सासु असेल तर मग चांगलेच आहे की.
घरजावई होणे यात वाईट काय आहे?
घरजावई होणे यात वाईट काय आहे? :एभाप्र:
आणि जुयेरेगा मधे सतिष घरजावई नाहिये तो फक्त त्यांच्या (सासुरवाडीच्या) वरच्या मजल्यावर राहतो कारण त्याच्या बायकोला आईवडिलांपासुन दूर राहायचे नाहिये.
आता करोडोंचे शेअर्स असलेली
आता करोडोंचे शेअर्स असलेली सासु असेल तर मग चांगलेच आहे की
>>>
आणि काहीही मागितल की त्याच लेटेस्ट वर्जन हजर होत असेल समोर तर का नको
३ जणांसाठी घरात ४ नोकर
३ जणांसाठी घरात ४ नोकर असलेल्या घरात हिरॉइन भाजी आणायला का गेली म्हणे मार्केट मधे? भाजी मार्केट घरी नाही का आलं?
घरजावई होणे यात वाईट काय आहे?
घरजावई होणे यात वाईट काय आहे? :एभाप्र:
मलाही हा प्रश्न पडतो. मुलगी जर सासरी राहु शकते तर मुलगा का नाही त्याच्या सासरी राहु शकत? मुलगा मुलगी एक समान असे वाटणा-यांना तरी घरजावई या कल्पनेत कहीच वाईट दिसायला नको...
एनी वेज, मी ही मालिका पाहणार नाहीच, वरचा प्रतिसाद केवळ विषयांतर....
Pages