Submitted by यक्ष on 21 February, 2014 - 01:45
सद्ध्या श्रीमान ग्रेगरी साहेबांचे मराठित अनुवादित ग्रंथ वाचतोय.
सुरुवातिला कुतुहल वाट्ले...आता थोडे रटाळ वाट्तेय.
मुबैच्या वास्तव्यात मी 'कंपनी' क्रुपेने 'लोंखंडवाला कौंम्लेक्स भागात रहात होतो. तेंव्हा अती श्रीमंती व अती गरिबी जवळून बघावयास मिळाली. ह्या दोन्ही टोकांचे तेंव्हा नवल वाटायचे! तशी मुंबई मला कधीच आवडली नाही.
'शांतारामा' व सुकेतु मेहता च्या मुंबई वरिल पुस्तकांन्नी थोडी थोडी कळावयास लागलीय!
असो!
-यक्ष
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
मी सद्या मेलुहा वाचते आहे..
मी सद्या मेलुहा वाचते आहे..
! तशी मुंबई मला कधीच आवडली
! तशी मुंबई मला कधीच आवडली नाही.<<
कुफेहेपा!
हुश्श्य!! संपवली एकदाची! खूपच
हुश्श्य!!
संपवली एकदाची! खूपच जाड्जूड ग्रंथ आहे!. सुरुवातिचा रोमांच व उत्सुकता शेवट्पर्यंत काही टिकवू शकलो नाही. पण कुठ्लेही पुस्तक अर्धवट सोडवत नाही म्हणून संपवले!
'शांतराम' उर्फ ग्रेगरी म्हणजे मुळचा ऑस्ट्रेलिअन बंदा...गुन्हेगारी पार्श्वभुमिचा...जेलमधून फरार...तोच त्याचा मुख्य थरार....मुंबैस पलायन...झोपड्पट्टित वास्तव्य....'अंडरवर्ल्डशी निकट सहवास...अनधिक्रुत कार्यांमध्ये सहभाग...अफ्गाणिस्थान मुक्ति युद्धात सहभाग...अशी गोष्ट!
तशी मनोरंजक...वेगळ्या धाटणीची...एकदा जरूर वाचाण्यासर्खी.
त्याची (म्हणजे शांतरामची) वेब्साईट पण आहे.
त्यानी दिलेल्या मराठी भाषेच्या मानाला मनःपुर्वक सलाम! हो तो गोरा असून मरठी शिकला...बोलला....जगला आणि क्रुतज्ञ राहिला !
छोटी
मी आत्ताच मेलुहा आणली! सुरु कर्तोय....!
साती
मी हे पाप मुम्बैत दीड वर्ष वास्तव्य करून पुर्णपणे फेड्लेय! मी लोकल प्रवासात नुसत्या 'वासावरून' (डोळे बंद करून) स्टेशन ओळखण्याचे कसब शिकलो होतो! अन नुस्ता आवाज ऐकून लेडिज डबा पण ओळखू लागलो होतो!
पण आपल्या भावना दुखावण्याचा उद्देश अजिबात नाही...तसे वाट्ल्यास मनःपुर्वक क्षमा मगतो!