अनेकांचे सल्ले धुडकावून मी विन्डोज ७ आणि ऑफिस होम & स्टुडन्ट २०१० यांच्या अधिकृत प्रती विकत घेऊन त्यांची माझ्या संगणकात प्राणप्रतिष्ठा केली ( Installed). हे करताना प्रिंटर संगणकाला जोडलेला नव्हता. यथावकाश प्रिंटरही जोडून घेतला. (प्रिंटर नेहमी जोडलेला नसतो. जेव्हा गरज असते तेव्हाच जोडला जातो.)
आता काहीही प्रिंट करताना ते सरळ प्रिंट न होता वननोट २०१० कडे जाऊन त्याची एक प्रिंट फाइल बनू लागली.
वर्ड फाइल्ससाठी हा प्रॉब्लेम काही खटपटी करून सोडवला. आता माझा प्रिंटर निवडून हवे ते सरळ छापता येते आहे. (नक्की काय केले ते आठवत नाही. प्रिंटरची प्राणप्रतिष्ठा-उत्तरपूजा-पुनर्प्राणप्रतिष्ठा ३-४ वेळा केली होती.)
माझा प्रिंटर हा डिफॉल्ट प्रिंटर सेट करता येत नाही आहे.
एक्सेल तसेच पीडीएफफाइल्सच्या प्रिंटिंगचे वननोटकडून होणारे अपहरण अजूनही थांबवता आलेले नाही. एक्सेल फाइल छापताना प्रिंटर निवडायच्या पर्यायातील माझा प्रिंटर निवडला तरीही वननोट त्याच्यावर झडप घालतो. : प्रिंटरसाठी ड्रॉप डाउन ऑप्शन्समधला योग्य पर्याय = माझा प्रिंटर (संगणकाला जोडलेला) निवडून त्यावर क्लिक केले तरी सेण्ड टु वननोट २०१० असाच पर्याय निवडला जातो. त्याची एक वेगळी प्रिंट फाइल तयार होते व ती प्रिंट करताना बरेच सव्यापसव्य करावे लागतात. प्रिंटाउट मनासारखे नसते ते वेगळेच. त्यावर वननोटचे हेडर, तारीख इत्यादी मजकूर असतो.
हे सगळे का होते याचे उत्तर गुगलबाबाला विचारले तर ही समस्या अनेकांना आलेली दिसली.
ऑफिस २०१० ची प्राणप्रतिष्ठा करताना प्रिंटर जोडलेला नसल्याने हे होते असे उत्तर मिळाले.
यावर उपाय काय?
माझा प्रिंटर डिफॉल्ट प्रिंटर करता येईल का?
वननोट २०१० ची उत्तरक्रिया करणे? ( uninstall?)
प्रिंटर जोडलेल्या अवस्थेत ऑफिस २०१० ची पुनःप्राणप्रतिष्ठा करणे? माझा सगळा डेटा D drive मध्ये तर सगळ्या प्रणाली (softwares) |C drive मध्ये आहेत.
यानिमित्ताने प्रिंटर, तसेच ऑफिससाठी तांत्रिक सहाय्य : technical support मोजक्याच काळासाठी उपलब्ध असतो, अशी हृदयद्रावक माहिती मिळाली.
सोप उत्तर हव अस्ल
सोप उत्तर हव अस्ल तर
uninstall office or office component.
If uninstall fully restart computer and install office. Choose custom and select what u want.
वननोट मध्ये फ़ाईल-ऑप्शन्स
वननोट मध्ये फ़ाईल-ऑप्शन्स मध्ये जाऊन, त्यात सेंड टू वननोट मध्ये जा. तिथे प्रींट टू वननोट मध्ये ऑलवेज आस्क व्हेअर टू सेंड सेलेल्ट करा.
सेण्ड टु वननोट मध्ये सगळ्या
सेण्ड टु वननोट मध्ये सगळ्या गोष्टींसाठी ऑल्वेज आस्क व्हेअर टु सेण्ड हेच सिलिक्टेड आहे.
मला मुळात प्रिंट वन-नोटकडे जायलाच नको आहे.
वननोट अनइस्टाल करा सरळ
वननोट अनइस्टाल करा सरळ ........
कंट्रोल प्रोग्राम->
कंट्रोल प्रोग्राम-> प्रोग्राम्स & फीचर्स -> ऑफिस २०१० पॅक (हे सुद्धा दोन दोन दिसताहेत : एक नुसते आणि एक हिंदीसहित) सिलेक्ट करून -> चेंज -> अॅड ऑर रिमुव्ह फीचर्स -> वन नोट -> अनॅव्हलेबल असे केले. हे दोन्ही ऑफिसमध्ये केले.
तर आता एक्सेल प्रिंटिंगच्या वेळी वननोटच्या ऐवजी डिफॉल्ट ऑप्शन वननोट जाऊन फॅक्स आला.
ड्रॉप डाउन करून प्रिंटर निवडला तरी फॅक्सच येतोय. आगीतून फुफाट्यात. आता त्याला पुन्हा इनॅबल करणे आले.
सुदैवाने हा प्रॉब्लेम वर्ड आणि बरहाला नाही; एक्सेलला आहे.
उदयन, https://exploreb2b.com/
उदयन,
https://exploreb2b.com/articles/solving-error-0x00000709-cant-set-defaul...
हे करून बघतोय. मलाही हाच एरर मेसेज येतो.
रिस्की आहे का?
डिव्हाइसमध्ये वननोट, विन्स्पूल, नल असे दिसतेय. ते डिलिट होत नाही.
याच ब्लॉगवर कमेंटसमध्ये हे आहे.
On my Win7 pc, deleted the key and the value.
I had to change permissions of the "Windows" tab to FULL access before I could delete the "Device" key. Right click on "Windows" tab to get to
Go to "File" then "Permissions" then check the "allow". This I also did the above instructions, but I can't delete the last part, I look for another blog then I was able to set the default printer after restart.
हे फाइल परमिशन नक्की कुठले आहे?
प्रिन्टर पुन्हा एकदा इन्स्टाल
प्रिन्टर पुन्हा एकदा इन्स्टाल कर्न बघता येइल का? त्यावेळी डिफॉल्ट प्रिंटर चा ऑप्शन मिळेल. एक प्रयत्न म्हनुन बघा जमत असेल तर...
भरत मयेकर, तुम्ही दिलेल्या
भरत मयेकर,
तुम्ही दिलेल्या दुव्यात सांगितलेली रजिस्ट्री एण्ट्री उडवणे धोकादायक नसावे.
फाईल परमिशनचं झंझट टाळण्यासाठी हे करा : तुम्ही windows मध्ये start बटण दाबून शोधचौकटीत regedit टंकलंत की programs च्या खाली regedit.exe असं दिसू लागतं. त्यावर उजवी टिचकी (right click) मारा आणि Run as administrator वर डावी टिचकी मारा.
पुढील कार्यास शुभेच्छा!
आ.न.,
-गा.पै.
काल संध्याकाळी इथे लिहीत
काल संध्याकाळी इथे लिहीत असतानाच ते रजिस्ट्री, परमिशन प्रकरण केले होते. पण शेवटची पायरी Restart the computer so it starts with the altered Windows system registry. करून न बघताच काहीच होत नाही म्हणून हताश होऊन पीसी बंद केला होता. आत्ता पीसी सुरू केल्यावर एक्सेलमध्ये प्रिंटिंगला गेल्यावर पीसी स्वतःच प्रिंटर शोधायला जातो आणि खराखुरा प्रिंटरच निवडतोय.
डिव्हाइसेस & प्रिंटर्समध्येही जोडलेला प्रिंटर डिफॉल्ट झालेला आहे.
हुश्श! अहो आश्चर्यम्! वगैरे वगैरे
इथे लिहिणार्या सगळ्यांचे आभार.
तरीही ही समस्या वर्ड डॉक्युमेंट्सपुरती आधीच कशी काय सुटली होती ते कळलेले नाही.
अभिनंदन भरत... विंडोज चे
अभिनंदन भरत... विंडोज चे प्रश्न कधी कसे सुटतील कळतच नाही.
एकदा प्रिंटर ची स्पूलिंग
एकदा प्रिंटर ची स्पूलिंग सर्वीस चालू आहे का ते पहा 'कॅड' मारून. कॅड - कंट्रोल + ऑल्ट + डिलीट.
डिफॉल्ट प्रिंटर्स मध्ये वननोट हा प्रिंटर डिलीट करा. नाहीतर सगळे प्रिंटर्स डिलीट करून, जो तुम्हाला हवा आहे तोच प्रिंटर अॅड करा.
ओह... मी वर वाचलंच नाही
ओह... मी वर वाचलंच नाही आधी... चला बरं झालं
विजय देशमुख, विंडोज हाच मुळी
विजय देशमुख, विंडोज हाच मुळी एक भला थोरला प्रश्न आहे!
भारत मयेकर, अभिनंदन! ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड!
आ.न.,
-गा.पै.
मयेकर, तुम्ही दिलेल्या
मयेकर, तुम्ही दिलेल्या दुव्याचा काल फायदा झाला. अगदी असाच प्रॉब्लेम होता एका क्लाएंट कडे. हा धागा डोक्यात होताच. लगेच registryला हात घातला आणि अगदी दोन मिनिटांत सॉल्व्ह्ड! धन्यवाद
आयला, काय एकेक प्रश्न /अडचणी
आयला, काय एकेक प्रश्न /अडचणी अस्तात!
भ्रमर, भारीच, पण तू बर लक्षात ठेवल होतस इतक सगळ!
लिंबुदा, यावरच पोट आहे माझं.
लिंबुदा, यावरच पोट आहे माझं. लक्षात ठेवायला लागतंच.
आधीचा प्रिंटर मेल्याने नवा
आधीचा प्रिंटर मेल्याने नवा घेतला. आता प्रिंटरसोबत इन्स्टॉलेशन साठी सीडी आली नाही. HP च्या site वरून डाउनलोड करा. तिथे म्हणे की मायक्रोसॉफ्टने विंडोज ७,८ साठी सपोर्ट बंद केला आहे. एक नोव्हेंबर २०२२ नंतर आणलेल्या प्रिंटर्ससाठी आम्ही पण या ओ एस साठी सॉफ्टवेअर आणि ड्राय व्हर्स देणार नाही. तुमची ओ एस अपग्रेड करा. माझी विन्डोज ७ आहे. आधीच्या प्रिंटर्स साठी सॉफ्टवेअर , ड्रायव्हर्स मिळतील. पण मेंटेनन्स नाही.
मला त्यांच्या साइटवर सॉफ्टवेअर मिळालं. फाइल डाउनलोड झाली. पण रन होईना. एच पी ईझी स्टार्ट अशी एक खिडकी उघडून पीसी / मॉनिटर किती तरी वेळ माझ्या तोंडाकडे नुसतंच बघत बसला. ते कॅन्सल करून पुन्हा फाउल डाउनलोड , पुन्हा रन असं दोनदा केलं.
तोच अॅक्शन रिप्ले.
मग फोनवर सल्लामसलत. ऑन साइट वॉरंटी आहे, तर एच पी वाल्यांना फोन करून विचारा, घरी बोलवा .
आज सकाळी ते करण्यापूर्वी पुन्हा एकदा फाइल रन करू म्हटलं आणि अगदी स्मूथली सगळं झालं. प्रिंटर इन्स्टॉल झाला. एक पान प्रिंट करून पाहिलं.
तात्पर्य, तुम्हांला कोणतेही इश्युज येत असतील तर आधी स्विच ऑफ करून स्विच ऑफ करा. ( याच्या पुढची पायरी सगळ्या वायरी अनप्लग करून पुन्हा प्लग करा) हा तिळा तिळा दार उघड मंत्र आधी म्हणून बघा. २०-२५ -३० वर्षांपूर्वी आमच्या ऑफिसातल्या डेस्कटॉपसाठी विप्रो, सी एम सी वाले हेच सांगायचे.
प्रिंटर इन्स्टॉल झाल्याने विंडोज अपग्रेड करायचे, मग नवा ऑल इन वन पीसीच घ्यायचे डोहाळे तूर्तास मागे ढकलले.
अभिनंदन!!
अभिनंदन!!
Android (व १३)tablet घेतला.
Android (व १३)tablet घेतला. उत्साहाने प्ले स्टॉरवरून Microsoft office app ( आता Microsoft 365 म्हणायचे.) डाऊनलोड केले. तर उघडल्यावर मेसेज आला to edit and save office365 subscription required.
यूट्यूबवर अधिकृतरित्याMicrosoft office 92 days साठी कसं मिळवायचं ते पाहून दहा मिनिटांत चालू केलं. तीन महिने उलटले तरी बंद झालेलं नाही.
परवा माहिती कळली की subscription ला वैतागून लोक ईतर पर्याय वापरू लागले. ( Libre, WPS,ZODO वगैरे) .आता नवीन office 2024 beta तयार आहे आणि काही जण ते वापरू लागलेत. शिवाय त्यातल्या दोन तीन प्रगत गोष्टी वगळून सर्वांनाच फुकट देणार आहेत म्हणे. October - December पर्यंत येईल.
(दहा इंचापेक्षा लहान टॅबलेटसना office 2021 फुकट आहे.)
काहीच प्रगती झाली नाही तर गूगल शीट्स कायमच उपलब्ध आहेत. त्यातून शेवटी save as xlxs file हा पर्याय आहेच.
WPS ला पण काही दिवसांनी
WPS ला पण काही दिवसांनी प्रॉब्लेम येतो.
नवा पीसी, नवी OS -windows 11
नवा पीसी, नवी OS -windows 11 , नवं ms office. जुनाच प्रिंटर. नवी गंमत.
फाइल उघडून प्रिंट केली तर कोरा कागद बाहेर येतो. पुन्हा चांगदेव.
hp smart app मधून फाइल निवडून प्रिंट केली तर व्यवस्थित प्रिंट होतं.
स्कॅनिंगसाठीही असाच काहीतरी प्रॉब्लेम आला होता.
एच पीचं Microsoft 365शी वाकडं दिसतंय