'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
९०१.....
९०१.....
एका लग्नाची मधल ते खोट कुटुंब
एका लग्नाची मधल ते खोट कुटुंब पण इतक गोड दाखवलाय. हेवा वाटतोय. इतक गोड कुटुंब कदाचित खर
रक्ताच कुटुंब पण असणार नाही
फोनवरील फक्त २ च वाक्यात
फोनवरील फक्त २ च वाक्यात शिल्पा तुळसकरांचा आवाज ओळखणार्या आयडूंचे अभिनंदन.....:)
कालच्या महाएपि मधे उका चे
कालच्या महाएपि मधे उका चे सासवड दुहेरी कनेक्शन (शितु इज इन सासवड) दाखविले
फोनवरील फक्त २ च वाक्यात
फोनवरील फक्त २ च वाक्यात शिल्पा तुळसकरांचा आवाज ओळखणार्या आयडूंचे अभिनंदन....खरोखरच...
मला तर बायकोचा फोन येऊन चार वाक्य ती बोलली तरी पत्ता लागत नाही...
लक्ष कुठेय तुझं म्हणे पर्यंत
(No subject)
आयडू माझ्याकडूनपण अभिनंदन.
आयडू माझ्याकडूनपण अभिनंदन. शिल्पाचा आवाज ओळखण्यासाठी.
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/tv/Shilpa-enter...?
अनिता दाते नी कुठला रोल केलाय
अनिता दाते नी कुठला रोल केलाय ?
सुजा, अनिता दाते ईशाची
सुजा, अनिता दाते ईशाची मैत्रीण आहे.
अछ्या. आणि ती ओम्याची बहिण
अछ्या. आणि ती ओम्याची बहिण कोण आहे ? परत धना पण आधी कधीच बघितली नव्हती
सुजा धना, 'गुंतता हृदय हे'
सुजा धना, 'गुंतता हृदय हे' मध्ये गौरी होती, पल्लवी सुभाषची शेजारीण, त्यात खूप सुंदर होते तिचे काम.
ओमची बहिण मलापण नाही माहिती कोण आहे?
स्नेहा माजगावकर अॅज धना
स्नेहा माजगावकर अॅज धना
धन्यवाद विनिता धनाबद्दल.
धन्यवाद विनिता धनाबद्दल.
आरती वडबगळकर अॅज मधू (टाईमपास
आरती वडबगळकर अॅज मधू (टाईमपास मधे दगडूची बहीण)
<<...परत धना पण आधी कधीच
<<...परत धना पण आधी कधीच बघितली नव्हती >> एपिसोडसमधे वेळ भरून काढायला तिचा भरपूर, संदर्भरहीत व हास्यास्पद वापर चाललाय !
अरे धन्स कसले! गुगलले थोडेसे!
अरे धन्स कसले! गुगलले थोडेसे!
विनिता धन्स, मधूसाठी.
विनिता धन्स, मधूसाठी.
अरेच्च्या!!
अरेच्च्या!!
अग तुझ्या गुगलण्याच्या
अग तुझ्या गुगलण्याच्या कष्टांसाठी. मी तो आळशीपणा केला तू गुगललेस, मला रेडीमेड मिळाले.
गोगा मी खूप हासले तुमची
गोगा
मी खूप हासले तुमची पोस्ट वाचून.
अंजू बरोबर
अंजू बरोबर
ओमची आई रव्याच्या लाडवांची
ओमची आई रव्याच्या लाडवांची डिलिव्हरी करून परत गेल्यानंतरचे ओम-ईशाचे दृश्य पाहिले. ओम शेक्सपीयरीय भाषेत बोलायला लागतो आणि ईशाही त्याला तशीच उत्तरे देते. तिथे उमेश कामतसमोरच नव्हे तर मुळातच स्पृहाची संवादफेक अगदीच तोकडी पडली. तिला दिलेले संवादही ओमच्या संवादांच्या मानाने पाणचट वाटले. पल्लेदार संवाद मिळाले असते तर तिचीही उडी बरोबर पडली असती, की तीच उताणी पडली असती?
चपात्यांच्या कारखान्यात
चपात्यांच्या कारखान्यात तुम्हाला कुठली चपाती मिळेल , कुणी सांगावे...
चपाती? लाडू ना ?
चपाती? लाडू ना ?
ही उपमा शिरीयलमधे काम
ही उपमा शिरीयलमधे काम करणार्या राम रानडे ( रारचे बाबा ) यानी दिली होती.
ते म्हणतातः कामावर गेलं की तयार होऊन बसायचं. मग गरमा गरम चपात्या वाटाव्यात तसे संवाद आणुन वाटले जातात. ते पाठ करायचे. तुमचे पाठांतर चांगले असले की झाले.
मग One take shot द्यायचा. अगदीच मोठी चूक असेल तर २ वेळा.
किंवा तुम्ही हिरो / हिरोईन असाल तर अजून एकदा दोनदा.
तरी चुका झाल्या तर बाकीच्यांचे काम पूर्ण करायचे.
आणि मग एक कॅमेरामन समोर ठेऊन फक्त तुमचे shot घ्यायचे.
चपात्याचा कारखाना...
तुम्ही सोडून जात असाल तर एक फोटॉ द्यायचा की लगेच त्याला हार... बस्स...
गोगा.... गरम गरम चपात्या....
गोगा.... गरम गरम चपात्या.... गंमत वाटली पोस्ट वाचून....:)जर एखादा संवादलेखक भेटला तर तो त्याची बाजू सांगेल....असेलच काहीतरी....सीरियलच्या गोष्टीची दिशा ठरवणारे आदल्या दिवशी रात्री सांगतात अन दुसर्या दिवशी आठला कलाकार हजर व्हायच्या आत संवाद लिहून तयार पाहिजेत, वगैरे....झी मराठी क्रिएटिव्ह टीमची ही अशीच काही व्यथा असेल, काय सांगावे....पण फिनिश्ड प्रॉडक्ट बर्याच वेळेला 'विनोदी' असतो हे मात्र खरे....
एखाद्या व्यक्तीरेखेला
एखाद्या व्यक्तीरेखेला सिरियलीत आणलं की तिला इतकं लार्जर दॅन लाईफ का केलं जातं? कालच्या भागात ओमची आई मारे मला त्याची काळजी वाटली म्हणून त्याला भेटायला गेले म्हणाली. मग मुलाला टाकून गेली, वर्षानुवर्ष त्याचं तोंड पाहिलं नाही तेव्हाचं काय? त्याचा पश्चाताप तर सोडा, उल्लेखही नाही?
पूनम +१ आणि मुख्य म्हणजे याचं
पूनम +१
आणि मुख्य म्हणजे याचं आणि इशाचं बिनसलं होतं तेंव्हाही शोभना मावशीने तीला फोन वर सांगितलं होतं ना की तुमच्या मुलाला तुमची गरज आहे?
तेंव्हा नाही आली आणि आता अचानक इतक्या दिवसांनी काळजी वाटुन उगवली?
ओम त्याच्या वयाच्या कितव्या
ओम त्याच्या वयाच्या कितव्या वर्षापासून एकटा रहात होता? . आई वडिलांच्या मदतीशिवाय. वयाच्या दहाव्या वर्षापासून कमवायला लागला कि काय तो.?होस्टेल मध्ये फेकून दिल म्हणजे ? त्याच्या आईची पण काही मजबुरी असेल कि नाही ? तिच्या समोर काही दुसरा पर्याय नसेल तर काय करणार होती ती. मुलाला सांभाळण्याची जबाबदारी आई - वडिलांची दोघांची आहे. एकट्या आईची नाही.
त्याच चिडण त्याच्या परीने बरोबर आहे. पण आईचं ऐकून घ्यायला हव कि नाही ?
या सिरियल्स मध्ये असे काही तरी प्रोब्लेम्स घालतात ना
त्यांच्या त्यांच्या त्यांच्या बाजूने विचार केला तर सगळ्यांचच बरोबर वाटायला लागत
संध्याकाळचा वेळ बाकी चांगला जातो
Pages