मायबोलीवर सगळीकडे दिसणार्या जाहिराती या मायबोलीसाठी एक महत्वाचा भाग आहेत. ते मायबोलीचं उत्पन्नाचं साधन आहे आणि त्या नसतील तर मायबोली चालू राहणार नाही.
यातल्या काही जाहिराती नुसत्या दिसल्यातरी मायबोलीला उत्पन्न मिळते. काही जाहिरातींवर क्लीक केले तर काही जाहिरातींमुळे प्रत्यक्ष विक्री किंवा कृती झाली तरच उत्पन्न मिळते.
मायबोलीवरच्या जाहिराती त्रासदायक नसतील, व्हल्गर नसतील यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो. जेंव्हा मायबोलीकरांनी वेळोवेळी अशा त्रासदायक जाहिराती नजरेस आणून दिल्या आहेत , तेंव्हा शक्य तितक्या तातडीने त्या बंद करण्यात आल्या आहे. या सगळ्या मायबोलीकरांचे मनापासून आभार. तुमच्या कडून या पुढेही हा पाठींबा मिळेल अशी आशा आहे.
मायबोलीवर कधीच Pop up (नवीन खिडकी उघडणार्या)जाहिराती नसतात. नुकत्याच एका मायबोलीकरणीला अशा जाहिराती मायबोलीवर दिसत होत्या पण त्याचे कारण त्यांच्या संगणकावर आलेला व्हायरस्/मालवेअर होते असे निष्पन्न झाले.
आपोआप ध्वनीत बडबड सुरु करणार्या जाहिराती मायबोलीवरून काढून टाकल्या आहेत (त्या दाखवणारे नेटवर्कच बंद केले आहे)
मायबोलीवर प्रकाशित केलेले फोटो जर डाव्या रकान्याच्या मर्यादेत असतील (जसे इतर लेखन असते) तर जाहिरातींचा त्रास होत नाही. ते फोटो जर डाव्या रकान्याच्या बाहेर जाणारे प्रकाशित केले गेले तर जाहिरातीं मधे मधे येतात. थोडक्यात फोटोंनी अतिक्रमण केले तरच जाहिराती फोटोंवर अतिक्रमण करतात.
मायबोलीवर प्रकाशित होणारे लेखन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की ते आधी तपासून पाहून मगच प्रकाशीत करणे शक्य नाही. तसेच येणार्या जाहिराती इतक्या वेगवेगळ्या मार्गाने, नेटवर्कमधून येतात की त्या सगळ्या आधी तपासून पाहणे शक्य नसते. त्यातूनही आजकाल बर्याच जाहिराती या भौगोलिक पातळीवर मर्यादित (Geo targeted) , किंवा वाचकाच्या आंतरजालावरच्या वाटचालीनुसार मर्यादित (behavioral targeted) असल्याने कुणितरी सांगितल्याशिवाय पडताळूनही पाहता येत नाही.
फक्त मायबोलीसाठीच नाही तर मराठी आंतरजालाच्या वाढीसाठी, जास्तीत जास्त मजकूर प्रकाशित होण्यासाठी या आवश्यक आहेत. यांचं स्थान थोडसं मराठी सिरियलच्या प्रायोजकांसारखं आहे, ते जर नसते तर आज अनेक मराठी व्यक्तींना नवीन व्यवसायाच्या/नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या नसत्या. या जाहिरातींमुळेच , जाहिरातदारांना, मराठी ग्राहकवर्ग मोठा आहे, ऑनलाईन आहे , त्याच्या कडे खरेदीची क्षमता आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याची जाणीव होते आहे.
काही जाहीराती, जाहिरातदार अतिशय त्रासदायक जाहिराती दाखवत असतात याची आम्हाला कल्पना आहे आणि त्या येऊ नयेत म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करत असतो. अशी जाहिरात आली तर
१) पानाचा screenshot घेऊन आम्हाला कळवा.
२) काही जाहिरातींवर, त्या त्या जाहिरात नेटवर्कला प्रतिसाद द्यायची सोय असते ती वापरून ती जाहिरात का योग्य नाही ते कळवा.
जाहीरात संस्थांना या त्रासदायक जाहिराती कमी होण्याची गरज माहिती आहे आणि त्यासाठी अनेक उपायही योजले जात आहे. उदा, काही जाहिराती नेटवर्क जितकी जाहिरात त्रासदायक किंवा वाचकांचा वाईट प्रतिसाद तितकी जाहिरात दाखवण्याची किंमत आपोआप वाढवतात आणि चांगल्या, वाचकांचा प्रतिसाद असणार्या जाहिरातींची किंमत कमी करतात.
या विषयावर तुमची मतं किंवा येणार्या अडचणी समजून घ्यायला जरूर आवडेल.
>>मायबोलीवर कधीच Pop up (नवीन
>>मायबोलीवर कधीच Pop up (नवीन खिडकी उघडणार्या)जाहिराती नसतात>> मध्यंतरी फोनवरून मायबोलीवर आलं की जाहिराती, अॅप्स आपोआप उघडत होती. (उदा- कँडी सागा) ते कशामुळे होतं?
एक जाहिरात नेटवर्क होतं ते
एक जाहिरात नेटवर्क होतं ते अशा जाहिराती पाठवत होतं. ते मायबोलीवरून बंद केले आहे.
बरंय, उत्तम झालं.
बरंय, उत्तम झालं.
नविन लेखन, हितगुज,
नविन लेखन, हितगुज, गुलमोहर,लेखनमालिका
ही वरची लाईन आहे तिचा साईज वाढवता येईल का,,, मोबाइल वरून क्लिक होत नाही लवकर.. अक्षरे लहान दिसतात
आपोआप ध्वनीत बडबड सुरु
आपोआप ध्वनीत बडबड सुरु करणार्या जाहिराती मायबोलीवरून काढून टाकल्या आहेत (त्या दाखवणारे नेटवर्कच बंद केले आहे) >> खूप छान!
clickable ads ची लिस्ट देता
clickable ads ची लिस्ट देता येईल का?अठवड्यातून एकदा क्लिकून टाकल्या की रोज रोज मोदी पहायला नको..
पानाचा screenshot घेऊन
पानाचा screenshot घेऊन आम्हाला कळवा.>> म्हणजे नेमके कुणाला आणि कसे कळवायचे?
मला काही दिवसांपासुन ह्या जाहिरातींचा त्रास होत होता. हा धागा अस्तित्वात नव्हता म्हणुन शक्य तितक्या सर्व मार्गांनी मायबोली प्रशासनाला कळवायचा प्रयत्न केला.
मायबोली प्रशासनाने त्वरीत दखल घेउन कारवाई केल्याबद्दल धन्यवाद!
मायबोलीवरच्या जाहिराती दिसूच
मायबोलीवरच्या जाहिराती दिसूच नयेत किंवा इतर पद्धतीने मायबोलीला मिळणारे इतर उत्पन्न कमी होईल असे उपाय काही मायबोलीकर अगदी हिरीरीने, मायबोलीवरच मुद्दाम दुसर्यांना सांगत असतात >>> हे तिकडच्या धाग्यावर वाचलं.
या जाहिराती दिसु नयेत म्हणून फायरफॉक्स वापरा, अॅड ब्लॉक लावा असे नेहमी सांगितले-ऐकले जाते. त्यामागे कुणाचाच उद्देश मायबोलीचे उत्पन्न बुडवावे असा अजिबात नसतो. मायबोलीवरून भलतीकडेच रिडिरेक्ट झाल्यामुळे या जाहिरातींमुळे संगणकात व्हायरस आल्याच्या १-२ घटना २०११ मध्ये झाल्या आहेत. माझ्या कंप्युटरवर व्हायरस आला होता त्यामुळे ही ऐकीव माहिती नाही. अजूनही अधून-मधून असे प्रकार होतात. गेल्याच आठवड्यात मायबोलीच्या कुठल्याही धाग्यावर गेले असता भलतीकडेच रिडिरेक्ट होत होतं पान. फायरफॉक्स आणि अॅडब्लॉक्स वापरून देखील हा प्रकार होत होता. मग आमच्या कंप्युटरच्या सेफ्टीसाठी आम्ही काही उपाय करायचे ठरवले तर त्यात चूक काय? जिथे कुठे हे सल्ले दिले-घेतले जात होते तिथेच लिहिलं असतंत तर हे कारण लगेच कळलं असतं.
तो दुसरा मुद्दा बहुतेक मायबोली खरेदीबद्दल आहे असा माझा अंदाज आहे. माझा अंदाज चूक नसेल तर- याबद्दल तर एक स्वतंत्र धागा आहे. तो धागा तेव्हाच बंद करायचा होता किंवा तिथे इतर ऑनलाइन खरेदी सेवा पुरवण्यार्या संस्थळांची 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट'मुळे माहिती देऊ नये असं सांगितलं असतं तर चाललं असतं.
आताच याच पाना'वर' दिसणारी
आताच याच पाना'वर' दिसणारी ईमेज...
घरी ठीक आहे पण ऑफिसात माबो वर जर असेल तर अॅनॉईंग...
मी स्क्रीन कॅप घेतला होता पण १६२ केबी चा असल्याने अपलोड नाही होत.
>मायबोलीवरून भलतीकडेच
>मायबोलीवरून भलतीकडेच रिडिरेक्ट झाल्यामुळे या जाहिरातींमुळे संगणकात व्हायरस आल्याच्या १-२ घटना २०११ मध्ये झाल्या आहेत.
हे होऊ नये म्हणून गेले काही महिने, असे काही करणार्या जाहिराती, दाखवायच्या अगोदरच तपासून आपोआप बंद करण्याची सोय केली आहे. (ही सोय गुगलने त्यांच्या नेटवर्क सॉफ्टवेअरमधे केली आहे जे मायबोलीही वापरते). इतरही जाहिरात संस्था यावर लक्ष ठेवून आहेत. कारण हा फक्त मायबोलीचा नसून जाहिरात उद्योगाच्या विश्वासार्हतेचा मूळ प्रश्न आहे.
आज फक्त बोस च्या स्पीकर्स अन
आज फक्त बोस च्या स्पीकर्स अन हेडफोनच्या जाहिराती दिसताहेत. ~हुश्श!~
जाहीरातीसाठी मागे एक अजुन
जाहीरातीसाठी मागे एक अजुन उपाय सुचवलेला.. आपले मोठे इवेंट्स जसे की गणेशोउत्सव ,मराठी दिवस, अश्या इवेंट्स चे धागे उघडताना १०-३० सेकंद ची जाहीरात बघण्याची सोय जरी दिली तरी यातुन उत्पन्न मिळेल ..
युट्युब वर सुध्दा जर तुम्ही सारखे १० च्या वर (बहुदा) विडिओ एकापाठोपाठ एक बघत गेलात तर ११व्या विडिओ पासुन तुम्हाला सुरुवातीला १० सेकेंदाची जाहीरात बघावी लागते.. कधी "स्किप" चा ऑप्शन असतो कधी नसतो...
इवेंट्स चे धागे वाचण्यासाठी सुरुवातीला जर जाहीरात दाखवली तर यातुन उत्पन्न नक्कीच मिळेल मायबोलीला..
धागा वाचण्यासाठी उघडताना आधी जाहीरात दिसेल मग आतील मजकुर दिसेल .. अशी सोय होउ शकेल का..
हवे तर प्रायोगिक तत्वावर काही वादविवादवाल्या धाग्यांवर लावले तर वादविवाद कमी होतील या उत्पन्न वाढेल .. दोन्ही काम होउन जातील
वाद करायचा असेल तर व्हिडीओ बघ........नाहीतर शांत बस
मायबोली ज्या ज्या देशात उघडली
मायबोली ज्या ज्या देशात उघडली जाते त्या त्या देशातल्या / भाषेतल्या जाहीराती त्यावर दिसतात. समजा मी एखादे फ्लाईट सर्च केले किंवा एखाद्या देशाच्या पर्यटनाची माहीती शोधली त्या त्या जाहीराती मला दिसत राहतात.
त्यात वावगे काहीच नाही.
पण मला ज्या ज्या क्षेत्रात रस आहे, ज्या ज्या क्षेत्रात नवीन काही आले तर ज्याची माहीती मला घ्यायला आवडेल अशी माहीती जर मला नोंदवता आली आणि त्या त्या क्षेत्रातील जाहीराती मला दिसत राहिल्या तर मला आवडतील.
तसे मायबोलीला करता येईल का ?
जाहिरातीबद्दल आक्षेप
जाहिरातीबद्दल आक्षेप नाही
मायबोलीला त्यातून उत्पन्न मिळुन ती चालू राहते हे सर्वात महत्वाचे
मात्र काही वेळेला आक्षेपार्ह जाहिराती दिसतात
त्यामुळे ऑफिस मध्ये मायबोली ऊघडताना काळजी घ्यावी लागते
दोन तीन दिवसापुर्वी एका आक्षेपार्ह जाहिरात चित्र फ्रंट पेज ला दिसत होते
हे कितपत योग्य आहे ??
बाहेरच्या जगात या जाहिराती चालू असतात हे मान्य
पण मायबोली सारख्या संस्थळावर या अशा जाहिराती याव्यात हे खटकते
जाहिराती घेताना या मुद्द्याचा विचार व्हावा असे वाटते
तसेच दिनेश. यांनी मांडलेला पण मला ज्या ज्या क्षेत्रात रस आहे, ज्या ज्या क्षेत्रात नवीन काही आले तर ज्याची माहीती मला घ्यायला आवडेल अशी माहीती जर मला नोंदवता आली आणि त्या त्या क्षेत्रातील जाहीराती मला दिसत राहिल्या तर मला आवडतील.
ह्या मुद्द्याचाही विचार व्हावा असे वाटते
माफ करा, पण मायबोलीवरील
माफ करा, पण मायबोलीवरील बर्याच जाहिराती/ विशेषतः पॉप अप्स या कधी निव्वळ त्रासदायक तर कधी घरातील लहानांसमोर न बघता येणार्या आढळल्या आहेत. खेरीज, बरेच वेळा ईथल्या मूळ कंटेंट पेक्षा जाहिरातबाजीकडे लक्ष जास्त जात्/दिले गेले असल्याने वैयक्तीक माबोवर येण्याचे सध्या टाळावे लागत आहे.
(त्यामागील मायबोलीची धंदेवाईक मर्यादा वा व्यावसायिक कारणे मान्य आहेत!)
'गुलमोहर' पुन्हा भविष्यात अवतरेल अशी आहे आहे.
@योकू<<<<मी स्क्रीन कॅप घेतला
@योकू<<<<मी स्क्रीन कॅप घेतला होता पण १६२ केबी चा असल्याने अपलोड नाही होत.>>>microsoft office picture manager 2003 डाऊनलोड करा. पिक्चर फाईल राईट क्लिक करून 'open with' microsoft office picture manager ह्या प्रोग्राम मध्ये तुमचे पिक्चर उघडा. 'edit picture' हे बटन दाबा. उजव्या बाजूला एक विंडो उघडेल. त्यात तुमचे चित्र एडीट करू शकता. रुंदी ४०० पेक्षा कमी ठेवा. कॉम्प्रेस करताना webpage हा विकल्प वापरा. फाईल एकदम लहान होईल. Happy Computing !!
सुरेशजी, मी मॅक वापरतो.
सुरेशजी, मी मॅक वापरतो. अपर्चर (फोटो एडिटर) वापरून करून पाहिलं पण त्याची क्वालीटी गंडत होती
आतासुद्धा याच पेज च्या वर बिकीनीतल्या मुलीचा फोटो येतोय (अन मेली विचारतेय की गेम खेळायचाय का म्हणून... :p)
हेच जर ऑफिसात झालं तर फार अॅनॉईंग होतं...
मला आत्तापर्यंत माबोवर
मला आत्तापर्यंत माबोवर क्रोमवरून किंवा मोबाईलवरून कधीही एकही पॉप-अप आलेला नाही. कधीही आक्षेपार्ह जाहिराती दिसल्या नाहीत
आतासुद्धा याच पेज च्या वर
आतासुद्धा याच पेज च्या वर बिकीनीतल्या मुलीचा फोटो येतोय (अन मेली विचारतेय की गेम खेळायचाय का म्हणून... )
हेच जर ऑफिसात झालं तर फार अॅनॉईंग होतं...
>>>
अगदी अगदी ! ऑफिसात बर्याचदा बिकीनीतल्या मुलींचे, अंतरवस्त्राच्या जाहिराती दिसतात.
मला ऑफिसात इंटरनेटवर काही अपलोड करायची परवानगी नसल्याने मला स्क्रिसॉ देता येणार नाहीत. कोणी तरी दिल्यातर बरं होईल. कारण अनेकदा ऑफिसात "हायला , काय बघतेयेस तू हे? असलं पण असतं का तुमच्या मायबोलीवर ?" वगैरे ऐकावं लागतं. माझ्या आणि माबोच्या इमेजला हे भलतंच हनिकारक आहे
ऑफिसमधून माबो करण्याएवढा वेळ
ऑफिसमधून माबो करण्याएवढा वेळ असतो कामातून? आणि मनाचा कल?
अतिशय जेन्युईन उत्सुकतेने विचारते आहे.
वरदा, मी फक्त माझ्या पुरतं
वरदा, मी फक्त माझ्या पुरतं उत्तर देते
माझे वर्कफ्लोज चालेपर्यंत माझ्याकडे नुसतं बसण्याखेरीज काहीच काम नसतं तेंव्हा रोमातून माबोवर डोकावणं/ माबो वाचणं सहज शक्य असतं
आणि माझ्या हापिसातल्या इतरांसारख्या हापिसात कुचाळक्या करत बसण्यापेक्षा, एकमेकांच्या चुका डिस्कस करून चहाड्या करत बसण्यापेक्षा माबोवर कुचाळक्या केलेल्या कधीही बर्या की नाही?
वरदा, इथली बरीच लोकं ऑफिसमधून
वरदा, इथली बरीच लोकं ऑफिसमधून मायबोलीवर येतातच की... किंबहूना काही लोकं फक्त ऑफिसमधूनच लॉगीन होतात..
तू कधीमधी काम करत असताना पुपुवर डोकावत नाहीस ? 'आता खूप बिझी आहे सो एकदम संध्याकाळी येईन' अश्या टाईपचे पोस्ट टाकतेस की.. त्यामुळे ऑफिसमधूम माबो करण्याबद्दल एव्हडी उत्सुकता-बित्सुकता वाटण्याचं कारण आणि मुद्दा कळला नाही आणि holier than thou टाईपचा प्रश्न वाटला..
माझ्याबद्दल सांगायचं तर मी लंच डेस्क वर केला तर बर्याचदा माबोवरच्या कथा/लेख वगैरे वाचतो.. कधी कॉफी पिताना किंवा जनरल अधेमधे २/५ मिनीटांचा ब्रेक हवा असेल तर माबो उघडतो..
त्यावेळी कुठल्यातरी विचित्र जाहिराती उघडल्या की नको होतं. हे फक्त माबोच नाही तर TOI, मटा, सकाळ किंवा इतर कुठल्याही वेबसाईट बद्दल आहे. हल्लीतर क्रिकइन्फोवर आपोआप व्हिडीयो सुरु होतात ! ते ही फार त्रासदायक आहे..
मी माझ्या सगळ्या मशिन्सवर फाफॉ विथ अॅड ब्लॉकर वापरतो.. कधीही कुठल्याही जाहिराती दिसत नाहीत त्यामुळे माबोचे आर्थिक नुकसान होते हे माहित नव्हते पण खरं सांगायचं तर can't help.
ह्या ऐवजी इतर कुठल्या प्रकारे मायबोलीला आर्थिक मदत करता येईल का ? एक उपाय सुचतोय तो म्हणजे खरेदी विभागावरून खरेदी. अजून काही असेल तर नक्की इथे सांगा.
आपल्याला इ-कॉमर्समधलं काही
आपल्याला इ-कॉमर्समधलं काही कळत नाही, त्यामुळे सदरहू प्रश्न बावळट वाटेल, पण...
काही नॉमिनल चार्ज दिल्यावर (उदा. वर्षाला ५० रु.) त्या आयडीला जाहिराती दिसणार नाहीत, असं काही करता येतं का? अॅप विकत घेतल्यावर जाहिराती दिसत नाहीत तसं? नियमित येणारे सदस्य आनंदाने तेवढे पैसे भरतील. मग अॅडमिनभी खुष, सदस्यभी खुष.
आपण बुवा सगळीकडेच अॅडब्लॉक वापरतो.
पराग, इथे होलिअर दॅन दाऊ चा
पराग, इथे होलिअर दॅन दाऊ चा प्रश्न नाहीये हा. मी जर व्यावसायिक काम करत असेन तर माझी लिंक तुटते म्हणून मी इथे येत नाही. शिवाय मी ऑफिसमधे बसून काम करत नाही. मला फक्त 'ट्रॅडिशनल' दिवसभर सतत काम असण्याच्या ऑफिसचाच अनुभव आहे. इतर कार्यक्षेत्र/ऑफिसेसबद्दल माझं ज्ञान मर्यादित आहे आणि म्हणून असा विचार डोक्यात आला.
कुचकट/खवट किंवा होलिअर दॅन दाऊ सुरात प्रश्न विचारायचा असता तर तश्शाच सुरात विचारला असता मी. काळजी नसावी.
ओके.. उत्तर मी वर दिलेलं
ओके.. उत्तर मी वर दिलेलं आहेच.
९०% लोक ऑफिस मधुन असतात..
९०% लोक ऑफिस मधुन असतात.. म्हणुन रात्री, शनिवारी, रविवारी मायबोली मंद होते... हे सरळ दिसुन येतेच..
मल्टिटास्किंग म्हणून एक गोष्ट
मल्टिटास्किंग म्हणून एक गोष्ट असते की. काही लोकांना जास्त चांगली जमते.
मला आत्तापर्यंत माबोवर
मला आत्तापर्यंत माबोवर क्रोमवरून किंवा मोबाईलवरून कधीही एकही पॉप-अप आलेला नाही. कधीही आक्षेपार्ह जाहिराती दिसल्या नाहीत >>>+१००
किंबहुना हा एवढा मोठा प्रश्न आहे हे इथेच कळले.
मल्टिटास्किंग म्हणून एक गोष्ट
मल्टिटास्किंग म्हणून एक गोष्ट असते की. काही लोकांना जास्त चांगली जमते.
>>+१ असं केल्याने काम आणि वेळ याचं चांगले नियोजन करता येते...
आम्हाला मोदी आणि राहूलच
आम्हाला मोदी आणि राहूलच दिसतो
बाकी काय बी दिसत न्हाय
Pages