मायबोलीवर सगळीकडे दिसणार्या जाहिराती या मायबोलीसाठी एक महत्वाचा भाग आहेत. ते मायबोलीचं उत्पन्नाचं साधन आहे आणि त्या नसतील तर मायबोली चालू राहणार नाही.
यातल्या काही जाहिराती नुसत्या दिसल्यातरी मायबोलीला उत्पन्न मिळते. काही जाहिरातींवर क्लीक केले तर काही जाहिरातींमुळे प्रत्यक्ष विक्री किंवा कृती झाली तरच उत्पन्न मिळते.
मायबोलीवरच्या जाहिराती त्रासदायक नसतील, व्हल्गर नसतील यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो. जेंव्हा मायबोलीकरांनी वेळोवेळी अशा त्रासदायक जाहिराती नजरेस आणून दिल्या आहेत , तेंव्हा शक्य तितक्या तातडीने त्या बंद करण्यात आल्या आहे. या सगळ्या मायबोलीकरांचे मनापासून आभार. तुमच्या कडून या पुढेही हा पाठींबा मिळेल अशी आशा आहे.
मायबोलीवर कधीच Pop up (नवीन खिडकी उघडणार्या)जाहिराती नसतात. नुकत्याच एका मायबोलीकरणीला अशा जाहिराती मायबोलीवर दिसत होत्या पण त्याचे कारण त्यांच्या संगणकावर आलेला व्हायरस्/मालवेअर होते असे निष्पन्न झाले.
आपोआप ध्वनीत बडबड सुरु करणार्या जाहिराती मायबोलीवरून काढून टाकल्या आहेत (त्या दाखवणारे नेटवर्कच बंद केले आहे)
मायबोलीवर प्रकाशित केलेले फोटो जर डाव्या रकान्याच्या मर्यादेत असतील (जसे इतर लेखन असते) तर जाहिरातींचा त्रास होत नाही. ते फोटो जर डाव्या रकान्याच्या बाहेर जाणारे प्रकाशित केले गेले तर जाहिरातीं मधे मधे येतात. थोडक्यात फोटोंनी अतिक्रमण केले तरच जाहिराती फोटोंवर अतिक्रमण करतात.
मायबोलीवर प्रकाशित होणारे लेखन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की ते आधी तपासून पाहून मगच प्रकाशीत करणे शक्य नाही. तसेच येणार्या जाहिराती इतक्या वेगवेगळ्या मार्गाने, नेटवर्कमधून येतात की त्या सगळ्या आधी तपासून पाहणे शक्य नसते. त्यातूनही आजकाल बर्याच जाहिराती या भौगोलिक पातळीवर मर्यादित (Geo targeted) , किंवा वाचकाच्या आंतरजालावरच्या वाटचालीनुसार मर्यादित (behavioral targeted) असल्याने कुणितरी सांगितल्याशिवाय पडताळूनही पाहता येत नाही.
फक्त मायबोलीसाठीच नाही तर मराठी आंतरजालाच्या वाढीसाठी, जास्तीत जास्त मजकूर प्रकाशित होण्यासाठी या आवश्यक आहेत. यांचं स्थान थोडसं मराठी सिरियलच्या प्रायोजकांसारखं आहे, ते जर नसते तर आज अनेक मराठी व्यक्तींना नवीन व्यवसायाच्या/नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या नसत्या. या जाहिरातींमुळेच , जाहिरातदारांना, मराठी ग्राहकवर्ग मोठा आहे, ऑनलाईन आहे , त्याच्या कडे खरेदीची क्षमता आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याची जाणीव होते आहे.
काही जाहीराती, जाहिरातदार अतिशय त्रासदायक जाहिराती दाखवत असतात याची आम्हाला कल्पना आहे आणि त्या येऊ नयेत म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करत असतो. अशी जाहिरात आली तर
१) पानाचा screenshot घेऊन आम्हाला कळवा.
२) काही जाहिरातींवर, त्या त्या जाहिरात नेटवर्कला प्रतिसाद द्यायची सोय असते ती वापरून ती जाहिरात का योग्य नाही ते कळवा.
जाहीरात संस्थांना या त्रासदायक जाहिराती कमी होण्याची गरज माहिती आहे आणि त्यासाठी अनेक उपायही योजले जात आहे. उदा, काही जाहिराती नेटवर्क जितकी जाहिरात त्रासदायक किंवा वाचकांचा वाईट प्रतिसाद तितकी जाहिरात दाखवण्याची किंमत आपोआप वाढवतात आणि चांगल्या, वाचकांचा प्रतिसाद असणार्या जाहिरातींची किंमत कमी करतात.
या विषयावर तुमची मतं किंवा येणार्या अडचणी समजून घ्यायला जरूर आवडेल.
मवा +१०००
मवा +१०००
दोन पेशंटांच्या दरम्यानच्या
दोन पेशंटांच्या दरम्यानच्या अर्ध्या मिन्टात, किमान एकादा बाफ पेट(व)लेला असेल तर लक्ष जातेच जाते. माझ्या कन्सल्टिंगमधे दोन डेडिकेटेड स्क्रीन कायम सुरू असतात. पैकी पर्सनल स्क्रीनवर एक विंडो माबोची असते, तिला एफ-५ मिळतोच मिळतो.
अॅडिक्शन.
दुसरं काय!
रिया.+१ मलाही तीच जाहिरात
रिया.+१
मलाही तीच जाहिरात खटकत होती
ये एक अच्छे पढने लिखने की साईट है अस माझ्या कलिगना मी सांगीतल आहे
त्यांनी ती जाहिरात पाहिली असती तर 'गुड !तो तेरे अच्छे पढने लिखने साईट पे ये भी होता है क्या ' असा शेरा मारलाच असता
या जाहिराती दिसू नयेत अशी काळजी घ्यावी अशी प्रशासकांना नम्र विनंती
सिंडरेला यांच्या वायरसच्या
सिंडरेला यांच्या वायरसच्या पोस्टीला +१
योकु, रिया आणि जाई म्हणतायत
योकु, रिया आणि जाई म्हणतायत तीच add मलापण दिसत होती आणि खटकत होती.
आजतागायत मला माबो च्या
आजतागायत मला माबो च्या जाहिरातीन्चा अजिबात त्रास झालेला नाही ....... पण वार्षिक शुल्क भरून जाहिराती बन्द करण्याची कल्पना चांगली आहे.............!
कुणाला कुठली जाहिरात दिसते हे
कुणाला कुठली जाहिरात दिसते हे पुष्कळदा (नेहमीच नाही) तुम्ही गेल्या काही दिवसात आंतरजालावर केलेल्या प्रवासावर अवलंबून असू शकते (असतेच असे नाही पण असू शकते).
हे काही उपाय करून पहा.
१) ब्लूकाय ही मार्केटींग कंपनी बर्याच कंपन्याना तुमच्याबद्दल माहीती पुरवते. खालील दिलेल्या लिंकवर त्यांच्यामते तुम्हाला काय आवडते आहे, कशावर तुम्ही क्लीक कराल (त्यांच्या मते) याची माहिती आहे. त्यातली जी योग्य वाटत नसेल तर त्यातून स्वतःला काढून घ्या.
http://bluekai.com/registry/
यातला What others know about you हा विभाग इंटरेस्टींग आहे.
२) वरचा उपाय लागून पडत नसेल तर हा करून पहा.
तुमच्या ब्राउझरची कॅश स्वच्छ करून पहा. विशेषतः कुकीज, म्हणजे कुठल्या तरी वेबसाईटवर तुम्ही गेला असाल तर त्यांना ते लक्षात ठेवता येणार नाही.
एखादी व्हलगर जाहिरात दिसत असेल तर तुम्ही त्या व्हलगर वेबसाईटला भेट दिली म्हणूनच हे घडेल असे नाही. पण संख्याशास्त्रानुसार अ) या चांगल्या वेबसाईट्ला भेट देणारे ७०-८०% वेळा ब) या व्हलगर वेबसाईटवर जात असतील तर अ) च्या काही वाचकांना ज्यांनी अजून ब) ला भेट दिली नाही , बच्या जाहिराती दिसू लागतील.
हे उलटेही होते. ब) ही जर चांगली वेबसाईट असेल तर तिच्याही जाहिराती तुम्हाला दिसतील.
छान धोरण, इथे त्याबद्दल
छान धोरण, इथे त्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
एक अजून सोप्पा उपाय म्हणजे
एक अजून सोप्पा उपाय म्हणजे आपण आपल्या आवडत्या वेबसाईटसना भेट द्यायची म्हणजे त्या बेवसाईटच्याच किंवा त्याच प्रकारच्या जाहिराती दिसायला लागतात. पण या जाहिराती उजव्या हाताला दिसतात. वर दिसणार्या जाहिराती आपल्या कंट्रोलमध्ये नसतात बहुधा.
माझ्या स्क्रीनवर उजवीकडे फ्लिपकार्ट, मिंत्रा, इबे, असल्या जाहिराती असतात. मात्र वरती दिसणार्या कधी कधी विचित्र असतात.
त्रासदायक जाहिराती ऑफिसमधून
त्रासदायक जाहिराती ऑफिसमधून दिसतात खर्या. कामाच्या अधे मधे वेळ मिळाला किंवा डेस्कवरच ५-१० मिनिटांचा ब्रेक म्हणून माबो उघडले जाते. फ्लिपकार्ट वा तत्सम विक्रेत्यांच्या जाहिराती वगैरे ठीक आहेत पण अंतर्वस्त्रांच्या जाहिराती, अरब मुलींच्या जाहिराती, बोलकी सोनम ह्या जाहिराती ऑफिसमध्ये नको वाटतात.
ऑफिसमध्ये हवा तो बाऊझर वापरण्याचे सुख आम्हांला नाही. ब्राऊझर कॅश स्वच्छ करुन सुद्धा ह्या जाहिराती दिसतात, व ते त्रासदायक होते हे खरेच.
मला आज मायबोलीवर ही जाहिरात
मला आज मायबोलीवर ही जाहिरात दिसते आहे आणि त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाही.
http://www.maayboli.com/node/28519
वेमा, मी माझ्या ऑफिस
वेमा, मी माझ्या ऑफिस ब्राऊजरवर माबो सोडून काहीच अॅक्सेस करत नाही.
केलंच तर गूग्ल ते पण कामासंधर्बात गोष्टींसाठी.
मग मला तसल्या अॅड्स का दिसतात?
(मला बहुदा तुमचा मुद्दा नीट कळाला नाहीये )
मला पण कधीच अश्या जाहिराती
मला पण कधीच अश्या जाहिराती दिसल्या नाहीत. मला बहूतांशी वेळा आर्ट-क्राफ्ट संबंधित, फॅबइंडिया, नोव्हिका, क्वचीत कधी किचनच्या सामानाच्या संबंधित जाहिरातीच दिसतात. मी मध्यंतरी करंसी काउंटींग मशिनबद्दल शोधलं होतं तर आज मला त्याची जाहिरात दिसतेय.
मी फक्त घरूनच किंवा क्वचीत कधी मोबाइलवरुन मायबोली वाचते. घरून मायबोली बघत असताना बर्याचवेळा बाजूच्या खिडकीमध्ये कपडे, पेंटींग्ज, ब्लॉग्ज बघणं /वाचणं चालू असतं.मी ज्या वस्तू गुगल सर्चमध्ये बघते त्याच जाहिरातींमध्ये पण दिसतात मला.
कदाचीत काहीजण ऑफिसातून माबो वाचताना दुसर्या कोणत्याच साइट्स अक्सेस करत नसतिल आणि त्यामूळे त्यांच्या आवडीच्या जाहिराती येण्याऐवजी दुसर्याच (अॅनॉयींग) जाहिराती त्यांना रँडमली दिसत असतिल.
मी कितीही सिल्क, अॅपेरल,
मी कितीही सिल्क, अॅपेरल, आर्ट, क्राफ्ट वगैरे बघत असले तरी मला मॅट्रोमोनियलच्याच अॅडस दिसतात. सध्या मराठी मॅट्रिमोनिची दिसतेय. म्हणजे आपल्या पाऊलखुणांप्रमाणेच (माबोवरच्या पाखु नव्हे!) अॅडस दिसतील असेच काही नाही.
रिया... गुगल प्रत्येकाचा
रिया... गुगल प्रत्येकाचा हिशोब ठेवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही कुठून लॉगिन करता, किती वाजता करता, काय शोधता असे जवळ जवळ ५० / ६० वेगवेगळे Parameter ठेवतात ते.. त्यावरून तुम्हाला काय आवडेल याचा अंदाज बांधून जाहिराती येतात.
तुम्ही काहीच शोधत नसाल , तर Random जाहीराती आहेतच...
मला आत्ता Play Games, आणि Convert PDF अश्या जाहीराती आल्यात.
मी नेटवर खेळत नाही ( Random )
PDF Converter वापरला होता पुस्तक लिहीताना..
मला मॅट्रोमोनियलच्याच अॅडस
मला मॅट्रोमोनियलच्याच अॅडस दिसतात. सध्या मराठी मॅट्रिमोनिची दिसतेय. >> +१
हापिसात स्वतः नेट्वर टैंम्पास
हापिसात स्वतः नेट्वर टैंम्पास करायचा वर दुसरा त्याच्या सिस्टीमवर काय करतो ते पण भोचकपणे बघायचे? लोकांना लै वेळ असतो हेच खरे. तस्मात फाट्यावर मारणेचे करावे!
सध्या मराठी मॅट्रिमोनिची
सध्या मराठी मॅट्रिमोनिची दिसतेय <<< तुमचे लग्न झाले आहे का ? कि.वा तुम्ही वधू / वर शोधण्याच्या कोणत्याही Link वर Click केले होते का?
किंवा बाजूला 'बहिणीसाठी वर पाहिजे..' जाहीरातीमुळे असेल
तुमचे लग्न झाले आहे का ? << ओ
तुमचे लग्न झाले आहे का ? <<
ओ देसाई.. काय जोक मारता हो? लग्न जुनं झालं माझं आता!
बाकी बहिणभावंडे वगैर नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी वा कुणासाठीच संशोधन केले नाहीये आजतागायत.
वेमा, मी माझ्या ऑफिस
वेमा, मी माझ्या ऑफिस ब्राऊजरवर माबो सोडून काहीच अॅक्सेस करत नाही.
केलंच तर गूग्ल ते पण कामासंधर्बात गोष्टींसाठी.
मग मला तसल्या अॅड्स का दिसतात? अ ओ, आता काय करायचं>>> +१११
वेमा यांच्या पोस्टवरन सर्व दोष आमच्याच पोस्टिला दिला जात्तो अस दिसत
आता वरती मला वरुण धवन दिसतोय
ह्या माणसाला मी कधीही सर्च केलेल नाही
नाही जाई. सर्व दोष पोस्टींना
नाही जाई. सर्व दोष पोस्टींना नाही दिलाय. ती एक शक्यता वर्तवलीये.
वरती गोष्टीगावाचे जे म्हणतायत ते की बाजूला माबो जाहिरातीत बहिणीसाठी वर पाहिजे दिसतंय ते कारण मॅट्रिमोनियलच्या अॅडस दिसण्यासाठी लॉजिकल होऊ शकतं.
तसेच त्या त्या बाफवर जी चर्चा झाली असेल त्यातले कीवर्डस घेऊनही येऊ शकत असणार अॅडस. होना?
किंवा मग या सगळ्याचे कॉम्बो...
मी तर आयुष्यात भाजपाच्या साईट
मी तर आयुष्यात भाजपाच्या साईट वर गेलो नाही... मग मला मोदी यांचा प्रचार का दिसावा ? मोदिनोमिक्स
आताच या पेज वर मला वरूण धवन,
आताच या पेज वर मला वरूण धवन, बेड्शीट्+पिलोकवर्स आणि १६जीबी स्पायपेन या तीन अॅड्स दिसताहेत.
मी स्वतः कधीही या/ तत्सम गोष्टी गूगलल्या नाहीत... म्हणजे बहुतेक या रॅन्डम येत असाव्यात.
मी भारतातलं सर्वर नाही वापरत. युकेचं आहे.
काही जाहीराती चिडवण्यासाठी
काही जाहीराती चिडवण्यासाठी असाव्यात... मला नेहमीच तद्दन भिकार वाटलेल्या King Khan चे फोटो येताहेत बाजूला... google मला त्रास व्हावा म्हणून हे करत असावे...
google मला त्रास व्हावा
google मला त्रास व्हावा म्हणून हे करत असावे <<
हो ना.. गुगलचं आणि माझं गेल्या जन्मीचं वैरच आहे ना!
मला खरंच खूप छान जाहिराती
मला खरंच खूप छान जाहिराती दिसतात तर. आत्ता या क्षणी डाव्या बाजूला नोव्हिका ची शॉप युनिक ज्वेलरी म्हणून जाहिरात आहे आणि वरच्या बाजूला जय्पोर ची कलमकारी स्टोल्सची.
माबोवर अजून पर्यंत मला कधीही
माबोवर अजून पर्यंत मला कधीही आक्षेपार्ह जाहिराती दिसल्या नाहीत. आत्ताच कळले याबद्दल.
इन्फॅक्ट कधीतरीच जाहिराती दिसतात.
वेमा, संकेत स्थळाचा हा उत्पनाचा मार्ग आहे, तर मग अजिबातच अॅड न दिसणे पण प्रॉब्लेमेटि़क आहे.
मी फायरफॉक्स वापरते. version 28.
गोगा, बहुदा तुमच्या
गोगा, बहुदा तुमच्या पोस्ट्सवरुन मला कळालय असं वाटतंय!
म्हणजे मी इतर कोणत्याच साईट्स फॉलो करत नसल्याने रँडम काहीही उचलून माझ्या पेजवर मला दाखवलं जातंय असच ना?
पण जर मी एखादी साईट लेट्स से कपड्यांची साईट फॉलो करत असते तर मला इथे कपड्यांसंबंधीत अॅड्स दिसल्या असत्या. असच ना (का) ?
पण जर मी एखादी साईट लेट्स से
पण जर मी एखादी साईट लेट्स से कपड्यांची साईट फॉलो करत असते तर मला इथे कपड्यांसंबंधीत अॅड्स दिसल्या असत्या. असच ना (का) ? >> रीया , हो बहुतेक.
मी एकदाच मिंत्रा वरून बायकोला ड्रेस घेतला होता , तर कितीतरी दिवस त्याच्या अॅड्स यायच्या . हल्ली मॅट्रोमोनियल का दिसतायत माहित नाही
मला फक्त ग्रामर चेकरच्या अॅड
मला फक्त ग्रामर चेकरच्या अॅड दिसतात, किती सोज्वळ नेट्वावर तो!
Pages