सेवानिवृत्तीनंतर मी इतर कामे ( प्राध्यापकगिरी, सल्लेगार ) व त्याबरोबरच भाषांतराचे ( मुख्य मराठी- इंग्रजी, मराठी- हिंदी व तस्त्सम ) काम सुरू केले.
आज पावेतो ९ पुस्तके व इतर व्यावसायिक काम ( फार्मास्युटिकल कंपन्यांचे तांत्रिक लिटरेचर , क्वा मॅन्युअल्स, सरकारी परिक्षांच्या प्रश्नपत्रिका ) केले.
या कामात व्याप्ती खूप आहे.
इतर क्षेत्रे म्हणजे सब टाय्टल देणे, मौखिक इंटर व्यूचे छापील दस्तावएजात रूपाम्तर, वेज अॅग्रीमेंट्स इ.
यात आवश्यक पात्रता. टेक्निकल टर्म्स वर व कंप्युटर वर प्रभुत्व. वेगवेगळ्या फाँट्स ची माहिती व रोज ३ ते ४ तास + भाषे वर प्रभुत्व.
घरबसल्या हा एक छंद व व्यवसाय होवू शकतो.
पैसा फार उत्तम नाही पण आपण गुंतले राहतो व वाचन उत्तम व सविस्तर होते. सुरुवातीस प्रकाशकांच्या तसेच कंपन्यांच्या मागे लागावे लागते.
अजोून सविस्तर लिहा. हा धागा
अजोून सविस्तर लिहा. हा धागा उद्योजक ग्रूपमध्ये घालाल का?
अजोून सविस्तर लिहा. +१
अजोून सविस्तर लिहा. +१
मी पण अनुवादक आहे, जास्त करून
मी पण अनुवादक आहे, जास्त करून कायदा संबंधी भाषांतरे करते.
मस्त धागा..
अजून सविस्तर लिहा. +१००००
मी पण अनुवादक आहे...जर्मन <->
मी पण अनुवादक आहे...जर्मन <-> ईंग्रजी.
मस्त धागा......
खरच सविस्तर लिहा.
एकमेकांना मदत होउ शकते....
पण यामधे उत्पन्नाचे प्रमाण
पण यामधे उत्पन्नाचे प्रमाण कसे असते ? अनुवाद केल्यानंतर एकदाच की अनुवादित पुस्तकाच्या विक्रीनुसार ?
काम कसे मिळवायचे, कामाचे पैसे
काम कसे मिळवायचे, कामाचे पैसे कसे मिळतात, एखादी कंपनी कशी आहे, असे प्रश्न विचारले की भारतातील अनुभवी अनुवादक (विशेषत: मराठी भाषिक ) चर्चा त्यांच्यापुरती बंदच करतात.
त्यांना एकतर नवोदित अनुवादकांशी स्पर्धेची काळजी वाटत असावी किंवा उत्तरे देण्यात रस नसावा. बाहेरील देशातील अनुवादक खुल्या मनाने चर्चा करताना आढळतात.
महेश मला आजपर्यंत व्यावसायिक भाषांतराचे शब्दांनुसार वा तासानुसार पैसे मिळत आलेत. पण पुस्तकाबद्दल रेव्युच जास्त नीट सांगू शकतील.
विनिता, धन्यवाद !
विनिता, धन्यवाद !
मलाही असे प्रश्न आहेत पण
मलाही असे प्रश्न आहेत पण अजूनपर्यंत खास ओळखीतला किंवा खात्रीलायक असा कुणी भेटला नाही की ज्याला ह्यासंबंधी व्यवस्थित माहिती आहे आणि त्याचा अनुभवही चांगला आहे.
पण एकूणात हे क्षेत्र खूपच फसवं आहे त्यामुळे एखाद्याची फसगत झाली तर तो ती इतरांना सांगत नसावा...स्वतःची फजिती सांगणं इतकं सोपं नसतं.
दुसरं कारण विनिता म्हणते ते बरोबर वाटतंय..एखाद्याला त्यात यश आलं असेल,चांगला अनुभव आला असेल तर तो इतरांना ते अनुभव खुलेपणाने सांगत नाही कारण स्पर्धेची भिती हेच असावं.
ह्यावर उपाय एकच...स्वतःच अनुभव घ्यावा आणि इतरांना त्याबद्दल मोकळेपणाने सांगावे.
प्रमोद, स्वतः अनुभव
प्रमोद, स्वतः अनुभव घेतल्यानंतर तो घेतलेले लोक बदलणार नाहीत कशावरून
बरोबर महेश! हेच घडण्याची
बरोबर महेश! हेच घडण्याची शक्यता जास्त आहे.
>>पण एकूणात हे क्षेत्र खूपच
>>पण एकूणात हे क्षेत्र खूपच फसवं आहे त्यामुळे एखाद्याची फसगत झाली तर तो ती इतरांना सांगत नसावा...स्वतःची फजिती सांगणं इतकं सोपं नसतं.
असं काहीही नसतं. भाषांतरकारांच्या संकेतस्थळांवर याविषयी मोकळेपणाने चर्चा होत असते. अश्या फसव्या 'ब्लॅक लिस्टेड' कंपन्यांची लिस्टही उपलब्ध असते.
रीक्षा फिरवतेय असं नाही विषयाला अनुरुप आहे म्हणून याच क्षेत्रावर मी १० साली इथे लेख लिहिला होता त्याची लिंक देते:
http://www.maayboli.com/node/14551
वर्षा, संकेतस्थळांवर जरी
वर्षा, संकेतस्थळांवर जरी चर्चा होत असली तरी देखील वर उल्लेख केल्याप्रमाणे वैयक्तिक चर्चेत बहुतेक वेळा अनुवादक (आणि त्यातही मराठी) अशी माहितीची देवाणघेवाण करायला फारसे उत्सुक नसतात.
पुर्वी मी भाषांतराचे काम करत असताना आलेले अनुभव पण थोडेफार असेच होते.
अर्थात मी खुप काळ मोठ्या प्रमाणावर केले नव्हते.
वर्षा, आपण म्हणता ते खरंही
वर्षा, आपण म्हणता ते खरंही असेल. दूर्दैवाने आमच्यासारख्यांपर्यंत ती माहिती पोचली नाही किंवा आम्ही तिथपर्यंत पोचू शकलो नाही म्हणून म्हणा...आमच्यासारख्यांना अशा गोष्टींबद्दल एकीकडे उत्सुकता असते तर दुसरीकडे भितीही असते.
असं होऊ नये खरंतर. कामे
असं होऊ नये खरंतर. कामे मिळवणे, दर किती असावा, प्रत्यक्ष पेमेंट घेण्याचे कोणकोणते मार्ग असतात, कोणते सुरक्षित असतात्/नसतात या बेसिक प्रश्नांमध्ये लपवण्यासारखं काही नाही कारण तशीही ही माहिती ऑनलाइन सर्च केल्यावर सहज मिळते.
मला जरासा उलट अनुभव आहे. वैयक्तिक चर्चेपेक्षा ऑनलाइन असे जे मंच आहेत त्यात मराठी भाषांतरकारांचा रिस्पॉन्स उदासीन असतो.
मला या एजन्सीजचा अत्यंत वाईट
मला या एजन्सीजचा अत्यंत वाईट अनुभव आहे. त्याखेरीज मराठी भाषांतरकारांनी घातलेले काही चुकीचे पायंडे मला अजिबात पटत नाहीत, पण "इंडस्ट्री स्टॅन्डर्ड" म्हणत काय वाट्टेल ते भाषांतर करवून घेतात. शिवाय, पैसे फार कमी आणि खूप उशीरा देतात.
वैअयक्तिक ओळखीतून मिळालेली कामे मात्र बर्यापैकी चांगली असतात. पैसे लवकर मिळाले आणि कामाचे समाधान पण फार चांगले होते.
वर्षाचा धागा मला स्वत:ला
वर्षाचा धागा मला स्वत:ला प्रचंड उपयोगी पडला.
आणि ती म्हणते ते अगदी बरोबर आहे. एकूणच मराठी अनुवादक मंचांवर प्रतिसाद देण्यासाठी फार उदासीन असतात. (जोपर्यंत त्यांचे स्वत:चे अडत नाही तो पर्यंत).
असं होऊ नये खरंतर. कामे मिळवणे, दर किती असावा, प्रत्यक्ष पेमेंट घेण्याचे कोणकोणते मार्ग असतात, कोणते सुरक्षित असतात्/नसतात या बेसिक प्रश्नांमध्ये लपवण्यासारखं काही नाही कारण तशीही ही माहिती ऑनलाइन सर्च केल्यावर सहज मिळते.>>>> नाही ही सगळी अद्ययावत माहिती शोधून नाही मिळत, पेमेंट घेण्याचे कोणकोणते मार्ग असतात, कोणते सुरक्षित असतात्/नसतात याची माहिती मिळेल कदाचित, पण कामे मिळविण्यासाठी असलेले उत्तम मार्ग, दरांचे समीकरण यांविषयीची चर्चा मराठी भाषिक अनुवादक फार वैयक्तिक मानतात खरे.
खरे तर इतरांच्या वैयक्तिक अनुभवातून खूप काही शिकता येते, नवोदिताना याची गरज असते. शिवाय काय करू नये हे माहिती असणे पण गरजेचे असते.
मराठी भाषांतरकारांसाठी भाषांतराचे फ्री वेबिनार, पेड सेमिनार फार कमी प्रमाणात झालेत आणि वारंवार असे करण्याची नितांत आवश्यकता आहे.
शिवाय मराठी हिंदी
शिवाय मराठी हिंदी महाराष्ट्रातील भाषांतरकारांसाठी जॉब बोर्ड, कामांसाठी ऑनलाईन ठिकाणे वाढविण्याची, इत्यादी फार गरज आहे.
रेव्यु, वर्षा, विनिता, मी
रेव्यु, वर्षा, विनिता, मी पुण्यात परत आल्यावर या बाबतीत खुप काही करण्याची इच्छा आहे. जमल्यास सम विचारी लोकांनी एकत्र येऊन काही करूयात.
मी स्वतः वैद्यकिय, तांत्रिक,
मी स्वतः वैद्यकिय, तांत्रिक, भविष्य आणि ईतर ही भाषांतराचे काम करतो ( यु.के. ईथे राहून) . भारतीय कंपनीचा माझ अनुभव एव्हढा चांगला नाहिये. काम झाल्यावर पैशांसाठी तंगवतात. क्लायंट ने काम स्विकारले तरी ही हे ईकडे चुका काढतात. खुप फॉलोअप करावा लागतो,
उलटपक्षी ईकडील / युरोप किंवा उसगावातील कंपन्या ह्या बाबतीत एकदम क्लीअर असतात. काम झाले की बिल ड्यु डेट ला पेमेंट मिळते.
मी English-Marathi, English - Hindi, English -Gujrati असे भाषांतर करत असतो.
प्रफुल लकी आहात तुम्ही भारतात
प्रफुल लकी आहात तुम्ही
भारतात (मेली अॅड करा) फसवणुकच फार!, नाहीतर काय!
मलाही घरबसल्या असे काम मिळेल
मलाही घरबसल्या असे काम मिळेल का?
>>मला या एजन्सीजचा अत्यंत
>>मला या एजन्सीजचा अत्यंत वाईट अनुभव आहे. शिवाय, पैसे फार कमी आणि खूप उशीरा देतात.
यामध्ये एजन्सीजच्या आधी 'भारतीय' शब्द घालून हीच वाक्ये म्हणते.
(आता यात सर्व भारतीय कंपन्या वाईट आणि सर्व परदेशी चांगल्या असं म्हणायचं नाहीये पण दुर्दैवाने मला तरी भारतीय कंपन्यांचे अतिशय अनप्रोफेशनल अनुभव आहेत. )
मुळात 'भाषांतर' करणं हे बहुतेकांना 'हॅ त्यात काय!' टाईप वाटतं त्यामुळे त्याचा योग्य तो मोबदला देण्यास तयार होणं, तो ठरल्यानुसार प्रत्यक्षात वेळेवर देणं हे भारतीय कंपन्यांकडून घडणं तितकं कॉमन नाही. अर्थात टाळी एकाच बाजूने वाजत नसल्यामुळे (पुन्हा 'हॅ त्यात काय' अॅटिट्यूड असल्याने) वाईट दर्जाचं भाषांतर, निरनिराळी कारणं सांगत ठरलेल्या मुदतीत न देणार्या भाषांतरकारांचाही यात हातभार असतो.
प्रफुल्ल शिंपी तुम्ही
प्रफुल्ल शिंपी तुम्ही युकेमध्ये आहात हे सांगितलत ते बरं केलंत. तुम्ही इंटरप्रिटेशनही करता का? कधीकधी कोर्टकेससंदर्भात किंवा हॉस्पीटल्स अशा ठिकाणी मराठी (युकेस्थित) जाणणार्या लोकांची गरज असलेली कामेसुद्धा निघतात. (व्हॉइस ओव्हरची सुद्धा) मी इथे (माबोवरही) अशा पोस्ट्स युके बीबीवर वगैरे पोस्ट केल्या होत्या.
निवा, भाषांतराचे काम घरुन
निवा, भाषांतराचे काम घरुन करता येते. अधिक माहितीसाठी माझ्या एका लेखाची लिंक वर दिली आहे ती वाचून बघा. काही प्रश्न असल्यास जरुर विचारा.
तुम्ही इंटरप्रिटेशनही करता
तुम्ही इंटरप्रिटेशनही करता का?
>> हो इंटरप्रिटेशनही करतो,
खास करून जन्म तारखेचा दाखला, विवाहाचा दाखला असे कागदपत्रे आपली शासकिय कार्यालये अति शुद्ध मराठी मध्ये देतात असे कामे नेहेमी करतो. फक्त नोटरी बाहेरून करावे लागते
भारतात (मेली अॅड करा) फसवणुकच
भारतात (मेली अॅड करा) फसवणुकच फार!, नाहीतर काय!
>> अगदी असे ही नाही, काही काही कंपन्या चांगल्या असतात पण खुप फॉलोअप करावा लागतो.
कधी कधी फोरमस मध्ये (भाषांतरकारांच्या) अश्या कंपनी बद्दल लिहीले की चांगला प्रतिसाद मिळतो
वाईट दर्जाचं भाषांतर, निरनिराळी कारणं सांगत ठरलेल्या मुदतीत न देणार्या भाषांतरकारांचाही यात हातभार असतो.
>> हे सुद्धा काही प्रमाणात खरे आहे.... प्रोफेशनलिझम इज मस्ट
ओके. तुमचा इमेल विपू किंवा
ओके. तुमचा इमेल विपू किंवा संपर्कातून कळवाल का? पुन्हा अशी कामे कळली तर तुम्हाला कळवीन.
हा जर व्यवसाय आहे तर यासंबंधी
हा जर व्यवसाय आहे तर यासंबंधी प्रशिक्षणही असायला हवे. किंवा सरावही. किमान पात्रता काहीतरी
त्याबद्दल लिहा ना कुणीतरी.
नुसत्या दोन भाषा येत असून उपयोग नाही. एका भाषेतून दुसर्या भाषेत मुद्दे नेताना मूळ लेखकाला जे म्हणायचंय ते चपखल पोचलं पाहिजे. शब्दशः नाही तर चपखल. नाहीतर 'विवाह आंबट होणे' किंवा स्ट्रेंजर्स इन द नाइट या गाण्याचा उल्लेख असेल तर त्या शब्दांचेही 'रात्रीचे अनोळखी' असे बिंडोक भाषांतर होते (माय फ्यूडल लॉर्ड या तेहमिना दुराणी यांच्या पुस्तकाच्या भाषांतरात हे आहे).
यापेक्षा फेबुवरचे बिंगचे ट्रान्स्लेशन बरे निदान मजा तरी येते!
मी बराच वेळ नेटवर नसल्याने
मी बराच वेळ नेटवर नसल्याने प्रतिसाद दिला नाही.
जमेतील गोष्टी; फारशी गुंतवणूक नाही, निवृत्त झाल्यावर करण्यास उत्तम व्यवसाय.
वाचन भरपूर होते व स्वत: काहीतरी चांगले करत असल्याचे समाधान असते.
परंतु सर्वसाधारणपणे, काही अपवाद वगळता समान दर्जाची वागणूक प्रकाशकांकडून मिळत नाही.
पैसा- साधारण: ५० ते ७० रु प्रति पान
वेळेवर पेमेंट होत नाही. त्याहून औद्योगिक अथवा इतर भाषांतर अधिक पैसे देते.
मी दिल्लीच्या काही प्रकाशकांचे काम केले आहे. ते देखील एकंदरित लाला टाइप आहेत .
या क्षेत्रातील अपवाद वगळता, कुणालाही साहित्याची जाणिव अथवा ऍप्रिसियेशन नसते. ते नुसते बेस्ट सेलरची नावे वाचून भाषांतर करवून घेतात.
आण्खी काही विशिष्ट शंका असल्यास वि पु मध्ये विचारा – स्वागत आहे
युनायटेड नेशन्सला पण
युनायटेड नेशन्सला पण भाषांतरकारांची, इंटरप्रिटेशनर्सची गरज असते. त्यांचं काही तरी सर्टिफिकेशन पण आहे बहुतेक.
Pages