Submitted by मानुषी on 27 February, 2014 - 11:17
माझ्या आयपॅड वर मी गुगल इन्पुट्मधे मराठी टाइपते. आणि ते नोट्स मधे कॉपी पेस्ट करते.
ईंग्रजी लिखाण तर तिथेच करते.
अचानक काल नोट्समधलं प्रत्येक पानावरच् लिखाण अर्धवट डिलिटेड अर्ध शिल्लक असं दिसतंय.
काय झालं असेल? सगळी पानं अशीच अर्ध्वट डिलिटेड दिसतात.
प्लीज संगण्क तज्ञांनो मदत करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मानुषी, कृपया आयपॅडचे iOS
मानुषी, कृपया आयपॅडचे iOS व्हर्शन सांगा. तसेच गूगल इनपुट वापरता त्याचा यूआरेल द्या. माझ्या माहितीप्रमाणे iOS वर गूगल इनपुट चालत नाही. तुम्हाला गूगल ट्रान्सलिटरेट म्हणायचं आहे का?
आ.न.,
-गा.पै.
गापै धन्यवाद मी मराठी
गापै धन्यवाद
मी मराठी टायपिन्ग आधी बरहा मधे करत असे. आता ते गूगल इन्पुट मधे करते.
कारण माझ्या आयपॅडवर बरहा नाही.
गेले २/३ महिने या आयपॅड्वरच मराठी टाइपतेय. आणि नोट्स मधे डकवून ठेवते. असं कधी झालं नव्हतं?
बाकी तुम्ही ़ खूप प्रॉम्प्ट मदत करयात. पण तुम्ही विचारलेल्या गोष्टी मला नाही सांगता येणार.
मानुषी, मीही गुगल इनपुट
मानुषी,
मीही गुगल इनपुट म्हणजेच transliteration हे साफारीमधील पेज वापरतो. पण मी डायरेक्ट माबो मध्ये पेस्ट करतो. जर हे पेस्ट करन्यासाथी तुम्हाला दुसरे अप्प पाहिजे असेल तर 'pages' app वापरा. App माहित नसल्यास appstore मध्ये सर्च करा. नवीन आय पॅड करता हे फ्री आहे नाहीतर $१० लागतील.
गूगल इनपुट मध्ये टाईप केलेले बर्याच वेळा गायब होते म्हणून मधेमधे कॉपी करून पेजेस मध्ये पेस्ट करीत जाणे उत्तम.
हैप्पी computing !
मानुषी, तुम्हाला गूगल
मानुषी,
तुम्हाला गूगल ट्रान्सलिटरेट म्हणायचं आहे असं गृहीत धरतोय. मलाही हीच अडचण आहे. iOS वर मी थेट हिंदी कीबोर्ड वापरतो. किचकट काम आहे, पण पर्याय नाही!
अन्यथा मायबोलीपुरतं म्हणाल तर प्रतिसादाच्या झरोक्यावर (टेक्स्ट बॉक्स वर) सफरचंदाचं चिह्न आहे. त्यावर टिचकी मारली की दुसरी खिडकी उघडते. तिथे दोन झरोके दिसतात. डावीकडे इंग्रजीत टाईप केलं की उजवीकडे मराठीत दिसतं. ते तुम्ही प्रतिसादात चिकटवू शकता. मात्र मी हे अजून तरी iPad वर वापरून बघितलेले नाही.
आ.न.,
-गा.पै.
>>>मात्र मी हे अजून तरी iPad
>>>मात्र मी हे अजून तरी iPad वर वापरून बघितलेले नाही.
चाललं पाहिजे. ते जे सफरचंदाचं चिन्ह आहे त्याच्या करताच आहे बहुतेक
गामा पैलवान, सुरेश शिंदे आणि
गामा पैलवान, सुरेश शिंदे आणि मॅक्स
सर्वांना धन्यवाद.
आत्ता नोट्समधलं सगळं इंग्रजी मराठी लिखाण जसंच्या तसं दिसतय. २ दिवस अर्धं पान डिलिट केलेलं, काही पानं १/३ गायब असं काय झालं होतं काही कळ्त नाही.
असो.....प्रॉब संपला. काही तरी टेम्पररी प्रॉब असावा.