'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
येईलच की जी कोण असेल ती.
येईलच की जी कोण असेल ती.
बाकी ओमचा फोन तिला कसाही मिळु शकतो की. त्याच्या ऑफीसमधुन्/मित्राकडुन्/घरच्या फोनवर फोन केल्यावर कुणी चोंबडेपणा केला असेल तर्/काकेने सांगीतले असेल तर. त्याचा फोन नंबर मिळवणे ही अगदीच अशक्यप्राय गोष्ट आहे का?
मीना नाईकांचे दात कायतरी
मीना नाईकांचे दात कायतरी विचित्र वाटतात नेहमी. प्लॅस्टीकचे वाटतात. त्या मस्त दिसतील ओम्याची आई म्हणून.
शिल्पा तुळसकरच आहे ओमची आई..
शिल्पा तुळसकरच आहे ओमची आई.. मी झी२४ तासवर पाहिलं, त्यांनी मालिकेच्या सेटवर भेट दिली, तेव्हा शिल्पा तुळसकरच होती तिथे....
मला वाटतं कालच्या एपिसोडमधे
मला वाटतं कालच्या एपिसोडमधे मोठ्या बाबाना अचानक एकदम छोटे करून टाकण्यात आलं. एका हुषार, शिकलेल्या मुलीला लग्नाबाबत सावध करणं, तिला पुन्हा विचार करायला सांगणं, समजण्यासारखं आहे; पण तडक "तुला एक संधी देतो ... तीन महिन्यात हें करून दाखव .... नाही तर घरच्यानी बहुमताने ठरवलेल्या अमेरिकेतल्या मुलाशी लग्न कर.. मला हरव .." !! छे:, अगदींच विसंगत वाटले वकील म्हणून जगाचा अनुभव गांठीशी असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या तोंडीं आजच्या जमान्यात असले विचार व असला नाटकी प्लान !!
भाऊ, पण मला आवडला कालचा भाग.
भाऊ, पण मला आवडला कालचा भाग. मस्त वाटले दोघांमधील संभाषण. असे वाटले प्रत्येक घरात असं कोणतरी पाहिजे.
भाऊकाका, अनुमोदन! किमान
भाऊकाका, अनुमोदन!
किमान त्यांनी इशाला जगरहाटी शिकवण्यासाठी हे सारं केलं असं तरी दाखवावं शेवटी!
भाऊ अनुमोदन. पण मालिका अशीही
भाऊ अनुमोदन. पण मालिका अशीही फार्सिकलच आहे ना?
प्रत्यक्ष जीवनात असं झालं तर कोणती मुलगी फेक फॅमिली अॅक्सेप्ट करेल?
तीन महिन्यात काय करुन
तीन महिन्यात काय करुन दाखवायला सांगतात ते? काल मी पाहिलं नाही.
कालचा एपिसोड मनापासून पटला
कालचा एपिसोड मनापासून पटला नाही.
मुळात इतके दिवस कथानक फार्सिकल रीतीने जात होतं तेव्हा इतकं खटकलं नाही. दरवेळेला ओमच्या आईवड्लांचा डिव्होर्स ही घटना इतक्या लाजिरवाणेपणाने का सांगितली जाते?
पण काल आजोबा (जो स्वतः निष्णात वकील आहे) नातीला काय सांगतो? रक्ताची नाती खरी, मानलेली नाती खोटी? आणि काल इशाच्या काकूला "ती तुझीपण मुलगी आहे" कशाच्या बेसिसवर सांगतो? काकूचं आणी इशाचं नातं रक्ताचं नाहीच ना? मग ते नातं मात्र खरं, आणि =ओमची नाती खोटी. आणि असलीच खोटी तर काय् बिघडतं? इशा लग्न ओमशी करणार आहे का त्या नातेवाईकांशी?
त्यातही परत ओम मध्ये आजोबांना काय प्रॉब्लेम आहे? एक लाईफ पार्टनर म्हणून त्याच्याक्डे वैगुण्य काढण्यासारखं काहीच नाही. शिकलेला आहे, कामामध्ये चांगला आहे, इशावर प्रेम करतो आणि निर्व्यसनी वगैरे आहे. (अधून मधून काफ्का वगैरेचे रेफरन्स देतो, अजून काय हवे? ) तरीपण त्याच्या आईवडलांचा डिव्होर्स झालेला आहे, या एकाच कारणामुळे त्याला असं रीजेक्ट करनं आणि तू त्याच्या खर्या नातेवाईकांना तीन महिन्यांत शोधून दाखव नाहीतर त्या यु एसच्या स्थळाशी लग्न कर हे सांगणं खूप खटकलं (ते यु एस चं स्थळ कन्याकुमारी दिसतंय. सीरीयल चालू झाल्यापासून इशाची वाट बघतंय!!)
कुणाच्या आईवडलांचा डिव्होर्स झालेला असणं हे काय एवढं अपमानास्पद अथवा चुकीचे आहे का? बरं, तो मुलगा व्यवस्थित. त्याच्यामध्ये काही खोट काढण्यासारखं नाही,. तरी दरवेळेला "आईवडलांचा डिव्होर्स" हे इतकं एकच तुणतुणं का वाजवरत आहेत? आणी ती इशा कसलं चॅलेंजघेते अईवडलांना परत आणाय्चं? हा ओम. मी याच्याशी लग्न करनार, त्याचे आईवडील आणि त्याचं कुटुंब याच्याशी माझा संबंध नाही, असं सांगू शकत नाही? वकिल आहे ना???
सॉरी, पण कालचा भाग फार विचित्र ट्रॅक्वर गेला.
<<पण काल आजोबा (जो स्वतः
<<पण काल आजोबा (जो स्वतः निष्णात वकील आहे) नातीला काय सांगतो? रक्ताची नाती खरी, मानलेली नाती खोटी? आणि काल इशाच्या काकूला "ती तुझीपण मुलगी आहे" कशाच्या बेसिसवर सांगतो? काकूचं आणी इशाचं नातं रक्ताचं नाहीच ना? मग ते नातं मात्र खरं, आणि =ओमची नाती खोटी. आणि असलीच खोटी तर काय् बिघडतं? इशा लग्न ओमशी करणार आहे का त्या नातेवाईकांशी? >> नंदिनी अगदी अगदी
काहीतरी कहानीमे ट्विस्ट पाहिजे ना म्हणून हे सगळ नाहीतर नायक नायिकेच साध सरळ सोप्प जमल तर मालिकाच संपेल ना ?
मला पण मीना नाईकचाच आवाज वाटला आणि शिल्पा तुळसकर उका च्या आईच्या भूमिकेत शोभणार पण नाही आत्ता तो मोठ्ठा दिसायला लागलाय लग्नाचा नायक म्हणून पण मीनाक्षी म्हणतेय ना शिल्पाच आहे म्हणून
मोठे बाबा आणि इशामधला डायलॉग
मोठे बाबा आणि इशामधला डायलॉग मी मिस केला. काय म्हणतात ते?
नंदिनी+१. ओके एक वेळ मान्य
नंदिनी+१. ओके एक वेळ मान्य केलं की लग्नाचा विषय निघाल्यावर भलेभलेही इल्लॊजिकल होतात. पण इशाचं जर ओमवर इतकं प्रेम आहे आणि ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही हे दोघांनाही पटलंय, तर अशा अटी आणि शर्ती मान्य का करायच्या? आमचा ओमही सर्वगुणसंपन्न आहेच की सरळ दोघं लग्न नाही करू शकत? फ़ार तर फ़ार मी मनापासून शोध घेईन त्यांना शोधायचा वगैरे ठीक आहे. लग्नच पणाला लावायची काय गरज? ज्या माणसावर आपण प्रेम करतो त्याच्या मनाला एखादा विषय काढल्यावर यातना होत असतील तर आपण तो टाळणार, का तोच उगाळत बसणार?
तीन महिने वै सिरियलचा फार्स. मोठ्या बाबांना मुळात ठाऊकच असणार की ओमिशा (अय्या ;)) एकत्र येणार, त्याचे आई-बाबाही येणार त्यांना आशीर्वाद द्यायला आणि प्रेमाचा विजय होणार वैवैवै
पूनम +१. मुळात ओमेशामध्ये
पूनम +१.
मुळात ओमेशामध्ये प्रॉब्लेम होता तोपर्यतं ओके. आता घरच्यांना शोधून आणते वगैरे कशाला? आणि कितीही कसलाही डिव्होर्स झालेले आईवडील असू देत, मुलाच्या लग्नासाठी येणार नाहीत का? मुलाला बोलायची इच्छा नसेल प्ण मुलीकडचे तर बोलवून घेऊ शकतात ना? सुनीताबाईंच्या आहे मनोहरमधेय त्यांच्या वडलांच्या लग्नादरम्यान कुणी नातेवाईक नसल्याने शोधाशोध मोहिम केली होती वगैरे मजेदार उल्लेख आहेत. म्हणजे मुलाचे नातेवाईक नसणं हे काही अगदीच टॅबू नव्हे. तरी इथे तो एवढा मोठा इशू का केला जातो. अमेरिकेत काम करणारा मराठी सायंटिस्ट *ज्याचे नाव माहित आहे!) असा शोधायला असा काय त्रास पडणार आहे???
या तो फार्सिकल रख्खो या फिर इमोशनल ड्रामा. दोन्ही करायला गेले की गडबड होतेय.
म्हणजे अजून तीनमहिने तरी काही
म्हणजे अजून तीनमहिने तरी काही ही सिरियल संपणार नाही.
मला आधी वाटलेलं की आजोबा तिची
मला आधी वाटलेलं की आजोबा तिची परिक्षा घेत असतील. आणि शेवटी म्हणतील की मी तुझी परिक्षा घेत होतो तू किती नीट वकिली करू शकतेस वगैरे. पण तसं काही झालंच नाही.
कालचा भाग नाहीच पटला.
म्हणजे अजून तीनमहिने तरी काही
म्हणजे अजून तीनमहिने तरी काही ही सिरियल संपणार नाही.
>> हो. आतल्या गोटातुन कळलंय कि मालिका जुन्/जुलै पर्यंत संपणार नाहीये. तसं काँट्रॅक्ट झालंय ऑलरेडी.
म्हणजे अजून तीनमहिने तरी काही
म्हणजे अजून तीनमहिने तरी काही ही सिरियल संपणार नाही << असं काही नसावं ... काल एका शिरेली मधे १ महिन्यनंतर, ३ महिन्यानंतर, ६ महिन्यानंतर असे भाग होते.
लेखकाला मधे पाणी ओतायला नाही मिळाले की....
गोगा तुमचं काहीही चाल्लेलं
गोगा तुमचं काहीही चाल्लेलं अस्तं
<< काल एका शिरेली मधे १
<< काल एका शिरेली मधे १ महिन्यनंतर, ३ महिन्यानंतर, ६ महिन्यानंतर असे भाग होते.>> पाणी घालायला १महिन्यापूर्वीं, ३ वर्षांपूर्वी असे आधीचेच एपिसोड 'फ्लॅशबॅक' म्हणून दाखवणं अधिक सोईचं व अगदींच स्वस्तही असतं !
आजच्या भागात आपलं म्हणणं लाडे लाडे ओमच्या गळीं उतरवण्याचा ईशाचा प्रयत्न 'स्पृह'णीय होता ! मोहन जोशी इतर शूटींग मधून आतां मोकळे झाले असावेत !
ईशाने ओमच्या आईबाबांना शोधून
ईशाने ओमच्या आईबाबांना शोधून आणून तरी काय उपयोग आहे ? त्याच्या बाबांचे दुसरे लग्न झालेय आणि अमेरिकेत त्यांचे दुसरे कुटुम्ब आहे ना. त्यामुळे लग्नाला आले तरी ते ओम ईशा बरोबर राहाणार नाहीतच.
ओमच्या आईबाबांना शोधून आणून
ओमच्या आईबाबांना शोधून आणून तरी काय उपयोग आहे ? <<< असले प्रश्न लेखकाच्या समोर यायला तीन महिने अवकाश आहे.. होईल काहीतरी...
खोटी फॅमिली दाखवुन खरे प्रेम
खोटी फॅमिली दाखवुन खरे प्रेम केले म्हणे ओमने? त्या इशाचा त्रागा बरोबरच होता. सहाजिकच इतकं मोठ खोटं कुठलीही मुलगी प्रेमात सहन करु शक्णार नाही. आणि आता काय तर डीवोर्स झालेल्या आईबाबाना एकत्र आणायचे?? काय गरज आहे?? ओमशी लग्न करायचय एवढं पुरेसं नाहीये का?? आणि कसल्या पांच्ट अटी घालतात. प्रेम आहे लग्न आहे की आट्यापाट्या चा खेळ.
एक गंमत- कालच्या एपिसोडमधे ओम
एक गंमत- कालच्या एपिसोडमधे ओम आपल्या आई-वडिलांचा विषय परत काढणार नाही असं वचन ईशाकडे मागतो. ईशाला ह्या पेंचातून सोडवायला नेमक्या त्याच वेळीं दत्ताभाऊंची एंट्री मोठ्या खुबीदारपणे दाखवण्यात आली. पण... फक्त ईशा व ओमच आंत असलेल्या खोलीचा ईशाने मुद्दाम बंद केलेला दरवाजा सरळ ढकलून दत्ताभाऊंची 'एंट्री ' दाखवणं हा कमालीचा औचित्यभंग मात्र घडून आला !
[ मला खरंच आवडते म्हणून ही एकच सिरीयल मीं कांहीशा नियमितपणे पहातों; कृपया केवळ चूका काढायला ती पहातों ,असा गैरसमज नसावा.]
भाऊ.
भाऊ.
ती ईशाची मैत्रीण कसली लाडे
ती ईशाची मैत्रीण कसली लाडे लाडे एखाद्या तीन- चार वर्षाच्या मुलाशी बोलल्या सारखा शोनू शोनू करत होती . चार वर्षाच्या मुलाला समजावल्या सारख " आत्ता आपल्याला लग्न करायचं कि नाही ? " काही पण
सुजा.... ती अश्विनी ओम आणि
सुजा....:)
ती अश्विनी ओम आणि ईशाला (ते दोघं 'उंदरे उदंड जाली' आळवत असताना) दरवाजा उघडल्यावर म्हणाली, "तुम्हाला समाजाची काही चाळ , काही लाज?" ......अरारारा...... चाड ऐवजी चाळ ?
' कल्याण करी रामराया '
तो उमेश चा खोटा बाप कसला
तो उमेश चा खोटा बाप कसला बोअर करतोय आणि आजकाल मराठी मालिकांमध्ये हे दारू चे प्रसंग जरा जास्तच दाखवायला लागलेत. काही सेन्सोर वगैरे आहे कि नाही.? तो म्याडम चा नवरा दारू ढोसून तमाशे करताना दाखवलाय . होणार सून मी मध्ये शरयूचा नवरा पण..काय चाललाय काय
<< दारू चे प्रसंग जरा जास्तच
<< दारू चे प्रसंग जरा जास्तच दाखवायला लागलेत......काय चाललाय काय >> पाणी घालून एपिसोड वाढवण्याऐवजी दारू घालून.... थोडंसं वेगळं, एवढंच ! शिवाय, 'डायलॉग' लिहायची पण गरज नाही; 'दहा-पंधरा मिनीटं कांहींतरी बरळा' म्हटलं कीं काम झालं !!
खरंय......हल्ली मालिकेत दारू
खरंय......हल्ली मालिकेत दारू पिण चुकीच नाहीये किव्हा मजेत राहण्याचं प्रतिक असल्यासारखं दाखवलं जात.....त्या शरयूच्या नवऱ्याला तर चामड्याच्या पट्ट्याने सोलून काढायला पाहिजे असं वाटायला लागतं..
९००
९००
Pages