बर्याच वेळा आपल्याला असे ऐकावाचायला मिळते, की मराठी शिकणाऱ्या किंवा बोलणाऱ्या माणसांचे प्रमाण घटत चालले आहे आणि आपली मराठी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मराठी माणसेच जिथे एकमेकांशी मराठी बोलत नाहीत, तिथे मराठीला विचारणार तरी कोण?
पण एक फार मोठा अमराठीभाषक लोकसमूह कामधंद्याच्या, शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात स्थायिक झालेला आहे आणि तो काही ना काही कारणास्तव मराठी भाषा आपलीशी करू पाहत आहे.
राणी मुखर्जी सिनेमासाठी मराठी शिकतेय, आमीर खानही खास शिक्षक नेमून मराठी शिकतोय, ही बातमी होते; पण ज्यांची मातृभाषा मराठी नाही, अशी प्रकाशझोतापासून दूर असलेली अनेकानेक माणसेदेखील मराठी शिकत आहेत. मराठी सिनेमा-नाटके बघताहेत. त्यांची मराठी शिकण्याची कारणे अनेक आणि काहीही असतील, पण महत्त्वाचे आहे की त्यांना मराठी शिकावेसे वाटत आहे.
आपल्या सर्वांच्या माहितीतदेखील अशी काही माणसे आली असतील, जी अमराठी असूनही त्यांना मराठी समजते, ती अस्खलित मराठी (आणि अगदी अस्खलित नाही, तरी कामचलाऊ संवाद साधण्याजोगे मराठी) बोलू शकतात. मला खात्री आहे अशी काही माणसे आपल्या संपर्कात असतीलच.
येणाऱ्या काळात, या लोकांचे मराठी टिकण्या-टिकवण्यासंदर्भात काय, कसे आणि किती योगदान असेल, हे काही सांगता यायचे नाही आणि तसे पाहता महाराष्ट्रात आलेल्या एकूण अमराठी माणसांच्या तुलनेत ही माणसे मूठभरच असतील, परंतु अशी मूठभर असलेली माणसे आपल्या अंगावर मूठभर मांस मात्र चढवून जातात. आणि त्यामुळेच त्यांची दखल आपण नाही घेणार तर कोण घेणार?
तर समस्त मायबोलीकरांनो, मराठी मातृभाषा नसलेल्या, पण मराठी शिकलेल्या, शिकणार्या, बोलणार्या व्यक्तींना यंदाच्या मराठी भाषा दिनाच्या उपक्रमात सहभागी करून घेऊया. आपण त्यांचाशी संवाद साधूया, त्यांची पार्श्वभूमी समजावून घेऊया.
हे कोण आहेत, मूळचे कुठले, कधी आले महाराष्ट्रात, त्यांना मराठी भाषेबद्द्ल काय वाटते, मराठी बोलायला कसे शिकले, कोणती चित्रपट-नाटकं त्यांनी बघितली, कोणती मराठी पुस्तके वाचली इत्यादी प्रश्न विचारायचे आणि हे सर्व लिखित स्वरूपात संयोजकांना पाठवायचे. आता ही भिन्न मातृभाषा असलेली मंडळी मराठी नक्की बोलतात कशी, याची उत्सुकताही आपल्याला असेलच. तर ’तुम्ही मराठी का शिकलात?’ किंवा ‘स्वतःच्या मातृभाषेशी तुलना करता मराठीमध्ये चांगले काय आढळले?’ यासारख्या आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या, कोणत्याही एकाच प्रश्नोत्तराचे ध्वनिमुद्रणही आम्हांला पाठवा. म्हणजे लिखित मुलाखतीबरोबर हे ध्वनिमुद्रणही जोडता येईल.
ही सगळी अमराठी माणसे मराठी का शिकत आहेत, काय वाचत आहेत, कसे बोलत आहेत हे आणि त्यायोगे आपल्या भाषेची सामर्थ्यस्थळे नक्की काय आहेत हेही या निमित्ताने आपल्याला कळेल.
नियम :
१. या लिखित-श्राव्य उपक्रमात केवळ मायबोलीकरांनाच भाग घेता येईल व प्रवेशिका पाठवताना मायबोलीचा आयडी नमूद करणे आवश्यक आहे.
२. या उपक्रमांतर्गत मायबोलीकरांनी एखाद्या अमराठी व्यक्तीची माहिती, त्या व्यक्तीची लिखित स्वरूपातील एक छोटीशी मुलाखत व आपल्यासाठी महत्वाच्या वाटणाऱ्या कोणत्याही एकाच प्रश्नोत्तराचे ध्वनिमुद्रण या स्वरूपात इथे पाठवणे अपेक्षित आहे.
३. लिखित मुलाखत व श्राव्य स्वरूपातले प्रश्नोत्तर अशी एकत्रित प्रवेशिका, संयोजकांना sanyojak@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल कराव्या. ई-मेल पाठवताना विषयात 'लाभले आम्हांस भाग्य – प्रवेशिका’ असे नमूद करावे.
४. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख, सोमवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०१४ असेल.
५. लिखित स्वरूपातल्या मुलाखतीसाठी किमान अथवा कमाल शब्द मर्यादा नाही. ध्वनिमुद्रणाच्या किमान कालावधीसाठी मर्यादा नाही, पण कमाल मर्यादा ५ मिनिटे आहे. या मर्यादेपेक्षा थोड्या जास्त कालावधीचे ध्वनिमुद्रण पाठवण्यास हरकत नाही. हे ध्वनिमुद्रण एमपी-३ प्रकारात असावे.
६. प्रवेशिका मराठी भाषा दिवस २०१४च्या तीन दिवसांच्या सत्रात संयोजकांतर्फे प्रकाशित केल्या जातील.
चला तर मग इतर भाषकांच्या मनामध्ये आपल्या मराठीचा शोध घेऊयात .....
अरे वा मस्त. आमच्या घरी बरेच
अरे वा मस्त. आमच्या घरी बरेच उमेदवार आहेत अमराठी असून तुटक /चांगले (दोन्ही प्रकारचे) मराठी बोलणारे.
हा खुप नाविन्यपूर्ण उपक्रम
हा खुप नाविन्यपूर्ण उपक्रम आहे.
Va! Mast upakram!
Va! Mast upakram!
नाविन्यपूर्ण व वाखाणण्याजोगा
नाविन्यपूर्ण व वाखाणण्याजोगा उपक्रम! प्रवेशिका वाचायची व ऐकायची आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.
एक शंका, हा उमेदवार कंपल्सरी
एक शंका, हा उमेदवार कंपल्सरी बाहेरुन आलेलाच पाहिजे का? म्हणजे मुंबईतीलच पण पंजाबी/मारवाडी समाजामधील ( का मग त्याच्या आजुबाजुचे वातावरण मराठी आहे म्हणुन येत असेल असे?) असेल तर चालणार का?
अरे वा! मस्त आयडिया ..
अरे वा! मस्त आयडिया ..
ज्यांची मातृभाषा मराठी नाही
ज्यांची मातृभाषा मराठी नाही अशा कोणत्याही व्यक्तीची मुलाखत चालेल.
ध्वनीमुद्रण कंपल्सरी आहे का?
ध्वनीमुद्रण कंपल्सरी आहे का? (माझ्या नात्यातल्या काही अमराठी व्यक्ती या शहरात रहात नाहीत. म्हणून विचारलं आहे.)
आणि एक आय डी किती व्यक्तींच्या बद्दल लिहू शकतो?
खूपच सुंदर विषय निवडला आहे.
खूपच सुंदर विषय निवडला आहे. अभिनंदन!
चांगला उपक्रम आहे. मी प्रयत्न
चांगला उपक्रम आहे. मी प्रयत्न करेन एखादी एंट्री देण्याचा.
ध्वनिमुद्रण पाठवलेच पाहिजे
ध्वनिमुद्रण पाठवलेच पाहिजे असे नाही. (कम्पल्सरी नाही).
एका आयडीला जास्तीत जास्त तीन व्यक्तींची मुलाखत पाठवता येईल,
धन्यवाद संयोजक. एखादी मुलाखत
धन्यवाद संयोजक.
एखादी मुलाखत फोनवरुन घेइन. नक्कीच भाग घेणार.
खूपच कल्पक उपक्रम आहे हा..
खूपच कल्पक उपक्रम आहे हा.. मस्त एकदम!
उपक्रम छान आहे. लिस्ट
उपक्रम छान आहे. लिस्ट डोळ्यासमोर आली मराठी बोलणार्या अमराठी माणसांची. संवाद साधण्यास योग्य वेळ मिळाला तर नक्कीच लिहीन.
व्वा, छान कल्पना आहे.
व्वा, छान कल्पना आहे.
ज्यांची मातृभाषा मराठी नाही
ज्यांची मातृभाषा मराठी नाही अशा कोणत्याही व्यक्तीची मुलाखत चालेल.<< माझी मुलाखत घ्या!
छान उपक्रम , शुभेच्छा
छान उपक्रम , शुभेच्छा
धन्यवाद संयोजक.... मला जाम
धन्यवाद संयोजक....
मला जाम आवडलेली आहे ही कल्पना. मी २ जणांची मुलाखत घेणार.
एकदम कल्पक उपक्रम !! नंदिनी
एकदम कल्पक उपक्रम !!
नंदिनी
संयोजक, नाविन्यपूर्ण
संयोजक, नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल अभिनंदन!
मस्त. एकदम कल्पक उपक्रम !!
मस्त. एकदम कल्पक उपक्रम !!
अशी व्यक्ती शोधायला हवी आता.
amaraathee lokaanchyaa
amaraathee lokaanchyaa maraatheet mulaakhatee. maazyaa maahiteetasuddhaa barech jan aahe maraathee bolanaaree amaraathee
एखाद्या पेस्तनकाकाची मुलाखत
एखाद्या पेस्तनकाकाची मुलाखत कोणी घेऊ शकेल काय ?
वरची इमेज एकदम झक्कास आहे!
वरची इमेज एकदम झक्कास आहे!
प्रवेशिका पाठविली आहे. खुपच
प्रवेशिका पाठविली आहे.
खुपच उत्सुकता आहे सगळ्यांच्या मुलाखती वाचण्याची.
मायबोलीकरांनो अजूनही आपली
मायबोलीकरांनो अजूनही आपली प्रवेशिका पाठवू शकता.
संयोजक, कधीपर्यंत मुदत वाढवली
संयोजक,
कधीपर्यंत मुदत वाढवली आहे?
धन्यवाद!
वत्सला आणि इतर मायबोलीकर,
वत्सला आणि इतर मायबोलीकर,
आपल्या प्रवेशिका आपण आमच्याकडे उद्यापर्यंत (२७ फेब्रुवारी) पाठवू शकता.
सर्व मायबोलीकरांना मराठी
सर्व मायबोलीकरांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!