'अनुमती' या चित्रपटाचा शुभारंभाचा खेळ शुक्रवार, १४ जून, २०१३ रोजी पुण्याच्या सिटिप्राइड कोथरूड चित्रपटगृहात संध्याकाळी साडेसात वाजता आयोजित केला आहे.
चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर या खेळाला उपस्थित राहणार आहेत.
मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या चित्रपटांच्या शुभारंभाच्या खेळांना मायबोलीकर उपस्थित असतात. त्याप्रमाणे 'अनुमती'च्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.
या खेळाची काही तिकिटं आपल्याकडे आहेत.
या खेळास उपस्थित राहू इच्छिणार्यांनी कृपया chinmay@maayboli.com या पत्त्यावर इमेल पाठवावी. इमेलीत कृपया आपला दूरध्वनी क्रमांकही कळवावा.
एका मायबोलीकराला एकच तिकीट मिळेल, याची कृपया नोंद घ्यावी.
या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहून नेहमीप्रमाणेच मायबोलीकर या खेळाबद्दल व चित्रपटाबद्दल भरभरून लिहितील, ही खात्री आहे.
मस्तच. इमेल पाठवली आहे.
मस्तच. इमेल पाठवली आहे.
यायला नक्की आवडेल ! बाकी
यायला नक्की आवडेल ! बाकी गोष्टी बघून इमेल करेन.
शुभारंभाच्या प्रयोगांना उपस्थित रहाण्याची संधी मायबोलीमुळे मिळते.. त्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद.
मुंबईत कधी शुभारंभाचे शो होत
मुंबईत कधी शुभारंभाचे शो होत नाहीत काय???
मीही इमेल पाठवली आहे
मीही इमेल पाठवली आहे
शुभारंभाच्या प्रयोगांना
शुभारंभाच्या प्रयोगांना उपस्थित रहाण्याची संधी मायबोलीमुळे मिळते.. त्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद. >> +१. उपस्थित राहायला आवडेल.
अगदी बघायचाच असे ठरवलेला असा
अगदी बघायचाच असे ठरवलेला असा चित्रपट शेवटी काल मला सिडीवर बघायला मिळाला. बघताना खुप त्रास झाला कारण विक्रम गोखलेला अशा लाचार भुमिकेत बघायची सवय नाही आणि त्याने पडद्यावर जे काही केलेय, त्याला अभिनय म्हणणे म्हणजे त्याचा अपमान आहे. खुप वेळा असे वाटले आपण थेट त्या काऊंटरवर जाऊन ताबडतोब पैसे भरावेत. आणि त्या दोघांना आपल्या घरी घेऊन यावे.. अप्रतिम चित्रपट.
एकदोन ठिकाणी जरा गफलत जाणवली.
१) मुलीला तो म्हणतो तुम्ही पहिल्या दिवशी आलात तेच खुप.. खरं तर मुलगी जावई त्यांना विमानतळावर सोडायला आलेलेच असतात. त्याचवेळी मधु कोसळते.
२) कोकणातल्या घराचा जो पहिला शॉट आहे त्यात झोपाळा आणि तुळशी वृंदावर दिसत नाही. तुळशी वृंदावन घराच्या समोरच असायला हवे.
३) गाडीतल्या गाण्याचा जो खिडकीबाहेरून जो शॉट घेतलाय त्यात मुलीच्या डफ वाजवण्याच्या हालचाली आणि आवाज यात गफलत आहे.
अगदी क्षुल्लक आहेत या गफलती.. चित्रपट खरोखरीच अप्रतिम. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी अवश्य पहावा.