प्रस्तावना-
भारतात बाहेर जेवायला गेलं की ड्रिन्क्स मिळणाऱ्या हाटिलांत दोन मेन्यूकार्डे असतात. एक खाण्याचं, एक पिण्याचं. मी ड्रिन्क्स घेत नसल्याने त्या पिण्याच्या कार्डातलं मला चालेल असं पेय म्हणजे दारुविरहित मॉकटेल्स. या मॉकटेलची किंमत शंभर-दोनशे काहीही असते- जवळजवळ मेन डिश इतकीच.
तरीही कधीतरी मॉकटेल घेतलं जातं आणि चव आवडली असली तरी ’अरे बापरे दीडशे रुपये या एका ग्लाससाठी’ हा विचार डोक्यातून हलत नसतो!
साहित्य
परवा फ्रिजमध्ये पनीरच्या भाजीत घालून उरलेलं थोडं हेवी क्रीम होतं. फिशकरीत घालून उरलेलं कोकोनट मिल्क होतं. तयार अननस ज्यूस होता.
कृती
तर Pina Colada (दारुविरहित) करण्यासाठी- पाईनॲपल ज्यूस आणि नारळाचं दूध समप्रमाणात घेतलं. त्यात थोडं क्रीम घातलं. मिश्रण काही सेकंद मिक्सरमधून फिरवलं. मग चव बघून थोडं आंबट वाटल्याने थोडी साखर घातली आणि पुन्हा फिरवलं. फ्रेश स्ट्रॉबेरीजनी गार्निश करुन टॉल ग्लासमध्ये सर्व्ह केलं.
तात्पर्य
दीडशे रुपयेवाल्या पेयाच्या जवळपास जाणारी चव येते तरी माझ्याकडे छत्रीवाला स्ट्रॉ नव्हता!
हाय काय नाय काय.
सोर्स
इंटरनेट (मूळ रेसिपीत दारु होती, पण मी घातली नाही अर्थात!)
टीप
पाईनॲपल ज्यूसचा आंबटपणा योग्य प्रमाणात क्रीम व साखर घालून घालवावा.
Disclaimer- मी मायबोलीत नवीन आहे आणि ही अतिशय बाळबोध सिंगल-स्टेप पाककृती असल्यामुळे ही ’रेसिपी’ म्हणून क्वालिफाय होते की नाही मला माहीत नाही
मूळ रेसिपीत दारु होती, पण मी
मूळ रेसिपीत दारु होती, पण मी घातली नाही अर्थात!
<<
निषेध!
(घेतली नाही म्हणून नव्हे, तर मालिबू सारख्या सेक्सी चवीच्या 'रम'ला दारू म्हणून हिणवल्याबद्दल)
पण पिनाकोलाडा मधे मालिबूच
पण पिनाकोलाडा मधे मालिबूच असते असं थोडीच आहे, इकाका? त्यांनी साध्या रम ला हिणवलं असेल
माझेही आवडते पेय. टिनमधला
माझेही आवडते पेय. टिनमधला अननस घेतला तर साखर घालावी लागत नाही.