नाटक म्हणजे मराठी संस्कृतीचं एक देदीप्यमान दालन! उज्ज्वल परंपरा लाभलेली मराठी रंगभूमी अनेक वर्षांपासून मराठी मनाला भुरळ घालत आली आहे. ऐतिहासिक, सामाजिक, अनुवादित, प्रायोगिक, बालनाट्य अशा अनेक प्रकारच्या नाटकांनी मराठी रंगभूमी समृद्ध आहे. या अथांग सागरातून काही मोती वेचून आपण पुढच्या पिढीची ओंजळ त्या मोत्यांनी भरून देऊया.
मराठी भाषा दिवस २०१४च्या निमित्ताने आम्ही घेऊन येत आहोत 'तिसरी घंटा'!
नियम :
१. केवळ मायबोलीकर आणि त्यांचे पाल्य (आणि या पाल्यांची मित्रमंडळी) यांना या श्राव्य कार्यक्रमात एकत्र भाग घेता येईल.
२. या उपक्रमासाठी प्रवेशिका पाठवताना मायबोलीचा आयडी आवश्यक आहे.
३. या उपक्रमांतर्गत मराठी नाटकातील एखादा प्रसंग, त्यातील संवाद दोन किंवा अधिक जणांनी बोलून तो जिवंत करायचा आहे आणि त्या संवादांचं ध्वनिमुद्रण आम्हांला पाठवायचं आहे.
४. या उपक्रमासाठी निवडलेले नाटक व उतारा यांची माहिती संयोजकांना दिनांक २० फेब्रुवारी, २०१४पर्यंत कृपया द्यावी.
५. ध्वनिमुद्रित केलेले संवाद संयोजकांकडे सोमवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०१४पर्यंत पोहोचले पाहिजेत.
६. ध्वनिमुद्रणाच्या कालावधीसाठी किमान मर्यादा नाही, पण कमाल मर्यादा ५ मिनिटे आहे. या मर्यादेपेक्षा थोड्या जास्त कालावधीचे ध्वनिमुद्रण पाठवण्यास हरकत नाही.
७. ध्वनिमुद्रण पाठवताना सोबत नाटकाचे नाव, नाटककाराचे नाव, स्वतःचा मायबोली आयडी, भाग घेणार्या पाल्यांची नावे आणि वय व ध्वनिमुद्रणाचा कालावधी हे तपशील नमूद करावेत.
८. प्रवेशिका मराठी भाषा दिवस २०१४च्या तीन दिवसांच्या सत्रात संयोजकांतर्फे प्रकाशित केल्या जातील.
९. एक आयडी जास्तीत जास्त ३ प्रवेशिका पाठवू शकतो.
प्रवेशिका कशी पाठवाल?
१. प्रवेशिका संयोजकांना sanyojak@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करणे अपेक्षित आहे.
२. ई-मेल पाठवताना 'तिसरी घंटा' असा विषय लिहावा.
विशेष सूचना :
ध्वनिमुद्रण पाठवताना प्रताधिकारांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी नाटकाच्या सादरीकरणाचे हक्क ज्यांच्याकडे आहेत, त्या व्यक्तीची (नाटककार किंवा प्रकाशक किंवा नाट्यसंस्था) आणि ते नाटक छापील स्वरूपात उपलब्ध असल्यास प्रकाशकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
मायबोलीकरांच्यी सोयीसाठी मायबोली प्रशासनाने काही नाटकांच्या (किंवा नाटकाप्रमाणे सादरीकरण होऊ शकेल, अशा लेखनाच्या) सादरीकरणाची परवानगी अगोदरच घेऊन ठेवली आहे.
हे नाटककार व त्यांची नाटके पुढीलप्रमाणे -
१. श्री. कुसुमाग्रज - प्रेम आणि मांजर, वीज म्हणाली धरतीला
२. श्री. रत्नाकर मतकरी - निम्मा शिम्मा राक्षस, अलबत्या गलबत्या
३. श्री. दिलीप प्रभावळकर - बोक्या सातबंडे (दहा भाग)
("'बोक्या सातबंडे'चा जन्म मुळात रेडिओसाठी झाला. त्यानंतर पुस्तकं आली, टीव्हीसाठी मालिका तयार केली,
मग चित्रपट आणि आता पुन्हा जगभरातली मुलं एकत्र येऊन ध्वनिमुद्रण करत आहेत. एका अर्थी चक्र पूर्ण झालं, याचा मला आनंद आहे. 'बोक्या'चं ध्वनिमुद्रण करताना पालकांनी आपला सहभाग कमीत कमी ठेवला आणि मुलांनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी एकत्र येऊन जास्तीत जास्त पात्रं उभी केली, तर मला जास्त आनंद होईल", असं परवानगी देताना श्री. प्रभावळकर म्हणाले.)
४. श्री. पु. ल देशपांडे यांच्या नाटकांच्या, एकपात्री प्रयोगांच्या सादरीकरणासाठी परवानगीची आवश्यकता नाही.
पुलंच्या नाटकांची यादी -
एकपात्री प्रयोग - बटाट्याची चाळ
नाटक - तुका म्हणे आता
अंमलदार (मूळ लेखक - निकोलाय गोगोल)
भाग्यवान
तुझे आहे तुजपाशी
सुंदर मी होणार
तीन पैशाचा तमाशा (मूळ लेखक -बेर्टोल्ट ब्रेश्ट्)
राजा ओयदिपौस (मूळ लेखक -सोफोक्लीझ)
ती फुलराणी (मूळ लेखक - जॉर्ज
बर्नार्ड शॉ)
एक झुंज वाऱ्याशी
वटवट
एकांकिकासंग्रह -
मोठे मासे आणि छोटे मासे
विठ्ठल तो आला आला
आम्ही लटिके ना बोलू
लोकनाट्य -
पुढारी पाहिजे
वाऱ्यावरची वरात
या यादीतील कोणतेही नाटक निवडून तुम्ही त्यातील निवडक भागाचे ध्वनिमुद्रण करू शकता.
मात्र ध्वनिमुद्रण करताना नाटकात कोणताही बदल करण्याची परवानगी लेखकांनी आणि प्रताधिकारधारकांनी दिलेली नाही. त्यामुळे नाटकातील संवादांमध्ये काटछाट, उतारे पुढेमागे करणे, प्रसंगांचा क्रम किंवा शब्द बदलणे अशा कुठल्याही संपादनास परवानगी नाही.
तसंच, या ध्वनिमुद्रणांसाठी असलेली परवानगी ही 'मराठी भाषा दिवस २०१४' व मायबोली.कॉम यांपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे ही ध्वनिमुद्रणं इतरत्र प्रकाशित करण्यास परवानगी नाही.
या यादीतील नाटकांव्यतिरिक्त इतर नाटकातील संवाद सादर करायचे असतील, तर कृपया तशी लेखी परवानगी घेऊन संयोजकांना पाठवावी. परवानगी मिळवण्यासाठी मायबोली प्रशासन सर्वतोपरी मदत करेल. त्यासाठी कृपया १७ फेब्रुवारीपर्यंत संयोजकांना कळवावे.
प्रताधिकारधारकाची परवानगी नसलेली ध्वनिमुद्रणं स्वीकारली जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.
आम्ही वाट पाहतोय हं तुमच्या संवादांची!
हा ही उपक्रम छान.
हा ही उपक्रम छान.
छान आहे उपक्रम
छान आहे उपक्रम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पोस्टर फारच गोड आहे..
पोस्टर फारच गोड आहे..
खरंच अगदी गोडुलं पोस्टर
खरंच अगदी गोडुलं पोस्टर आहे.
या उपक्रमामध्ये मी आणि माझा मुलगा अश्या दोघांनीच भाग घेतला तर चालेल ना?
मस्त उपक्रम आणि पोस्टरही
मस्त उपक्रम आणि पोस्टरही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख होईल हा उपक्रम!
सुरेख होईल हा उपक्रम!
मस्त उपक्रम, गोंडस पोस्टर!
मस्त उपक्रम, गोंडस पोस्टर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Are ha paN upakram chanach
Are ha paN upakram chanach hoNar!
वरील पैकी च नाटके सोडुन इतर
वरील पैकी च नाटके सोडुन इतर ना टक चालेल का?
फक्त मुलं आणि मोठ्ठे असंच
फक्त मुलं आणि मोठ्ठे असंच अपेक्षित आहे का? मोठ्ठी, मोठ्ठ्या किंवा एकत्र असं चालणार आहे ना?
छान उपक्रम आणि गोड पोस्टर!
छान उपक्रम आणि गोड पोस्टर!
पोस्टर खरच खुप गोड आहे पण ते
पोस्टर खरच खुप गोड आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण ते मला खुप मोठ्ठं दिसतय! समासाच्या बाहेर दिसतंय!
माझ्या ब्राऊझरचा दोष असावा बहुदा
मस्त!
मस्त!
उपक्रम आणि पोस्टर, दोन्ही फार
उपक्रम आणि पोस्टर, दोन्ही फार आवडलं.
ध्वनिमुद्रण किंवा संवाद
ध्वनिमुद्रण किंवा संवाद साधारण किती वेळाचे असले पाहिजेत?
मस्त उपक्रम.
मस्त उपक्रम.
वरील पैकी च नाटके सोडुन इतर
वरील पैकी च नाटके सोडुन इतर नाटक चालेल का?
उत्तर :
याचे उत्तर आधीच नियमांत आहे.
या यादीतील नाटकांव्यतिरिक्त इतर नाटकातील संवाद सादर करायचे असतील, तर कृपया तशी लेखी परवानगी घेऊन संयोजकांना पाठवावी. परवानगी मिळवण्यासाठी मायबोली प्रशासन सर्वतोपरी मदत करेल. त्यासाठी कृपया १७ फेब्रुवारीपर्यंत संयोजकांना कळवावे.
फक्त मुलं आणि मोठ्ठे असंच अपेक्षित आहे का? मोठ्ठी, मोठ्ठ्या किंवा एकत्र असं चालणार आहे ना?
उत्तर :
लहान मुलांना मराठी नाटकांशी जवळीक वाटावी / वाढावी म्हणून हा उपक्रम आहे. पण केवळ मोठ्यांनीच भाग घेतला तरीही हरकत नाही.
क्या बात है. मस्त उपक्रम.
क्या बात है. मस्त उपक्रम.
छान आहे हा उपक्रम. पोस्टर तर
छान आहे हा उपक्रम.
पोस्टर तर फारच आवडलं.
मस्त उपक्रम. मायबोली कर
मस्त उपक्रम.
मायबोली कर गायक/गायिकांनी मराठी नाट्यगीत म्हणून पाठवलेले चालणार आहे का?
(किंवा त्याचं इंस्ट्रुमेंटल व्हर्जन?)
छान उपक्रम.
छान उपक्रम.
छान उपक्रम.
छान उपक्रम.
सगळे मोठे हे माबो सदस्यच हवेत
सगळे मोठे हे माबो सदस्यच हवेत का?
आणि एका आयडी वरुन एकच
आणि एका आयडी वरुन एकच प्रवेशिका पाठविणे अपेक्षित आहे की एकापेक्षा अधिक चालतील.
उदा.
प्रवेशिका १- मी आणि माझा मुलगा
प्रवेशिका २- मी आणि अमाबोकर मैत्रिण
प्रवेशिक ३- मी आणि माझी माबोकर बहिण्/मैत्रीण
ध्वनीमुद्रण किती मिनीटांचं
ध्वनीमुद्रण किती मिनीटांचं असावं (किमान आणि कमाल मर्यादा) ?
अल्पना, <<६.
अल्पना,
<<६. ध्वनिमुद्रणाच्या कालावधीसाठी किमान मर्यादा नाही, पण कमाल मर्यादा ५ मिनिटे आहे. या मर्यादेपेक्षा थोड्या जास्त कालावधीचे ध्वनिमुद्रण पाठवण्यास हरकत नाही.>>
थँक्यु मंजू. मला आधी
थँक्यु मंजू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला आधी वाचल्यासारखं वाटत होतं, पण आज परत बघताना नेमका तो मुद्दा नजरेतून सुटला.
बघू आता, पोरगा मराठी पाठांतर किती करु शकेल यावर अवलंबून आहे भाग घेता येईल की नाही हे.
@ चैतन्य दीक्षित मायबोली कर
@ चैतन्य दीक्षित
मायबोली कर गायक/गायिकांनी मराठी नाट्यगीत म्हणून पाठवलेले चालणार आहे का?
(किंवा त्याचं इंस्ट्रुमेंटल व्हर्जन?)
>>> या उपक्रमात नाटकातील संवाद अपेक्षित आहेत. नाट्यगीत अथवा इंस्ट्रुमेंटल व्हर्जन स्विकारता येणार नाही. क्षमस्व.
***********************************************************************************************************
@ मुग्धानन्द
आणि एका आयडी वरुन एकच प्रवेशिका पाठविणे अपेक्षित आहे की एकापेक्षा अधिक चालतील.
उदा.
प्रवेशिका १- मी आणि माझा मुलगा
प्रवेशिका २- मी आणि अमाबोकर मैत्रिण
प्रवेशिक ३- मी आणि माझी माबोकर बहिण्/मैत्रीण
>>>>>> एक आयडी जास्तीत जास्त ३ प्रवेशिका पाठवू शकतो. (वर नियमांत हा नियम नव्हता. आता तिथेही लिहित आहोत. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.)
मात्र, मायबोलीचे उपक्रम मायबोलीकरांसाठी असतात. त्यामुळे भाग घेणार्या लहान मुलांव्यतिरीक्त इतर सर्वजण मायबोली सदस्य असणे आवश्यक आहे. ज्या (मोठ्या) व्यक्ती मायबोलीच्या सभासद नाहीत त्यांनी प्रथम मायबोलीचे सदस्यत्व घ्यावे आणि मग उपक्रमांत जरूर भाग घ्यावा.
धन्यवाद संयोजक.
धन्यवाद संयोजक.
धन्यवाद संयोजक, मैत्रीणीला ही
धन्यवाद संयोजक,
मैत्रीणीला ही सभासद करुन घेते.
Pages