गिरी ते खोदूनी अश्मखंड। प्रसन्नगडा मार्ग निर्मिला॥
डिसेंबर महिन्यात नाणेघाटात जाताना चावंड किल्याचे दर्शन झाले होते त्यातच मायबोलीकर सुज्ञ माणुस यांचा जीर्णनगरी मुशाफिरी : प्रसन्नगडाचे प्रसन्न दर्शन हा लेख वाचनात आला. एकीकडे मायबोलीकरांचा "सासामुमो"चा बेत शिजत होता पण २ दिवस सुट्टीचा प्रॉब्लेम असल्याने १८ जाने. ला एक दिवसाची चावंड किल्याची भटकंती निश्चित झाली. ऑफिसमध्ये विचारले असता अजुन तीन मित्र तयार झाले. सकाळी ६:३० ची कल्याण-जुन्नर एसटीने जुन्नर आणि तेथुन १०वाजताच्या जुन्नर-घाटघर गाडीने चावंड फाटा असा बेत ठरला. सकाळी इतर तिघांना पाच मिनिटे उशीर झाला आणि आमच्या समोरून ६:३०ची जुन्नर गाडी निघुन गेली (त्या दिवशी गाडी अगदी वेळेवर सुटली ;-)). चौकशी केली असता दुसरी गाडी पावणे आठला आहे असे समजल. तितक्यात ठाणे डेपोतुन आलेली "ठाणे-अहमदनगर" गाडी आली आणि त्यातुन "बनकर फाटा" आणि पुढे जुन्नर असे जायचे ठरले. ६:४०च्या दरम्यान गाडी निघाली. मुरबाडच्या १०-११ किमी आधी एके ठिकाणी गाडी थांबली पुढे पाहिले असता अजुन ५-६ गाड्या रांगेत उभ्या होत्या (त्यात कल्याण जुन्नर गाडीही होती ), आत्तापर्यंत एव्हढ्या वेळेस या रस्त्याने गेलो पण कधीच ट्राफिक लागलेल नव्हतं. खाली उतरून गेल्यावर समजलं कि नुकतंच तेथे बाईक आणि ट्रक यांचा अपघात झाला होता आणि बाईकस्वार जागच्या जागी गतप्राण झाला.
काहि वेळात पोलिस तेथे आले आणि पंचनामा करून साधारण पाऊण तासात रस्ता मोकळा केला. या सर्व प्रकारात १०ची जुन्नर-घाटघर गाडी चुकणार यांचा अंदाज आला, पण नाईलाज होता. या अपघातानंतर गाडीत, नववर्षाच्या सुरूवातीला "ठाणे-नगर" या एसटीला झालेल्या अपघाताची चर्चा सुरू झाली आणि योगायोग असा होता कि आम्ही ज्या गाडीत होतो ती तीच ठाणे डेपोतील, त्याच वेळेस जाणारी दुसरी गाडी होती. माळशेज घाटातुन जुन्नरकडे जाताना ३७ जणांचे बळी घेणार्या त्या एसटीचे अवशेष दिसत होते.
साधारण १०:३० च्या दरम्यान आम्ही जुन्नरला पोहचलो. चौकशी केली असता चावंड मार्गे जाणारी "जुन्नर-कुकडेश्वर" एसटी साडेअकराला होती. एका तासाने गाडी आली आणि आम्ही १२-१२:१५च्या दरम्यान चावंड फाट्यावर उतरलो. जुन्नरहुन चावंडला जाताना आणि परत येताना तीच गाडी होते. (रस्त्याची स्थिती आणि गाडीची अवस्था यामुळे अगदी शेजारी बसलेल्या मित्रांसोबत बोलण्याचे सारे प्रयत्न निष्फळ होत होते. फक्त आणि फक्त खडखडाट ) किल्याकडे जाणारी वाट विचारून घेतली. पुढे गेल्यावर हापश्याच्या इथे एक वाट चावंड गावात जाते आणि दुसरी वाट किल्यावर जाणार्या पायर्यांकडे जाते. तेथेच एका आंब्याच्या झाडाखाली बसलो सोबत आणलेला खाऊ खाल्ला आणि हापश्यातलं गार पाणी पिऊन साधारण १२:४५ ला भर उन्हात चावंड किल्ला चढायला सुरूवात केली.
नुकत्याच्य बांधकाम केलेल्य पायर्यांपासुन गडावर जाणारी वाट सुरू होते. या पायर्या संपल्यावर सोप्पासा रॉकपॅच पार केल्यावर रेलिंगची वाट सुरू होते. जुन्या रेलिंग काढून येथे नवीन रेलिंग लावलेल्या आहेत त्यामुळे त्यातील थ्रील कमी झाले आहे, पण ट्रेकर्स नसलेल्या लोकांनाही आता हा किल्ला पाहता येईल. पायथ्यापासुन किल्याचा माथा गाठायला साधारण एक तास पुरेसा आहे. सर्वात जास्त दमछाक होते ते शेवटच्या ५०-६० पायर्या चढताना. गडावर भरपूर पाण्यच्या टाक्या खोदलेल्या आढळतात. गडाचा घेरा मोठा असल्याने संपूर्ण गड ४-५ तासात पाहुन होतो.
किल्याविषयी:
इतिहासः
१) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामधे चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले.
२) दुसरा बुर्हाण निजामशाह (इ.स. १५९०-१५९४) हा सातवा निजाम. याचा नातु बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता.
३) १६३६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला, त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला.
४) मे १६७२ पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले.
५) या गडाची अनेक नावे अशाप्रकारे आहेत-चामुंड, चाऊंड, चावंड- ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेत. चुंड- हे निजामशाही आमदानीतील नाव आहे. प्रसन्नगड-हे शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव. मलिक अहमदने शिवनेरी जिंकल्यावर आपल्या एका सरदाराच्या हाती हा किल्ला दिला. या किल्ल्यातही भरपूर लुट त्याच्या हाती आली. जोंड किल्ल्याचीही व्यवस्था आपल्या एका सरदाराच्या हाती सोपवून त्याने लोहगडाकडे आपला मोर्चा वळवला. संदर्भ - अहमदनगरची निजामशाही मलिक अहमदच्या अधिकारापुढे नमूद केलेल्या किल्ल्यांच्या अधिकाऱ्यांनी मान झुकवली नव्हती. त्यांचा पाडाव करण्यासाठी त्याने कूच केले. ते किल्ले म्हणजे- चावंड, लोहगड, तुंग, कोआरी, तिकोणा, कोंढाणा, पुरंदर, भोरप, जीवधन, मुरंजन, महोली आणि पाली. हे सर्व किल्ले त्याने बळाचा वापर करून आपल्या ताब्यात घेतले. संदर्भ - गुलशने इब्राहिमी आदिलशाहच्या सैन्याशी लढताना इब्राहीम निजामशाहच्या मस्तकात गोळी लागून तो ठार झाला. निजामशाही वकील मिया मंजू याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले. त्याचवेळी त्यांने इब्राहीमच्या अल्पवयीन मुलाची म्हणजे बहादूरशाहची चावंडला बंदिवासासाठी रवानगी केली. चांदबीबी ही बहादूरशाहची आत्या. मिया मंजूने बहादूरशाहवर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले. पुढे निजामशाही गादीवर तोतया आहे हे सिद्ध झाले. निजामशाही सरदार इख्लासखान याने चावंड किल्ल्याच्या सुभेदाराला राजपुत्र बहादूर याला आपल्या हवाली करण्यास हुकुम पाठवला. या हुकुमाचे पालन मिया मंजू याच्या लेखी आज्ञेशिवाय होणार नाही असे सुभेदाराने कळवले. इख्लासखानाने तोतया बहादूरशहा निर्माण केला. मिया मंजूने अकबराचा राजपुत्र मुराद यास मदतीस बोलावले. मुराद अहमदनगरच्या किल्ल्यावर चालून आला. आता मिया मंजूला पश्चात्ताप झाला. त्याने अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सारखान व राज्यप्रतिनिधी म्हणून चांदबीबीला नेमले. मिया मंजू आदिलशाह व कुतुबशहा यांना मदतीस बोलावण्यास अहमदनगरच्या बाहेर पडला. चांदबीबीने याचा फायदा उठवीत त्याचा हस्तक अन्सारखान याचा खून करवला. आणि चावंडच्या अटकेतून बहादूरशाहची मुक्तता करत त्याची सुलतान म्हणून ग्वाही दिली.
किल्याविषयी अधिक माहिती इथे वाचा.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
चावंड गाव
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३किल्यावरी वास्तुंचे अवशेष आणि पुष्करणी
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७सप्तकुंडे
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०गडावरून दिसणारी सह्याद्रीची श्रीमंती
प्रचि २१निमगिरी किल्ला
प्रचि २२किल्ले निमगिरी झूम्म करून
प्रचि २३किल्ले हडसर झूम्म करून
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
(प्रचि १ आणि प्रचि ३१ पहा दोन्ही गाड्यांचे नंबर आणि डेस्टिनेशन बोर्ड.)
मस्तच. जिप्सी, ९ व्या
मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी, ९ व्या प्रचिमध्ये प्रवेशद्वारावर कसले चिन्ह आहे?
चांवडच्या जवळचे कुकडेश्वराचे
चांवडच्या जवळचे कुकडेश्वराचे मंदीर नाही पाहीले का...
आणि चांवडला जायला अजून एक रस्ता म्हणजे हडसर निमगिरी करून, लॉंचने माणिकडोह बॅकवॉटर पार करायचे आणि आपण चावंडच्या मागच्या बाजूला उतरतो आणि तिथून वळसा घालून मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचा....
मस्त लेख. प्र चि २६ झक्कास
मस्त लेख. प्र चि २६ झक्कास आहे.
सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला >>> मलिक अंबर नाव असावं.
जिप्सी, परत एकदा मनोहारी
जिप्सी, परत एकदा मनोहारी प्रचि! तिसरे खासकरून आवडले. असा सज्जा (ओव्हरहँग) सहसा दिसत नाही. आणि दिसला तरी क्यामेरात पकडणे अवघड!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आ.न.,
-गा.पै.
मस्त!
मस्त!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मामी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी, ते चिन्ह "गणपती" आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![](https://lh6.googleusercontent.com/-7Lf_JCyGAj8/Uve2GHsKJPI/AAAAAAAAMjY/4Fzq5IAmIM8/s640/IMG_6155.jpg)
हा अजुन एक फोटो:
चांवडच्या जवळचे कुकडेश्वराचे मंदीर नाही पाहीले का...>>>>आशु, नाही रे. वेळ कमी होता आणि हा सारा परिसर फिरायचा म्हणजे स्वतःची गाडीच पाहिजे. दुर्ग ढाकोबा करायचा आहे. बघु त्यावेळेस जमलं तर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलिक अंबर नाव असावं.>>>>राजेश, काहि माहिती नाही रे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
गापै, देवकी धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी, ते चिन्ह "गणपती" आहे.
मामी, ते चिन्ह "गणपती" आहे. >>> ओके. म्हणजे मूळ किल्ला कोणी बांधला होता? कोणा हिंदू सरदारानं बांधला असणार.
मुरुडजंजिर्याच्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर सिद्दी राजांचे प्रतिक म्हणून एक सिंह आहे.
मस्त.. २८ / २९ मधला पण्यात
मस्त.. २८ / २९ मधला पण्यात घुसलेला गोलाकार भाग आहे ना, तिथे मला रहायला आवडेल. कायमचं !
सुंदर!
सुंदर!
मस्त!
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेश., >> पण्यात घुसलेला
दिनेश.,
>> पण्यात घुसलेला गोलाकार भाग आहे ना, तिथे मला रहायला आवडेल. कायमचं !
मग तुम्ही मुंबईत आलात की इथे जाऊन बघाच एकदा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आ.न.,
-गा.पै.
मस्त प्रचि... आम्ही गेलेलो
मस्त प्रचि...
आम्ही गेलेलो तेव्हा डोक्याएवढ गवत होत, खुप फिरलो पण ते सप्तकुंड सापडलच नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
खुप फिरलो पण ते सप्तकुंड
खुप फिरलो पण ते सप्तकुंड सापडलच नाही>>>>आबासाहेब, आम्हीही मॅप घेऊन जायला विसरलो होतो. त्यामुळे बरीच शोधाशोध केल्यावरही हे सप्तकुंड सापडत नव्हंत (संपूर्ण गडाला फेरी मारूनही) शेवटी ते न बघताच परतण्याचा निर्णय घेऊन पुन्हा मुख्य दरवाज्याजवळ आलो पण सप्तकुंड न पाहता परत फिरणं पटत नव्हंत म्हणुन पुन्हा एकदा शोध घेतला. पुष्करणीच्या अगदी समोर दगडांच्या समोरच हे सप्तकुंड दिसलं (आधी याच वाटेवरून गेलो होतो
). चामुंडा देवीच्या मंदिराजवळुन (उंच टेकाडावरून) सप्तकुंड दिसतं. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच हा सारा परिसर फिरायचा
छानच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा सारा परिसर फिरायचा म्हणजे स्वतःची गाडीच पाहिजे>> स्वतःच्या गाडीने देखील हाडं खिळखिळी होतातच.
रस्ताच एवढा भारीये की दुसरा गीयर तिसरा गीयरवरच चारचाकी चालते.
यश्टीवाले दणादणा पळवतात. छोटी कार पळवणे = गाडीच्या बॉटमला डँमेज
रस्ता असा असुनही अंजनावळेला जाणार्या गाड्या तशा बर्याच आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हॅटस ऑफ टु यश्टी
हा सारा परिसर फिरायचा म्हणजे
हा सारा परिसर फिरायचा म्हणजे स्वतःची गाडीच पाहिजे>> स्वतःच्या गाडीने देखील हाडं खिळखिळी होतातच.>>>>हो ते ही खरंय
मला म्हणायचे होते कि वेळ वाचतो आणि दोन-चार ठिकाणं जास्त पाहुन होतात म्हणुन स्वतःची गाडी पाहिजे. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रे
मस्त रे
मस्त रे.फोटोज् आणि वर्णन
मस्त रे.फोटोज् आणि वर्णन दोन्हिही.
पहिला फोटो विशेष आवडला.
मस्त मस्त फोटो! रेलिंग तर
मस्त मस्त फोटो! रेलिंग तर छानच दिसतेय.
<<पण्यात घुसलेला गोलाकार भाग आहे ना, तिथे मला रहायला आवडेल. कायमचं !<
अगदी अगदी दिनेशदा! तो फोटो पाहिल्यावर पहिल्यांदा हेच मनात येतं.
तसच प्रचि १२ मधलं उजवीकडे एकटं दिसणार घर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच, वर्णन आणि प्रचि.
मस्तच, वर्णन आणि प्रचि. सप्तकुंड छान आहेत.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
खिळखिळ्या प्रवासातूनच असे सुंदर प्रचि खिलतात
जिप्सी.. मस्त रे... गडावरून
जिप्सी.. मस्त रे...
गडावरून दिसणारी सह्याद्रीची श्रीमंती >> हा कुकडेश्वर समोरील डोंगर असावा. जेथुन फोटो घेतला आहे त्या खाली चावंड गाव होते का?
सुंदर फ़ोटो! पाणी पाहून तर थंड
सुंदर फ़ोटो! पाणी पाहून तर थंड थंड वाटलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अफलातून फ़ोटोग्राफ़ी
गडावरून दिसणारी सह्याद्रीची
गडावरून दिसणारी सह्याद्रीची श्रीमंती >> हा कुकडेश्वर समोरील डोंगर असावा. जेथुन फोटो घेतला आहे त्या खाली चावंड गाव होते का?
इंद्रा....चावंड गाव हा फोटो काढताना डावीकडे राहतं. हा जीवधनच्या मागचा डोंगर आहे. याच्या पायथ्यातून घाटघरचा रस्ता जातो. समोरच्या डोंगराचा आकार शिवलिंगाप्रमाणे असल्याने शंभूचा डोंगर म्हणतात. मागे कुकडी नदीच्या उगमाचा डोंगर आणि उजवीकडे व-हाडाची रांग उर्फ भोरांडयाचे दार. सगळ्यात पहिल्या प्रचि मध्ये डावीकडे कोप-यात धाकोबा शिखर आहे.
अप्रतिम
अप्रतिम
छान जागा आहे. पण खिळखिळ्या
छान जागा आहे. पण खिळखिळ्या प्रवासातूनच जाणे जमणार नाही. मोशन सिकनेस..
जिप्सी, सप्तकुंडाचा इतिहास माहितेका?
धन्यवाद ओंकार
धन्यवाद ओंकार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच भटकंती
मस्तच भटकंती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)