जो पर्यंत सगळे आपले रंगसामान गोळा करतायत तो पर्यंत आपण जलरंगासाठी आवश्यक तेव्हढ्या रेखांकनाचा विचार करुया.
जलरंगात येखादे लँडस्केप करायचे म्हटले तर त्याची साधारण प्रक्रिया खालिल टप्प्यात मांडता येईल
१. पेंटींग चा स्पॉट किंवा रेफरंस फोटो नक्की करणे. जर आपण स्पॉट वर पेंटींग करणार असू तर त्यावेळ्चा प्रकाश, आपली आवड्/निवड, बसायला साऊली /आडोसा या वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण स्पॉट निवडतो, फोटोवरुन पेंटींग करताना आपल्या वेगवेगळ्या फोटोंमधुन आपण आपल्याला आवडेल तो फोटो निवडतो
मात्र पेंटींग साठी कोणते पेपरचे कोणते ओरिएन्टेशन योग्य ठरेल ते ठरवणे महत्वाचे
म्हणजे या प्रक्रियेची दुसरी पायरी म्हणजे ओरिएन्टेशन ठरवणे
२.ओरिएन्टेशन - आपला इम्पीरिअल साईझ पेपर असतो २०x३० इंचांचा म्हणजे त्याचा आस्पेक्ट रेशो २:३
या पेपरचे समान भाग करत राहिलो तर १५x20 ( हाफ साईज), 10x१५ (क्वार्टर साईझ ), ७.५ x10 (पोस्टकार्ड साईझ?) अशा वेगवेगळ्या साईझेस मिळतील . या सग्ळ्या साईझेस मधे आस्पेक्ट रेशो साधारण २:३ राहतो.
जर आपण पेपर उभा म्हणजे यातली लांब बाजु उभी आणि छोटि बाजु आडवी पकडली तर आपल्या पेपर चे ओरिएन्टेशन हे पोर्टेट ओरिएन्टेशन आणि त्याउलट जर लांब बाजु आडवी धरली तर ते लँडस्केप ओरिएन्टेशन
आपण सारे जग लँड्स्केप ओरिएन्टेशनमधेच बघतो त्यामुळे टीवी, सिनेमा , रंगमंच, कॉम्प्युटर स्क्रिन या सगळ्या दृष्यमाध्यमांचे ओरिएन्टेशन हे लँडस्केपच असते. आणि बहुतेक लँडस्केपसाठी हे जास्तीत जास्त वापरले जाणारे ओरिएन्टेशन , त्यातुन मोठाले जलायश, मासेस उत्तम दाखवता येतात.
लँड्स्केप ओरिएन्टेशनमधले एक पेंटींग
पोर्टेट ओरिएन्टेशन हे बरेचदा क्लोजअप्स किंवा एखाद्या गोष्टीची उंची अधोरेखीत करायची असेल तर वापरतात.
उदा. जर राजाबाई टॉवर चे पेंटींग करायचे असेल , किंवा एखाद्या दरवाजाचे क्लोजप करायचे असेल तर लँडस्केप ओरिएन्टेशन पेक्षा पोर्टेट ओरिएन्टेशन जास्त योग्य ठरेल.
लोकमान्य टिळकांचे जेथे निधन खाले ती सरदारगृह ही वास्तू खरे तर आडवी बिल्डींग आहे मात्र त्याचे पेंटीन्ग करतानामी मुद्दामहुन पोर्ट्रेट फॉर्म्याट निवडला आणि त्या वास्तूचा मधला भाग हायलाईट केला
याशिवाय पॅनोरॉमीक , स्क्वेअर असे फॉर्म्याट्स गरजेनुसार वापरले जातात. उदा. मुंबईच्या सिलींक चे पेंटींग करायचे झाले तर पॅनोरामा मधे जास्त खुलुन दिसेल . स्क्वेअर फॉर्म्याट हा थोडा डीझाईन कदे झुकतो म्हणुन अगदी सिमीट्रिकल पेंटींग , किंवा थोडी शॉक व्हॅल्यू म्हणुन याचा वापर करता येतो.
बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान करताना काय ओरिएन्टेशन ठेवावे ते नक्की होत नव्हते , म्हणुन स्क्वेअर फॉर्म्याट वापरून थोडा वेगळा परीणाम साधायचा प्रयत्न केला.
३.ओरिएन्टेशन नक्की केले की चित्र रेखाटुन घ्यावे लागते . त्यात खालिल गोष्टींचा विचार करावा लागतो
अ) क्षितीज रेषा अर्थात eye level / horizon line
समजा मी सहा फुट उंच आहे (आहेच )आणि उभा राहुन सरळ पुढे बगहतोय तर साधारण पावणे सहा फुट उंची वर माझी eye level / horizon line येईल, जर जमीनवर बसलो तर तिन्/चार फूटांवर ही horizon line येईल, उंच बिल्डींग वरुन मी खाली बघीतले तर किंवा जमीनीवरून वर बघीतले तर ही horizon line बदलेल. हि येक कालपनीक रेषा असली तरी चित्र कंपोझ करताना फार म्हत्वाची असते ( प्रत्यक्ष क्षितीज आणि क्षितीज रेषा यात गल्लत करु नका आपण कोणत्या कोनातुन बघतो याप्रमाने क्षितीज रेषा बदलते तर क्षितीज नाही)
आपल्या चित्रात क्षितीज रेषा मध्य भागाच्या वर किंवा , खाली पकडावी , अगदी मध्यभागी पकडली तर चित्र खुप सेंटर होईल जे कंपोजिशन योग्य समजले जात नाही ( अपवाद स्केअए फॉर्मॅट, इथे horizon line मध्यभागी चालुन जाईल ) , इथे मी rule of thirds बद्दल लिहणार नाही मात्र तो येक महत्वाचा कंपोझिशन चा नियम आहे , त्यावर इतरत्र भरपुर माहिती खास करुन फोटोग्राफी साईट्स्वर म्हणुन लिहायचे टाळतोय मात्र सर्च करुन येकदा वाचुन घ्या.
ब) चित्रातले घटक : स्केच करताना मुख्यता दोन प्रकारचे घटक लक्षात घ्यावे लागतात
१) रेषीय घटक Linear objects उदा: रस्ता , पर्वत रांग , झाडांची रांग इलेक्ट्रीक पोल ची रांग ई. या घटकांबरोबर आपली नजर चित्रात फिरत राहते. म्हणुन त्यांचा त्या दृष्टीने विचार करावा लागतो
२.मासेस (masses)/आकार , यात घर, बिल्डींग , झाड, फिगर्स इ< मोडतात. जर Linear objects बरोबर आपली नजर फिरत असेल तर मासेस जवळ आपली नजर थांबते , त्यामुळे आपली चित्रातली नजर मधेच कुठे अडखळुन थांबेल अशा ठीकाणी ते घटक न काढता जिथे लाईन्स मिळतात तेथे , किंवा रुल ऑफ थर्ड प्रमाणे जिथे इटरेस्टींग पॉईन्ट येतात त्या ठीकाणी हे घटक काढावेत
क) चित्राचे सुलभी करण (simlification) : आपल्या स्पॉटवर किंवा फोटोत खुप सार्या गोष्टी असतात त्यात आपल्या स्बजेक्ट ला पुरक अशा गोष्टी घेऊन बाकिच्या गोष्टी काढुन टाकाव्या लागतात. अन्यथा चित्र सुंदर होण्यापेक्षा गिचमीड होईल. वॉटरकलर च्या पेंसिल स्केच मधे आपण शेडींग करीत नाही त्यामुळे चित्रातले भौमितीक आकार शोधुन त्या आउट्लाइन किंवा हवे तेव्हढेच रेखांकन करुन घ्या वे लागते
या प्रकाशचित्रात पेंटींग साठी आवश्यक ते सग्ळे घटक आहेत, सुंदर कॉन्ट्रास्ट आहे मात्र खुप अनावश्यक घटक आहेत
त्याचे सुलभी करण करताना पहील्यांदा eye level निश्चीत केली .घराचे कुंपण आणि झाडाखालचे लाकडाचे ओंडके खुप क्लटरींग वाट्ल्याने रेखाटले नाहित. त्या ऐवजी फक्त उभ्या लाकडी पोलेचे कुंपण काढले. डावीकड्चे झाड कंपोझिशनला मारक वटल्याने ते काढुन टाकले.
उज्वीकडच्या झाडाची जागा रुल ऑफ थर्ड प्रमाणे निश्चीत केली, झाडचे फॉलियेज मुद्दाम घराच्या छपरावर थोडे ओवरलॅप केले त्यामुळे रंगवल्यावर येक खोली (depth) साधली जाईल
मात्र उजवीकडच्या झाडाला बॅलंस करायला घरा मागे थोडी छोटी झाडं काढली. कपड्यांच्या दोर्या काढल्या नसल्या तरी त्या काढुन सुंदर लिनिअर ओब्जेक्ट काढता येईल.
या चित्रात कुठलेही डीटेल्स नाहित, फक्त काही रेषा आणि भौमीतीक आकार वापरुन स्केच केलेय
हेच चित्र जर पोर्ट्रेट ओरियेंटेशन मधे काढले तर झाड उंच काढावे लागेल आणि घरापेक्षा झाडाला प्राधान्य देता येईल
nOte: रेखांकन करताना परस्पेक्टीव्ह, रिपीटेशन, चित्र घट्कांचा बॅलंस यांचा विचार करावा लागतो. यातील पर्स्पेक्टिव्ह बद्दल इथे http://www.artyfactory.com/perspective_drawing/perspective_index.html चांगली माहिती आहे. बाकिच्या घट्कांबद्दल थीअरी लिहण्यापेक्षा आपण सरावात त्याचा आढावा घेऊ
या चित्रात रेषा मुद्दाम डार्क केल्यात , प्रत्यक्षात चित्र हलक्या हातने रेखाटावे
४. आपले वॉशेस आणि रंग प्लॅन करणे. वॉटरकलर हे ट्रान्स्परन्ट माध्यम असल्याने खुप जास्त वेळा येकाच भागवर रंग लावले तर चित्र बिघडते, तसेच बाकिच्या ओपेक माध्यमांप्रमाणे यात चुका सुधाराअयला फारसा वाव नसतो. म्हणुन साधारणपणे तीन वॉशेस च्या स्टेजेस मधे चित्र संपायला हवे . म्हणुन हे प्लॅन करणे खुप महत्वाचे आहे. आणि ठरलेल्या प्लॅन प्रमाणे रंगवणे हे तितकेच महत्वाचे हे आपण पुढल्या भागात बघु . तो पर्यंत सगळ्यांच्या सामानाची जुळवाजुळव झाली असेल.
तो पर्यंत प्रत्येकाने कंमित कमी दोन फोटो निवडुन त्याचे सुलभीकरण करुन त्याचे लाईन ड्रॉईंग करुन इथे पोस्ट करावे. त्याच्यावर आपण डिस्कशन करुया.
या मालिकेचे बाकिचे लेख
जलरंग तोंडओळख , तयारी http://www.maayboli.com/node/47445
लेख तिसरा- बेसिक वॉशेस http://www.maayboli.com/node/47609
लेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल.http://www.maayboli.com/node/47815
पुर्वा आणि यशस्विनीचं बघून
पुर्वा आणि यशस्विनीचं बघून मला आत्ता लंच अवर मध्येच चित्र काढायची सुरसुरी आली. घेतला फोटोकॉपी पेपर आणि काढलं.
लय भारी
लय भारी
अरे व्वा, यशस्विनी, पूर्वा..
अरे व्वा, यशस्विनी, पूर्वा.. मस्तच
[कोरड्या ठाक्क स्वरात = मी हापिसात मधेच पेपर काढून रेखाटायचा प्रयत्न कर्तोय, अन पुन्हा लपवुन ठेवतोय गठ्ठ्या खाली कागद ]
फार म्हणजे फारच सुरेख
फार म्हणजे फारच सुरेख लिहिलंयस अजय. किती सुरेख बारकावे दाखवले आहेत.
पुणे विद्यापीठाच्या फोटोच्या स्केचमधल्या लाईन्स, आय लेव्हल वगैरे वाचून भन्नाट वाटलंय. अगदी कागद उभा धरावा की आडवा की चौरस आकाराचा निवडावा याच्याबद्दलची टिप्पणी तर फारच उपयोगी.
केवळ महान! आता आम्ही काय दिवे लावतो ते बघून घाबरू नकोस म्हणजे झालं.
अजय, एक चित्र काढण्या मागे
अजय,
एक चित्र काढण्या मागे इतकी प्रोसेस असते हे माहितच नव्हते. अतिशय डिटेल प्रोसेस लिहिल्याबद्दल धन्यवाद.
परत परत वाचतेय सगळे!! रेखांकन
परत परत वाचतेय सगळे!!
रेखांकन साध्या ड्रॉईंग पेपरवर काढले तर चालेल का प्रॅक्टिससाठी..?
असं खाडाखोड न करता एकाच फटक्यात नाही आलं नीट तर?
आत्तापर्यंत आलेली स्केचेस
आत्तापर्यंत आलेली स्केचेस चांगली आहेत
)

अजुन काही स्केचेस येतील
मी पोस्ट केलेला हा फोटो पाहु . हा फोटो one point perspective चे उदाहरण आहे . जे आपल्याला समांतर आहे ते प्रतल सोडले तर बाकी सगळी planes रस्त्या जिथे मिळाल्याचा आभास होतोय तिथे मिळतील. one point perspective हा असे रस्ते , गल्ल्या , रेल्वे रुळ यांच्या मधे उभा राहुन जर फोटो /स्केच काढला तर लक्षात येईल ( अर्थात रस्त्याच्या किंवा रेल्वे रुळांमधे उभे राहुन आपला जीव धोक्यात घालायची गरज नाही , या पर्स्पेक्टीव्ह मधले अनेक फोटो उपल्बध असतील
रस्त्याच्या डावी कडे एक आणि उजवी कडे तीन घरं आहेत. त्यामुळे दोन्ही बाजु बॅलंस झाल्या आहेत . कारण डावी कडच्या एका घराने व्यापलेल्या जागे इतकाच साधारण भाग उजवी कडच्या तिन घरानी व्यापला आहे. जर दोन्ही बाजुला एक एक घर असते आणि ते जरी समान आकाराची अस्ती तरी फोटो बॅलंस असता मात्र खुप एकसुरी वाटला असता. म्हणजे तराजुच्या दोन्ही पारडयात १ किलोचे वजन टाकायचे की येका पारड्यात १किलो आणि दुसर्या पारडयात २००gm . 300 gm , 500 gm अशी वजन टाकुन बॅलंस करायचे हा फरक. टू डायमेंशनल डीझाइन च्या गाईड्लाईन प्रमाणे विषम संख्यांचा समुह जास्त आकर्षक दिसतो म्हणुन तिन घरं चांगली दिसतील, त्या दृष्टीने हा फोटो योग्य आहे. डावी कडचे झाड येकंदर फोटोला ओव्हरपॉवर करतेय त्याचा आकार कमी करता येईल
तसेच पुढचा विजेचा खांब आणि त्याच्या आडव्या तारा या मारक वाटतात. डाव्या कोपर्यातले पॉलिथीन्,कचरा हे काही व्हॅल्यु अॅड करत नाही
याशीवाय त्या गावच्या वातावरणात कार एक ऑड गोष्ट वाटते ती टाळू शकतो . उदा इथे फिगर्स टाकयच्या झाल्या तर नववारी /पाचवारीतील बाई मीडी/मीनीतल्या बाईपेक्षा जास्त शोभुन दिसेल
यात चूक बरोबर असे काही नाही , मात्र फोटो काढताना आपण ज्या गोष्टी टाळु शकत नाही किंवा ज्याची भर घालू शकत नाही त्या करुन आपली रचना अधीक सुंदर करायचे स्वातंत्र्य आप्ण चित्रकार म्हणुन घेउ शकतो
याच जागेचे मी केलेले स्केच खाली टाकतोय
कार/पुढची मुलं मी काढली नाहित, त्यामुळे चित्र सुटसुटीत दिसते.
येक बैल अॅड करुन गावाचे वातावर तयार केले.
ऊजवी कडचे आकाश खुप मोकळे वाटत होते तीथे एक अजुन इलेक्ट्रीक पोल अॅड केला मात्र one point पर्स्पेक्टिव्हला बाधा येणार नाही हे बघीतले
डावी़कडच्या घरांचा पायांचे डावे कोपरे जरी मुळ फोटोत दिसत नसले तरी one point पर्स्पेक्टिव्ह प्रमाणे अलाईन करुन तिन लेव्हल तयार केल्या. त्यामुळे चित्र खुप फ्लॅट वाटणार नाही.
उजव्या कोपर्यात येक फांदी आहे , ते जास्त करुन फोटोग्राफी येलिमेंट्/फिचर म्हणुन वापरतात , मी ते चित्रात टाळतो. येकसुरी पणा टाळण्या साठी कौलाच्या रेषा, कॅनोपीची टोक थोडी जास्त वाकडीतीकडी केली घरांचे वासे निट ड्रॉ केले.
वर लिहल्याप्रमाणे चित्रात मुळ फोटोला अगदीच बाधा येणार नाही असे बदल करता येतात आणि ते प्रत्येक चित्रकाराच्या पद्धती वर अवलंबुन असते.
पूर्वा - स्केच व्यवस्थीत आहे,
पूर्वा - स्केच व्यवस्थीत आहे, कार ,पुढचा पोल टाळलेत ते छान , पर्स्पेक्टिव्ह कडे थोडे लक्ष द्यावे लागेल
यशस्विनी - क्लिन लाइन्स आल्यात , सुंदर मात्र मी वर लिहलेल्या काही गोष्टी टाळता येतील तर बघा. रंगवलेल्या चित्राबद्दल आप्ण नंतर बोलू मात्र प्रत्येक माध्यमाचे एक वैषिष्ठ्य असते ते वापरले तर अधीक चांगले. आपण हेच चित्र काही आठवड्यानी रंगउ त्यावेळेला अधिक
Anvita - चांगले आहे मात्र eye leve अगदी मध्यावर आलेय ती या चित्रात खाली यायला हवी
अश्विनी के - वरच्या काही सुचना+ रेषा तुटक न काढता , येका स्ट्रोक मधे संपवायचा प्रयत्न करा.
के अंजली - काही जण तुम्ही
के अंजली - काही जण तुम्ही म्हणता तसे करतात. आधी चित्र येका साध्या पेपर वर कंपोझ करतात, त्यानंतर ट्रेसींग करुन वॉटरकलर पेपरवर ट्रान्स्फर करतात. मी हि पद्धत कधी वापरली नाही , मात्र खुप रिप्रेझेंटेशनल आर्कीटेक्चर करायचे असले तर फोटोशॉप मधे अँगल, मेझरमेंट्स , प्रपोर्शन बघुन त्याचा वापर करतो.हे खुप क्वचित करतो कारण असे काम करायला मला मजा येत नाही
ओक्के! धन्यवाद!
ओक्के! धन्यवाद!
(No subject)
खोडाखोड न करता कसे जमावे? असो
खोडाखोड न करता कसे जमावे? असो . पुन्हा एकदा प्रयत्न करेन.
स्वाती२ - तुमचा स्केचींगचा
स्वाती२ - तुमचा स्केचींगचा सराव आहे का? neat work, खासकरुन पर्स्पेक्टीव्हचा व्यवस्थीत विचार केलाय
हलक्या हाताने बिल्डींग लाईन केल्यात तर त्या न खोडल्या तरी चालतात
अजय, धन्यवाद ! पुढच्या स्केच
अजय, धन्यवाद !
पुढच्या स्केच मध्ये eye level चा विचार अधिक करेन .
शाळेत असताना डोंगर त्यातून दिसणारा सूर्य आणि डोंगरातून निघणारी नदी वरती ४ आकाराचे पक्षी ह्या शिवाय काही स्केच काढलेले आठवत नाही. हे तुम्हाला माझ्या आत्ता काढलेल्या स्केच वरून लक्षत आले असेलच
तरीही तुम्ही प्रोत्साहन देताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद !
अजय, शाळेत चित्रकला शिकले पण
अजय, शाळेत चित्रकला शिकले पण मग १०वी नंतर सगळे थांबले. हा उपक्रम सुरु केल्याबद्दल खूप धन्यवाद.
गायी, बैल, माणसं, मोटारी
गायी, बैल, माणसं, मोटारी रेखाटायचे वांधे आहेत.
मृण्मयी - आपल्या
मृण्मयी - आपल्या लँद्स्केपसाठी कामचलाऊ फिगर्स कशा करायच्या हे नंतर पाहु
पाटील, मनापासून धन्यवाद! ते
पाटील, मनापासून धन्यवाद! ते शिकायला मिळालं तर खूप मदत होईल.
मी चित्र काढायला घेतलं खरं,
मी चित्र काढायला घेतलं खरं, पण इथली चित्रं बघून काँप्लेक्सच आला
मी शनिवारी रविवारी गृहपाठ
मी शनिवारी रविवारी गृहपाठ करणार आहे.
आता फक्त अध्ययन. बाकीच्यांचा अभ्यास पूर्ण झाला आणि आपणच मागे राहिल्यावर जसं वाटायचं तसं पुन्हा एकदा वाटायला लागलंय..
सहीये. इथे सगळ्यांचीच
सहीये. इथे सगळ्यांचीच चित्रकला मस्त आहे.

माझाही प्रयत्न
पाटील, सुचना वाचल्या.
पाटील, सुचना वाचल्या. पुढच्या वेळेस नक्की लक्षात ठेवेन. इथे पहिली दोन स्केच आलेली बघितल्यावर घरी येईपर्यंत थांबायचा धीर निघत नव्हता त्यामुळे १० मिनिटांत भरभर काढून एकदाचं पोस्ट केलं. लंचमध्येच बाजूने गेलेली मैत्रिण मला चित्र काढताना बघून जाम खुश झाली कित्येक वर्षांनी चित्र काढायला हात लावलेला पाहून. ह्याचं श्रेय तुम्हाला आणि मायबोलीला. धन्यवाद
मजा येतेय.
सावली - कारची बैल गाडी करायची
सावली - कारची बैल गाडी करायची कल्पना छान फक्त आकार खुप छोटा झालाय , आयलेव्हल सुध्हा थोडी खाली यायला हवी , बाकिचे बदल चांगले आहेत
अजय,तुमच्या सुचनांप्रमाणे बदल
अजय,तुमच्या सुचनांप्रमाणे बदल करुन परत एकदा स्केच करण्याचा प्रयत्न करेन.स्केचिंगलाच इतकी मज्जा येते आहे कि रंगवायला सुरुवात केली कि किती येईल?
थँक्यु अजय. पुन्हा एकदा स्केच
थँक्यु अजय. पुन्हा एकदा स्केच करते उद्या.
अजय, ऑफीसमधे बसल्या बसल्या
अजय, ऑफीसमधे बसल्या बसल्या फोनवर फोटो घेऊन टाकतोय.

चित्र square दिसत असले तरी तसे नाहिये. मला size छोटी करायला काही app download करता येत नसल्यामूळे, phone मधल्याच editor मधे clip केले. घरून मूळ चित्र टाकायचा प्रयत्न करेन. रस्त्याच्या शेवटी येणारि जाणारि बैल गाडी काढत होतो पण persoective मधे फारच छोटी वाटते. No value addition. बघणार्याच्या बाजूने रस्ता मोठा झालाय, ति रिकामी जागा भरली तर फारच distracting होतेय, त्यासाठी काय करता येईल ?
(No subject)
फारच लाइट दिसताहेत रेषा..
फारच लाइट दिसताहेत रेषा.. पुढच्या वेळेस जरा डार्क पेन्सिल वापरीन.
असामीचं इंजि. ड्रॉइंग चांगलं असणार.. सगळ्या रेषा बरोब्बर पॅरलल आल्यात.
पाटील सर्व प्रथम धन्यवाद
पाटील सर्व प्रथम धन्यवाद माहिती बद्दल. हे सगळे नवीन आहे माझ्या साठी. इथे खूप शिकायला मिळेल.
दिलेली माहिती समजून घेवुन स्केचेस काढायला थोडा वेळ लागेल असे वाटते. पण तरीही प्रयत्न केला.कितपत जमले ते सांगा.
पाटील प्रतिक्रिया व
पाटील प्रतिक्रिया व मार्गदर्शनासाठी आभार...
ज्यावेळी मी रेखांकन काढायला घेतले तेव्हा मी उजवीकडील विजेच्या तारा, वर दिसणारी झाडाची फांदी, समोर मध्येच दिसणारा विजेचा खांब, काही झाडांची खोडं, सुके गवत व त्यामध्ये दिसणारे निळे प्लॅस्टिक, कार या गोष्टी वगळणार होते. कारण मला तितकेसे ते अपिल झाले नाही. परंतु नंतर चित्र हुबेहुब कितपत काढता येइल हे बघण्यासाठी सर्वच गोष्टी अॅड केल्या. विजेच्या तारा रंगवताना नीट जमल्या तर ठीक, चुकल्या तर सर्व चित्र खराब होईल म्हणुन काढल्या नाहीत. चित्रात दिसणारी दोन मुले मात्र मी काढणारच होते. कारण मला तो चित्रातील मुख्य इंटरेस्ट वाटला. समहाउ ह्युमन टच, त्यामुळे चित्र जिवंत वाटते व बघणारयाला ते जास्त आकर्षक वाटते.
तुम्ही दिलेले इतर पर्याय देखील उपयोगी जसे प्युअर गावाचा टच येण्यासाठी बैल, एखादी नउवारी नेसलेली स्त्री किंवा वर सावलीने चित्रात दाखविल्याप्रमाने बैलगाडी....
Pages