लोणार - सरोवर व मंदिरे

Submitted by छंदोमयी on 29 January, 2014 - 08:15

लोणार सरोवरास भेट देण्याचा योग ह्या वर्षी घडून आला. तसं या सरोवाराबद्दल बरेच लेख लिहिले गेले आहेत व बरीच माहितीही उपलब्ध आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mi pahile aahe Lonar. far kahi wyawastha nahi gawat. tumhi hiwalyat gelat te bare kele. aamhi May madhe gelo hoto tenwha sagalyanchi waaT lagali hoti. pan Lonar che taLe sundarach aahe. tyachya aajubajula bharpur RamafaLe hoti. ti aamhi khoop khalli. ghari pan aanali. pikayala thewalit. wanaat mor aaDhaLale. taLyaachaa aakar basheesaarakhaa aahe. pan wait watat ki itake sundar taLe asun swachchhata aani dekharekh shoonya aahe.

मस्तच वर्णन आणि फोटो Happy

इथे मागच्या दिवाळीच्या सुमारास जाणे झाले होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांत उतरलो होतो. आमच्या शेजारच्या घरात उतरलेल्या एका शिक्षकांना उल्कापातामुळे तयार झालेला, पाण्यावर तरंगणारा दगड देखिल मिळाला.

गोव्याच्या नॅशनल इंस्टीट्युट ऑफ ओशनोग्राफी तर्फे येथे सरोवरात ३-४ ठिकाणी बोअर घेऊन संशोधन चालू आहे.

त्या सरोवराच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक पशू-पक्षी असून तो भाग अभयारण्य जाहीर झाला आहे. त्या भागात असलेली शेते त्यांचा ताबा घेऊन दुसरीकडे हलवण्याचे काम चालू आहे. तिथे सरोवरातील क्षारांच्या वाढीव प्रमाणामुळे त्या पाण्यात मासे नाहीत तरीही आम्हाला जे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पहावयास मिळाले, त्यामधे पाणपक्षी देखिल होते. ह्या पाण्यात जे एक प्रकारचे शेवाळे उगवते ते खायला हे पक्षी तिथे जमतात.

धन्यवाद चैत्राली, शैलजा, दिनेश, बी, शशांक, हर्पेन, सृष्टी, जाई.

बी: होय ! गावात तशी फारशी काही सोय नाही. मला तर जेवायलासुद्धा बस-स्टँड पर्यंत जावे लागले होते. अन्यथा चहा व भजी यांशिवाय काही पर्याय नव्हता. आणि हो, हा प्रवास हिवाळ्यातच केलेला बरा. लोणार सरोवराभोवतीच्या अरण्यात आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी बरीच औषधी वनस्पती आढळतात. जंगलात मोर, वानरे, हरणे असे पशु-पक्षीही भरपूर आहेत.

हर्पेनः अगदी बरोबर. सरोवराचे पाणी इतके क्षारीय असूनसुद्धा तेथे रूडी शेलडक, ब्लॅकविंग्ड स्टिल्ट, टिटवी असे पाणपक्षी बरेच होते हे विशेष.

दिनेशः जगात क्वचितच कुठे लोणारसारखी ठिकाणे आहेत जेथे तुम्हाला एकाच जागी सात-आठ गोष्टींचा आनंद एकत्र लुटता येऊ शकतो. खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनौषधी, मंदिरस्थापत्य, मूर्तिशास्त्र व निसर्ग यांपैकी कुठलाही एक किंवा अधिक छंद जर तुम्ही जोपासत असाल तर लोणारला तुम्ही जाच असे मी म्हणेन. शिवाय निव्वळ प्रवासाचा आनंद जरी लुटायचा असेल तरीही लोणार उचित ठरावे.

खूप छान माहिती आणी फोटो!!

भारतातील अशी कित्येक ठिकाणं राहूनच गेलीयेत पाहायची..

धन्यवाद नताशा, Srd, वर्षू नील, मानुषी

Srd: लोणारहून जालना - ९२ कि.मी. व शेगाव - ११५ कि.मी.

तुम्ही विदर्भ अथवा उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांतून जात असल्यासच फक्त शेगाव सोयीचे ठरेल. इतर सर्व ठिकाणांहून जायचे असल्यास जालना स्थानक गाठावे. खास करून मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, इ. साठी जालना स्थानक अगदी सोयीचे. जालन्याहून लोणारसाठी राज्य परिवाहनाच्या भरपूर गाड्या उपलब्ध आहेत. आम्ही जालन्याला उतरून प्रथम सिंदखेड राजास गेलो. सिंदखेड राजा जालन्याहून फक्त ३२ कि.मी. आहे. तेथून पुढे लोणारला गेलो.

मानुषी: योग नक्कीच येईल. तुम्हाला लोणारबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास जरूर कळवा.

सुंदर माहीती आणि लेख.

फारच सुंदर माहिती पण गो मुख धारेवरचा फोटो नाही दिसत आहे.... तिथे गेले नाही का? फारच सुंदर स्थळ आहे ते Happy

धन्यवाद स्मितू. लोणार सरोवराच्या आसपास दोन धारा आहेत - एक धार, धार मंदिरसमूहाच्या मध्यभागी (प्र.चि. २). तेथे एक कुंड आहे ज्यात उतरावयास पायर्‍या आहेत व जेथील स्रोताचे पाणी लोक पिण्यासही वापरतात. ही धार बारमाही आहे. तुम्ही बहुधा ह्याच धारेबद्दल बोलत आहात. दुसरी धार म्हणजे ह्याच स्रोताचे पाणी सरोवरास मिळण्याअगोदर एक छोटासा धबधबा निर्माण होतो तेथील धार. तीस सीतान्हाणी म्हणतात. ह्यां व्यतिरिक्त जर एखादी धार तुम्ही म्हणत असाल तर थोडे सविस्तर लिहिल्यास समजू शकेल.

तेथुन खुपच छान माहिती दिलीत .माझ माहेर लोणार पासुन अगदी जवळ [साखरखेर्डा] त्यामुळे लग्नापुर्वी बरेचदा जाण व्ह्यायच. वाचल्यानंतर व चित्र पहातांना जुन्या आठवणी जाग्या झाल्यात.परत जाण्याची इच्छा आहे. बघु केव्हा जमत..धन्यवाद छंदोमयी पुन्;प्रत्ययाचा आनंद अनुभवल्या बद्दल.

प्रभा: ले़ख आवडल्याबद्दल धन्यवाद. इतक्या रम्य ठिकाणाजवळ आपले माहेर असणे म्हणजे किती भाग्याची गोष्ट म्हणावी. या लेखामुळे तुमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या हे ऐकून खूप बरे वाटले.

मस्तच फोटो !
मी बरेचदा गेलो अगदी मुक्कामी होतो सरोवराचे ठिकाणी !
फोटो पाहताना मजा आली !

धन्यवाद मुक्तेश्वर, रंगासेठ.

मुक्तेश्वरः सरोवराच्याकाठी राहणे म्हणजे एक मस्तच अनुभव.

रंगासेठः अवश्य जा आणि कोणतीही माहिती हवी असल्यास जरूर कळवा.

छान ..लोणारचे नाव आले की आमची छाती अभिमानाने फुगते..कारण अवघ्या तिस किमी अंतरावर मी राहतो..दुसरबिड.. Happy तसेच सितान्हाणी येथे असलेल्या गोमुखातून पडणारी धारच पंचक्रोषीत 'लोणारची धार' म्हणून प्रसिद्ध आहे..दर श्रावणमासात धारेखाली स्नान करण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी लोटते..
तलावाला आतून गोल चक्कर मारल्यास तलावाच्या दक्षिण दिशेत घनदाट अरण्यात कमळजा देवीचे निसर्गरम्य,मनोहारी मंदीर आहे व त्यासमोरच तलावात दोन वेगळ्यवेगळ्या विहिरी आहेत,त्यांना सासु-सुनेची विहिर म्हणतात..पण यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तलावात असूनसुद्धा एका विहिरीतील पाणी गोड असून दुसरीतले खारे आहे..तलावातले पाणी वाढल्यास विहिरी दिसत नाहित..
तसेच लोणारमधिल आडव्या मारुतीची महाकाय मुर्तीही बघण्यासारखीच..!

मेहेकर, लोणार ही नाव वाचल्यानंतर माहेरी गेल्यासारखच वाटल. मनाने तेथे जाउन आले. धन्यवाद.