एक अंडं, पिकलेलं केळं, २ मध्यम चमचे कणिक, चिमूटभर मीठ १-२ चमचे साखर, तेल किंवा तूप, मध आणि पाणी अगदी पाववाटी.
प्रथम एका भांड्यात अंडं फोडून चांगलं फेटून घ्या, त्यात केळ अगदी बारिक कुस्करून घाला. मग त्यात मावेल इतकी कणिक घाला आणि पुन्हा फेटा, मग चिमूटभर मीठ आणि दोन चमचे साखर घाला. मी अत्यंत आळशी असल्याने अंडं मिक्सरच्या भांड्यात फोडून डायरेक्ट व्हिप मोडवर फिरवून त्यातच केळाचे तुकडे, कणिक वगैरे मिक्स करून फिरवते... किंचित घट्ट वाटलं तर पाणि (अगदी थोडं) घालून पुन्हा फिरवते. तव्यावर सरसरित ओतता येईल असं मिश्रण हवं.
गॅसवर नॉनस्टिक किंवा कोणताही तवा तापत ठेवून त्यावर थोडं तेल घालून तवा चांगला तापला की हे मिश्रण वरून गोल गोल करत ओतायचं. आणि झाकण ठेवायचं. साधारण फुलतो.... लक्षात येतो झाला की. तळ साधारण ब्राऊन झाला की पलटायचा...
नंतर प्लेट मध्ये काढून वर फक्त मध ओतून खायचा...
अंडं हाताने जितकं फेटू तितका हा पॅनकेक हलका होता आणि फुलतो... माझा फुलत नाही कारण मी मिक्सरवर मिश्रण करते. एखाद्यावेळेस ब्रेकफास्टला किंवा लाईट डिनर म्हणून चांगला पडतो खायला. होतोही पटकन.
ह्यात baking powder घालातात
ह्यात baking powder घालातात त्याने pancake अजून हलका होतो .
मस्त !!!!!!!
मस्त !!!!!!!
मस्त! मी बर्यापैकी बटर आणि
मस्त! मी बर्यापैकी बटर
आणि मध व फळांचे तुकडे घालते.
अंड्याला ऑप्शन काय असेल, अंड
अंड्याला ऑप्शन काय असेल, अंड खात नाही म्हणून विचारले. बाकी हा प्रकार दिसतोय छान.
म स्त ..सोपा दिसतोय
म स्त ..सोपा दिसतोय ..करायला.
छान दिसतोय! बेपाने मस्त
छान दिसतोय! बेपाने मस्त फुलतो.
थोडी तांदुळाची पिठी घालून पण
थोडी तांदुळाची पिठी घालून पण चांगला लागतो. तव्यावर घातला की वरून थोडी ड्रायफ़्रूट पावडर घालायची. उलटला की कुरकुरीत होते.
केळ्याऐवजी सफ़रचंद पण किसून
केळ्याऐवजी सफ़रचंद पण किसून घालता येतं.
दक्स.....मस्त! ं ब्रेफासाठीचा
दक्स.....मस्त! ं ब्रेफासाठीचा माझा अत्यंत आवड्ता प्रकार. यात हेच सगळं अर्धा,, कप् दुधात ़ मिक्स करून जर बॅटर ब्नवलं तर पॅनकेक अजून छान होतत.
आणि झाल्यावर वरून थोडं बटर, मध , मिक्स फळांचे तुकडे .....अहाहा!
मानुषी वॉव! कल्पनेनं तोंडाला
मानुषी वॉव! कल्पनेनं तोंडाला पाणि सुटलं.
मला पॅन केक हा प्रकार अजिबातच माहिती नव्ह्ता. मैत्रिणीने एके दिवशी करून खाऊ घातला. (अगदीच घरगुती गोष्टी ज्या उपलब्ध होत्या त्यातून) मला खूप आवडला. आणि त्यात बरिच व्हेरिएशन्स पॉसिबल आहेत .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अन्जू अंड्याला ऑप्शन काही
अन्जू अंड्याला ऑप्शन काही नाही.
जाणकार अधिक प्रकाश टाकतील.
दक्षुतै एकदम खिचडीवरुन पॅनकेक
दक्षुतै एकदम खिचडीवरुन पॅनकेक वर उडी... मस्त दिसतयं.. पण अंड![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
दक्षे... मस्त आहे पा कृ...
दक्षे... मस्त आहे पा कृ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो (हे मी स्वतःच्या
मस्त फोटो (हे मी स्वतःच्या फोटोसाठी लिहिलं नसून दक्षिणाच्या फोटोसाठी लिहिलं आहे याची कृपया नोंद घ्यावी). ज्युनियर मंडळींचा आवडता ब्रेफा आहे हा.
मी बटरमिल्क पॅनकेक घरी बनवते लेकींसाठी. २ अंडी छान फेटून मग त्यात मावेल तितकी साधारण अंदाजानेच कणिक, थोडी सिनेमन पावडर, थोडं व्हॅनिला एक्सट्रॅक्ट, किंचित मीठ आणि बेकिंग पावडर घालून ताकात भिजवते.
तव्यावर टाकले की कधी कधी चॉकलेट चिप्स टाकते त्यावर जरासे. प्लेट्मध्ये खायला घेतल्यावर मग त्यावर मेपल सिरप!
वॉव....खरच मस्त आहे...आज
वॉव....खरच मस्त आहे...आज मुलिसाठि नक्कि बनवणार......त्याच बरोबर्,इथे दिलेल्या टिप्स हि आजमाउन बघेन....
शुम्पी, तुमचा केक हि छान फुललाय आगदि....
अंड न घालता करता येईल का? अंड
अंड न घालता करता येईल का? अंड हवच का?
दक्षिणा सुरेख कृती. पुढल्या वेळी ती जाळी पण दिसायला हवी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अंडे नको असल्यास केळ्याचे
अंडे नको असल्यास केळ्याचे प्रमाण वाढवावे. फ्लाक्समिल (अळीव पावडर) भिजवून (१ मोठा चमचा + ३-४ मोठे चमचे पाणी) तेही वापरले तर चालते.
धन्यवाद सिमन्तिनी
धन्यवाद सिमन्तिनी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मि करुन पाहिले....आगदि फ्लफी
मि करुन पाहिले....आगदि फ्लफी झाले नहि (माझच काहितरि चुकल असेल) पण मऊ अणि हलके झाले होते...मुलिने आवडिने खाल्ले.
बॅटर थोडावेल भिझल्यावर (साधारण २ तास) जे बनवले, ते बर्यापैकि फ्लफी झाले.
आणि मि कणिक न वापरता 'नाचणि' च पीठ वापरल....ते हि मस्त झाल होत.....
फ्लाक्समिल (अळीव पावडर) >>
फ्लाक्समिल (अळीव पावडर) >> फ्लाक्स म्हणजे जवस ना?
दक्षिणा मस्त रेस्पी इतके
दक्षिणा मस्त रेस्पी
इतके दिवसात अंड असल्याने केला नव्हता कधीच पॅनकेक
आतामात्र सा बां ना ब्रे फा ला करुन देण्यात येईल... धन्स गो नविन पर्यायासाठी! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दक्षे, मस्तच ग. करुन बघण्यात
दक्षे, मस्तच ग. करुन बघण्यात येईल. मी अजूनपर्यंत पॅनकेक ना कधी केलाय ना कोणी केलेला खाल्लाय.
मस्त ग! उद्याच करून बघते.
मस्त ग!
उद्याच करून बघते. भिजवल्यावर लगेच करायचा का थोडा वेळ पीठ तसाच ठेवायचे??
द्क्षा की जय हो !! आज आमच्या
द्क्षा की जय हो !! आज आमच्या कडे सुपर हीट !!
सहेली, फ्लेक्स सीड्स म्हणजे
सहेली, फ्लेक्स सीड्स म्हणजे जवस झाला. ती म्हणते आहे ते बरोबरच आहे.
मृणाल मी नाही बॅटर भिजवत
मृणाल मी नाही बॅटर भिजवत वगैरे बसत, लग्गेच करते. बट थॅंक्स एकदा भिजवून प्रयोग करून पहायला हरकत नाही. १० मिनिटं इकडे तिकडे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दक्षे, हा गरम गरमच खावा की
दक्षे, हा गरम गरमच खावा की गार झाल्यावर पण चांगला लागतो?
पॅन केक मध्ये पाण्या एवजी
पॅन केक मध्ये पाण्या एवजी दुध टाकावे.
जवस म्हणजे अळीव की आळशी?
जवस म्हणजे अळीव की आळशी?
दक्षिणा अन्ड्याचा वास येतो का
दक्षिणा अन्ड्याचा वास येतो का याला? आपण केक करतो तेव्हा आपल्याला चव किन्वा वास जाणवतो अन्ड्याचा, तसा. मी विकतचे पॅनकेकचे मिश्रण वापरलेय. अन्डे आपण घालायचे त्यात नन्तर. मी कधी घातले नाही. विकतच्या मिश्रणात मैदा असतो. त्यावेळी माझी मुलगी आम्लेट खात नव्हती म्हणून मी त्यात चक्क हिन्ग, जीरे घालुन त्याचे धिरडेच बनवुन तिला घालायची.:फिदी:
ती आवडीने खायची. गोड तिला अजीबात आवडत नसल्याने मध, सिरप बाजूलाच राहिले. आता तुझ्या पद्धतीने करुन बघते. फोटो भारी आलाय पण. मस्त चकाकी जाणवतेय मधाची.
Pages