एक अंडं, पिकलेलं केळं, २ मध्यम चमचे कणिक, चिमूटभर मीठ १-२ चमचे साखर, तेल किंवा तूप, मध आणि पाणी अगदी पाववाटी.
प्रथम एका भांड्यात अंडं फोडून चांगलं फेटून घ्या, त्यात केळ अगदी बारिक कुस्करून घाला. मग त्यात मावेल इतकी कणिक घाला आणि पुन्हा फेटा, मग चिमूटभर मीठ आणि दोन चमचे साखर घाला. मी अत्यंत आळशी असल्याने अंडं मिक्सरच्या भांड्यात फोडून डायरेक्ट व्हिप मोडवर फिरवून त्यातच केळाचे तुकडे, कणिक वगैरे मिक्स करून फिरवते... किंचित घट्ट वाटलं तर पाणि (अगदी थोडं) घालून पुन्हा फिरवते. तव्यावर सरसरित ओतता येईल असं मिश्रण हवं.
गॅसवर नॉनस्टिक किंवा कोणताही तवा तापत ठेवून त्यावर थोडं तेल घालून तवा चांगला तापला की हे मिश्रण वरून गोल गोल करत ओतायचं. आणि झाकण ठेवायचं. साधारण फुलतो.... लक्षात येतो झाला की. तळ साधारण ब्राऊन झाला की पलटायचा...
नंतर प्लेट मध्ये काढून वर फक्त मध ओतून खायचा...
अंडं हाताने जितकं फेटू तितका हा पॅनकेक हलका होता आणि फुलतो... माझा फुलत नाही कारण मी मिक्सरवर मिश्रण करते. एखाद्यावेळेस ब्रेकफास्टला किंवा लाईट डिनर म्हणून चांगला पडतो खायला. होतोही पटकन.
जवस म्हणजेच आळशी. अळीव/ हळीव
जवस म्हणजेच आळशी. अळीव/ हळीव वेगळे.
काय झकास फोटो आलाय गं (बेसिक
काय झकास फोटो आलाय गं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नखरे नुसते!!!)
(बेसिक रेसिपीज म्हणे!!
कवडे गार नाही खाल्ला मी कधी,
कवडे गार नाही खाल्ला मी कधी, गरमच खाल्लाय कायम. तु गार खाऊन पहा आणि मला सांग.
सई
सई
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
अग दक्षिणा माझ्या प्रश्नाचे
अग दक्षिणा माझ्या प्रश्नाचे उत्तर दे की ग.
भारी दिसतोय ग. मी एकदा ट्राय
भारी दिसतोय ग.
मी एकदा ट्राय केल होत..काय चुकल माहित नाही पण अंड्याचा वास येत होता. मुलीला नाही आवडला फारसा. त्यावेळी ती अंड खायची नाहि. आता खाते. आता बनवून बघते.
हल्ली मी असाच दुध, केळ, तांदूळ पिठी, साखर आणि ड्राय fruits ढकलून डोसा म्हणून खपवते. बनाना डोसा ती आवडीने खाते. पण तो एवढा फ्लफी वगैरे होत नाही.
कवे, छशिट ला असलेल्या मॅक्डीत
कवे, छशिट ला असलेल्या मॅक्डीत ब्रेफा आयटेम असतो असा पॅनकेक. २ तळव्याएवढे पॅके अन मॅपल सिरप च पार्सल घेता येईल... स्पेसिफिक ठिकाण सांगितल कारण सगळ्याच मॅक्डीज मध्ये नाही मिळत अन ब्रेफा असल्याने ११००/११३० नंतर बंद करतात
अंड न टाकता त्यात थोडा बेकिंग
अंड न टाकता त्यात थोडा बेकिंग सोडा व बेकिंग पावडर टाकायची. एकदम मस्त होतात. यात थोडं नाचणी सत्व पण टाकते लेकीसाठी.
अंड न टाकता कसे करायचे हे
अंड न टाकता कसे करायचे हे ज्यांनी ज्यांनी सांगितले त्या सर्वांना धन्यवाद.
दक्षे, तुला जेवण बनवायची आवड
दक्षे, तुला जेवण बनवायची आवड निर्माण झाली यातच अर्धी लढाई जिंकलीस.
सेल्फ रेझिग फ्लोअर वापरले तर फेटायची वा अंडे घालायचीही गरज नसते. याला येणारे बुडबुडे फुटण्यापुर्वीच तो उलटायचा.
यात साधारण गर असलेली ( पपई, चिकू, आंबा ) फळे वापरू शकतेस. पिठात न घालता वरून घेतली तरी चालतात.
दिनेशदा, सेल्फ रेझिंग फ्लोअर
दिनेशदा, सेल्फ रेझिंग फ्लोअर इथे मिळेल का नाही शंका आहे. फळांचे ऑप्शन छान दिलेत तुम्ही.
अन्जू, स्टेशन समोरच्या अप्सरा
अन्जू, स्टेशन समोरच्या अप्सरा मार्ट मधे सेल्फ रेझींग फ्लार मिळते.
योग्या, धन्स रे.
योग्या, धन्स रे.
जवळपास गेली दोन वर्ष पॅनकेक
जवळपास गेली दोन वर्ष पॅनकेक खायचा म्हटलं की करिष्माच्या चौकातल्या यॉकशायरला धावत होते!
थॅंक्स टू दक्षिणा, आता मला हे करायला लागणार नाहीये!
काल रात्री तुझ्या ह्याच रेसिपीने केले बनाना पॅनकेक्स आणि ते अफलातून झाले होते! मेपल सिरप नसल्याने मी ते घरी केलेल्या पेरुच्या जेलीबरोबर खाल्ले, पण फील सेमच!!!
पुन्हा एकदा थँक्स दक्षिणा!!!
दक्षिणाचा कीबोर्ड अडकला की
दक्षिणाचा कीबोर्ड अडकला की काय?? मागे जात नाही का? अग मागचे वाच की बयो.:फिदी:
https://lh6.googleusercontent
https://lh6.googleusercontent.com/-jXU7jYtAO1k/UupemKPCWRI/AAAAAAAAE2k/W...
इथे नाहि दिसत आहे फोटो मि
इथे नाहि दिसत आहे फोटो मि टाक्लेला ..इथे कसा दिसेल ?
सफरचंद घालून केलेला पाहिलाच
सफरचंद घालून केलेला
पाहिलाच प्रयत्न आहे पण लेकीने आवडीने खाल्ला
अंड्याचा वास जावा म्हणून इसेन्स टाकला एक थेंब
धन्यवाद दक्षिणा
khoop sundar
khoop sundar
भूक लागली तर पटकन करायला
भूक लागली तर पटकन करायला चांगलं वाटतय.
ईथे कॉस्टकोमधे मल्टिग्रेन
ईथे कॉस्टकोमधे मल्टिग्रेन pancake मिक्स मिळते. छान होतात pancakes. वरिल रेसिपिने fluffy होतात का , करुन पाहायला हवे.
आज मुलाला क्युरियस जॉर्जचा
आज मुलाला क्युरियस जॉर्जचा पॅनकेकचा एपिसोड बघताना पॅनकेक खाण्याची हुक्की आली.त्याला गोड आवडत नसल्याने भित भितच केले.पण त्याला खूप आवडले.छान आणि सोपी रेसिपी आहे.मुख्य म्हणजे मैदा नाही!! मी थोडे वॅनिला इसेंस घातले.मेपल सिरप ऐवजी मध वापरला.किंचित दूध घातले पातळ करायला.मस्त मऊ लुसलुशीत पॅनकेक्स झाले.थँक्यू दक्षिणा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुपर्ब रेसिपी! झटपट होतो आणि
सुपर्ब रेसिपी! झटपट होतो आणि पोटभरीचा. मुख्य म्हणजे कणिक वापरली आहे, मैदा नाही. IHOP मधे पॅनकेक खाते नेहमी पण घरी करायला इतका सुटसुटीत असेल असं वाटलं नव्हतं.
याचं तिखट व्हेरिएशन केलं आहे का कोणी? नवरोबा पॅनकेक्स अजिबात खात नाही- गोड असतात म्हणून.
पाण्याऐवजी दुध आणि तेलाऐवजी
पाण्याऐवजी दुध आणि तेलाऐवजी बटर अस वापरून अगदीच सरसरीत पीठ न करता थोडं घट्टच ठेवायचं आणि नॉनस्टिक वर पसरवून न ओतता तसंच ओतायचं (ते आपणहून जेवढं पसरेल तेवढं पसरू द्यावं) म्हणजे ते अगदीच डोस्यासारखं न होता थोड जाडसर केक सारखं दिसतं.
हा प्रकार विना अंड पण करता येतो, पिठाऐवजी मैदा पण वापरता येतो आणि विना अंड करणार असाल तर सढळ हाताने चांगल्या तुपाचा उपयोग करावा …. (मी अंड टाकत नाही)
हे बघा यात अंड टाकलेलं नाही
हे बघा यात अंड टाकलेलं नाही ..
Pages