Submitted by webmaster on 2 June, 2008 - 01:22
य र ल व श ष स पासून सुरू होणारे शब्द
या अगोदरचं हितगुज इथे पहा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
य र ल व श ष स पासून सुरू होणारे शब्द
या अगोदरचं हितगुज इथे पहा
'रयत'
'रयत' शब्दाचा भाषिक प्रवास मजेदार आहे. त्याचा उगम अरेबिक, नंतर तो उर्दूत आला व मग मराठीत आणि गंमत म्हणजे इंग्रजीनेही त्याला आपलासा केला ryot हे स्पेलिंग देवून!
मी रयत हा
मी रयत हा शब्द फ़क्त मराठी भाषेतच ऐकला आहे.
मी पण रयत
मी पण रयत हा शब्द फक्त मराठीतच ऐकला आहे.
'निर्लेप' हा असाच एक (माझ्यामते) फसवा शब्द, शालेय अभ्यासक्रमात किंवा अभ्यासेतर वाचनात हा शब्द कधीच आला नाही, त्यामूळे तो प्रथम वाचला तेव्हा तो इंग्रजी शब्द आहे की काय असा प्रश्नं पडला होता... (कारण तेव्हा निर्लेप तव्यांची जाहीरात टि.व्ही. वर जोरात सुरू होती. :P)
रयत हा
रयत हा शब्द कानडीमधे पण आहे. किंबहुना, मराठीपेक्षा त्याचा कानडीमधेच जास्त वापर होतो.
रयत
रयत इंग्रजीतही आहे पण माझ्यामते त्याचा फारसा वापर हल्ली होत नाही
खरं
खरं म्हणजे बाबुष्का म्हणजे (रशियन भाषेत ) आजी
ममम३३३, तुम्हालाही रशियन येत का???रशियनमधे असे अनेक शब्द आहेत जे संस्कृतुत्पन्न आहेत्.उदाहरणे-
गोरा - गिरीपासुन
ब्रात- भ्रातापासुन
मात- मातापासुन
ह्राम(मंदीर)- हरे राम पासुन्(रे वगळुन वाचा)
रशियनमधे साखरेला साखरच म्हणतात तर चहाला चाय म्हणतात. अननस हा शब्दही इथे आहे.
असे अनेक शब्द आहेत ज्यांची उत्पत्ती भारतातील आहे.
चिन्या, 'चह
चिन्या,
'चहा', 'चाय' हे सारे शब्दं मूळ चिनी भाषेतून आले आहेत. त्यांचा उगम भारतीय नाही. 'चा' हा मूळ शब्द, कॅन्टनीज भाषेतील. तसंच, 'तेऊ' हे त्याच शब्दाचं दुसरं रूप. त्यावरून ईंग्रजी 'टी', फ्रेंच 'ते', एस्पेरांतो 'तेओ' हे शब्दं आले. जगभरात 'चा' आणि 'तेऊ' यांचीच रुपं प्रचलित आहेत.
तसंच 'अननस' ह शब्द. हे फळ मुळचे द. अमेरिकेतील. 'आनानास कोमोसस' हे आपण भारतात खातो ते फळ. पंधराव्या शतकात कोलंबसाने ते युरोपात नेले, आणि मग हळूहळू त्याचा जगभर प्रसार झाला. आणि बहुतेक देशांत ते याच नावाने ओळखले जाते.
'आनानास' हा गुर्वानी भाषेतील शब्द. बोलिव्हीया आणि उरुग्वेमध्ये ती बोलली जाते.
'अनुष्का'
'अनुष्का' म्हणजे हिब्रू भाषेत 'डौल'.
आणि देवस्थळी, जोशी व कुलकर्णी यांनी संपादीत केलेल्या संस्कृत शब्दकोषानुसार 'विद्युल्लेखा'.
ह्या शब्दकोषात मला एक मस्त शब्द सापडला, 'हेलन', म्हणजे 'तिरस्करणीय स्त्री'.
अर्थात ट्रॉयची हेलेन वेगळी. 'हेलेना' हा शब्द आला 'वेलेना'पासून, म्हणजे वाहणारी.. wel हा इंडो - युरोपिअन धातू, अर्थ वाहणे, गडगडणे,पळणे.. waltz, revolve, helix, willow या सगळ्या शब्दांचा हा उगम.
ट्रॉयची ही हेलेन शरण्यू बनून आपल्या ऋग्वेदात येते. त्वस्तराची मुलगी, सूर्याची पत्नी, अश्विनीकुमारांची आई. हेलेनप्रमाणे तिचही अपहरण झालं होतं. शरण्यू म्हणजे ' चपळ', नदीसाठी हा शब्द वापरतात.. अर्थात हेलेनप्रमाणे शरण्यूसुद्धा 'वाहणारी'..
अरे बापरे!
अरे बापरे! 'हेलन्'चा अर्थ वाचून वाईट वाटले. आपली हिंदी चित्रपटातली हेलन म्हणजे तर कित्ती 'आवडती स्त्री'!
चिन्या, अरे
चिन्या,
अरे, रशियन भाषेत 'ह' असा उच्चारच नाही.. ते 'ख्राम' आहे..
आणि या शब्दाचा उगम स्लाविक भाषांत आहे. स्लोवेनियन, बोस्नियन, सर्बियन या तिन्ही भाषांत हाच शब्द आहे, आणि प्रभुपाद अथवा त्यांचे अनुयायी या भूतलावर अवतीर्ण होण्यापूर्वीपासून तो प्रचलीत आहे.
चिनॉक्स,
चिनॉक्स, हरे राम हा शब्द प्रभुपादांनी नाही काही आणलेला. तो उपनिषदांमधेही आहे. शिवाय तो सरळ सरळ ख्राम होत नाही. येथे 'एच' चा उच्चार ह आणि ख मधिल आहे. सरळ सरळ ख नाहीये. तो उच्चार लिहिता येत नाही मराठीत पण पुर्णपणे ह नाही आणि पुर्णपणे ख नाही.मला आता आठवत नाही पण 'युरो-इंडिअन' का काहीतरी म्हणतात याला. म्हणजे कुठकुठले शब्द भारतातुन आलेले आहेत याचा अभ्यास रशियन भाषातज्ञांनी केलेला आहे. चाय्,अननस्,साखर हे भारतातुन आलेले नसावेत याची मला शंका होतीच. पण वर दिलेले इतर शब्द संस्कृतोत्पन्न आहेत. रशियात विष्णुची मुर्ती सापडली आहे. स्लाविक भाषा जेथे बोलल्या जात तिथे भारतीय मंदीरे व इतर अवषेश वगैरेही सापडतात. अजरबाईजानमधे एक मंदिर आहे जिथे भारतिय योगी साधारण ४००-५०० वर्षांपुर्वीपर्यंत राहत होते. तेथील एक प्राचीन मंदिर ,नेहरुंच्या सांगण्यामुळे प्रेक्षणिय स्थळ म्हणुन सरकारने रक्षित केले आहे.
इतर काही शब्द-देस्यात(द्येसित बोली भाषेत)- दश पासुन
द्वा - द्व (संस्कृत दोन)
त्री -संस्कृत ३
दात- दानपासुन
येस्त- अस्ति(असणे) पासुन
आगोन- अग्नि पासुन
अदिन- आदि पासुन
ओवशि- औषधी पासुन
बेगात्-भागत्(पळणे)
बोय-भय
वोल्ना-वालन पासुन
वालीक्-वाली पासुन
द्वेर्-द्वार पासुन
करुना-करुन पासुन
तुम्हाला रशियन येत असेल तर ही साईट पहा-
http://www.roxton.kiev.ua/another/sanscrit.html
हेही पहा- http://russanskrit.livejournal.com/825.html
इथे अनेक असे शब्द दिलेत.
तुम्ही
तुम्ही लोकांनी हा जो शब्द्च्छल चालवला आहे तो चांगला आहे जागतीक शब्दांचा प्रवास व त्याचे इतरांवर होणारे परीणाम याचा उहापोह इथे पहायला नव्हे वाचायला मिळतो काहींनी केलेले गमतीदार विश्लेशण हि वाचुन मजा येते
गोदेय
चिन्या,
चिन्या, "हरे राम" कुठल्या उपनिषदांमध्ये आहे बाबा?
बाकी उपनिषदांची खरी गंमतच आहे. भारतीय मनावर त्यांचा पगडा बघून बरेच जणांनी चलाखीने आपल्याला पाहिजे तशी उपनिषदे "तयार" केली आहेत आणि त्यांची संख्यादेखील प्रचंड आहे. पण मुख्य उपनिषदे १० च मानली गेली आहेत.
आपण बोलतो त्याची पार्श्वभूमी माहिती असावी शक्यतो...
असो. बोलण्याच्या ओघात उल्लेख करावासा वाटला झाले.
अहो क्ष, मी
अहो क्ष, मी काय बोलतो याची पार्श्वभुमी मला माहीत आहे. हा मंत्र 'कालीसंतारणोपनिषदा'त आहे.त्याचप्रमाणे पद्मपुराण,ब्रह्मांडपुराण्,अग्निपुराणातही उल्लेख आहे .बहुदा कथोपनिषदातही उल्लेख आहे. एकुण उपनिषदे १०९ आहेत.बाकी उपनिषदांची महती काहींना कळलेली नाहीत त्यामुळे ती 'तयार' केलेली आहेत असे काही लोक म्हणतात. बाकी काय तयार केलेले आहे आणि काय नाही हे ते कशावरुन ठरवतात तेच जाणोत. स्वामी विवेकानंद म्हणतात की 'तुम्ही उपनिषदे वाचा.गीतेपेक्षाही उपनिषदे वाचा.जगातील सर्व धर्मग्रंथांमधे उपनिषदे अशी आहेत की ज्यात निर्भयता,शौर्य यांचा देवाशी संबंध सांगितलेला आहे.' पण काही विद्वानांना कळत नसावे मग ते 'तयार' करण्याच्या 'काँट्रोवर्सी थिअरीज' आणतात.
आपण कशाला विरोध करतो याचीही पार्श्वभुमी माहीती असावी शक्यतो.
ओह, मी
ओह, मी बघितलं आत्ताच हे. मला माहिती नव्हतं हे कालीसंतारण उपनिषद खरंतर. पण कठोपनिषदामध्ये नाहीये त्याचा उल्लेख.
असो. तयार केलेल्या उपनिषदांमधलं एक सांगायचं म्हणजे अल्लाह उपनिषद .. विकिवर काही दिवसांपूर्वी बघितलं तर त्याचा उल्लेख १० मुख्य उपनिषदांमध्ये होता नावावरुनच कळतं तिथे कि तयार केलेले आहे की नाही.
बाकी तुझ्या बोलण्यातला रोष जाणवला पण ठीक आहे... राग उफाळून येणं स्वाभाविक आहे.
चालायचंच.
रोषाचा
रोषाचा प्रश्न नाहीये.मला वाटल की मी उपनिषदाच नाव दिल की लगेच 'हे तयार केलेल आहे' अस म्हटल जाईल म्हणुन लिहिल. बाकी १०९ उपनिषद आहेत्.त्यांची नावेही आहेत् . हवी असल्यास टाकतो. काही उपनिषदांमधे इस्लामचा उल्लेख आहे(ही इस्लाम भारतात येण्यापुर्वीची आहेत्.पण साधर्म्यावरुन इस्लामबद्दल लिहिलेले असावे असे वाटते),यापैकी कुठल्यातरी उपनिषदाचे नामांतर करुन ते विकिवर टाकायचे प्रकार कोणी केल्यास माहीत नाही.
नाही रे.
नाही रे. मला जितकं थोडंसं माहिती आहे त्यावरून उपनिषदं म्हणजे गुरुजवळ बसून घ्यायचे ज्ञान. दुसरा अर्थ होतो जे ज्ञानाकडे नेते ते उपनिषद.
आता असं ज्ञान बर्याच जणांनी आपापल्या संप्रदायाप्रमाणे आपलंच खरं म्हणूनही सांगितलेलं आहेच. आणि त्यात काहीच गैर नाही कारण त्यांच्यासाठी ते त्यांच्या गुरूने दिलेले ज्ञान होते. आज जी मुख्य १० उपनिषदे मानली जातात (कठ, प्रश्न, बृहदारण्यक, ईशावास्य, मांडुक्य, तैतिरीय, ऐतरेय, छांदोग्य, केन आणि मुंडक) ती सुद्धा शंकराचार्यांनी त्यांचे महत्व दाखवून दिले तेव्हाच ती मुख्य मानली गेली. त्यामुळे शंकराचार्यांचे मत ज्यांना पटते, त्यांनी ती मानावीत. ISKON मध्ये कलीसंतारण मानले गेले असेल तर भले त्यातले ज्ञान त्यांच्यासाठी खरेच असणार. आपण त्या वादाकडे लक्ष न देता आपल्या मार्गावर राहणे श्रेयस्कर.
पण अल्लोपनिषद आहे. त्याचे नाव वगैरे बदललेले नाही तर ते अकबराच्या काळात लिहिले गेले आहे. त्या उपनिषदांत असे सांगितलेय की ते अथर्व वेदाचा भाग आहे आणि त्यानुसार अल्ला हा देवांचा देव आहे. आजकाल त्यावरून काही जण असा दावा पण करतात की अल्लाचे नाव वेदांमध्ये पण लिहिले आहे
असो, विषयापासून फारकत झाली खरी.
वास्तविक
वास्तविक इस्कॉन मधे कालीसंतरण उपनिषद मानले जात नाही. अग्निपुराण,पद्मपुराण,ब्रह्मांडपुराण् यांमधे 'हरे कॄष्ण महामंत्र' आहे.आणि त्यात असा स्पष्ट उल्लेख आहे की ही १६ अक्षरे कलीयुगात देवापर्यंत जाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.सर्वात महत्वाच म्हणजे चैतन्य महाप्रभु जे कृष्णाचा अवतार होते त्यांनी हा मंत्र म्हणा असे सांगितले आहे म्हणुन इस्कॉनमधे हा मंत्र म्हणतात्.कालीसंतरणोपनिषदात दिलेला मंत्र 'हरे राम' पासुन सुरु होतो(घालीन लोटांगण च्या शेवटी जसे येते त्याप्रमाणे.बहुतेक तिथे या उपनिषदातुन घेतलेले असावे), तर पुराणांमधील व इस्कॉनमधील मंत्र 'हरे कृष्ण' पासुन सुरु होतो.मुळ मुद्दा हा आहे की रशियन मधे मंदिरासाठी असलेला 'ह्राम' हा शब्द 'हरे राम' पासुन आलेला आहे.
चिन्या, <<मु
चिन्या,
<<मुळ मुद्दा हा आहे की रशियन मधे मंदिरासाठी असलेला 'ह्राम' हा शब्द 'हरे राम' पासुन आलेला आहे.>>
तुला मंदिर म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे?
आणि 'ह्राम' शब्दाच्या ह्या व्युत्पत्तीला आधार काय?
हे विचारण्याचं कारण म्हणजे माझ्या मते ही व्युत्पत्ती तू सांगतोस त्याच्या एकदम विरुद्ध आहे..
चिनॉक्स,तु
चिनॉक्स,तुझ्यामते व्युत्पत्ती कुठे आहे???
मंदिर म्हणजे मंदिरच अपेक्षित आहे. चर्चला इथे त्सेर्कव्ह म्हणतात.
चिन्या, 'ह्
चिन्या,
'ह्राम' म्हणजे हिंदूंचं मंदिर हा अतिशय संकुचित अर्थ तू गृहित धरला आहेस. निदान तुझ्या वरील पोस्टमुळे तरी तसंच वाटतं. खातरजमा करून घेण्यासाठीच तुला विचारलं होतं.
तुझ्या वरील २-३ पोस्ट्सपैकी एकही विधान योग्य नाही. मी आधी म्हटल्याप्रमाणे 'ह्राम' हा स्लाविक शब्द आहे.
आता 'ह्राम' या शब्दाची व्युत्पत्ती...
कॉप्टीक (प्राचीन इजिप्शियन) भाषेत pira-mona म्हणजे splendour of sun..पिरमिड्सचा आकार हा सूर्यकिरणांसारखा होता, म्हणून हे नाव. या कॉप्टीक pira-monaवरून ग्रीक pyramid तयार झाला. pyr म्हणजे अग्नी, amis म्हनजे भांडं.
अरबी भाषेत 'हर्म' म्हणजे 'म्हातारपण'. ही पिरमिड्स जुनी आणि म्हातारपणानंतर तिथे जावं लागतं म्हणून या पिरमिड्ससाठी अरबी शब्द तयार झाला 'एहराम'. त्यावरून आला 'हरम' हा शब्द, म्हणजे 'पवित्र स्थळ'. आता अरबी भाषेत 'बिर्बा' असा शब्द आहे. याचा अर्थ 'पवित्र स्थळ, उपासनेची जागा, म्हणजेच मंदिर'. 'बिर्बा'चं अनेकवचन 'बिर्बीस'. या 'बिर्बीस्'चं एक रूप म्हणजे 'पिरामीस' असंही मानतात. असो.
तर अरबी भाषेत 'हरम' म्हणजे 'पवित्र स्थळ अथवा उपासनेची जागा'. मक्का-मदीनेला 'अल्-हरमान' म्हणतात. जेरुसालेमचं एक प्राचीन नाव 'थालिथ-अल्-हरमान' असं आहे. 'मुहर्रम' म्हणजे 'पवित्र महिना'. 'बाईत अल्-हरम' म्हणजे 'पवित्र घर', अर्थात 'काबा'.
तर 'एहराम'मुळे तयार झाला 'हरम' आणि त्याचाच भाऊ 'ह्राम'. सगळीच प्रार्थना स्थळं.
आता आपण 'मंदिर' म्हणजे काय ते बघू. Temple म्हणजे उपासनेची पवित्र जागा. इस्लाम व western christianity वगळता हा शब्द जवळजवळ सर्वच धर्मात वापरला जातो. यावर हिंदू धर्माची मक्तेदारी मुळीच नाही. कन्फुशियन, ज्यू, बहाई, शिन्तो, ताओ या धर्मांत 'मंदिर' हाच शब्द वापरतात. जुन्या रोमन व इजिप्शियन मंदिरांबद्दल इतिहासात केवढं लिहून ठेवलं आहे. ज्यू धर्माच्या समजूतीनुसार देवाने जिथे आदम तयार केला , त्या जागेला इंग्रजीत ' The Temple Mount' असं म्हणतात. अरबी नाव आहे 'अल्-हरम अश्-शरीफ'.
कॅथलिक पंथापासून आपलं वेगळेपण राखण्यासाठी eastern orthodox church स्वतःला temple, म्हणजे मंदिर असं म्हणवून घेतं. उदा. बेलग्रेडमधील Temple of Saint Sava. या 'मंदिराचं' स्थानिक नाव आहे 'Hram Svetog Save'.
Pagan परंपरेतसुद्धा temple/मंदिर हाच शब्द वापरतात. आणि अशी अनेक मंदिरं रशिया, स्लोवेनिया, बल्गेरिया, क्रोएशिआ, सर्बिया इ. देशांत आहेत. नंतर त्यांच्यावर कॅथलिकांनी हक्क सांगितला तरी त्यांची जुनी नावं अजूनही प्रचलित आहेत. त्यांना 'ह्राम' असंच म्हटलं जातं. किंबहूना चर्च व मशीद नसलेली प्रत्येक उपासनेची जागा 'ह्राम' या नावाने ओळखली जाते. उदा. बल्गेरियातील St Alexander Nevski Cathedral (Hram-pametnik Aleksander Nevski).
रशियन भाषेतील 'ह्राम'चा हिंदू मंदिराशी संबंध जोडणं चूक आहे. 'हरे राम'मधील 'रे' वगळून 'ह्राम' तयार झाला, हे कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला तरी संभवत नाही. 'हरम' आणि 'ह्राम' हे शब्द अनेक भाषा, धर्म व संस्कृतींत 'पवित्र, उपासनेची जागा' या अर्थी हजारो वर्षांपासून प्रचलित आहेत.
तात्पर्य, 'ह्राम' या शब्दाचा रामाशी, उपनिषदांशी, प्रभूपादांशी काडीमात्र संबंध नाही.
त्याची उगमस्थळं आहेत 'एहराम' आणि 'हरम' हे अरबी शब्दं.
ता.क. उझबेकी भाषेत 'ह्राम'चा अर्थ बघ. किंवा 'बोरात' बघ. झीट येऊन पडशील.
ह्राम
ह्राम म्हणजे हिंदु मंदिर अस मी कुठेही म्हटलेल नाहीये.ह्राम म्हणजे मंदिर.कधीकधी ख्रिश्चन्स्च्या छोट्या धर्मस्थळालाही ह्राम म्हणतात. ज्याप्रमाणे इतर अनेक रशियन शब्द संस्कृतोत्पन्न आहेत त्याप्रमाणे हाही आहे असे मला सांगण्यात आले होते.मी काही या क्षेत्रातला तज्ञ नाही. आणि सांगणारा माणुसही इस्कॉनवाला नव्हता त्यामुळे त्याने सांगितलेले बरोबर असेल असे वाटले होते.बाकी मी दिलेल्या २ लिंक्स पाहील्या का???त्याबद्दल काय मत आहे???रशियन भाषा संस्कृत पासुन आलेली आहे असे इथले काही भाषातज्ञ म्हणतात त्याबद्दल काय मत आहे(हे भाषातज्ञ इस्कॉनशी संबंधित नाहीत).
तुझ्या वरील २-३ पोस्ट्सपैकी एकही विधान योग्य नाही
अजुन कुठली विधाने चुकली आहेत???
<<मंदिर
<<मंदिर म्हणजे मंदिरच अपेक्षित आहे. चर्चला इथे त्सेर्कव्ह म्हणतात.<<>>
यात कुठेही तू इतर धर्मस्थळांचा उल्लेख केलेला नाहीस. त्यामुळे मंदिर म्हणजे 'हिन्दुंचे मंदिर' असाच ग्रह होतो.
तू दिलेल्या लिंक्स पहिल्या. त्यांत 'ह्राम' कुठेही नाही. संस्कृतचा जगातील अनेक भाषांशी संबंध आहे. सगळ्या युरोपियन भाषांत संस्कृतोद्भव शब्द सापडतील. अगदी एस्पेरान्तोसारख्या 'तयार केलेल्या' व कम्युनिस्टांची समजल्या जाणार्या भाषेतसुद्धा.
मी त्यावर कधीच आक्षेप घेतलेला नाही. उलट माझे इतर काही पोस्टस बघितलेस तर मी संस्कृत व इतर भाषांबद्दल लिहिलं आहे.
इथे चर्चा 'ह्राम' या शब्दाबद्दल सुरू होती, आणि सगळे संदर्भसुद्धा त्याच्याशीच निगडीत आहेत.
<मंदिर म्हणजे मंदिर> व क्ष यांना उत्तर देताना केलेलं <मुळ मुद्दा हा आहे की रशियन मधे मंदिरासाठी असलेला 'ह्राम' हा शब्द 'हरे राम' पासुन आलेला आहे.>
या दोन विधानांवर मी आक्षेप घेतला.
<कधीकधी ख्रिश्चन्स्च्या छोट्या धर्मस्थळालाही ह्राम म्हणतात<>
हेही बरोबर नाही. 'ह्राम'चा आणि आकारमानाचा काहीही संबंध नाही. कॅथलिक चर्चला 'मंदिर', temple, 'ह्राम' म्हणत नाहीत. हे सगळं त्या पंथावर अवलंबून आहे.
कॅथलिक
कॅथलिक चर्च फारसे नाहीत रशियात. छोटे चर्चेस (ऑर्थोडॉक्स) म्हणजे एका खोलिचे ,त्यांना त्सेर्कव्ह न म्हणता ह्राम म्हणतात. ह्राम हा शब्द ख्रिश्चन धर्मस्थळांशीही संबंधित आहे रशियात.तुम्हाला विश्वास नसेल तर फोटो काढुन पाठवतो ख्रिश्चन ह्राम्सचा.ख्रिश्चन कधी ह्राम आणि कधी त्सेर्कव्ह म्हणतात हे माहीत नाही.त्यांना विचारावे लागेल्.मुळात इथले रशियन कॅथलिक्सना परधर्मिय मानतात व कॅथलिक्स कमी आहेत. मंदिर म्हणजे हिंदुच नसते. मंदिर इतर धर्मियांच्या धर्मस्थळालाही म्हणतात. पेगन्सची मंदिरेच असत्.काबा हेही एक पेगन्सचे मंदिर होते म्हणतात.
चिन्या, अरे
चिन्या,
अरे मीच सांगितलेलं मलाच काय परत सांगतो आहेस?
<छोटे चर्चेस (ऑर्थोडॉक्स) म्हणजे एका खोलिचे ,त्यांना त्सेर्कव्ह न म्हणता ह्राम म्हणता<>
याचा खोलीशी संबंध नाही. ते orthodox असण्याशी आहे. हे मी वर लिहिलं आहे.
तू या पोस्ट्मधे केलेली कही विधानं माझीच आहेत.
<ह्राम हा शब्द ख्रिश्चन धर्मस्थळांशीही संबंधित आहे रशियात.तुम्हाला विश्वास नसेल तर फोटो काढुन पाठवतो ख्रिश्चन ह्राम्सचा.>
फोटो कशाला, मी तुला त्यांची नावंच दिली आहेत.
'ह्राम्'चा आणि हरे रामचा संबंध नाही ,त्याचा संबंध अरबांशी आहे हे मला सांगायचे होते.
बाकी मंदिरांबद्दलही मी आधीच लिहिलं आहे.
Oops!!!!!!!!!लोचा
Oops!!!!!!!!!लोचा झाला की!!!!!!!!!
अहो तुम्ही इतके तपशील दिले ज्यात मला फारसा इंटरेस्ट नव्हता.म्हणुन मी वरवर वाचुन पुढच लिहिल.
दैरो हरम
दैरो हरम मे बसनेवालों
मयखानो मे फूट न डालो
---------------------------------------------------------------
-Man has no greater enemy than himself
<अहो
<अहो तुम्ही इतके तपशील दिले ज्यात मला फारसा इंटरेस्ट नव्हता.>
इंटरेस्ट नव्हता? अरे, तू एक विधान केलंस, त्याच्याशीच संबंधीत आहे सारं.
<आणि सांगणारा माणुसही इस्कॉनवाला नव्हता त्यामुळे त्याने सांगितलेले बरोबर असेल असे वाटले होते.>
म्हणजे इस्कॉन्वाले चूक.
असो. शब्दाचा उगम सापडला. आता एखादा नवीन शब्द शोध.
काय रे
काय रे गिरी, तू सुद्धा सगळ्यांना नामो"हरम" करण्याच्या नादी लागलास की काय
नाही बुवा!
नाही बुवा! मला 'हरम' ची व्युत्पत्ति कळली,इतकेच!
_________________________
-Man has no greater enemy than himself
Pages