हिवाळा आला !
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
26
मेंढ्यांवरी लोकर दाट भारी
थंडीस त्यांच्या बहू निवारी !
हूहू हू हू SSSSS कडकडकडकड SSSSSSS
- हिवाळा आला या चि. वि. जोशींच्या लेखाची सुरुवात.
या वर्षी हिवाळा जरा जास्तीच जाणवतो आहे. स्थानिक वेळेप्रमाणे आज सकाळी मायबोलीच्या मुख्यालयाबाहेरचं तापमान, डीग्री सेल्सियस मधे.
सालाबादप्रमाणे यंदाही आमचे येथे श्रीकृपेकरून सुतारपक्षी यांचे आगमन होऊन गेले. कुठलीही भूतदया न दाखवता, त्यांना हाकलून लावून भोके बुजवण्यात आली. माझ्या स्वत:च्या भवितव्यासाठी मी सुतारपक्षाच्या भावी कुटुंबाची वाट लावली याबद्दल पक्षीमित्रांची क्षमा मागतो आणि ते माझ्यावर दया दाखवतील अशी अपेक्षा करतो.
"Maayboli Is Cool" हे शब्दश: खरे ठरते आहे.
प्रकार:
शेअर करा
अजय.. इथे NJ मधे -१६ होतं
अजय.. इथे NJ मधे -१६ होतं काल..
मी तर इथे येवुन फक्त एक आठवडा झालाय त्यामुळे तर जास्तच गारठलेय ..
माफीनामा भारीय
इथे मायबोली इज कूल आणि
इथे मायबोली इज कूल आणि उपमुख्यालयात (कॅलिफोर्निया) मायबोली इज हॉट!
अजय
अजय
सकाळी साडे सात वाजता बॅटरी
सकाळी साडे सात वाजता बॅटरी ५०% पेक्षा कमी चार्ज कशी? रात्रभर मायबोलीवर टाइमपास करत होता की काय?
रजनी सरांना, फ्रीजचा दरवजा
रजनी सरांना,
फ्रीजचा दरवजा बंद करायला सांगा...फरक नक्की जाणवेल.
सुतार पक्षी आमच्या घरी पण येऊ
सुतार पक्षी आमच्या घरी पण येऊ लागलाय गेल्या वर्षीपासून. भोके नाही पाडली पण चिमणीवर बसून जोरात टर्र्र्र्र्र्र्र्र्र्र आवाज करतो थोड्या थोड्या वेळाने! आख्खं घर हादरतं त्या आवाजाने! माद्यांना त्या ड्रिलिंग सारख्या आवाजाने अट्रॅक्ट करतात म्हणे ते!
हाकलायला शेवटी कुठला उपाय
हाकलायला शेवटी कुठला उपाय लागू पडला?
माद्यांना त्या ड्रिलिंग
माद्यांना त्या ड्रिलिंग सारख्या आवाजाने अट्रॅक्ट करतात म्हणे ते!>>>>> हे बाकी छान सोप्पं केलं बघा निसर्गाने सुतारबुवांकरता. बेस्ट!
हाकलायला शेवटी कुठला उपाय लागू पडला>>>>> जास्तीच ड्र्ड्रिलिंग केलं असेल त्याने आक्का, सुतारबाईंनीच बोअर झालं म्हणून हाकलून दिलं असेल.
>> हे बाकी छान सोप्पं केलं
>> हे बाकी छान सोप्पं केलं बघा निसर्गाने सुतारबुवांकरता.
का हो बुवा, माणूसबुवांना त्यासाठी फार कष्ट पडतात का?
तर मग! तुम्हाला नाही कळायचं
तर मग! तुम्हाला नाही कळायचं बाई.
(अजय म्हणतील विषय काय, बोलताय काय!...)
>>सकाळी साडे सात वाजता बॅटरी
>>सकाळी साडे सात वाजता बॅटरी ५०% पेक्षा कमी चार्ज कशी? रात्रभर मायबोलीवर टाइमपास करत होता की काय? >> त्यांच्या नशिबात कुठला आलाय टाईमपास? सारखी झाडलोट करायचं काम त्यांच्याकडे.
बुवा, -१८ व्होडका साठवायला
बुवा,
-१८ व्होडका साठवायला चांगलं तापमान अस्तं म्हणे. फ्रीजरमधे जागाही अडत नाही.
अजय यांना नक्की
अजय यांना नक्की मुख्यालयाबाहेरच्या थंडीची तक्रार करायची आहे की सुतार पक्ष्याची?
कसलीही तक्रार नाही, मायबोली
कसलीही तक्रार नाही, मायबोली कूल असल्याची जाहिरात करायची आहे.
>> -१८ व्होडका साठवायला
>> -१८ व्होडका साठवायला चांगलं तापमान अस्तं म्हणे.
प्यायलाही.
>>प्यायलाही. होहो.
>>प्यायलाही.
होहो. सुतारपक्षाला हाकलल्यामुळे ग्रे गूस तेवढी आणू नये.
अजय म्हणतील विषय काय, बोलताय
अजय म्हणतील विषय काय, बोलताय काय!..>>
आहो खुद्द मायबोली संस्थापक असं कसं म्हणतील? इतक्या वर्षात सवय झालीच असेल ना त्यांना
सालाबादप्रमाणे यंदाही >> तरी
सालाबादप्रमाणे यंदाही >> तरी अजून तुम्ही ( मराठी वर्तमानपत्रातील वृत्त्कवींप्रमाणे ) कविता पाडली नाहीत हे काही बरोबर नाही .
किटकिट करतो बाई सुतार
याच्या साठी सुचवा गं उतार
असं काही तरी लिहायचं की
त्यांनी कविता केल्या तर लोकं
त्यांनी कविता केल्या तर लोकं वृत्त मिसिंग आहे, मुक्तछंदात का लिहिली वगैरे कटकट करतील म्हणून टाळली असेल
आला थंडीचा महिना, शेकोटी
आला थंडीचा महिना, शेकोटी पेट्वा. वगैरे जास्त कॅची टायटल झाल असत.
आमच्याकडे येत्या दहा दिवसात तापमानाची रेंज -७ (सेल्सिअस) पासून २० पर्यंत आहे. feels like काय्पण असू शकते. एक दिवस तर स्नो पण पडनार आहे.
आज आईस-बर्ग मधून मार्ग काठत
आज आईस-बर्ग मधून मार्ग काठत ऑफिसला गाठलं.....
पोलार-व्हर्टेक्सच्या वेळी पार वाट लागली होती.. वॉटर ट्रॅफिक जॅम झाला होता....त्या मानाने आज -१८ ला ईतका गोठलं नव्हत....माझा मॅनेजर सांगत होता...तो एकेकाळी ब्रूकलिन वरुन चालत आलाय गोठलेल्या बर्फावरुन...
आला थंडीचा महिना, शेकोटी
आला थंडीचा महिना, शेकोटी पेट्वा >>> आता व्होडकाबरोबर लावणी पण सादर करतील का ?
मोस्टली सनी आणि तापमान एवढे
मोस्टली सनी आणि तापमान एवढे कमी.
प्रतिसादांमुळे हा बाफदेखिल
प्रतिसादांमुळे हा बाफदेखिल पण विनोदी बाफात टाकावा लागणार.
झकासराव .. गेला आठवडा असाच
झकासराव .. गेला आठवडा असाच आहे .. सुर्य ७ ला येतो बाहेर ..टाईमपास करतो नि जातो ५ ला परत
यंदाचा अमेरिक्न हिवाळा बेस्ड
यंदाचा अमेरिक्न हिवाळा बेस्ड मुक्तपीठ लिवा की कुणीतरी.