Submitted by वेल on 21 January, 2014 - 09:46
अॅलोपथी मधल्या पेन किलर्स बद्दल अनेक समज गैरसमज आहेत. त्यातले दोन मुख्य -
१. कोणत्याही दुखण्यावर वेदनेवर पेन किलर्स घ्यावेत, त्याने असलेला त्रास बरा होतो. पेन किलर्स स्वतःच्या मनाप्रमाणे घेतले तरी चालतात.
२. पेन किलर्स घेऊ नयेत. सवय लागते. त्याने किडनी इत्यादीवर परिणाम होतो.
ज्यांना वाटते पेन किलर्स हा सर्व दुखण्यांवर उपाय आहे ते डॉना न विचारता पेन किलर्स घेतात.
आणि ज्यांना वाटते पेन किलर्स कधीही घेऊ नयेत ते लोक डॉने सांगितले तरी पेन किलर्स घेत नाहीत.
माबो वरच्या डॉ.नी पेन किलर्सबद्दल अधिक माहिती द्यावी ही विनंती.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या विषयावर डॉ ईब्लीस यांनि
ह्या विषयावर डॉ ईब्लीस यांनि नक्की लिहावे प्लीज. म्हणजे मी ते आमच्या घरच्यान्ना दाखवीन.
माझ्या सासुबाई ८५ वर्ष्यान्च्या आहेत. ८ बाळन्तपणे झालेली आहेत. त्यान्चे कटिप्रदेशातील सगळे स्नायु प्रचण्ड दुखत असतात. पण घरातुन त्याना पेन किलर्स घेऊ देण्याबाबत खूप विरोध आहे, जरी एका डॉ नी लिहुन दीलेत तरिही. कारण काय तर "सवय लागेल.."
मला वाटते कि काय हरकत आहे त्यानी पेन किलर्स घ्यायला? जितके शिल्लक आहेत तितके दीवस तरी बरे जाऊ देत ना.. त्या खूप ऊत्साही आहेत पण सतत या वेदनाम्च्या दुष्ट चक्रात अडकलेल्या असतात.
पॅथी कोणतीही असो. डॉ च्या
पॅथी कोणतीही असो. डॉ च्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत. तीदेखील त्यांनी सांगितलेल्या मुदतीपर्यंतच! सर्व पथ्ये पाळून्च!
गुण नाही आला तर पुन्हा तपासून घ्यावे.
याच विषयावर लेख आला होता
याच विषयावर लेख आला होता लोकसत्तामध्ये त्याची link देतेय.
http://www.loksatta.com/health-it-news/takeing-painkiller-be-careful-346...
मला पेन किलर बद्दल कोणता ही
मला पेन किलर बद्दल कोणता ही problem नव्हता प्रत्येक महिन्याल त्या दिवशी एक घ्याविच लागायची पण
एकदा किडनी वर सुज आली ८ दिवस प्रचंअड दुखले आता मात्र बंद आहे
सो पेन किलर घ्या पण त्याचे दुशपरीणाम लक्षात घेउनच
माझा नवरा 'सवय लागेल' या मोड मधे असतो कायम
स्वतःच्या मनाने कोणतेही औषध
स्वतःच्या मनाने कोणतेही औषध घेणे आणि मनानेच बंद करने हे चूकच. त्याचे दुश्परिणाम होऊ शकतात. परंतु डॉ ने सांगितलेले असताना न घेणे आणि डॉ ला न सांगता बंद करणे हे चूक. कोणत्याही औषधाचे दुष्परिणाम जाणवत असल्यास केवळ औषध बंद करण्यापेक्षा त्यासोबत डॉचा सल्ला घेणे योग्य.
वेदना शामक औषधे फक्त वेदना शमन करत नाहीत, त्याचे चांगले परिणामही असतात. जसे अॅण्टिइन्फ्लमेशन. माबो वरील डॉनी ह्याबद्दल लिहिल्यास आपल्या मनातील समज गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
वेदना शामक औषधे फक्त वेदना
वेदना शामक औषधे फक्त वेदना शमन करत नाहीत, त्याचे चांगले परिणामही असता>+१
पेन किलर घ्या पण दुष्परिणाम
पेन किलर घ्या पण दुष्परिणाम लक्षात घेवून.हे १०० % खरे आहे... बर्याच वेळेस असे होते की डॉक्टर सांगत नाहीत साइड इफेक्ट बद्दल ..स्वानुभव...बाबांना दिल्या होत्या..पण kidney functioning वर परिणाम झाला आणि कळले तेव्हा खूप उशीर झाला होता.
सहसा मी ही गोळ्या घेण्याच्या
सहसा मी ही गोळ्या घेण्याच्या विरुद्ध च असतो.
म्हणून आम्ल पित्त असेल तर कोकम सरबत, आवला सरबत,आणी अतीच झालं तर मग डायजीन,
डोके दुखी ला कोमट पाण्यासोबत १ चिमूट मिठ. मग बाम तरीही त्रास असेल तर डिस्प्रिन.
हे बरोबर आहे का?
डोके दुखी वर नेहमी, झंडू बाम अम्रुतांजन इ. लावलेत तर त्याची ही सवय लागते का?
म्हणून आम्ल पित्त असेल तर
म्हणून आम्ल पित्त असेल तर कोकम सरबत, आवला सरबत,आणी अतीच झालं तर >>>>>
एक न्यूट्रिशियनने सांगितलेला उपाय...रात्री१०-१२ काळ्या मनुका धुवून पाण्यात भिजत घालायच्या.दुसर्या दिवशी उठल्यावर,मनुकांवरचे पाणी प्यायचे व मनुका बियांसकट चावून खायच्या.डायबिटीस पेशंटलाही हा उपाय चालतो. मैत्रिणीला हाउपाय मानवला आहे.