पुन्हा फुटकळ

Submitted by विजय दिनकर पाटील on 20 January, 2014 - 00:36

नवीन स्वतंत्र धागा झाल्यामुळे धागा संपादित केला आहे. स्वतंत्र धाग्याबद्दल आभार डॉक्टर!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कडाक्याचा इरादा ठीक नाही
तिरिप येतेय छोटी हे जमेचे

वा.

विजयः एक धागा उघडता येऊ शकतो,
जिथे जो तो जमेल तसे फुटकर शेर देऊ शकेल.
अर्थातच ही नुसती कल्पना आहे, चालेल की नाही पहावे लागेल.

मस्त कल्पना आहे समीर. चालेलच, अर्थात गझलकारांनी स्वतःहून त्यात अ‍ॅडीशन्स करत गेले पाहिजे. भन्नाट कलेक्शन होऊ शकते.

तीनही आवडले
समीरजींचा शेरही फार आवडला
धन्यवाद

कल्पना छान आहेच पण वेगळा धागा सुरू करायचा की हा आहे त्यातच अ‍ॅडिशन्स चालतील ?

माझा एक शेर देवून ठेवतो...

दिलीस जी वेदना तिचा मी असा बनवलाय पारवा
अता तिचा हुंदका जराही घुमून येईल तर शपथ

परिपुर्र्ण गझल वाचताना जी मजा येत ती फुटकळ मधे नाही

खरे आहे. पण परिपूर्ण अश्या गझला मराठीत बोटावर मोजण्या इतक्याच आहेत.
अगदी उर्दूतही मीर-गालिब ह्यांच्या अत्यंल्प गझला परिपूर्ण आहेत. तरीही आपण त्यांचे लिखाण वाचतोच की.
असो, बाकी चालु द्या मधील बाकी अत्यंत महत्त्वाचे आहे.
कारण फुटकर च्या रस्त्यावरूनच परिपूर्ण गझलेला जाता येते हे विसरता कामा नये.

बाकी चालु द्या !<<<

मुक्तेश्वर, तुम्हाला उद्देशून नव्हे, पण मला व्यक्तीशः 'बाकी चालुद्या' ह्या फ्रेजचा प्रचंड राग येतो. बाकी चालूद्या म्हणणारे काय परवानगी बिरवानगी देतात की काय येथे लिहायला? उगाच अ‍ॅडमीनच्या थाटात 'बाकी चालूद्या' म्हणायचे?

बाकी चालूद्या म्हणणार्‍यांचे काही चाललेलेच नसते आणि चालतच नसते म्हणून ते ज्यांचे काहीतरी चाललेले आहे त्यांना बाकी चालूद्या म्हणतात याउप्पर काही नाही.

समीर आणि बेफिंशी सहमत!

मुक्तेश्वरचा प्रतिसाद इंटेशनल नसावा असे मला त्याच्या मायबोलीवरच्या एकंदरीत वावरावरून वाटत आहे त्यामुळे त्याने अनावधानाने लिहिलेल्या प्रतिसादावर पुन्हा कॉमेंट करत नाहीये.

परीपूर्ण गझल सोडा, एक परीपूर्ण शेर लिहिताना शायराचे काय काय होते ही सांगून समजण्याची गोष्ट नाही.

बापरे फार गहजब झाला एवढ्या वाक्याने !
मला परिपूर्ण म्हणजे कमीत कमी ५ शेर असे म्हणायचे होते.

बाकी चालु द्या एवढ्याच साठी होते की एकाचा एक मतला दुसर्याचा दुसरा त्यामुळे थोडेसे खटकत होते. जर त्या फुटक्ळ वरुन पुढे कोणी त्याच लयीत गझली लिहीली तर आवडलेच असत.

बाकी चालु द्या :P: