अॅन्ड्रॉईड बद्दल बरेच काही छान चांगल्यागोष्टी आहेत
मी सुध्दा अॅन्ड्रॉईड फोन घेतला.. सुरुवातीला अतिशय कंटाळा आलेला काय ही ब्याद गळ्यात आहे म्हणुन पण जेव्हा त्यात इंटरनेट चालु करुन घेतले आणि मार्केट मधुन एक एक अप्लिकेशन्स डाउनलोड केले मग काही चांगला वाटला... फार उपयोगी काही app. आहेत
त्यातले काही खालील प्रमाने.. :
super security beta 1.23 ;- हा अँटीवायरस प्रोग्राम आहे... स्कॅन करतो..मेलवेअर, हायरिस्क app. कोणती आहेत हे सुध्दा सांगतो..तसेच त्यात एक स्ट्राँगबॉक्स म्हणुन आहे त्यात आपन पासवर्ड वापरुन आपले फोटो विडिओ एसएमएस साठवु शकतो..मुख्य म्हणजे जे काही आपण यात टाकले ते बाहेर गॅलरीत दिसत नाही..
आणि जो पासवर्ड असतो तो आपल्या इमेल वर मेल म्हणुन येतो..म्हणजे विसरलात तरी प्रोब्लेम नाही..
Android assistant :- app. अनइन्स्टोल करणे.. फोन मेमरी मोकळी करणे. cache cleaner Volume control इत्यादी यात सहज पणे करता येते file manager सुध्दा यात आहे जो आपल्याला फोन मधे उपलब्ध नसतो..
sms blocker :- हा अत्यंत उपयोगी app. आहे... आपल्याला नको असलेले नंबरांवरुन जे मेसेज येतात त्यांचा नंबर यात टाकला की आपल्याला त्यावरुन मेसेज येतच नाहीत हा app. ते ब्लॉक करुन टाकतो
m-indicator :- आपल्याला लोकल्स ट्रेन किती वाजता ची आहे हे कळण्यासाठी उपयोगी आहे..त्याच बरोबर यात बस चे नंबर सुध्दा आहे त्याचे रस्ते सुध्दा कळतात.. मेगा ब्लॉक्स ची माहीती मेसेज वरुन आपल्याला कळते..
camscanner :- कागद पत्रांचे पीडीफ मधे रुपांतर यात करु शकतात... जर आपल्या कडे स्कॅनर नाही तर आपण कागद समोर ठेउन त्याच्या या app. ने फोटो काढायचा आणि तो मस्त पैकी साफसुफ करुन हा पीडीफ स्वरुपात आपल्या समोर ठेवतो.. अतिशय स्पष्ट लिहिलेले दिसते यातुन..
flashlight :- आपल्या मोबाइल चा टोर्च म्हणुन उपयोग करण्यासाठी हा app. वापरात येतो.. लाइट कमी जास्त करन्याची सुध्दा सोय आहे यात.
Net Counter - नेट वापरताना किती डेटा वापर होतो याची नोंद मिळते.
Battery Doctor - कोणत्या अॅप साठी बॅटरी जास्त वापरली जाते हे कळते. त्यानुसार ते अॅप बंद करता येतात. पर्यायाने बॅटरी लाईफ वाढवता येते.
ES File Explorer - file/folder management साठी उत्तम.
Go Launcher - सुंदर UI Themes. ह्याच्या स्वतःच्या Themes छान आहेत. एक iPhone सारखी Theme पण आहे.
GPS Essentials - GPS Tracking साठी
Indian Rail - Online inquiry / train timings / seat availability साठी
Offline Dictionary - ह्यात Dictionary बरोबर language translation पण आहे - ते सुद्धा offline. पण मोठ्या-मोठ्या database files एकदा(च) download कराव्या लागतात.
LBE Privacy Guard - हा firewall चे काम करतो. [पण ह्यासाठी root access हवा.]
Photo Tools by hcpl: विविध छायाचित्रणासंबंधी गणकयंत्रे
PhotoFunia: छायाचित्रणासाठी व नंतर प्रोसेसिंग साठी लागणार्या करामती...
App 2 SD (move app to SD);- आपले फोन मधले अॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे जमा करते त्या मुळे फोन मेमरी फ्री राहते आणि जास्त जागा मोकळी राहाते
Photo Art - Color Effects = मस्त आहे हे.....अॅप्लिकेशन...एक विशिष्ट रंग कायम ठेवुन बाकीचे रंग रंगविरहित करता येतात फोटो मधले
पॉवरलाईन : २ (चकटफू व्हर्जन) किंवा अधिक (१.५ $ला) गोष्टी आडवी रेघ वापरून दाखवते. जसे की बॅटरी, सीपीयू वर्कलोड वगैरे. साधे, अवाजवी जागा न व्यापणारे असे अॅप आहे.
fm radio india :- नावाचे एक छान अॅप आहे ऑनलाइन रेडिओ ऐकण्यासाठी. भरपूर चॅनेल्स आहेत रेडिओची त्यावर. एक मराठी गाण्यांचेही चॅनेल आहे. मला आवडलं अॅप. ट्राय करून पहा
Stuck on Earth :- भटक्यांसाठी बेस्ट अॅप....यात तूम्हि तूमची ट्रीप प्लॅन करु शकतात....तिठल्या ठिकाणांचे लोकांनी काढलेले फोटो पाहू शकतात आणि बरच काही....
TripAdvisor :-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फ्लईट्स, Things to do in city...
AppLock :- हे लॉक अॅप्लिकेशन आहे......यात तुम्ही हवे ते अॅप्लिकेशन, मेस्सेज, जीमेल व्हॉट्सप्प आणि इतर अॅप्लिकेशन लॉक करु शकतात... यात पासवर्ड ची सुविधा आहे..... अॅप्लिकेशन ओपन करताना पासवर्ड ची गरज लागते .
Distance calculator:- आपण किती चाललो याचा हिशोब ठेवणारे अॅप्लिकेशन
अरे व्वा, हुडा हुडा, कित्ती
अरे व्वा, हुडा हुडा, कित्ती कित्ती माहिती दिली आहेस, बरीच माहिती आहे की तुला
(सर्कारी बाबू ऐवजी तू मोबाईलइंजिनियर का नै झालास? )
लिम्ब्या कट अॅन्ड पेष्ट !!
लिम्ब्या कट अॅन्ड पेष्ट !!
४.३ जेलीबिन व्हर्जन रीलिज
४.३ जेलीबिन व्हर्जन रीलिज झालेले आहे...... आपापले फोन अपडेट करुन घ्या
उदयन अपडेट कसे करायचे?
उदयन अपडेट कसे करायचे? प्रत्येक मॉडेलसाठी वेगळी पद्धत आहे का?
सेटिंग्स मधे जाउन "about
सेटिंग्स मधे जाउन "about phone" मधे software update मधे जाउन चेकिंग करुन घ्या....... नविन सिस्टिम अपडेट आले का बघा
ओके. धन्यवाद उदयन
ओके. धन्यवाद उदयन
Paid apps free मधे download
Paid apps free मधे download करायला http://www.apkmania.com/ इथे जावा.
nityya map my india by Sygic
nityya map my india by Sygic download kar
https://play.google.com/store/apps/details?id=com.sygic.aura_mmi
offline nevigation karata yete internet lagat nahi.
<<व्हॉट्सप आता ४.० वर्जन आणि
<<व्हॉट्सप आता ४.० वर्जन आणि त्यापेक्षा जास्त वर्जन्स वर चालणार आहे....... माझ्या २.३ वर्जन वर सुध्दा बंद झाले म्हणुन तो विकुन झेड घेतला :खोखो>>
माझा सोनी एक्सपीरिया पी आहे. त्यावर २.३ आहे. व्हॉट्सप चालते आहे. खरे तर सिस्टीम अपडेट होतच नाहीये माझ्याकडे. माझ्या कडे २जी पॅक आहे इंटरनेटचा. वाय्फाय नाही आहे. म्हणून अपडेट होत नसेल का?
खरे तर सिस्टीम अपडेट होतच
खरे तर सिस्टीम अपडेट होतच नाहीये माझ्याकडे. माझ्या कडे २जी पॅक आहे इंटरनेटचा. वाय्फाय नाही आहे. म्हणून अपडेट होत नसेल का? >> हो
" गुगल नाऊ चे ओके गुगल" मोटो
" गुगल नाऊ चे ओके गुगल" मोटो जी मध्ये वापरतोय. सिरी पेक्षा व्हॉईस रिकगनिशन कितीतरी चांगल आहे, (आपल्या अॅक्सेंटला ).
हा फोन खरच फक्त १२००० चा वाटत नाही !! मिडरेंजचा वाटतो त्यामुळे त्याचे कॉम्पिटटर्स देखील गॅलक्सी s4, s4 मिनि, नेक्सच ४, ५ वगैरे रेंज मध्ये आहेत.
अर्थात मी माझा आयफोन रिप्लेस नाही करणार.
टेक्निकल गप्पांसोबतच
टेक्निकल गप्पांसोबतच आपल्याकडे असलेल्या उपयुक्त अॅप्स सुचवत चला, दोस्तहो.. नव्या अॅन्ड्रॉईडधारकांना त्याचा फायदा होईल.
त्या अश्विनीच्या
त्या अश्विनीच्या स्तोत्रान्च्या धाग्यासारखे, धाग्याच्या सुरवातील अॅप्सच्या पोस्टची माहिती द्या की सगळे अॅप्स वरती एकत्र लिहा ना. साताठ पाने कुठे धुन्दाळत बसायचे? कमीत कमी कशाबद्दल अॅप्स मिळू शकतात ते तरी कळेल.
बाकी गुगल प्ले कॉम्प्युटर वरुन अॅक्सेस करुन अॅप्स शोधुन ते तिथुनच मोबाईल वर उतरवायचे तन्त्र जमतय मला.
चेतन२११२, आवडलं sygic. अर्थात
चेतन२११२, आवडलं sygic. अर्थात इथे बसुन भारतातलं जिपीएस नाही वापरता येत, पण ते होईल ही खात्री आहे. इथे काही लोकांना सांगीतलं, तर विश्वासच बसला नाही.
धन्यवाद शेअर केल्याबद्दल.
लिंबुभाउ..........मी वर कसे
लिंबुभाउ..........मी वर कसे लिहिणार ????????? आयडी ब्लॉक नाही का
प्लेस्टोअर मधे एक्स्पेन्स
प्लेस्टोअर मधे एक्स्पेन्स मॅनेजर म्हणुन छान अॅप आहे. आपला दररोजचा जमा-खर्च त्यात नोंद करता येतो. ऑनलाईन डाटा बॅकअप ची देखिल सुवीधा आहे. सेव्हींग्ज अकाऊंटमधे पैसे नक्की का वाढत नाहीत याचा शोध घेण्यासाठी बेस्ट अॅप. महिन्याच्या शेवटी झालेला खर्च बघून डोळ्याची बुब्बूळे पांढरी होतात
प्रसिक, करुन बघितले, पण सवय
प्रसिक, करुन बघितले, पण सवय काही सुटत नाही. दारूपेक्षा भारी व्यसन आहे हे
पण ज्यांना डायरी लिहायची सवय आहे, त्यांच्यासाठी उत्तम. डायरी-पेन शोधाशोध करायची गरज नाही.
मी एक महिना वापरले ते
मी एक महिना वापरले ते अॅप्लिकेशन............नंतर डिलीट केले.........उगाच ... मनस्ताप
>>> आयडी ब्लॉक नाही का <<<
>>> आयडी ब्लॉक नाही का <<< अरे त्याचा काय संबंध? तुझी पहिली धागानिर्मितीची पोस्ट तू पुन्हा संपादित करू शकतोसच की!
ते काही नाही, त्या के अश्विनीच्या स्तोत्रान्च्या धाग्यावर जाऊन बघ, (निदान त्या निमित्ताने तरी तुझा देवाधर्माशी थोडाफार पान्ढर्यावर काळा इतका संबंध येईल ) तिला विचार कसे करते ते, अन इथेही कर
निदान त्या निमित्ताने तरी
निदान त्या निमित्ताने तरी तुझा देवाधर्माशी थोडाफार पान्ढर्यावर काळा इतका संबंध येईल >>>
.
.
.
.
.
.
२००
पुन्हा संपादित करू शकतोसच की!
पुन्हा संपादित करू शकतोसच की! >>>>>>>> ऐकावे ते नवलच
देवाधर्माशी थोडाफार पान्ढर्यावर काळा इतका संबंध येईल >>>> मी सकाळी आरशात बघतो तेव्हाच देवाशी संबंध येतो... इतरत्र बघायची मग गरजच नाही
गिरी...........माझ्या नंबर मारलास ?
लिंबू, अहो धागाकर्ता आणि
लिंबू, अहो धागाकर्ता आणि प्रतिसाद देणारा उदयन एकच असला तरी धागाकर्ता आयडी 'उदयन.' (एकच टिंब) आणि प्रतिसाद देणारा आयडी 'उदयन..' (दोन टिंब) आहे. त्यामुळे त्याला हेडरमध्ये अपडेट करता येणार नाही.
टिंब... टिंब... टिंब...
टिंब... टिंब... टिंब... (हरीच्या चालीवर) इतकच काय करु शकतो तो.
मगास पासुन तेच समजावुन सांगत
मगास पासुन तेच समजावुन सांगत आहे त्यांना......
उदयन, तू अॅडमिनना विचारुन बघ
उदयन, तू अॅडमिनना विचारुन बघ हेडर अपडेट करण्यासाठी काही सोल्युशन आहे का.
विचारलेले
विचारलेले आहे..................बघु रीप्लाय काय येतो
ओक्के अश्विनी, आता कळ्ळ, पण
ओक्के अश्विनी, आता कळ्ळ, पण मला चष्मा लावून ही ती एक की दोन टिम्बे नेमकी किती ते दिसत नव्हते
एक टिम्ब वर्सेस दोन टिम्बे????? अवघड आहे. दोन टिम्बेवाला उदयन, तू तुझ्या आयडीपुढे काहीच लावू नकोस बरे.
(पण मग माझ्याशी बुप्राबनुन पन्गा घेणारा उदयन नेमका कोणता? मला कसे कळणार? )
यत्र तत्र सर्वत्र मीच
यत्र तत्र सर्वत्र मीच लिंबुभाउ....... फक्त आयडी येगळा ... माणुस नाय बदलणार
४.३ जेलीबिन व्हर्जन रीलिज
४.३ जेलीबिन व्हर्जन रीलिज झालेले आहे...... आपापले फोन अपडेट करुन घ्या - घेतले. मस्त आहे. मेसेज मस्त दिसतात
अँडमिन यांच्या
अँडमिन यांच्या कृपेने.................
मायबोलीकरांनी इतर सुचवलेले अॅप्लिकेशन धाग्यात टाकता आले आहे
धन्यवाद
Pages