अ‍ॅन्ड्रॉईड आणि त्यांचे काही उपयोगी अ‍ॅप्लिकेशन्स..!!

Submitted by उदयन.. on 8 October, 2011 - 06:54

अ‍ॅन्ड्रॉईड बद्दल बरेच काही छान चांगल्यागोष्टी आहेत
मी सुध्दा अ‍ॅन्ड्रॉईड फोन घेतला.. सुरुवातीला अतिशय कंटाळा आलेला काय ही ब्याद गळ्यात आहे म्हणुन पण जेव्हा त्यात इंटरनेट चालु करुन घेतले आणि मार्केट मधुन एक एक अप्लिकेशन्स डाउनलोड केले मग काही चांगला वाटला... फार उपयोगी काही app. आहेत
त्यातले काही खालील प्रमाने.. :

super security beta 1.23 ;- हा अँटीवायरस प्रोग्राम आहे... स्कॅन करतो..मेलवेअर, हायरिस्क app. कोणती आहेत हे सुध्दा सांगतो..तसेच त्यात एक स्ट्राँगबॉक्स म्हणुन आहे त्यात आपन पासवर्ड वापरुन आपले फोटो विडिओ एसएमएस साठवु शकतो..मुख्य म्हणजे जे काही आपण यात टाकले ते बाहेर गॅलरीत दिसत नाही.. Happy
आणि जो पासवर्ड असतो तो आपल्या इमेल वर मेल म्हणुन येतो..म्हणजे विसरलात तरी प्रोब्लेम नाही.. Happy

Android assistant :- app. अनइन्स्टोल करणे.. फोन मेमरी मोकळी करणे. cache cleaner Volume control इत्यादी यात सहज पणे करता येते file manager सुध्दा यात आहे जो आपल्याला फोन मधे उपलब्ध नसतो..

sms blocker :- हा अत्यंत उपयोगी app. आहे... आपल्याला नको असलेले नंबरांवरुन जे मेसेज येतात त्यांचा नंबर यात टाकला की आपल्याला त्यावरुन मेसेज येतच नाहीत हा app. ते ब्लॉक करुन टाकतो

m-indicator :- आपल्याला लोकल्स ट्रेन किती वाजता ची आहे हे कळण्यासाठी उपयोगी आहे..त्याच बरोबर यात बस चे नंबर सुध्दा आहे त्याचे रस्ते सुध्दा कळतात.. मेगा ब्लॉक्स ची माहीती मेसेज वरुन आपल्याला कळते..

camscanner :- कागद पत्रांचे पीडीफ मधे रुपांतर यात करु शकतात... जर आपल्या कडे स्कॅनर नाही तर आपण कागद समोर ठेउन त्याच्या या app. ने फोटो काढायचा आणि तो मस्त पैकी साफसुफ करुन हा पीडीफ स्वरुपात आपल्या समोर ठेवतो.. अतिशय स्पष्ट लिहिलेले दिसते यातुन..

flashlight :- आपल्या मोबाइल चा टोर्च म्हणुन उपयोग करण्यासाठी हा app. वापरात येतो.. लाइट कमी जास्त करन्याची सुध्दा सोय आहे यात.

Net Counter - नेट वापरताना किती डेटा वापर होतो याची नोंद मिळते.

Battery Doctor - कोणत्या अ‍ॅप साठी बॅटरी जास्त वापरली जाते हे कळते. त्यानुसार ते अ‍ॅप बंद करता येतात. पर्यायाने बॅटरी लाईफ वाढवता येते.

ES File Explorer - file/folder management साठी उत्तम.

Go Launcher - सुंदर UI Themes. ह्याच्या स्वतःच्या Themes छान आहेत. एक iPhone सारखी Theme पण आहे.

GPS Essentials - GPS Tracking साठी

Indian Rail - Online inquiry / train timings / seat availability साठी

Offline Dictionary - ह्यात Dictionary बरोबर language translation पण आहे - ते सुद्धा offline. पण मोठ्या-मोठ्या database files एकदा(च) download कराव्या लागतात.

LBE Privacy Guard - हा firewall चे काम करतो. [पण ह्यासाठी root access हवा.]

Photo Tools by hcpl: विविध छायाचित्रणासंबंधी गणकयंत्रे

PhotoFunia: छायाचित्रणासाठी व नंतर प्रोसेसिंग साठी लागणार्‍या करामती...

App 2 SD (move app to SD);- आपले फोन मधले अ‍ॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे जमा करते त्या मुळे फोन मेमरी फ्री राहते आणि जास्त जागा मोकळी राहाते

Photo Art - Color Effects = मस्त आहे हे.....अ‍ॅप्लिकेशन...एक विशिष्ट रंग कायम ठेवुन बाकीचे रंग रंगविरहित करता येतात फोटो मधले

पॉवरलाईन : २ (चकटफू व्हर्जन) किंवा अधिक (१.५ $ला) गोष्टी आडवी रेघ वापरून दाखवते. जसे की बॅटरी, सीपीयू वर्कलोड वगैरे. साधे, अवाजवी जागा न व्यापणारे असे अ‍ॅप आहे.

fm radio india :- नावाचे एक छान अ‍ॅप आहे ऑनलाइन रेडिओ ऐकण्यासाठी. भरपूर चॅनेल्स आहेत रेडिओची त्यावर. एक मराठी गाण्यांचेही चॅनेल आहे. मला आवडलं अ‍ॅप. ट्राय करून पहा

Stuck on Earth :- भटक्यांसाठी बेस्ट अ‍ॅप....यात तूम्हि तूमची ट्रीप प्लॅन करु शकतात....तिठल्या ठिकाणांचे लोकांनी काढलेले फोटो पाहू शकतात आणि बरच काही....

TripAdvisor :-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फ्लईट्स, Things to do in city...

AppLock :- हे लॉक अ‍ॅप्लिकेशन आहे......यात तुम्ही हवे ते अ‍ॅप्लिकेशन, मेस्सेज, जीमेल व्हॉट्सप्प आणि इतर अ‍ॅप्लिकेशन लॉक करु शकतात... यात पासवर्ड ची सुविधा आहे..... अ‍ॅप्लिकेशन ओपन करताना पासवर्ड ची गरज लागते .

Distance calculator:- आपण किती चाललो याचा हिशोब ठेवणारे अ‍ॅप्लिकेशन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा हा मस्त धागा. Happy
माझ्याकडे फ्लॅशलाईट आणि m-indicator आहे. स्कॅनर उपयोगी वाटतय घालायला पाहिजे.
माझ्याकडे अजून असलेली अ‍ॅप्लिकेशन्स.
Net Counter - नेट वापरताना किती डेटा वापर होतो याची नोंद मिळते.
Battery Doctor - कोणत्या अ‍ॅप साठी बॅटरी जास्त वापरली जाते हे कळते. त्यानुसार ते अ‍ॅप बंद करता येतात. पर्यायाने बॅटरी लाईफ वाढवता येते.

गुगल स्काय - हे वापरुन तुम्हाला दिसत असलेला तारा (किंवा ग्रह) कोणता हे फोन त्या दिशेला वळवला की लगेच त्याचे नाव दिसते

अडव्हान्सड टास्क किलर ने बॅकग्राउंड्ला चाललेले प्रोग्राम्स बंद करता येतात. आधी माझी बॅटरी एक दिवसही चालायची नाही. आता दोन दिवस बिना चार्ज चा फ़ोन चालु असतो.
A.K Notepad app पण खुप सोयीच आहे. माझा लायब्ररीचा कोड वगैरे नेहमी लागणार्‍या नोट्स मी त्यात लिहुन ठेवते. त्या सगळ्या नोट्स फोन वरुन ई-मेल पण करता येतात.
Net Counter आणि camscanner वापरुन बघायला हवे.

मिनु आयफोन्स साठी चे धागा आहे अप्लिकेशन्स साठी http://www.maayboli.com/node/13483
इथे बघा............
धन्यवाद मंडळी
गुगल स्काय हे २.२ वर चालते बहुदा... २.१ वर नाही चालत... Sad

भुकंपच्या नोंदी देणारे एक अप्प्लिकेशन आहे ...... जगात कुठे कीती मोठा भुकंप झाला याची माहीती मिळते...स्पीड चांगला आहे...... म्यानमार ला झालेला भुकंप ची बातमी न्युज पेक्षा ५ मिनिट आधी मिळाली मला...... Happy

m-indicator मुंबईमध्ये रहाणा-यांसाठी अगदी उपयुक्त !

माझ्याकडचे काही apps -

  • ES File Explorer - file/folder management साठी उत्तम.
  • Go Launcher - सुंदर UI Themes. ह्याच्या स्वतःच्या Themes छान आहेत. एक iPhone सारखी Theme पण आहे.
  • GPS Essentials - GPS Tracking साठी
  • Indian Rail - Online inquiry / train timings / seat availability साठी
  • Offline Dictionary - ह्यात Dictionary बरोबर language translation पण आहे - ते सुद्धा offline. पण मोठ्या-मोठ्या database files एकदा(च) download कराव्या लागतात.
  • LBE Privacy Guard - हा firewall चे काम करतो. [पण ह्यासाठी root access हवा.]

वॉकींग किंवा एक्सरसाईज वर्कआउट साठी Noom चांगले आहे.
फ्री कॉलींग साठी Viber कुणी वापरले आहे का ? अनुभव ?

मग काय फायदा........... त्या पेक्षा JAXTR बरा........ समोरच्या कोणत्या ही मोबाइल वर मेसेज पाठवता येतो ....... जगातल्या कोणत्या ही फोन वर

माझ्यासारख्या छंदीष्ट छायाचित्रकारासाठी ...

Photo Tools by hcpl: विविध छायाचित्रणासंबंधी गणकयंत्रे
PhotoFunia: छायाचित्रणासाठी व नंतर प्रोसेसिंग साठी लागणार्‍या करामती...
PhotFluent: छायाचित्रणासाठी नवनव्या कल्पना आणि मार्गदर्शन देणारी माहीती.

गाडी आणि भटक्यांसाठी..

aCar by Armond Avanes
गाडीची देखभालीच्या नोंदी आणि आठवण करण्यासाठीचे स्मरण सूचना , पेट्रोल भरल्याची नोंद, सफरीची नोंद वगैरे साठी

My Car Locator
गाडी कूठे पार्क केली ते लक्षात ठेवते आणि नंतर नकाशा मार्फत आणून सोडते... (जीपीएस वापरते)

Latitude
फोन बाळगणारी व्यक्ती शोधण्यासाठी ... (जीपीएस वापरते)

Google Sky Map
.. मी ह्या अ‍ॅप वर फीदा आहे ..

जीपीएस तर बरेच आहेत... Navigation आणि TeleNav मी प्रामुख्याने वापरतो ...
Places वापरुन Google Map वापरता येतात म्हणजे प्रवासाची आखणी लॅपटॉप वर करून नकाशे तयार करायचे आणि प्रवासादरम्यान फोनवर वापरायचे

GasBuddy: अमेरिकेत उपयुक्त .. जवळपास स्वस्त इंधनासाठी

Trippo Mondo: भाषांतरासाठी .. भारतीय शिव्या ऐकुन घ्याव्यात ...

SimpleMoonPhase Widget: चंद्राच्या कला तारखेवार जाणण्यासाठी

ह्या सर्वांव्यतिरीक्त...

CamScanner: स्कॅन करण्यासाठी आणि पीडीएफ म्हणून वापरण्यासाठी...

Hide Record Free: महत्वाचे काहीही रेकॉर्ड करण्यासाठी..

How to tie a tie : वेगवेगळ्या पध्दतीने कंठ लंगोट कशी बांधावी ..

Key Ring: बार कोड असलेली/नसलेली दुकानांची कार्डे एकत्र ठेवण्यासाठी.. भारतात Planet M चे कार्ड वापरात आहे तसे. अमेरीकेत Kroger, YMCA, Dicks, CVS, सार्वजनिक वाचनालय इत्यादी साठी उपयुक्त...

My Bills : वेगवेगळी बीले लक्षात ठेवण्यासाठी... अमेरिकेत आपोआप साइट ला जोडून घेतो आणि अद्यावत बीले दाखवतो

Ring Scheduler: वेळेनुसांर फोनचा रिंगटोन चालू/बंद, थरथराट करण्यासाठी

SleepTimer: झोपताना संगीत ऐकताना ठराविक वेळाने Winamp, MusicFX, Listen आपोआप बंद होण्यासाठी

MP3 Cutter: आवडत्या MP3 ची काट्छाट करून हवा तेव्हढाच भाग वापरता येण्यासाठी

WidgetSoid: आपल्या महत्वाची आणि प्रामुख्याने वापरात येणारी १० अ‍ॅप्स एका लांब आयतामध्ये ठेवण्यासाठी (जागा वाचते स्क्रिन वर)

EboBirthDay - वाढदिवस लग्नाचे, जन्माचे, साखरपुड्याचे वगैरे..

Talking Tom/Gina - लहान मुलांसाठी गंमत

FREEdi YouTube Downloader - यू ट्यूब वरील व्हीडिओ, व्हीडिओ म्हणुन किंवा MP3 म्हणून डाऊनलोड करण्यासाठी..

ccDialer - पीन वापरून फोन करण्यासाठी उत्तम ... प्रत्येक वेळी पीन टंकावी लागत नाही.. कॉलींग कार्ड, व्होनेज वापरून परदेशातून भारतात फोन करण्यासाठी अत्यूत्तम ...

Unit Conversion By S&J Studio Work - वेगवेगळी परिणामे (वजन, लांबी, तपमान, वेग, क्षेत्रफळ वगैरे) त्यांच्या वेगवेगळ्या मापन घटकांमध्ये रूपांतरीत करण्यासाठी..

मी येणारा/जाणारा फोन कॉल रे़कॉर्ड करण्यासाठी अ‍ॅप शोधतोय (रूट न करता..) कोणाला माहिती असल्यास कळवावे..
बरीच ट्राय केली पण बहुतेक स्पीकर चालू करून वापरायची आहेत..

multy ling keybord & myscript हे दोन app. ने आपण फोन वरून आरामात मराठी मधे लिहीता येते...मराठी keybord मिळाल्याने हे करता येते...

उदयवन कीबोर्डावर मराठी अक्शरे दिसतात . वरच्या विन्डोतही येतात पण दुसर्‍या अप्लिकेशनवर नेल्यास चौकोन दिसतात. मायस्क्रिप्ट इन्स्टॉल केलेले आहे....

उदयवन कीबोर्डावर मराठी अक्शरे दिसतात . वरच्या विन्डोतही येतात पण दुसर्‍या अप्लिकेशनवर नेल्यास चौकोन दिसतात. मायस्क्रिप्ट इन्स्टॉल केलेले आहे....>>>>>>>>>> चौकोन दिसतात.... दिसु देत... आपण जेव्हा त्या वेबसाइट वर पोस्ट करतात तेव्हा ते अक्षरे दिसतात......... Happy
उदा. मायबोली वर लिहिताना चौकोन दिसतील पण पोस्ट केल्यावर तुम्हाल तुमचे लिखाण मराठीत दिसु लागते

उदयराव , मला खरे तर त्याचा वापर नोट्स, डोक्युमेन्ट ह्यामध्ये करून ते मोबाइलमध्येच सेव करण्याचा होता. पण ह्या चौकोनामुळे ते होत नाही...

मोबाइल मधे सेव ?????????????/

कोणता मोबाइल आहे.... सॅमसंग चा नोट अथवा टॅबलेत असेल तर ठीक आहे.... नाहीतर मोबाईल मधे नाही दिसनार

smsBlocker नावाचे अ‍ॅप अँड्रॉईड मार्केटला आहे. नको असलेले मेसेजेस सरळ स्पॅम म्हणून गायब करता येतात. इनबॉक्स ला दिसत नाहीत. माझ्या गॅलॅक्सीवर झकास चालते.

Pages