खांद्यावरती जुनी घोंगडी
गर्द धुळीने बरबटलेली
पागोट्याची कैक लक्तरे
डोक्यावरती लपेटलेली
जुनाट मळक्या धोतरातला
मस्त देखणा माझा बाबा
शेत उभ्याने कातरताना
भाळावरच्या घामामध्ये
जीवन माझे शेंदत होता....
नाकामधल्या वेसणीतला
आवेग त्याचा कळवळणारा
तोंडामधून क्षणाक्षणाला
फ़ेस धरेवर टपटपताना
गवत वाळके माती खाऊन
क्षीण बापुडा धडपडणारा
बैल जीवाच्या आकांताने
वावरातल्या ढेकळातही
अजून नांगर ओढत होता....
आयुष्याच्या पाठीवरती
नाराजीच्या चाबूकातले
असंख्य फ़टके देता देता
कैक शिव्यांना हासडताना
रक्त कोरड्या ओठावरचे
हळूच गिळता गिळता बाबा
वांझ भुईच्या पोटावरती
मंतरलेली खुळी गरीबी
डोळ्यांमधून ओतत होता...
लहान भाऊ बहिण आणिक
सुरकुतलेली माझी आई
डोक्यावरती चिंधूक घेऊन
बोरखडीच्या झाडाखाली
घशात वारा ओतून ओतून
हताश व्याकूळ बसले असता
धगधगणारा सुर्य नभातील
पाहून त्यांना असे उपाशी
खदखद साला हासत होता...
वांझ जरीही जमीन होती
भूक गरीबी कठीण होती
शुष्क फ़ाटक्या शेतामधूनी
अंकूर फ़ुटतील कधीतरी रे
देव झोपला अजून नाही
असेच बोलून माझा बाबा
औतावरच्या बैलांसोबत
खोदून शेतामधली माती
प्राक्तन आमचे शोधत होता...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
कविता फार आवडली.
कविता फार आवडली.
अप्रतिम कविता... हॅट्स ऑफ
अप्रतिम कविता...
हॅट्स ऑफ सन्तोष.
वा! वा!!
वा! वा!!
सुरेख !!
सुरेख !!
सुरेख कविता! कवितेच्या
सुरेख कविता! कवितेच्या प्रांतात फार फिरकत नाही, पण स्वातीने लिन्क दिली म्हणून इथे आले, ते बरे झाले असे वाटले.
अप्रतिम, काळजाला भिडणारी
अप्रतिम, काळजाला भिडणारी कविता.
उत्तमच आहे कवित फेसबुक्वर
उत्तमच आहे कवित फेसबुक्वर वचलीच होती
धन्यवाद
पण गझल विभागात दिसते आहे ही येथून काढा प्लीज
काळजाला भिडणारी कविता. अतिशय
काळजाला भिडणारी कविता. अतिशय सुरेख..
वा !!!
वा !!!
काळजाला भिडणारी कविता. >>>>
काळजाला भिडणारी कविता. >>>> +१००....
बाबा हे शिर्षक वाचुन बघायला
बाबा हे शिर्षक वाचुन बघायला आले... सुंदर कविता वाचायला मिळाली....
देव झोपला अजून नाही असेच
देव झोपला अजून नाही
असेच बोलून माझा बाबा
औतावरच्या बैलांसोबत
खोदून शेतामधली माती
प्राक्तन आमचे शोधत होता...<< व्वा!!! आवडलीच.
मस्तच आहे, आवडली कविता
मस्तच आहे, आवडली कविता
छान कविता. गरिबीत पिचणार्या
छान कविता. गरिबीत पिचणार्या शेतकर्याचे छान वर्णन.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
"भाळावरच्या घामामध्ये
जीवन माझे शेंदत होता...." >>> शेंदणे म्हणजे विहिरीमधून पाणी काढणे हा अर्थ मला माहित आहे.
त्यानुसार या दोन ओळींचा नीटसा संबंध लावता आला नाही. की शेंदणे याचा अर्थ काही वेगळा आहे का ?
कविता खूप आवडली
कविता खूप आवडली
खूपच छान. मनाला भिडणारी,
खूपच छान. मनाला भिडणारी, अस्सल मातीतली.
काळजाला भिडणारी कविता. अतिशय
काळजाला भिडणारी कविता. अतिशय सुरेख..>>+++१११
बाबा हे शिर्षक वाचुन बघायला
बाबा हे शिर्षक वाचुन बघायला आले... सुंदर कविता वाचायला मिळाली....>>+१००
मनाला भिडणारी कविता.....
मनाला भिडणारी कविता.....
छानच. स्वाभिमानी, कष्टाळू,
छानच. स्वाभिमानी, कष्टाळू, आणि आशावादी बाबा डोळ्यासमोर उभा केलात.
वा ! खूप आवडली
वा ! खूप आवडली
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
आ हा... सुरेख कविता (शेंदणे
आ हा... सुरेख कविता
(शेंदणे बद्दल मलाही प्रश्नं आहे. शिंपणे असा अर्थ इथे लागतोय. माझी चूक असू शकते)
मान्यवरहो.. शेंदणे या शब्दाची
मान्यवरहो.. शेंदणे या शब्दाची संपुर्ण माहिती घेईन मी नक्कीच.....भावनेच्या भरात कदाचित चुकीचा शब्दही वापरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.....
शिर्षक वाचुन उघडली. फार सुंदर
शिर्षक वाचुन उघडली. फार सुंदर लिहिली आहे.
मान्यवरहो.. शेंदणे या शब्दाची
मान्यवरहो.. शेंदणे या शब्दाची संपुर्ण माहिती घेईन मी नक्कीच.....भावनेच्या भरात कदाचित चुकीचा शब्दही वापरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.....
शेंदणे माझ्या माहितीनुसार पाणी ओढून काढणे
ह्या अर्थी प्रचलित आहे. कवितेत शब्द अगदी व्यवस्थित बसतोय.
धन्यवाद समीर चव्हाण सर ।
धन्यवाद समीर चव्हाण सर ।
क्या बात !
क्या बात !
कैक शिव्यांना हासडताना रक्त
कैक शिव्यांना हासडताना
रक्त कोरड्या ओठावरचे>>>>>
बारिक संर्दभांसहित आवडली.
खूप आवडली
खूप आवडली
Pages