(ही पूर्णपणे मी केलेली पाककृती आहे)
ओली हळद
मोठे आवळे
आल्याचा तुकडा
पुदिन्याची पाने (देठासकट)
तिखट मिरच्या (हल्ली तिखट नसलेल्याही मिळतात म्हणून असे लिहिले)
मीठ
अर्धे भांडी पाणी
ओल्या हळदीचे दोन मोठे तुकडे, आल्याचा एक तुकडा, चार ते पाच मोठे आवळे, पुदिन्याची मुठभर पाने, पाच सहा तिखट मिरच्या व दोन टीस्पून (धन्यवाद साती - दुरुस्तीसाठी) मीठ आणि अर्धे भांडे पाणी मिक्सरमध्ये घालून दोन मिनिटे मिक्सर चालवावा.
अफलातून चटणी तयार!
अत्यंत गुणकारी अशी ही चटणी असून तितकीच स्वादिष्टही आहे.
हेल्थ बेनिफिट्सः
ओळी हळद - पचनास सहाय्य, लिव्हर, अल्झायमर, कॅन्सर, कोलेस्टेरॉल, मधूमेह व संधिवातावर उत्तम, प्रतिकारशक्ती वाढवते, सूज घालवते, जखमा भरून आणते, वजन ताब्यात ठेवते.
आवळा - मधूमेहावर गुणकारी, हृदयासाठी चांगला, आतड्यासाठी उत्तम, मेंदूसाठी चांगला, भूक वाढवतो, कॅन्सर रोखतो, लोह पुरवतो, नेत्रांवर गुणकारी, रक्तातील प्रतिकारशक्ती वाढवतो, नर्व्हस सिस्टीमवर चांगला परिणाम, वजन ताब्यात ठेवतो, त्वचा उत्तम ठेवतो, गोरे बनवतो, सर्व त्वचा प्रकारांवर गुणकारी, केसांचे आरोग्य राखतो.
आले - श्वसन सुधारते, नॉशिया जातो, भूक सुधारते, पचन सुधारते, डोकेदुखी, संधिवात व कॅन्सर रोखते.
मिरच्या - ए व सी व्हिटॅमिन रिच, प्रतिकारशक्ती सुधारते, हृदयविकाराची शक्यता घटते, सूज घालवते, पचन सुधारते, हाडे ताकदवान बनवते, ब्लड शुगर लेव्हल्स मेन्टेन करते, वेदना शमवते, रक्त पातळ करते (जे हृदयविकार असलेल्यांसाठी उपयुक्त), प्रोस्टेट कॅन्सर रोखते, फॅट बर्न करते.
पुदिना - पचन सुधारतो, वेदना शमवतो, त्वचेला झळाळी देतो, ओरल इन्फेक्शन्स घालवतो, कफ व दम्यावर गुणकारी, प्रतिकारशक्ती वाढवतो, ताण घालवतो, कॅन्सरशी लढतो.
मीठ - प्रतिकारशक्ती सुधारते, अॅसिडिटीशी लढते, वजन घटवते, त्वचा सुधारते, दमा, मधूमेह, हृदय विकार व ओस्टिओपोरॉसिसवर गुणकारी असते, स्नायूंसाठी उत्तम, ताण व डिप्रेशन घालवते.
एकुण काय? अत्यंत चविष्ट आणि अत्यंत औषधी व गुणकारी अशी ही चटणी आहाराचा नियमीत भाग बनण्यास पात्र आहे.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
तोपासु! करके देखना मन्गताच.
तोपासु! करके देखना मन्गताच.
मस्तं! ओली हळद मिळताच करून
मस्तं!
ओली हळद मिळताच करून पाहण्यात येईल.
साती - बदलले.
साती -
बदलले.
यू सेड इट साती. कधी खायला
यू सेड इट साती.
कधी खायला येउ बेफी... ?
कैलासराव, केव्हाही!
कैलासराव, केव्हाही!
आजच करून पहाणार! तब्येतीला
आजच करून पहाणार!
तब्येतीला चांगली दिसतेय.
वे टु गो बेफी. टिप्स छान.
वे टु गो बेफी. टिप्स छान. आता ओली हळद शोधणे आले.
मस्तच.. आवळ्याची बी कशी
मस्तच..
आवळ्याची बी कशी काढलीत की आवळे तासुन घेतलेत??
मस्त...आवडली. करून बघेन, घरात
मस्त...आवडली. करून बघेन, घरात ओली हळद आहे.
वाहव्वा!
वाहव्वा!
वा! बेफी. मस्तच. या चटणीचं
वा! बेफी. मस्तच. या चटणीचं पेटंटच घेऊन टाका.
बाजारात या दिवसात ओली हळद येते पण त्याचं काय करायचं हे मला सुचत नाही. आता ही चटणी नक्की करणार. धन्यवाद बेफी.
खूपच छान अधिक टीपा लाजवाब
खूपच छान अधिक टीपा लाजवाब
इतकी हेलदी चटणी नक्कीच करुन
इतकी हेलदी चटणी नक्कीच करुन पाहण्यात येईल.
मला ही साधना यांच्या प्रमाणे
मला ही साधना यांच्या प्रमाणे शंका आहे की आवळ्याच्या आतल्या बी चे काय? सीडलेस आवळे हल्ली मिळतात का?
नक्की करुन पाहण्यात येइन
नक्की करुन पाहण्यात येइन
ही चटणी करून खाऊन पाहिलेले
ही चटणी करून खाऊन पाहिलेले कोणी परत कसे आले नाहीत सांगायला ?
हि कृती वाचली व लगेच बाजारात
हि कृती वाचली व लगेच बाजारात जावून आणले सामान.( शनिवारच्या सुट्टीचा फायदा)
पन मला पांढरी हळद मिळाली. (आतून पांढरट दिसते).
मी आधी सर्व किसून घेतले(आवळे, हळद व आलं) मग वाटले. थोडी वेलची टाकली. मस्त वाटली.
बहुतेक पाण्यात टाकून पिता येइल.
धन्यवाद.
बाजारात या दिवसात ओली हळद
बाजारात या दिवसात ओली हळद येते पण त्याचं काय करायचं हे मला सुचत नाही
मी हळद आणि आंबेहळद दोन्ही धुवुन कोरड्या करुन सोलुन किसते. मिठ मिसळुन किस बरणीत भरते आणि किस बुडेल इतका लिंबाचा रस घालते. रोज थोडे थोडे खायचे नंतर. यावेळी आवळे किसुन आणि मिरच्या चिरुन घातलेले त्यात. छान लागते हे लोणचे. फक्त फ्रिजमध्ये ठेवावे लागते. बाहेर ठेवण्याची रिस्क मी घेतली नाही. (साधारण पाव किलोला तिनचार लिंबे लागतात)
हि चटणी युनिक वाटत आहे. आधी
हि चटणी युनिक वाटत आहे. आधी कधीच वाचनात नाही. त्यामुळे हिचे पेटंट तुम्हालाच. नक्कीच करुन बघण्यात येइल, धन्यवाद.
मामी +११ बेफिकीर हायली
मामी +११
बेफिकीर हायली इनोव्हेटिव्ह हं!! +११
वा बेफिकीर, एकदम हटके आणि
वा बेफिकीर, एकदम हटके आणि चवदार दिसतेय चटणी आणि पाचकपण. फोटोत तुम्ही घेतलेली हळद आंबे-हळद आहे असे दिसतेय, म्हणजे आंबे-हळदच घ्यायचीना, कारण साधी ओली हळदपण मिळते बाजारात. अर्थात आंबे-हळद जास्त गुणकारी असते त्यामुळे तीच घेऊन करेन ही चटणी. मस्तच.
साधना, मस्त आयडीया.
तोंपासु!! आणखीन आरोग्यपूर्ण
तोंपासु!!
आणखीन आरोग्यपूर्ण वगैरे करायची असल्यास मीठाच्या ऐवजी सैंधव पण घालता येईल नं?
ही किती दिवस टिकते चटणी?
वॉव..वाचतानाच तोंपासु
वॉव..वाचतानाच तोंपासु झालंय..स्लर>>>>>>प
कोपर्यावरची एक बाई बसते रोज ओली हळद , आंबे हळद विकायला.. मला कळतंच नव्हतं इत्के दिवस कि यांच काय करायचं अस्तं म्हणून..
अब्बीच जाना पडेगा..
मस्तच!
मस्तच!
मस्तच... तोंपासु.
मस्तच... तोंपासु.
आणलं सर्व सामान......
आणलं सर्व सामान...... हुश्श्य!!!!!
(उत्साहाच्या भरात खूप सारी हळद आणलीये पांढरी, पिवळी... चालेल ना आंबे हळद ही घातलेली???? )
पण उद्या करीन...
भारी आहे चटणी.
भारी आहे चटणी.
पन मला पांढरी हळद मिळाली.
पन मला पांढरी हळद मिळाली. (आतून पांढरट दिसते).
>> झंपी, ती आंबेहळद. नेहमीच्या हळदीपेक्षा वेगळा वास असतो हीला. गुणकारीही आहे. पण हळदीसारखेच डागही पडतात.
मस्तं चटणी. घट्क आणि कृती
मस्तं चटणी. घट्क आणि कृती वाचूनच चवदार वाटतेय. फ्रोझन आवळे आणि ताजी हळद आहे. करून बघण्यात येईल.
मामी, धन्यवाद माहीती
मामी, धन्यवाद माहीती दिल्याबद्दल.
(मी जरा विचारात पडले मग आईकडे फोन लावलाच मग चटणी केली. )
Pages