अ‍ॅन्ड्रॉईड आणि त्यांचे काही उपयोगी अ‍ॅप्लिकेशन्स..!!

Submitted by उदयन.. on 8 October, 2011 - 06:54

अ‍ॅन्ड्रॉईड बद्दल बरेच काही छान चांगल्यागोष्टी आहेत
मी सुध्दा अ‍ॅन्ड्रॉईड फोन घेतला.. सुरुवातीला अतिशय कंटाळा आलेला काय ही ब्याद गळ्यात आहे म्हणुन पण जेव्हा त्यात इंटरनेट चालु करुन घेतले आणि मार्केट मधुन एक एक अप्लिकेशन्स डाउनलोड केले मग काही चांगला वाटला... फार उपयोगी काही app. आहेत
त्यातले काही खालील प्रमाने.. :

super security beta 1.23 ;- हा अँटीवायरस प्रोग्राम आहे... स्कॅन करतो..मेलवेअर, हायरिस्क app. कोणती आहेत हे सुध्दा सांगतो..तसेच त्यात एक स्ट्राँगबॉक्स म्हणुन आहे त्यात आपन पासवर्ड वापरुन आपले फोटो विडिओ एसएमएस साठवु शकतो..मुख्य म्हणजे जे काही आपण यात टाकले ते बाहेर गॅलरीत दिसत नाही.. Happy
आणि जो पासवर्ड असतो तो आपल्या इमेल वर मेल म्हणुन येतो..म्हणजे विसरलात तरी प्रोब्लेम नाही.. Happy

Android assistant :- app. अनइन्स्टोल करणे.. फोन मेमरी मोकळी करणे. cache cleaner Volume control इत्यादी यात सहज पणे करता येते file manager सुध्दा यात आहे जो आपल्याला फोन मधे उपलब्ध नसतो..

sms blocker :- हा अत्यंत उपयोगी app. आहे... आपल्याला नको असलेले नंबरांवरुन जे मेसेज येतात त्यांचा नंबर यात टाकला की आपल्याला त्यावरुन मेसेज येतच नाहीत हा app. ते ब्लॉक करुन टाकतो

m-indicator :- आपल्याला लोकल्स ट्रेन किती वाजता ची आहे हे कळण्यासाठी उपयोगी आहे..त्याच बरोबर यात बस चे नंबर सुध्दा आहे त्याचे रस्ते सुध्दा कळतात.. मेगा ब्लॉक्स ची माहीती मेसेज वरुन आपल्याला कळते..

camscanner :- कागद पत्रांचे पीडीफ मधे रुपांतर यात करु शकतात... जर आपल्या कडे स्कॅनर नाही तर आपण कागद समोर ठेउन त्याच्या या app. ने फोटो काढायचा आणि तो मस्त पैकी साफसुफ करुन हा पीडीफ स्वरुपात आपल्या समोर ठेवतो.. अतिशय स्पष्ट लिहिलेले दिसते यातुन..

flashlight :- आपल्या मोबाइल चा टोर्च म्हणुन उपयोग करण्यासाठी हा app. वापरात येतो.. लाइट कमी जास्त करन्याची सुध्दा सोय आहे यात.

Net Counter - नेट वापरताना किती डेटा वापर होतो याची नोंद मिळते.

Battery Doctor - कोणत्या अ‍ॅप साठी बॅटरी जास्त वापरली जाते हे कळते. त्यानुसार ते अ‍ॅप बंद करता येतात. पर्यायाने बॅटरी लाईफ वाढवता येते.

ES File Explorer - file/folder management साठी उत्तम.

Go Launcher - सुंदर UI Themes. ह्याच्या स्वतःच्या Themes छान आहेत. एक iPhone सारखी Theme पण आहे.

GPS Essentials - GPS Tracking साठी

Indian Rail - Online inquiry / train timings / seat availability साठी

Offline Dictionary - ह्यात Dictionary बरोबर language translation पण आहे - ते सुद्धा offline. पण मोठ्या-मोठ्या database files एकदा(च) download कराव्या लागतात.

LBE Privacy Guard - हा firewall चे काम करतो. [पण ह्यासाठी root access हवा.]

Photo Tools by hcpl: विविध छायाचित्रणासंबंधी गणकयंत्रे

PhotoFunia: छायाचित्रणासाठी व नंतर प्रोसेसिंग साठी लागणार्‍या करामती...

App 2 SD (move app to SD);- आपले फोन मधले अ‍ॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे जमा करते त्या मुळे फोन मेमरी फ्री राहते आणि जास्त जागा मोकळी राहाते

Photo Art - Color Effects = मस्त आहे हे.....अ‍ॅप्लिकेशन...एक विशिष्ट रंग कायम ठेवुन बाकीचे रंग रंगविरहित करता येतात फोटो मधले

पॉवरलाईन : २ (चकटफू व्हर्जन) किंवा अधिक (१.५ $ला) गोष्टी आडवी रेघ वापरून दाखवते. जसे की बॅटरी, सीपीयू वर्कलोड वगैरे. साधे, अवाजवी जागा न व्यापणारे असे अ‍ॅप आहे.

fm radio india :- नावाचे एक छान अ‍ॅप आहे ऑनलाइन रेडिओ ऐकण्यासाठी. भरपूर चॅनेल्स आहेत रेडिओची त्यावर. एक मराठी गाण्यांचेही चॅनेल आहे. मला आवडलं अ‍ॅप. ट्राय करून पहा

Stuck on Earth :- भटक्यांसाठी बेस्ट अ‍ॅप....यात तूम्हि तूमची ट्रीप प्लॅन करु शकतात....तिठल्या ठिकाणांचे लोकांनी काढलेले फोटो पाहू शकतात आणि बरच काही....

TripAdvisor :-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फ्लईट्स, Things to do in city...

AppLock :- हे लॉक अ‍ॅप्लिकेशन आहे......यात तुम्ही हवे ते अ‍ॅप्लिकेशन, मेस्सेज, जीमेल व्हॉट्सप्प आणि इतर अ‍ॅप्लिकेशन लॉक करु शकतात... यात पासवर्ड ची सुविधा आहे..... अ‍ॅप्लिकेशन ओपन करताना पासवर्ड ची गरज लागते .

Distance calculator:- आपण किती चाललो याचा हिशोब ठेवणारे अ‍ॅप्लिकेशन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

purvi mazyakade sadha agadich falatu asalela phone hota. tyavar net connection vagaire kahi nastana koni photo pathvala tar milat ase pan sadhyachya Samsung madhe koni image send keli tar matr mala milat nahi. tyasathi net connection lagate ase samajale...he prakaran nakki kay aste? khare tar mala broadband connect kelyanantarahi photos milat nahiyet sadhya...kahi seeting aste ka tyasathi?

सुमेधाव्ही,
फोटो नक्की कसा पाठवताहेत पाठवणारे? एमएमएस आहे का? तो असेल तर सेटिंग करावी लागेल.
ईमेल, लाईन, व्हॉट्सॅप इत्यादी असतील तर आरामात येतील.

उदयनने प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे कॅमस्कॅनर हे अ‍ॅप फारच उपयोगाचे आहे.

Moto G हा एक अतिशय सुंदर अ‍ॅड्रॉईड बेस्ट फोन अन अनलॉ़क्ड $१७९ ला येतोय. मे बी भारतात अन इतर डेव्हलपींग देशासोबतच हा फोन अमेरिकेतदेखील खूप चालणार असे दिसते.

चेरी, FM radio India app खरच खूप मस्त आहे!
जर चांगल्या keyboard app मध्ये invest करायची तयारी असेल तर SwiftKey keyboard app विकत घ्या! Worth every penny!

>>उदयनने प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे कॅमस्कॅनर हे अ‍ॅप फारच उपयोगाचे आहे>>>> +१

SwiftKey keyboard app विकत घ्या! Worth every penny!>>> हे विकत घ्यायचि गरज नाहि. Touch Pal नावाचे app आहे. फ्री आहे. its exact replica of swiftkey and free also. Try it for once. I am using it for a long time now. Happy

टच-पाल मधे हिंग्लीश लिहायला मदत होत नाही. स्विफ्टकी मधे हा सपोर्ट खूप छान आहे. स्विफ्टकी चं ट्रायल वापरून बघा.

Stuck on Earth
भटक्यांसाठी बेस्ट अ‍ॅप....यात तूम्हि तूमची ट्रीप प्लॅन करु शकतात....तिठल्या ठिकाणांचे लोकांनी काढलेले फोटो पाहू शकतात आणि बरच काही....

TripAdvisor
हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फ्लईट्स, Things to do in city....

माझ्या Andy-Pandy वर what's app चालू होत नाहीये.

नुस्त 'कनेक्टिंग' डिस्प्ले होत. पण नंतर नॉट अव्हैलेबल असा मेसेज येतो... Sad

व्हॉट्सप आता ४.० वर्जन आणि त्यापेक्षा जास्त वर्जन्स वर चालणार आहे....... माझ्या २.३ वर्जन वर सुध्दा बंद झाले म्हणुन तो विकुन झेड घेतला :खोखो

उदयन,

माझा ४.० आहे. 'आयस्क्रीम-स्यान्डवीच' अस काहीतरी नाव आहे त्याच.

नवीन Android घ्यायचाय. कुठला घेऊ? ५ ते १० हजाराच्या आसपासचा एखादा....विचार करतीये ८ मेगापिक्सेल्स चा कॅमेरा असलेला घ्यावा.

बरं, मी नुक्ताच स्यामसन्ग ग्र्याण्ड घेतला आहे. तर वर उल्लेखिलेली बरीचशी अ‍ॅप्स कुठून कशी डाऊनलोड करुन घ्यावित? त्याकरताचे चार्जेस कसे वसूल होतात? जरा विस्कटून सान्गेल काय कुणी?
हे असल काही डाउनलोड करुन घेताना व्हायरस वगैरेची भिती किती असते? त्यावर उपाय काय?

लहान मुलां साठी चांगली गेम्स आहेत का
आणि त्यांच्या हातात मोबाईल दिला तर ईतर अ‍ॅप लॉक करु शकतो असे काही आहे का?

AppLock म्हणुन अ‍ॅप्लिकेशन आहे......यात तुम्ही हवे ते अ‍ॅप्लिकेशन लॉक करु शकतात... पासवर्ड वापरुन...

लिम्बुटिंबू :- तुमच्या टॅबवर गुगल प्ले बघा. गुगल चं आयडी वापरा आणि वाटलं तर कंप्युटरवरुनही डाउनलोड करा अ‍ॅप्स.
https://play.google.com/store?hl=en&tab=w8
आणि यासाठी वायफाय गरजेचे. इंटरनेटचे सामान्य चार्जेस (केवळ टॅबसाठी नाही तर जिथुन नेट वापरत आहात त्याला) पडतील.

विजय देशमुख, धन्यवाद माहितीबद्दल Happy मी ती लिन्क कॉम्प्युटरवरुन बघतोय, वायफाय मात्र आमच्या पिंचिमधे नाही

गरज नाही...............३जी नाहीतर २जी चे नेटपॅक वापरा.... १५० ते २५० मधे १-२ जीबी मिळते त्यातुन वरची बरिच शी अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करता येतात

Handcent हे एसेमेस मॅनेजमेन्ट साठी उपयुक्त अ‍ॅप आहे फ्री आहे .विशेष्तः ज्या हॅन्द्सेट मध्ये अगर सर्विस प्रोव्हायडर कडे १६० पेक्शा मोठे एसेमेस पाठवायची सुविधा नाही त्यात एसेमेसचे तुकडे स्प्लिट करून दोन तीन मेसेज करून पाठवतो . देवनागरी एसेमेस मध्ये कॅरॅक्टरच्या स.न्ख्येचा अ.न्दाज येत नाही . चर्ज मात्र एकाहून अदोक मेसेजचाच लागतो हे सा.न्गणे न लगे . अर्थात इतर सुविधाही मेसेजबाबत याअ‍ॅप म्ध्ये आहेत
The most popular messaging app on the Android Market, Handcent SMS is a powerful SMS/MMS app that fully unleashes the messaging potential of Android devices,free to use. More than just an unsurpassed alternative to the stock Android messaging app, Handcent SMS features optional, seamless online integration with your My Handcent Online account allowing users to circumvent the limitations of the Android OS and wireless carriers.
The following lists some of Handcent's most popular features:
> Full SMS and MMS support augmented with unmatched features powered by the Handcent network
> Integrated spell checking and additional message composition tools
> Additional security options allow you to password protect and hide individual messages with the Privacy Box or secure all of your messages. These protections apply regardless if they are viewed in Handcent SMS, the stock Android messaging app, or any third party applications!
> Support for more than 20 languages and growing as well as support for the various messaging protocols of different countries
> Handcent’s Contact Locator plugin helps you quickly locate your friends using GPS!
> Group sending features capable of extending Android’s SMS limitations of 100 messages per hour up to 1,100 messages per hour
> Optional SMS Popup notification and other notification customizations such as unique notification sounds, vibrate patterns, backgrounds and themes for individual contacts
> Customize every aspect of your Handcent SMS application with countless themes and skins available for free download from the Handcent Network. New themes are added daily!
> Mimic the unique messaging layouts of other device manufacturers such as HTC’s Sense, Motorola’s Blur, or even the iPhone!
> Backup Security powered by the Handcent network allows you to backup all your Handcent’s settings, SMS messages and MMS messages to your My Handcent Online account and restore them if you reinstall Handcent or if you reset your device or upgrade to a new one.
> Handcent MMS+ allows you to circumvent Android’s MMS limitations and send up to 10 files at 25 megabytes each for a total message size of 250 megabytes! This means sharing higher quality photos, videos, and music!
> Better MMS support and picture resizing that resolves Android compatibility issues with some carriers such as those in the UK
> Auto-splitting feature for messages over 160 characters for users on CDMA networks such as Verizon Wireless
> Additional font packs to further customize your SMS messages are available as downloadable plugins
> Integrated Blacklist feature with the ability to filter incoming SMS and MMS messages by origin and help block SPAM
> Manage drafts and undelivered messages
> Schedule tasks to deliver SMS and MMS messages at a specific time or regular intervals such as daily, weekly or monthly
> Full support for vCards allows you to send, receive, import and export them with Handcent SMS
> Share beautiful Handcent eCards with family and friends to mark holidays, birthdays, etc.
> Send and receive fun emoji icons and smileys to other Android Handcent users as well as iPhone users. Once exclusive to the iPhone, this integrated feature of Handcent SMS may now be enjoyed by Android users. Additional emoji are available as free, downloadable plugins!
>Group Mms with iphone,useful for US networks
>Handcent Talk service,send FREE messages/picture to android, iPhone ,Windows phone users easily,fast and security,just register free and login with your handcent account,add buddy then Handcent talk today!
>Universal messaging that send classic SMS/MMS and Handcent Talk with contact in one converstaion
>Included 20+ skins and 4000+ themes ,you can find your favorite style (like iOS7 or Sense..) easily and you can share your theme with others
For information, support, or to manage your account, please visit http://www.handcent.com

Pages