निराशा / वैफल्य

Submitted by असो on 21 January, 2013 - 03:59

निराशा / वैफल्य या संदर्भात माहिती हवी आहे.

वैफल्यातून येणा-या प्रतिक्रिया / वैफल्यग्रस्त होण्याची कारणे / स्वतः किंवा आपल्यामुळे इतरांच्यात वैफल्य येऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी / स्वभाव विशेषाप्रमाणे होणारे परिणाम / उपचार इ. माहिती मिळाल्यास आभारी राहीन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंपनीतल्या वैफल्यग्रस्त कर्मचा-याला कसं हाताळावं ? याबद्दल कुणाचे काही अनुभव असल्यास कळवावेत. ( याशिवाय कामाच्या ठिकाणाव्यतिरिक्त नातेसंबंधात / नवरा बायको नात्यात नैराश्य आल्यास काय करावे हे देखील या धाग्यावर आले तर एकत्र माहिती संकलित करता येईल )

कंपनीतल्या वैफल्यग्रस्त कर्मचा-याला कसं हाताळावं ?>>>

१. पहिले तर वैफल्याचे कारण कळणे महत्वाचे आहे. ते घरगुती आहे की ऑफिस रीलेटेड हे खुप गरजेचे आहे. ऑफिस मधील कारण असेल, जसे नावडता जॉब प्रोफाईल, रुटिन चा कंटाळा, खुप जास्त काम, ह्या माणसाचा उरक जर कामाच्या पेक्षा कमी पडतोय का, इ.इ. समस्येवर तोडगा म्हणजे रोटेशन मधे जॉब बदल करणे. उदा . आमच्या अकांउंट्स मधे दर वर्षी जॉब प्रोफाईल बदलतात. चार /पाच सीनीयर लोकांना कधी सप्लायर पेमेंट, तर कधी एक्स्पेन्सेस पेमेंट, तर कधी रीकन्सीलेशन्स & फायनलाय्झेशन, तर कधी प्रोजेक्ट असे प्रोफाईल रोटेशन मधे देतात. त्या मुळे प्रोफाइलचा कंटाळा आला, हा प्रकार होत नाही. त्याच बरोबर कंपनीचा फायदा हा की सगळ्यांना सगळी प्रोफाइल माहित असल्याने, हा गेला तर तो आहेच...

२. एकंदर राँग लाइन निवडल्याचा पश्चातापः === हा प्रकार जरा शिताफिने हाताळायला लागतो. कारण ही माणसे स्वतः वैफल्य घेवुन जगतातच त्याच बरोबर इतरांनाही काँप्लेक्स देतात... त्या मुळे कंपनीतच इतर कुठे तो सुट होत असेल तर नक्की असा ऑप्शन त्याला द्यावा. मी असे यशस्वी उदाहरण पाहिलेले आहे.

३. जर का काही घरगुती कारणाने वैफल्य येवुन कामावर परीणाम होत असेल, तर त्याच्याशी सतत संवाद ठेवुन, रॅपो ठेवुन जर जमेल तेवढे काउंसिलिंग करावे. कित्येक वेळेला समस्या खुप छोटी असते, पण मार्गदर्शन नसल्याने माणसे कुढत रहातात.

४. पैश्याची समस्या असेल व त्या मुळे वैफल्य येत असेल, तर एखाद्या दुसर्‍या जोडधंद्याचा पर्याय, जो फोन वर होवु शकतो, किंवा ओफिसला पुरक होवु शकतो तो सुचवावा. अनेक लोक इंशुरन्स एजंन्सी, कॉस्मेटिक ची एजंन्सी, टप्पर वेअर ची अजन्सी, हे उद्योग करतात.

५. ह्या उप्पर जर कुठला मेडिकल प्रॉब्लेम असेल, तर मात्र ताबडतोब स्वतः काहीही प्रयोग न करता, अधिकृत वैद्यकिय मदत घ्यावी हे केंव्हाही उत्तम.

मूळात प्रत्येकाशी कायम संवाद राखणे महत्वाचे. अशी माणसे मनातल्या मनात कुढत राहतात त्यामूळे कुणाच्या
लक्षातच येत नाही. रोज संवाद असेल तर हे लक्षात येते. एकदा लक्षात आले कि पुढचे बघता येते.
याची लक्षणे अनेक असतात आणि नीट लक्ष दिले तरच कळतात. खुपदा वरवर दिसणारी नसतातच.
त्यामूळे कुणालाही एकटे पडू न देणे, हा उपाय करावाच.

मीराचा दुसरा मुद्दा, मला लागू आहे. पण तो करीयरच्या पहिल्या टप्प्यातच लक्षात आल्याने, त्यावर उपाय करता आला. ( सर्व छंद जोपासले. )

मोकिमी - चांगले आहेत उपाय.
खुपदा वरवर दिसणारी नसतातच. >> अनुमोदन.

प्रचंड खदखद असू शकते. माझ्या माहितीप्रमाणे नैराश्याचा (फ्रस्ट्रेशन) आउटपुट सहका-यांशी रोजची वादावादी. काहींच्या बाबतीत अति आक्रमकपणा, काहींमधे आपले दोष इतरांवर ढकलणे / वरिष्ठांशी उर्मटपणे वागणे किंवा मग सेल्फ पिटी ( स्वसहानुभूती ?) मधे होतो. पण दिनेशदांनी म्हटल्याप्रमाणे ही स्टेज यायच्या आधी ओळखू येत नाही कि व्यक्ती नैराश्याचा शिकार होतेय. या स्टेजला काय करावं ? हाताखालच्या लोकांची काळजी कशी घेता येईल ?

वागणुकीत अगदी सूक्ष्म बदल घडतात.
डोके दुखणे, सर्दी, झोप येणे, नवीन शब्दप्रयोग, भूक मंदावणे, चिडचिड, घाम येणे .. असे अनेक. हे बदल नेहमी लक्ष देणार्‍या माणसाच्याच लक्षात येतात. ( मला स्वतःला तर फोनवरचे बोलणे ऐकूनदेखील जवळच्या लोकांच्या
बदललेल्या मनस्थितीची, आजारपणाची कल्पना येते. ) त्यामूळे लक्ष देणे हे महत्वाचे. कदाचित अशा लक्ष देण्यालाच हरकत घेतली जाईल, ती कदाचित पहिली पायरी असेल.

एका वर्गमित्राने नैराश्यातून नोकरी सोडली. पुढे हातात काम नाही आणि आता कुणी नोकरी देत नाही. त्यातून आणखी नैराश्य आलं. नुकतंच त्याचं निधन झालं. वेळीच इलाज झाला असता किंवा त्याला आपण स्वतः या व्याधीचे शिकार आहोत हे लक्षात आले असते तर ?

अमेरिकेतल्या मायबोलिकरांनी मात्र कामाच्या ठिकाणी अशी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या आणि तुमच्या मॅनेजर तर्फे HR ला कळवणे. तुमच्या हाताखाली अशी व्यक्ती काम करत असेल तर HR च्या मदतीनेच सर्व गोष्टी हाताळा. कुठल्या ही परिस्थितित counseling वगैरेच्या भानगडीत पडू नका. HR च्या procedures असतात त्याच पाळा. अनुभवाचे बोल सांगते...स्वतःकरता आणि कंपनीकरता जबरदस्त legal troubles ओढवून घ्याल.

खूप दिवसापासून माझी एक सखी नैराश्यातून जात आहे. मी इथे परदेशी आणि ती मायदेशी, मदत करायचे कळत नाही.

नेहमी chat वर भेटून बोलतच असते तिच्याशी पण आजकाल ती घरातून पळून जाण्याचे किंवा जीव देण्याचे बोलत आहे (महिन्यातून एकदा bomb टाकते).
Problem - मैन्त्रीन स्वताच्या लग्नात खुश नाही आहे खूप कारणे आहेत.
काडीमोड चा काही पक्का निर्यण घेत नाही पण गेले ४-५ वर्ष या विचारात स्वतच्या तब्यतीचे खूप नुकसान केले आहे, तिचे मानसिक स्वास्थ शांत नाही. ऑफिस मध्ये short -term attraction / affair या phases मधून पण जात असते आणि परत तेच की प्रेम नाही मिळत.
मी तर वैतागते की एकदाचा काय तो निर्णय घे (बोलणे सोपे असेल कदाचित ) ,ठाम राहा पण हिची काही हिम्मत नाही होत आणि रडणे सुरूच.

मी सहानभूती, भीती ( आपण उगाच अडकलो तर काही झाले तर ), avoid करणे या phases मधून जात आहे. कसे हाताळावे कळत नाही आणि सोडून दिले तर वाटते ........

गुलमोहोर - मैत्रिणीला सायकिअ‍ॅट्रिस्ट्ला भेटायला सांगा लग्गेच. याशिवाय तिला मेडिटेशनचे कोर्सेस मदत करतील. मला स्वतःला अनेक डिप्रेशन्स्वर अगदी छोट्या छोट्या ते मोठ्या मोठया प्रॉब्लेम्सवर मात करायला मदत केली सीक्रेट मूव्हीने आणि ब्रह्म्कुमारीजच्या युट्युबवरच्या व्हिडियोज ने. ते तिला ऐकायला पाहायला सांगा. स्वामी सुखबोधानंद ह्यांची पुस्तके खूप मदत करतील तिला, ती वाचायला सांगा. तिच्या वैफल्यावर सध्या उपाय तोच. तिला इतर मैत्रिणींशी बोलायला सांगा. ती मराठी असेल तर तिला माबो वर यायला सांगा.

तुम्ही तसे सुद्धा तिच्या सोबत देशात नाही आहात. तुम्ही तिला फारशी मदत करू शकत नाही. ऑफिसमध्ये सतत अफेयर्स केल्याने तिचे नाव खराब होऊ शकते. लोक तिच्याशी बोलणे बंद करू शकतात.

वेल धन्यवाद प्रतिसादाबद्दल.

सायकिअ‍ॅट्रिस्ट्ला भेटणे सोपे असते का ?? माझ्या जवळच्या मित्राला anger management साठी थोडे ४-५ वर्ष आधी सायकिअ‍ॅट्रिस्ट्ला भेटण्याआधी एक reference द्यावा लागला होता म्हणजे त्याची एक जवळची मैन्त्रीन dr होती तिच्या reference ने पुढे इलाज सुरु केला होता आणि त्या वेळेस fees एकावेळेस भेटण्याची १००० रुपये होती. आता इतके पैसे काही वाटत नाही पण तेव्हा वाटायचे गं आणि मित्राने पण १-२ session भेटून नंतर बंद केले (पैसे हेच कारण होते).
असो बोरीवली- कांदिवली ला कोणी सायकिअ‍ॅट्रिस्ट् असेल तर नक्की सांग. मला पण भेटायचे आहे काही जुने संदर्भ त्रास देतात (पण माझे meditation सुरु आहे).

मेडिटेशनचे कोर्सेस बद्दल मी तिला खूप वेळा सांगून दमले पण वेळ नाही सबब सांगून करत नाही आहे. office मध्ये affections मुळे नक्कीच नाव खराब होते , लोक बोलणे बंद करत नाही पण मागे खूप टिंगल करतात (हा ४-५ वर्ष पूर्वीचा अनुभव).

काही helpline numbers वर बोलून बघणार आहे भारत भेटीत. या वेळेस मुंबई मध्ये आल्यावर हे प्रकरण निकालात काढणार आहे मग तिच्या आई-वडिलांना भेटून चार शिव्या खाता येतील.

गुलमोहोर, क्लिनिकल सायकॉलॉजिस्टची आणि सायकिअ‍ॅक्ट्रीसची अपॉईंटमेंट रेफरंस शिवायही मिळू शकते. मात्र इंन्शुरन्ससाठी फॅमिली डॉकचे रिफरल असणे योग्य ठरते.

गुलमोहोरः तुमच्या मैत्रिणिला योगाभ्यासातून खूप फायदा होइल. आसन, प्राणायाम, मेडिटेशन हे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त करतात. ती लवकर बरी होवो ही प्रार्थना.

जन्मवेळ, जन्म्स्थान आणि जन्मतारिख खात्रीची असेल तर नैराश्य तात्कालीक आहे की दिर्घ कालीन याचा शोध घेता येतो. चंद्राची शनीशी युती दिर्घ् कालीन नैराश्य देते. साडेसाती खासच वाईट ठरते.

महादशा आणि अंतर्दशांच्या अभ्यासाने हा कालावधी निश्चीत होतो. वर म्हणल्या प्रमाणे योगाभ्यास खास करुन प्राणायाम ( अनोलोम विलोम- कपालभाती ) यानी विचारांच्या चक्रातुन बाहेर पडता येते.

ज्योतिष शास्त्राची मदत ज्याला योग्य वाटते त्याने नक्कीच घ्यावी. पण केवळ त्यावर विसंबून राहू नये. केवळ त्यावर विसंबून राहणे म्हणजे आळशीपणा आहे. पत्रिकेतच आहे न मग असेच होणार, शांती करू मग बदलेल. - अशाने काही बदलत नसते. स्वतः प्रयत्न करायचे असतात. योगाभ्यास प्राणायाम, मेडिटेशन खूप महत्वाचे आहे. ह्याशिवाय कौन्सेलिंगही महत्वाचे आहे. अशा घटनांमध्ये प्रेमाने आरसा दाखवाव लागतो.

सायकीअ‍ॅट्रिस्टच्या क्लिनिक मध्ये रेफरन्स शिवाय जाता येतं भारतात. कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्स आणि बोरीवली पश्चिम लॅन्स्लॉट - कोराकेन्द्र जवळ सहारा सागर हॉटेलच्या वर डॉ भावना आशर आहेत. त्या खूप चांगल्या आहेत. आम्ही बर्‍याच जणांना त्यांचा रेफरन्स दिला अहे. शिवाय माझ्या कुटुंबियांसाठीही त्यांची मदत घेतली आहे. बोरीवली पश्चिम लिंक रोड - एसके रिसॉर्ट समोर डॉ वाटवानी आहेत. नवरा बायको दोघेही सायकीअ‍ॅट्रिस्ट आहेत. सायकीअ‍ॅट्रिस्टची फी एरिया प्रमाणे बदलते. बोरिवलीत साधारण ६०० रु ही असेल.

मेडिटेशन साठी वेळ कोणालाच नसतो (ज्यांना त्याचा अनुभव आला नाही, किम्वा त्याचं महत्व पटत नाही). पण बसमध्ये ट्रेनमध्ये बसल्यावर गायडेड मेडिटेशनच्या ऑडिओज ची मदत घेता येते. ह्याशिवाय मी सगळ्यांना दोन गोष्टी नेहमी रेकमेण्ड करते, यु ट्युबवर ब्रह्मकुमारीज चे व्हिडियो आहेत ते डाऊन्लोड करून मोबाईलवर जाता येता ऐकायचे. त्यांच्या काही गोष्टी प्रॅक्टिकल नसतील आपल्यासाठी तर त्याकडे दुर्लक्ष करायचं. उदा - कांद लसूण नॉन व्हेज... पण बाकी गोष्तींचा फायदा होतो. ह्याशिवाय स्वामी सुखबोधानंद ह्यांची पुस्तकं वाचायची खूप मदत करतात.

ह्याशिवाय ऑफिसमधली कन्टिन्युअस अफेअर्स जर एचआर च्या नजरेत आली तर डच्चू मिळू शकतो. (पुरुषांना मिळाल्याची उदाहरने माहित आहेत)

वेल तुला खूप धन्यवाद आणि बाकी सर्व लोकांनापण.

वेल तुझ्या busy schedule मधून पण वेळ काढून तु मदत करत आहेस. मला मायबोली नवीन आहे म्हणून personal mail करणे (विपु) अजून कळले नाही आहे. मायबोली हे एकदा बसून जरा समजून घायचे आहे आणि प्रतिसाद नाही दिला त्यासाठी क्षमस्व.

नितीनचंद्र तुमच्या प्रतिसादबद्दल धन्यवाद. ज्योतिष शास्त्र बघून समस्येचा वेळ, वेगळ्या पद्धतीने कारण कळेन.

पण उपाय एकाच आहे ..स्वतःला मदत करणे. योगाभ्यास, प्राणायाम, मेडिटेशन हे सारेच शिकून आयुष्भरासाठी उपयोगी होणार आहे. शेवटी ज्याला जे हवे ते मिळो आणि सुखाकडे जाण्याचा हा प्रवास सुखकर होवो.

सायकीअ‍ॅट्रिस्ट क्लिनिक च्या माहिती बद्दल खूप सारे thanks . मी १ वर्ष फक्त ऐकले आणि माझ्या लेवेल पर्यंत समजावले आणि तुम्हा सर्वांमुळे मला २-३ पाऊले कळली आहेत आणि ती मी नक्कीच दुसऱ्याच्या डोक्यात बीजरोपण करणार आहे.

मला खूप नैराश्य येते बऱ्याचदा, माझी वाचनाची आवड आणि माझी family विशेषतः माझा नवरा आणि माझ्या भावंडाचा support, थोडेसे आध्यात्मिक वाचन आणि आपली मायबोली ह्यामुळे मी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करते.

मी एका अतितीव्र मतिमंदत्व,मेंदूच्या विकाराने सतत आजारी आणि ऑटीझम असणाऱ्या मुलाची आई आहे. मी एकटी बऱ्याचदा रडते त्यामुळे निचरा होतो. मला शक्यतो माझे दु:ख कोणाला सांगायला आवडत नाही कारण प्रत्येकाला स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात, पण ह्या बाफचा विषय हा असल्याने मी स्वानुभव म्हणून लिहिले. खूप त्रास झाला तर माझी एक मैत्रीण नगरला आहे तिला फोन करते, तीपण एका स्पेशल मुलीची आई आहे, आम्ही दोघी एकमेकींशी बोलतो.

sorry थोडे वैयक्तिक मांडल्याबद्दल, हा विषय नसता तर मी हे सांगितले नसते कारण मला सहानुभूतीचा आधार घ्यायला आवडत नाही.

अन्जू keep it up & best of luck.
आपण सगळेच ताणतणाव मधून जात असतो आणि ओढाताण होतेच.
मला पण काही त्रास होत असेल , कोणाचा राग येत असेल आणि बोलू शकत नाही तर मी सरळ खास २-३ मैत्रिणी ला फोन करते. सगळे मोकळेपणाने बोलले की बरे वाटतेच.

.... निराशा हा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात कधितरी अनुभवा लागतो.

१) आपल्याला निराशा कोणत्या विचाराने येते ते शोधा.
२) आपल्या मागच्या आयुष्यात काही अप्रिय घडले असेल तर ते योग्य माणसाजवळ बोलुन दाखवा, अशाने तुम्हाला हलके वाटेल.
३) स्वःला एखाद्या छंद लावुन घ्या.... वाचन करणे, एकट्याने फिरायला जाणे, योगासन करणे.
४) दुसर्‍याकडुन खुप अपेक्षा करणे सोडुन द्या.... म्हणजे तुम्हाला निराशा व्हावे लागणार नाही.
५) सतत स्वतःवर चिडत राहणे, निराशा आणणारे विचार करणे, जगच वाईट आहे हा विचारही खुपच निराशा आणतो.
....... शेवटी महत्वाचे अशा माणसांपासुन दुर राहा जे तुम्हाला तुमच्या सोबत घडलेल्या वाईट घटनांची सतत आठवण करुन देत असतील.

अंजू, तुम्हाला care giver fatigue पण येत असेल. थोडा वेळ स्वतःसाठी वेगळा राखून ठेवला पाहिजे.
आमच्या काँप्लेक्स मध्ये एक बाई आहेत त्यांचा मुलगाही ऑटिस्टिक आहे. त्यांनी त्याच्या साठी खेळाच्या शिक्षणाची सोय करून त्याला त्या शिक्षकांच्या बरोबर ठेवले आहे. त्या मुलाला कुत्रे खूप आवड्तात म्हणून कधी कधी तो आमच्या कुत्र्यांना हात लावतो.

मी नेहमी तेच लिहीते म्हणून नाही पण केअर डॉग्ज जे ट्रेन केलेले अस्तात त्यांचा वापर केल्यास
ऑटिझम मध्ये फरक पडतो. लॅब्राडोर जातीचे अतिशय सौम्य स्वभावाचे कुत्रे ह्यासाठी वापरतात.
ही थेरपी डिप्रेशनच्या रोग्यांसाठीही वापरली जाते. व मुंबईत उपलब्ध आहे. ह्यासाठी कुत्रा पाळावा लागतोच असे नाही. ते घेउन येतात व परत नेतात.

जे खूप स्ट्रॉन्ग असतात त्यांना देव मोठी चॅलेंजेस समोर ठेवतो. असे आपले मला वाट्ते.

ह्या बाफवर अवांतर होत असेल तर क्षमस्व.

अंजू - तुम्ही कुठे राहाता. तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे? मतिमंदांसाठी शाळा असतात तिथे जातो का नाही? मुंबई उपनगरात - मालाड पश्चिम लिंक रोड इथे वल्लभदास डागरा म्हणून एक शाळा आहे. तिथे मतिमंद अ‍ॅडल्टस यांच्यासाठीही काही ना काही वर्क्शॉप्स असतात. त्या शाळेच्या मुलांचा मोठ्ठा अ‍ॅन्युअल डे होतो. २००८ मध्ये मी पाहिला आहे तो. ह्या शाळेची बस सर्व्हिस देखील आहे. तुम्ही इथे जवळपास कुठे राहत असाल तर तुम्ही मुलाला तिथे घेऊन जाऊ शकता किंवा पाठवू शकता. बेलापूर इथे आर्टिस्ट व्हिलेजच्या पुढे अश्याच एका वर्क्शॉपची पाटी पाहिली आहे. पार्ल्यात नेहरू रोडला पेट्रोल्पंपाच्या मागे सुद्धा अशी एक शाळा आहे. तिथून बाहेर पडलेली काही मुले छोटे छोटे जॉब्स देखील करतात. मी एइकले आहे की कंदिवली पश्चिमेला बजाज शाळेतही असे वर्क्शॉप्स आहेत. मुंबईत इतर ठिकाणी आणि पुण्यात अशा शाळा खूप आहेत आणि तिथले पालक एकत्र येऊन मुलांसाठी काही न काही करत असतात.

तुम्हाला वेळेची पैशाची खूप कमतरता नसेल तुम्ही स्वत:च एक मदत गट स्थापन करू शकाल. तुमच्या विभागातल्या अशा मुलांच्या आयांना एकत्र आणून.

मी माझ्या नणंदेसाठी प्रयत्न केला होता. नवीन वस्तू शिकवण्याचा आण मग त्या वस्तूंचं प्रदर्शन लावून त्यातून मोठा उपक्रम सुरू करायचा, तीन क्लास झाले. मग त्या शिक्षिकेला वेळ नव्हता मग बाकीची मुले सोडत गेली ती स्लो लर्नर मुले होती मानसिक रित्या अपंग नव्हती. माझी नणंद ३८ वर्शाची आहे आणि तिला बॉर्डर लाईन मेंटल रिटार्डेशन आहे, मानसिक वय -४-५ वर्षे. माझी स्वत:ची इच्छा आहे की अशांसाठी - मुले आणि अ‍ॅडल्ट - काही तरी करावं पण सध्या वेळ आणि पैसा दोन्ही नाही. माअझी अशी इच्छ आहे की अशा अ‍ॅडल्ट्साठी कायमस्वरूपी केअर होम आणि वर्क्शॉप्स सुरू करायचे. कारण पालकांना माझ्या मागे माझ्या अशा मुलाचे / मुलीचे काय असा प्रश्न पडतो. शिवाय रोजच्या जीवनात देखील त्यांना काही अ‍ॅक्टिव्हिटि नसल्याने आई पूर्णपने अडकून जाते.

तुम्हाला मुलाला शाळेत घालण्या संबंधाने काही मदत हवी असेल तर सांगा.

धन्यवाद सर्वाना. मी सध्या ७ वर्षे डोंबिवली येथे रहाते. माझा मुलगा २० वर्षाचा आहे त्याला 'ट्युबरस स्क्लेरोसिस' ह्या नावाचा मेंदुचा विकार आहे, सव्वा वर्षाचा होता तेव्हा निदान झाले, हया विकारावर औषधोपचार नाहित, त्याला सतत फिट्स यायच्या बरीच वर्षे रोज ४-५ वेळा आणि तो बेशुध्द पडायचा. हिंदुजा हॉस्पिटल येथील डॉ. उदानी ह्यांनी आम्हाला स्पष्ट कल्पना दिली त्याच्या आजाराची. आम्ही त्यावेळी नालासोपारा येथे रहायचो. त्याला फिट्सची औषधे रोजच्यारोज द्यायला लागतात. त्याला तिथे विरारच्या स्पेशल स्कूलमधे घेतले नाही आणि सतत आजारी, फिट्स येणे ह्यामुळे त्याचे मतिमंद्त्व प्रोग्रेसिव्ह आहे असे डॉ. सांगितले. माझे माहेर डोंबिवली, इथे अस्तित्व शाळेतपण मुलाला घेतले नाही.

माझ्या नव्-याची बदली श्रीरामपूर येथे झाली. तिथली मतिमंदांची शाळा बंद पडली होती पण माझी तिकडे एका कॉलेजात सायकोलॉजी शिकवणाऱ्या आणि स्वतः स्पेशल मुलीची आई असणाऱ्या मैत्रिणीची ओळख झाली, ती स्वतः सायकोलॉजीस्ट असूनही तिलापण नैराश्य येते. ती म्हणाली एक आई आहे मी, स्वतःवर परिस्थिती आल्यावर मी कोलमडते. आता ती मैत्रीण नगरला असते.

पावणेचार वर्षांनी बदली परत मुंबईला झाली, तेव्हा माझ्या भावाने स्पष्ट सांगितले तू डोंबिवलीला सेटल हो, आम्ही आहोत, माझे भाऊ-बहिण डोंबिवलीला असतात. आम्ही २००६ एप्रिलला डोंबिवलीत सेटल झालो. इथेपण दिशा नावाच्या शाळेत न्यायचो, त्यांनीपण त्याला घेतले नाही. दुसऱ्या दिलासा नावाच्या शाळेत त्याला admission मिळाली आणि इथे एक स्पेशल टीचरपण मिळाल्या ज्या घरी शिकवायला येतात. मुलाचा IQ येत नाही त्याचा SQ फक्त १७ आहे. फिजिकली तो ठीक आहे मागे त्याचा पाय कंबरेतून आखडायला सुरुवात झाली होती पण occupational थेरेपी आणि योग्य औषधोपचार मिळाल्याने आता ठीक आहे. तो सतत आजारी असतो, रात्र-रात्र झोपत नाही आणि जबरदस्ती जागवून शाळेत पाठवले तर जागरणाने फिट्स येतात, डॉक्टरांच्या सल्ल्याने झोपेची गोळी दिली तरी (क्वचित) तो रात्रभर झोपत नाही, त्यामुळे शाळेत पाठवत नाही. यंदा जूनपासून शाळापण बंद पडली पण काही वर्षे इथे शाळेत गेला. जरा आजारी पडला तर खाणे-पिणे सोडून देतो. वेगवेगळ्या कारणाने सतत आजारी असतो. त्याला ऑटिझम आहे हे खूप उशिरा कळले, इथे डोंबिवलीला आल्यावर. डॉक्टरांनीपण सांगितले नाही. डॉग-थेरेपीबद्दल मीपण ऐकलय पण मुलगा दिवसभर झोपतो,रात्रभर जागतो, कितीप्रकारे सवय मोडायचा प्रयत्न केला. असो माझी पोस्ट खूप मोठी झालीय आणि personal झाली आहे. चालणार नसेल तर मी काढून टाकेन .

त्याचा IQ खूप कमी असल्याने वर्कशॉप वगैरेचा उपयोग नाही, त्याला मेंदूच साथ देत नाही, कितीही शिकवले तरी. मी अजिबात खूप strong नाहीये, खूप इमोशनल आहे, हळवी आहे, कधी-कधी दिवसभर रडत बसते एकटीच, मागे आईबाबांसमोरपण खूप रडले, ते दोघेही म्हातारे आहेत म्हणून ठरवले कि कुणाहीसमोर रडायचे नाही, एकटे असताना रडायचे. नवरा बिचारा दमून येतो तरी मुलाला सांभाळतो आल्यावर, भाऊ-बहिण म्हणतात की आम्ही सांभाळतो त्याला तुम्ही दोघे फिरून या, picture बघा, नाटक बघा पण त्याला सोडून आम्ही नाही एन्जॉय करू शकत.

परत एकदा वैयक्तिक लिहिल्याबद्दल माफी मागते. कृपया चालत नसेल तर सांगा, सर्व काढून टाकेन.

नाही ग अन्जू, आम्ही पण तुझ्या भाऊ-बहिण सारखेच आहोत.

इथे मदत, सल्ला देणारे खूप लोक आहेत आणि तुला मनमोकळे करायला हक्काची जागा आहे.भाऊ-बहिण तुला सगळीच मदत करायला तत्पर आहेत ना तसेच आम्ही.

इथे मदत, सल्ला देणारे खूप लोक आहेत आणि तुला मनमोकळे करायला हक्काची जागा आहे.भाऊ-बहिण तुला सगळीच मदत करायला तत्पर आहेत ना तसेच आम्ही.>>+१

वेलजी,

ज्योतिषाचा उपयोग निराशा तात्कालीक आहे की दिर्घ कालीन हे शोधण्यासाठी सुचवला होता. शांतीकर्माने निराशा संपते असा दावा मी केलाच नाही.

एका लिंकवर जाऊन पहा http://en.wikipedia.org/wiki/Past_life_regression

यातील एकच पॅराग्राफ खाली कॉपी पेस्ट केला आहे.

Modern era[edit]
In the modern era, it was the works of Madame Blavatsky, co-founder of the Theosophical Society, which brought it a new found popularity, especially in the West. French educator Allan Kardec also researched into past life regression in The Spirits Book and Heaven and Hell. Past life regression therapy has been developed since the 1950s by psychologists, psychiatrists and mediums. The belief gained credibility because some of the advocates possess legitimate credentials, though these credentials were in areas unrelated to religion, psychotherapy or other domains dealing with past lives and mental health. Interest in the phenomenon started due to American housewife Virginia Tighe reporting and recounting the alleged memories of a 19th-century Irish woman named Bridey Murphy; later investigation failed to support the existence of such a woman and the memories were attributed to Tighe's childhood during which she spent time living next to an Irish immigrant.[2]

जर पाश्चात्य सायकोलॉजीस्ट जर वैफल्यग्रस्तांसाठी पास्ट लाईफ रिग्रेशनचे प्रयोग करत असतील तर ज्योतिषाने कोणत्या प्रकाराच्या उपायाची आवश्यकता आहे हे शोधण्यात काही चुक आहे असे वाटत नाही. त्रस्त माणुस ज्योतिषच काय तर परमेश्वरावर सुध्दा अवलंबुन न रहाता उपाय शोधतच असतो.

Pages