Submitted by वेल on 2 January, 2014 - 00:21
हे आणि ते - १: पाहुणचार इथे बेफि यांनी मांडलेल्या मुद्द्याला पकडून हा धागा सुरू करत आहे.
आपण आपल्या मुलांना कोणाकडे घेऊन जातो तेव्हा ती काय काय गोंढळ धालतात, आपण तो कसा सांभाळतो किंवा आपल्याकडे कोणी येतं तेव्हा आपण पाहुण्या मुलांची मस्ती कशी सांभाळून घेतो त्यावेळी त्यांचे आई वडिल कसे वागतात. काही मुलं कशी गुणी असतात हे सगळे इथे लिहावे. ह्यातून आमच्यासारख्या पालकांना खूप काही शिकता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नुकतीच नक्षत्रशांती झाल्याने
नुकतीच नक्षत्रशांती झाल्याने मला भविष्य लिहिण्याचा छंद जडला आहे. तुमच्या धाग्याचं सांगतो.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तुमचा धागा किमान आज दिवसभर इग्नोर होईल. रात्रीतून पल्याडच्या लोकांना हलवावासा वाटला तर हलेल, पण ती शक्यता खूपच कमी वाटते आहे. मधेच कुणी चुकून शेपटीवर पाय दिला तर मात्र पेटण्याचे चान्सेस आहेत. पण तेही धूसर दिसतात, कारण बेफिंनी योग्य ते स्टेटमेंट ऑलरेडी करून ठेवलेले आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ते एक मुले लाजवतात तेव्हा
ते एक मुले लाजवतात तेव्हा नावाचा बाफ आहे कि तिथे चर्चा करता येइल. सर्व त्या वयाच्या मुलांचे पालक एक्त्रित भेटतील.
अश्विनीमामी | 2 January, 2014
अश्विनीमामी | 2 January, 2014 - 13:18 नवीन
ते एक मुले लाजवतात तेव्हा नावाचा बाफ आहे कि तिथे चर्चा करता येइल. सर्व त्या वयाच्या मुलांचे पालक एक्त्रित भेटतील.
<<<
अश्विनीमामी,
मुले लाजवतात हा बाफ मुलांनी केलेल्या अश्या कृत्यांचा आहे की जी पाहून पालकांना इतरांसमोर अचानक शरम वाटू शकते.
या विशिष्ट बाफवर प्रामुख्याने बेशरम पालकांची बेशिस्त मुले इतरत्र गेल्यावर जर बेशिस्त वागू लागली तर काय काय करता येईल ह्याबाबत चर्चा अपेक्षित आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या विशिष्ट बाफवर प्रामुख्याने
या विशिष्ट बाफवर प्रामुख्याने बेशरम पालकांची बेशिस्त मुले इतरत्र गेल्यावर जर बेशिस्त वागू लागली तर काय काय करता येईल ह्याबाबत चर्चा अपेक्षित आहे.>> ओके ओके. अळी मिळी गुप चिळी. हाताची घडी तोंडावर बोट.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंजे असे मुलांना सांगवून करून घ्यायचे ना. चल्नेदो.
इब्लिसांचे भविष्य खरं ठरवूया.
इब्लिसांचे भविष्य खरं ठरवूया. उद्या लिहितो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बर्याच लहान मुलांना मुळात
बर्याच लहान मुलांना मुळात स्वतःच्या आई वडिलांचा धाकच वाटत नाही. आई किंवा वडील अगदी जोरात ओरडले आणि 'आता फटका मिळेल' वगैरे म्हणाले तरीही मुलांना त्या विधानाची, आवाजाची भीतीच वाटत नाही. हा झाला एक भाग!
दुसरा भाग म्हणजे हट्टीपणा! एखादी गोष्ट आपल्याला न मिळणे हेही शक्य आहे हे मान्य करण्याची मुलांना सवयच लागलेली / लावलेली नसणे! हा समजुतदारपणा मुलांना नक्कीच शिकवणे शक्य असूनही तो तितक्याश्या जाणीवपूर्वकपणे शिकवला जात नसावा / नाही, ज्यामुळे मुले हट्टी होतात. मग त्यांचे रडणे, भोकाड, प्रचंड जोरात आवाज, किंचाळणे हे सर्व टाळण्यासाठी त्यांना ती वस्तू मिळू दिलेली बरी या निष्कर्षाप्रत पालक व यजमान असे सगळेच येतात ह्यात नवल नाही.
माझ्या लहानपणी मूल एकच असो किंवा अनेक, धाक नावाची अदृष्य बाब बर्याच मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असल्याचे सातत्याने दिसायचे. आकर्षणांची संख्या व वैविध्य आता वाढले आहे (जसे संगणक, संचारध्वनी, दूरदर्शन इत्यादी) हे कारण देऊन आजच्या मुलांच्या वर्तनाचे स्पष्टीकरण केले जाणे (माझ्यामते) गैर आहे. वर्तन कसे असावे हे इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ द सराऊंडिंग्ज शिकवणे शक्य आहे.
धाक नसणे व हट्टीपणाला वेळीच आळा न घालणे ह्यातून हे असे प्रॉब्लेम्स निर्माण होतात असे मला वाटते. (असे प्रॉब्लेम्स म्हणजे मुलांचे स्वगृही अथवा इतरत्र असह्य वर्तन, अटेंशन सीक करण्याचा अतिरेक, द्वतःशिवाय इतर काहीही महत्वाचे ठरू नये हा दुराग्रह वगैरे).
हॉटेलमध्ये गेल्यावर जरी आपले मूल वेटरला अगदी काका वगैरे म्हणत असले तरीही माझ्या मनात नेहमी असा विचार येतो की एका (उदाहरणार्थ) चाळीस वर्षे वयाच्या माणसाला एका चार वर्षे वयाच्या मुलाकडून मिळालेली ऑर्डर लिहून घेताना थोडेसे तरी वाईट वाटतच असेल ना? कदाचित नसेलही, कारण ते त्याचे काम आहे आणि कदाचित त्यालाही त्या मुलाचे कौतुक वाटत असेल वगैरे! पण मला तरी वाटते की त्याला थोडेसे वाईट वाटत असेल. (कदाचित माझे कंडिशनिंग असे असेल की मुलाने काय हवे ते स्वतःच्या पालकांना सांगावे व ते ऐकून व ते योग्य वाटल्यास पालकांनी वेटरला सांगावे).
या विशिष्ट बाफवर प्रामुख्याने
या विशिष्ट बाफवर प्रामुख्याने बेशरम पालकांची बेशिस्त मुले इतरत्र गेल्यावर जर बेशिस्त वागू लागली तर काय काय करता येईल ह्याबाबत चर्चा अपेक्षित आहे. >>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माझ्या लहानपणी मूल एकच असो
माझ्या लहानपणी मूल एकच असो किंवा अनेक, धाक नावाची अदृष्य बाब बर्याच मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असल्याचे सातत्याने दिसाय+०१११
वेल, जर आपण 'बेशिस्तीची' उदा.
वेल, जर आपण 'बेशिस्तीची' उदा. दिलीत तर काही मदत करता येऊ शकेल. होत काय की बर्याचदा पालकांना जे बेशिस्त वाटते त्याचा तेवढा बेशिस्त म्हणून बाऊ करायची खरच गरज आहे का? हे पालक म्हणून आपण तपासून पहायला हवे. मुलं म्हण्जे कुत्री/ नोकर नाहीत ऊठ म्हंटले की ऊठायला आणि बस म्हंटले की बसायला. (मुलं ही आई-वडिलांची प्राथमिक जबाबदारी आहेत. बर्याचदा मी असं बघितलं आहे; आई-वडिलांना स्वतःच्या मुलांमुळे ओशाळवाणं वाटत. त्याबद्द्ल हे वाक्य आहे.)
तो वेटरचा मुद्दा मला तरी काही पटला नाही. मग, लहान मुलांच्या कपड्याच्या दुकानांत काय लहान मुल ठेवणार का विक्रेते म्हणून बालमजूरीचा कायदा धाब्यावर बसवून? अरे! वेटर असणे त्याचे लाइव्ह्लीहूड आहे कोण ऑर्डर देते आहे त्याची लाज वाटून कसं चालेल? मग तर डॉक्टरनी कोणत्या तपासण्याच करायला नको मी एवढा मोठा शिकलेला, उच्चविद्यविभूषित मी कोणाच्या कुठे काय हात लावतोय आणि काय बघायच्या प्रयत्नात आहे?
(प्रतिसाद संपादित केला आहे.)
मग, लहान मुलांच्या कपड्याच्या
मग, लहान मुलांच्या कपड्याच्या दुकानांत काय लहान मुल ठेवणार का विक्रेते म्हणून बालमजूरीचा कायदा धाब्यावर बसवून? अरे! वेटर असणे त्याचे लाइव्ह्लीहूड आहे कोण ऑर्डर देते आहे त्याची लाज वाटून कसं चालेल? मग तर डॉक्टरनी कोणत्या तपासण्याच करायला नको मी एवढा मोठा शिकलेला, उच्चविद्यविभूषित मी कोणाच्या कुठे काय हात लावतोय आणि काय बघायच्या प्रयत्नात आहे?<<<
थोडा टोन बदलता येईल का तुम्हाला प्रतिसादाचा? कारण पहिल्या दहा प्रतिसादांमध्येच सवयीने असा उर्मट टोन आणला की पन्नासाव्या प्रतिसादापर्यंत गळे कापायची वेळ येते. जरा संयत चर्चा करता येते का असा एक प्रयत्न करून पाहा जमल्यास!
धन्यवाद!
मला अस वाटत की, मुलांना सारख
मला अस वाटत की, मुलांना सारख , असं करू नको. तसं करू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको... म्हणजे थोड्क्यात सारख्या सूचना करू नयेत. त्यामुळे मुले अगदी उलट वागतात.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जर आपण असं म्हणालो की,' माझा/माझी .... खुप छान अहे... कधीच त्रास देत नाही. खुप शांत बसतो/बसते' तर मुलांच्यात खुप फरक पड्तो... अर्थात हे माझं मत आहे.. अनुभवातून आलेल...
थोडा टोन बदलता येईल का
थोडा टोन बदलता येईल का तुम्हाला प्रतिसादाचा???? >>>हा व्ह्यूज आणि कमेंट्स चा बीबी होणारच आहे
मी नाही हं तुमचा गळा कापायला येणार आणि दार उघडायच्या आधी मला पीपहोलमधून बघायची सवय आहे त्यामुळे तुम्ही गळा कापायला आलात तर दार उघडणार नाही
मी फक्त व्ह्यूज आणि कमेंट्स देणार मला अक्कल आहे तिथेच ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद.
देवू + १
देवू + १
राजसी, या धाग्याचा उगम इथल्या
राजसी, या धाग्याचा उगम इथल्या चर्चेतुन झाला आहे -
http://www.maayboli.com/node/46966?page=1
इथे ओव्हरऑल बेशिस्तपणा म्हणजे नेमकं काय ते नाही सांगता येणार पण माझ्या साठी बेशिस्त म्हणेज खालील सगळं-
किचनमध्ये तो त्याच्या हाताला लागला आणि त्याने कोणाला काही कळायच्या आतच फिश टँकमध्ये नेऊन ओतला आणि त्यावर त्याची आई 'अरे बाळा काय केलस तू हे' म्हणुन माझ्या आईशी गप्पा मारायला लागली...जागेवरुन उठलीही नाही. मला सहन झालं नाही आणि मी त्या मुलाला सरळ दोन धपाटे घातले
)
१) लोकांच्या महागड्या वस्तुंचं नुकसान करणे
२) मोठ्यांना उगाच मारणे
३)अनेक मुलांना तर लोकांच्या घरातल्या वस्तु मागण्याची सवय असते. त्यांना ती वस्तू घरीच न्यायची असते.
४) सतत वेगळ्या वेगळ्या डिमांड्स करत रहाणे
५) घरातल्या लहान मुलाला मारणे (माझ्या मामाचा मुलगा हे नेहमी करतो)
६) घरातल्या पेट्स ना त्रास देणे (आमच्या फिश टँकमध्ये एकाने लाल तिखटाचा डब्बा ओतलेला एकदा
यात मुलांचा दोष नसेल पण पालकांचा दोष नक्कीच आहे. आणि आहेच!
बेशरम पालकांची बेशिस्त मुले
बेशरम पालकांची बेशिस्त मुले इतरत्र गेल्यावर जर बेशिस्त वागू लागली तर काय करता येईल?>>>>>
ह्याच मुलांना घरी जशी वागायची सवय लावली असेल तशी ती वागतील. घरी जर वाईट वागलेले चालत असेल तर बाहेर ह्यापेक्शा वेगळे वागणे अपेक्षित आहे हे त्याना कसे कळेल?
किचनमध्ये तो त्याच्या हाताला
किचनमध्ये तो त्याच्या हाताला लागला आणि त्याने कोणाला काही कळायच्या आतच फिश टँकमध्ये नेऊन ओतला आणि त्यावर त्याची आई 'अरे बाळा काय केलस तू हे' म्हणुन माझ्या आईशी गप्पा मारायला लागली...>>>> आईग्ग. रीया मला वाचुनच संताप आला. मी पण चांगले दणके दिले असते.
>>> जर आपण असं म्हणालो की,'
>>> जर आपण असं म्हणालो की,' माझा/माझी .... खुप छान अहे... कधीच त्रास देत नाही. खुप शांत बसतो/बसते' तर मुलांच्यात खुप फरक पड्तो... अर्थात हे माझं मत आहे. <<<<
घडते ते नेमके उलटे, दोनचार वर्षाच्या पोरापोरीबाबत, "आमचा बाब्या/बाबी नाऽऽ, अगद्दी कुण्णाकुण्णाचे ऐकत नाही हो, तिल्ला हव्वे त्तेच्च करवुन घेते" असे लाडे लाडे कौतुकाने पोरा/पोरीसमोरच सान्गणारे पालक सन्ख्येने जास्त भेटतात, अन पोरान्ना आपण जे चाळे करतोय तेच बरोबर असे अशा अवसानघातकी कौतुकाने नुस्तेच वाटू लागत नाही तर बथ्थड मेन्दूत ठसल्यामुळे, पुढे तीच पोरेपोरी जरा थोराड झाली की तेच लाडेलाडे चाळे पालकांना व इतरांना तापदायक तर ठरतातच, पण पोरेही ऐकण्याच्या पलिकडे गेलेली असतात.
anjut >> +१
anjut >> +१
>>>> यात मुलांचा दोष नसेल पण
>>>> यात मुलांचा दोष नसेल पण पालकांचा दोष नक्कीच आहे. आणि आहेच! <<<<
९०% पालकांचा अन १०% मुलाच्या कुंडलीचा दोष असतो असे माझे मत.
देवू +११ खरच स्वानुभवातुन
देवू +११
खरच स्वानुभवातुन आहे...
माझीच मुलगी , अस काही उत्साहवर्धक बोलल तर स्वतःहुन शहाण्यासारख वागते...
जास्त्च दरडावणे किंवा चुकीच वागुनही मुलांनी परक्रम केल्यासारख समर्थन करणे या दोन्ही गोष्टी चुकिच्याच....
विजय देशमुख | 2 January, 2014
विजय देशमुख | 2 January, 2014 - 06:34
रिया यजमानांचा त्रास जसा मुलांना होईला नको तसाच मुलांचाही त्रास यजमानांना होईला नकोच!>>>> सहमत.
कधीकधी गडबडही होते. मुलांना आवरावं तर मित्रच म्हणतो, अरे खेळुही देणार नाही का आता त्याला ? स्मित
असो. मुलांना बाहेर कसं वागावं हे शिकवणं आवश्यक आहेच, पण ते तसेच वागतील असही नाही, हेही लक्षात ठेवावेच लागते. मुलांशी खेळणे गरजेचे आहे, म्हणुन मित्राशी बोलुच नये का? बर्याच गोष्टी त्या वेळी जश्या सुचतील तश्या केल्या जातात. त्याला (किमान माझा तरी) इलाज नाही. काही अनुभव असतील तर नक्की कळवा, कामात पडतील.
>>>
विजयजी, हे जेंव्हा तो मित्र म्हणतो तेंव्हा त्याला खेळू द्यावं... पण तरीही तो नुकसान करत असेल वस्तुंचं तर मित्रालाच,' नको रे फोडेल काही तरी तो... बसू देत इथेच' असं सांगणं यात काही चुकीच नाही.
मी कोणा एखाद्याच्या मुलाला उद्देशुन हे लिहित नाहीये पण त्यावेळेला मुलाने असं केलं आता मी काय करू याचं उत्तर देणं अशक्यच आहे. असं एकदा , एखाद्या वेळेला सांगुन काही होत नसतं असं मला वाटतं.
आमच्या घरातल्या वस्तू कोणी तरी फोडल्या, तोडल्या तर आम्हाला कसं वाटेल हे आई बाबांनी इतकं बिंबवलं होतं लहानपणी मनावर की आम्ही दुसर्याच्या घरी गेलो तरी त्याचा विचार करायचोच!
चार-पाच वर्षाच्या मुलाला प्रसंगी समजावुन सांगुन, प्रसंगी धाक दाखवुन, वेळ पडलीच तर शिक्षा करुन एखाद्याच्या घरी कसं वागलं पाहिजे शिकवणं कठीण नाहीये.
मी खुप लहान मुलं पाहिलीयेत. ती कंटाळली की 'घरी चला' चा गजर सुरू करतात.... ऐकलं नाही की रडतात. हे स्वाभाविक आहे, यात मला वावगं वाटत नाही. पण अशीही मुलं पाहिलीयेत जी घरी जायचं म्हणून हट्ट करतात आणि ऐकलं नाही की सरळ आई वडिलांना, प्रसंगी यजमानांना देखील मारतात.... अरे हे काय? मोठ्यांना मारु नये हे वळण आम्हाला खुप लहानपणीच लावलं गेलय !
कित्तेक मुलं मी अशीही पाहिलीयेत की लोकांच्या घरी गेल्यावर मला हेच खायला पाहिजे तेच खायला पाहिजे असा हट्ट करतात. आणि अशीही मुलं पाहिलीयेत जी काही दिलं की आधी आई वडिलांकडे पहातात... परवानगी घ्यायला की घेऊ का नको....कोणी काही दिलं तर आधी नाही म्हणावं हे आम्हाला लहानपणीच शिकवलं गेलय.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
माझ्या एका मामाचा मुलगा नेहमी आला की त्याला माझ्या बहिणीच्या प्लेट मध्ये जे आहे तेच खायला हवं असतं... नाही तर तो सगळं फेकुन देतो, ताट भिरकावुन देतो.... त्याची काहीच चुक नाहीये. त्याने आधी हे पहिल्यांदा केलं तेंव्हाच त्याच्या आई वडीलांनी त्याला रोइखलं असतं तर असं झालंच नसतं... माझ्या मामीचं उत्तर ठरलेलं आहे,' इतर कुठे करत नाही हो असा हा! तुमच्याकडेच का करतो माहीत नाही' अरे??? आमच्याकडे करतो माहीत आहे ना? मग त्याला सांगुन आणत जा ना की असं करु नकोस... नाही ऐकलं तर फटके देत जा... उत्तर कसली देताय
देवू + १. खरच आहे मुलांना थोड
देवू + १. खरच आहे मुलांना थोड शाहन म्हणाल कि ती मुल आपल्या परीने शान्या सारखी वागतात
>>>> या विशिष्ट बाफवर
>>>> या विशिष्ट बाफवर प्रामुख्याने बेशरम पालकांची बेशिस्त मुले इतरत्र गेल्यावर जर बेशिस्त वागू लागली तर काय काय करता येईल ह्याबाबत चर्चा अपेक्षित आहे. <<<<
बेफिकीर, या एका वाक्यास सर्व "सार" आले आहे. मी फक्त अजुन एखाददोन शब्दांची भर घालेन, ती म्हणजे "बेशरम, उद्दाम, बेशिस्त अन बेफिकीर पालकांची तश्शीच बनलेली मुले"
आकर्षणांची संख्या व वैविध्य
आकर्षणांची संख्या व वैविध्य आता वाढले आहे (जसे संगणक, संचारध्वनी, दूरदर्शन इत्यादी) हे कारण देऊन आजच्या मुलांच्या वर्तनाचे स्पष्टीकरण केले जाणे (माझ्यामते) गैर आहे. वर्तन कसे असावे हे इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ द सराऊंडिंग्ज शिकवणे शक्य आहे.
>>>. या बद्दल थोड वेगळ मत आहे ... या मुलांना खरच आकर्षाणांचे वैविध्य वाढल्याने सांभाळणे थोडे कठिण जाते .. आणि आत्ताचे आई- बाबाच जरा 'कूल टाईप' असल्याने आपल्या लहान्पणीचा दरारा जसा आपल्याला होता तसा कमी होत आहे..
हरकत नाही लिंबुभौ, फक्त
हरकत नाही लिंबुभौ, फक्त बेफिकीर पालक म्हणण्यातून कोठेतरी ती माझ्यावर डागलेली तोफ नसावी अशी माफक आशा!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
या मुलांना खरच आकर्षाणांचे
या मुलांना खरच आकर्षाणांचे वैविध्य वाढल्याने सांभाळणे थोडे कठिण जाते .. आणि आत्ताचे आई- बाबाच जरा 'कूल टाईप' असल्याने आपल्या लहान्पणीचा दरारा जसा आपल्याला होता तसा कमी होत आहे..<<<
पण हे मत 'वेगळं' कुठे आहे तितकंसं? हे तसंच मत आहे की? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हे जे तुम्ही म्हणत आहात ते मान्यच आहे पण तसं असायला नको, तरीही धाक असायला हवा इत्यादी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्या चान्गल्या नशिबामुळे
आमच्या चान्गल्या नशिबामुळे आमच्या लहानपणी कोकणस्थी खाक्या होता, त्यामुळे आईच्या नजरेत असायचो, बाहेर पाहुणे म्हणून गेल्यावर बेशिस्त वागण्याबद्दल कोणाहीसमोर कानफटायला मागेपुढे बघितले जायचे नाहीच, पण बहुधा ज्यान्च्याकडे पाहुणे म्हणून जायचो ते देखिल कोकेच असल्याने वेळेस यजमानही दोन धपाटे द्यायला मागेपुढे बघायचे नाहीत.
दुसर्याच्या कसल्याच गोष्टीला हातही लावू नये, उगाचच भोसकगिरी करुन डोकावुन बघायलाही जाऊ नये, बोलावल्याशिवाय उम्बरठाही ओलांडू नये, दुसरा खात असल्यास तिथे क्षणभरही (टुकत) थाम्बू नये, कोणीही काहीही दिले तरी ते घेऊ नये, चोरी तर करूच नये पण उगाच रस्त्यावर काही सापडले तरी ते उचलू नये अशा अर्थाच्या कैक नियमबद्ध शिकवणि तेव्हा होत्या व कसोशीने अमलात आणल्या जायच्या! श्यामची आई पुस्तकात देखिल अशा संस्कारांचा उल्लेख ओघाओघात येऊन जातो.
युरोपिअन/अमेरिकन संस्कृतीतल्या व्यक्तिस्वातंत्र्याचे "भ्रष्ट व सोईस्कर" अनुकरण करुन घेऊन गेल्या पाचपन्चवीस वर्षात मात्र एकूणच समाजाने सर्वच व्यवहारात बेशिस्तीच्या कळस गाठला आहे.
सॉरी मी थोडे वेगळे बोलतीय.
सॉरी मी थोडे वेगळे बोलतीय. रियाचे मुद्दे तर मला पटलेच आहेत. पण घरात जर वयस्कर व्यक्ती असतील, तर त्यान्चे लाड पण भोवतात. स्वतच्या मुलाला शिस्तीच्या नावाखाली बेदम मारायचे, पण तेच त्याला ( मुलाला) जेव्हा मूल होते तेव्हा हेच महाशय नातवन्डाना शिस्त लावु देत नाहीत हे पाहीलेय. जाउ दे ना, कोण मोठा शिकुन बॅरीष्टर होणार आहे? खेळु दे जरा वेळ. असे म्हणले की ते मुल बिघडलेच समजा.
याचा अर्थ कृपया असा घेउ नये की मला घरात साबु साबा नको आहेत. माझे म्हणणे हे आहे की जनरेशन गॅपमुळे लहान मुलान्चे मस्त काम होते. मग आपल्या सारख्याना कळत नाही की मुलाला शिस्त लावावी की आजी आजोबाना.:अरेरे:
मॅनर्स, एटिकेटस कशाशी खातात हेच मोठे दुखणे आहे. कित्येकदा आपण घरात जे कळत नकळत बोलतो ते लहान मुले ऐकतात, आणी आपले अनुकरण करतात. ( आणी चार लोकात आपली बीनपाण्याने होते ती वेगळी).
नै ओ नै, बेफिकीरभौजी,
नै ओ नै, बेफिकीरभौजी, तुमच्यावर कशाला तोफ डागू? कृपया गैरसमज नको.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>> नाही तर तो सगळं फेकुन
>>>> नाही तर तो सगळं फेकुन देतो, ताट भिरकावुन देतो.. <<<< आमच्याकडे असे झाले तर आजही जाग्यावर कानठाळले जाईल! उपाशी ठेवले जाईल ते वेगळेच. मूळात अन्न हे परब्रह्म हे आईबापान्नाच माहित नसेल तर पोरान्ना काय माहित असणार? असो.
Pages