नक्षत्र शांती आणि अनुभव

Submitted by नितीनचंद्र on 1 January, 2014 - 23:38

ज्योतिष शिकायला लागल्यानंतर वयाच्या ३३ व्या वर्षी मला लक्षात आले की माझी स्वतःची मुळ नक्षत्राची शांत झालेलीच नाही. आधी अनुभवावे मग सांगावे यान्यायाने प्रथम मी माझी स्वतःची मुळ नक्षत्र आणि अमावस्या योगावर जन्माला आल्याची शांत केली. तहान लागली पाणी पिले आणि समाधान झाले इतका कार्यकारण भाव जरी या शांती नंतर दिसला नाही तरी अरोग्यात सुधारणा, स्वभावात सकारत्मक बदल, अकारण चिडणे क्मी झाले इतके स्पष्ट बदल स्वतःला जाणवले. पाठोपाठ माझ्या मुलीचे पुष्य नक्षत्रावर जन्म असल्यामुळे जननशांती कर्म खुप उशीरा म्हणजे तीच्या वयाच्या ९ वर्षी मी करवले.

दर वर्षीच्या दाते पंचांगात खालील प्रमाणे जननशांती सांगीतल्या आहेत.

तिथी - कृष्ण चतुर्दशी, अमावस्या

नक्षत्रे - अश्विनीची पहीली ४८ मिनीटे, पुष्याचा दुसरा व तिसरा चरण, आश्लेशा पुर्ण, मघा प्रथम चरण, उत्तराचा प्रथम चरण्,चित्राचा पुर्वार्ध, विशाखाचा चतुर्थ चरण, जेष्ठा पुर्ण, मुळ पुर्ण, पुर्वाषाढाचा तिसरा चरण, रेवतीची शेवटची ४८ मिनीटे.

योग - वैधृती, व्यतीपात, भद्रा ( विष्टी )

इतर - ग्रहण पर्वकाल, यमल म्हणजे जुळे, सदंत जन्म ,अधोमुख जन्म, माता -पिता-भाऊ - बहिण यांच्यापैकी एकाच्या जन्मनक्षत्रावर जन्म झालेला असताना, तीन मुली नंतर मुलगा किंवा तीन मुला नंतर मुलगी तसेच सुर्य संक्रमण पुण्यकाल, दग्ध, यमघंट, मृत्युयोग या पैकी कारण असेल तर शांती करावी.

मी याला अनुसरुन आलेल्या जातकांना मार्गदर्शन करायला सुरवात केली.

एक केस अशी आली की आमच्या एका साहेबांची मुलगी अभ्यास पुरेसा न झाल्याने बारावीला परिक्षेला ड्रॉप घेण्याचे म्हणत होती. आई वडील मुलीला समजाऊन हैराण झाले की हा निर्णय घेऊ नको. शेवटी पत्रीका पहाणे या विचारापर्यंत वडील पोहोचले आणि पत्रीका माझ्याकडे आली. या मुलीला मेडीकलाला जाण्याची तीव्र इच्छा होती. त्याकाळात फक्त बारावीच्या गुणांच्या आधारावर मेडिकल शाखेला प्रवेश मिळत होता. सी ई टी नव्हती.

पत्रीकेत शिक्षणाचे योग्य योग असताना असे का म्हणुन मी पाहिले असता या मुलीचे नक्षत्र आश्लेषा आढळले. आश्लेषा नक्षत्र राक्षस गणी असल्यामुळे आपल्या अपेक्षापुर्ती साठी तडजोड करणारे नसते.

मी जननशांतींची चौकशी केली असता ती न झाल्याचे समजल्याने शेवटी करण्याचा सल्ला तीच्या वडीलांना दिला पण हे करत असताना उत्तम पौरोहित्य जाणणारे गुरुजी सुचवुन अग्नी पृथ्वीवर असलेल्या योगावरच शांती कर्म करण्याचे दिवस शोधुन दिले. हे सर्व त्या मुलीच्या नशीबाने बारावीच्या परिक्षेच्या आधी जुळुन आले.

शांतीकर्म घडताच एक दृष्य बदल असा घडला की जी मुलगी बारावीच्या परिक्षेला बसणार नाही म्हणत होती ती स्वतःहुन परिक्षा देण्यास तयार झाली. पुढे निकाला अंती उत्तम गुण मिळाले. त्याच वर्षी मुलींसाठी मेडीकलला वेगळा कोटा सिस्टीम आल्याने तीला हवे ते कॉलेजही मिळाले. ती पुढे एम. बी. बी एस झाली हे वेगळे सांगणे नको.

यानंतर लग्न जुळत नाही म्हणुन न केलेली जननशांती दुसर्‍या एका मुलीला लग्नाच्या आधीच्या वयात करायला सांगीतली आणि आश्चर्यकारक रित्या त्वरीत लग्न जुळल्याचे अनुभवले.

असे अनेक अनुभव घेतल्यानंतर आज हे लिहण्याचे कारण घडले. माझ्या मते यावर आणखी संशोधन व्हावे. ह्या संशोधनाला जर लोक पुढे आले तर यातुन निष्कर्ष निघु शकेल.

माझ्या अनुभावात तरी जननशांती कर्म निष्फळ झाल्याचे दिसले नाही. यात या यज्ञ कर्माचा योग्य दिवस शोधणे आणि अग्नी भुमीवर त्या दिवशी असणे हे ज्योतिषाने शोधुन जातकाला सांगणे व त्या दिवशी उत्तम पौरोहीत्य करणार्‍या गुरुजींच्या हस्ते हे घडवणे आवश्यक आहे हे निक्षुन सांगावेसे वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललित लेखन आहे होय!
नैतर मग कुडमुड्या धंद्याचे मार्केटिंग म्हणावे लागले असते Wink
पण ललित, कल्पनाविलास इ. म्हणून मग ठीकेय. असतात असे अनुभव. Wink

संत एकनाथ मूळ नक्षत्रावर जन्मले. त्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे.
मूळीच्या मूळी एका जन्मला । मायबापे घोर धाक घेतला ।
कैसे नक्षत्र आले कपाळा । स्वये लागला दोहोच्या निर्मूळा ।

शांती हे कर्मकांड भट भिक्षुकांच्या उपजिविकेचे साधन होते. त्यामुळे अशा प्रकारची कर्मकांड जाणीवपूर्वक जोपासली गेली व गतानुगतिकतेचा भाग म्हणून त्याचे अंधानुकरण झाले. आता एक गोष्ट अशी होते की नक्ष्रत्र शांती केली नाही यामुळे आपल्या आयुष्यात काही अडचणी येत आहेत हा जो डोक्यात वळवळणारा किडा असतो तो या नक्षत्र शांती केल्यामुळे शमतो.त्यामुळे नक्षत्र जरी शांत झाले नाही तरी त्याचे मन शांत व्हायला मदत होते हे बाकी खरे!

जो डोक्यात वळवळणारा किडा असतो तो या नक्षत्र शांती केल्यामुळे शमतो.त्यामुळे नक्षत्र जरी शांत झाले नाही तरी त्याचे मन शांत व्हायला मदत होते हे बाकी खरे! > +१

असेच एकदा शांती निमित्ताने एका पुरोहितां सोबत बाबुलनाथला जाण्याचा योग आला... दुपारची वेळ असल्याने गर्दी नव्हती. पुरोहिताने अभिषेक सुरु केला. त्याच वेळी एक मद्रासी फुलं, उंची अत्तर, लेप, भस्म, गंधक, बेल, अगरबत्ती असे नाना प्रकारच्या पुजा साहित्याने भरलेली मोठी पेटी घेऊन तिथे आला. आमच्या सोबत असलेल्या पुरोहितांचे मंत्र सुरु होते... आणि तो योगायोगाने त्या मंत्राला अनुसरुन ते ते पुजा साहित्य पिंडी वर अर्पण करत होता. जवळ जवळ अर्धा तास हा अभिषेक सुरु होती. या सुंदर योगायोगा मुळे अशिषेक संपल्यावर मन अगदी शांत आणि प्रसन्न झाले होते.

नितिनचंद्र, छान विषय, आमचेही असेच अनुभव आहेत. Happy व तुम्ही म्हणता त्याच शास्त्रोक्त पद्धतीने शान्तीकर्म असेल तर सुचवतो.
शान्तीकर्माव्यतिरिक्त अर्कविवाह व कुंभविवाह यांचेही अनुभव असेच सकारात्मक आहेत.

माझा जन्म भद्रा योगावर झाला त्याची शांती केलीच नाही. लहानपणी ते करणे जमले नाही.

या शांतीत ज्याची शांती करायची त्या मुलाला गायीच्या खालून की मागच्या दोन पायांमधून बाहेर यायचे असा काहीतरी विधी असतो. असे ऐकले आहे. भद्रा योगाच्या शांतीसाठी की इतर कोणत्या ते नक्की माहिती नाही.

आता या वयात असे काही दिव्य करायला लागेल, ते करताना गायीने लाथ, शिंग मारले तर याची कल्पना करुन नंतर करुया असे म्हणत टाळत आलोय. Happy

गमभन, गायीच्या खालुन/मागुन पुढुन काढणे असा काही विधी नसतो, मात्र गायीने जातकास हुंगावे अशी अपेक्षा असते. अगदी वर्षादोनवर्षाच्या आत शांती कर्म करत असले तरी गायीच्या पोटाखालुन काढणे वगैरे प्रकार करूही नयेत.
गायीचे पूजन, गायीने हुंगणे, गायीला तिन प्रदक्षिणा, याव्यतिरिक्त, अवघ्राण (मातापित्यांनी बालकाची टाळू हुंगणे), आज्यावहलोकन इत्यादी उपचार केले जातात. जातकावरील अभिषेकासाठी मूळ व अन्य नक्षत्रांकरता स्वतंत्र सूक्त आहे ते व सप्तचिरंजीव स्तोत्र वापरणे उपयुक्त ठरते.

इच्छुकांनी ज्योतिषः एक थोतांड असा धागा काढावा आणि यथेच्छ लिहावे. विषय नक्षत्र शांती आणि अनुभव असताना ज्योतिष आणि अशा प्रकारची शांती हे थोतांड कसे आहेत हे त्यावर लिहीणे अस्थानी आणि हास्यास्पदच. बाकी, अस्थानी लिहीण्यात पी.एच.डी. केलेली सदस्यनामे आधीच दिसू लागलेली आहेत. Happy

कृपया विषयाशी/शीर्षकाशी सुसंगत लिहावे.

नक्षत्रशांती इ.वर माझा विश्वास नाही, पण (बहुधा 'शास्त्र असे सांगते' या पुस्तकात) वाचनात असं आलं होतं की ती जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात केली गेली तरच फलदायी असते. बाळाला तान्हं असताना गुटी द्यायची राहिली म्हणून दहाव्या वर्षी आपण चाटवत नाही, तसंच नंतर नक्षत्रशांती करण्याला काही अर्थ नसतो.

कृपया विषयाशी/शीर्षकाशी सुसंगत लिहावे.
<<
ही असली वाक्ये, maayboli.com/user/3 यांनी लिहिलीत, तर त्याला काही किंमत असते.

तुम्ही कोण? एल ओ एल.

इथे भोंदूगिरीचा प्रचार सुरू आहे, असा माझा विषय व मुद्दा आहे. तुम्ही वाट्टेल तो धागा काढून 'शीर्षकाशी सुसंगत लिहावे' म्हणाल, त्याला काय अर्थ?

गायीने डोक्याचा वास घेतल्याने नक्षत्रांचा 'ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट' कसा बदलेल? याबद्दल वाद घालावा इतपतही तथ्य त्यात नाही. भोंदू ते भोंदूच.

तुम्ही वाट्टेल तो धागा काढून 'शीर्षकाशी सुसंगत लिहावे' म्हणाल, त्याला काय अर्थ? >>

अगदी हे वाक्य युजर क्रमांक ३ यांनी लिहीले तर त्याला किंमत असते आणि शोभूनही दिसते रे इब्ल्या, तू नव्हे. कोण तू? एल ओ एल. तुला पटत नसेल तो धागा "वाट्टेल तो" असतो. काय पण जोक मारतो रे.
चालु दे हां. मी पॉपकॉर्न घेऊन बसतो. Wink

मग असं, की इथे लिहिणार. तसेच, जिथे लिहावे वाटेल तिथे.

तुम्हाला हवे तर हवा तो धागा काढा. हवे ते लिहा.

आम्हाला अन तुम्हालाही, उत्तर द्यायला लोक अन वेसण घालायला user/3 समर्थ आहेत. Happy

तुम्ही कोण? असा प्रश्न होता. त्याला 'बरं मग' असं उत्तर होत नाही Proud

नितीनचंद्रजी, क्षमस्व. तुमच्या धाग्यावर जरा अवांतर पोस्टी झाल्या. आता सुसंगत मुद्दे येऊद्या, पटले नाही तर सोडून देऊ. जे योग्य ते घेऊ. आता मी वाचन मोडात.

बरं झालं तो 'बरं मग' एडिट केला.

असंबद्ध का होईनात, किमान शब्द फुटले तोंडातून.

मंदार जोशी,

तुमच्या सुसंस्कृतपणाचे व संस्कार करण्याचे धिंडवडे सध्या निघताहेत माबोवर. धाग्यांच्या प्रतिसादांवरून धागे निघताहेत. खाण तशी माती अशी म्हण ठाऊक आहे ना?

मला अरेजारे करण्याची तुमची लायकी, ऐपत व औकात नाही, हे अजूनही समजले नाहिये का?

असो. तुम्हाला हा शेवटचा प्रतिसाद. तुम्ही लै कैच्याकै बरळता, तुमच्या लेव्हलवर उतरायची इच्छा नाही.

तुमच्या सुसंस्कृतपणाचे व संस्कार करण्याचे धिंडवडे सध्या निघताहेत माबोवर. धाग्यांच्या प्रतिसादांवरून धागे निघताहेत. खाण तशी माती अशी म्हण ठाऊक आहे न

इब्लिस, पुरे झालं. खरंच खूप झालं. मला बोललास ते बोललास वरुन कुटुंबावर घसरलास तर माझ्या इतका वाईट कुणी नाही हे लक्षात ठेव. आणि मी खरंच उतरलो ना लेव्हलवर, तर इथला सगळा आवेश गळून पडेल तुझा.

मायबोलीवरचे अनेक लोक मला व माझ्या कुटुंबाला जवळून ओळखतात (आणि मी त्यांना व त्यांच्या फ्यामिलीला). त्यामुळे त्यांना काहीच सांगायची गरज नाही. इतरांचा गैरसमज नको म्हणून सांगतो, अन्यथा स्पष्टीकरण द्यावं इतकी तुझी औकात नाहीच. लेखनाच्या ओघात जो किस्सा आला त्यावरुन चर्चा झाली. याचा अर्थ आमच्याकडे तसंच असतं असं नाही. उलट माझ्या धाग्यांवरुन इतर धागे निघत असतील आणि त्यातून काहि चांगलं शिकायला मिळत असेल मायबोलीकरांना तर ते रचनात्मक (constructive) आहे आणि त्यातच धाग्याचं यश आहे माझ्या.

ही शेवटची वॉर्निंग समज. माझ्याबद्दल काय ओकायचं ते गरळ ओक. ते चालूच असतं तुझं. परत माझ्या कुटुंबावर घसरलास तर होणार्‍या परिणामांना फक्त तूच जबाबदार असशील.

@ अ‍ॅडमिन
मला बोलतो हा इसम ते बोलतो. माझ्या कुटुंबावर घसरण्यापर्यंत मजल गेली आहे याची. आपण याला योग्य तो समज देणार असाल ही आशा.

Iblis2.jpg

मामी | 2 January, 2014 - 17:25
आधी या धाग्याची शांती करा नाहीतर याचं भविष्य अगदी खडतर आहे.

होराभूषण मामी यांचा विजय असो. Lol

<<गायीने डोक्याचा वास घेतल्याने नक्षत्रांचा 'ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट' कसा बदलेल>> +100

माझेही हेच मत आहे. कोणेतीही शांत केल्याने किंवा खडे घातल्याने नक्षत्रांमध्ये असलेल्या तार्‍यांचा किंवा ग्रहांचा आणि अस्तित्वात नसलेल्या राहू केतूंचा आपल्या शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम कसा बदलेल? हे असे झाले की मी चंद्राबद्दल काही मंत्र म्हटले आणि त्याने पृथ्वीवर येणार्‍या भरती ओहोटीत फरक पडला. असा विश्वास ठेवणे हे शास्त्रीय किम्वा लॉजिक ह्या दोन्ही दॄष्टीकोनातून अयोग्य आहे.

अर्थात ह्या गोष्टींवर विश्वास ठेवणार्‍यांना अतीव समाधान मिळून त्याचा त्यांच्या मनावर "प्लासिबो इफेक्ट" होऊन गोष्टी बदलू शकतात.

अभिषेक किंवा यज्ञ ह्यात वापरली जाणारी सामग्री मन प्रसन्न करते. शिवाय आपल्या मनावर लहानपणापासूनचे जे संस्कार असतात आणि त्या मंत्रांच्या high power sound energy मुळेही आपल्याला खूप प्रसन्न वाटते.

शांत व्हा मंडळी! शांत व्हा! मला सव्वा पेग दक्षिणा द्या! पुर्वदुषित'ग्रहां'मुळे हे सगळे होतय.कोण म्हणतो ग्रहांचा प्रभाव नसतो? आपण पुर्व'ग्रहां' ची शांती करु. आपण इथे सगळे मायबोली कुटुंबातील आहोत. व्यक्ति तितक्या प्रकृती असतात. त्या मुळे तर पुलंसारख्या लेखकांचे सकस साहित्य निर्माण होउ शकते.
या सगळ्या भावनांचा उगम या मेंदु मधे आहे. सुबोध जावडेकरांचे मेंदुच्या मनात हे पुस्तक जरुर वाचा. त्यात माणसे शिव्या का देतात? नितीनियमांची ऐशी तैशी! सोशलनेटवर्किंग आणि मेंदु, अंधश्रद्धा आणि मेंदु विज्ञान अशी अनेक प्रकरणे आहेत पुस्तकात जावडेकर म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!"
दाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे. आता काहींच्या दृष्टीने असलेल्या श्रद्धा या दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा.
परस्परांचे विचार भिन्न असले तरी संवाद व मैत्री होउ शकते. तेवढी प्रगल्भता निर्माण करता येउ शकते. केवळ शारिरिक वय वाढल म्हणजे प्रगल्भता येत नाही. तुम्ही 'आमच्यातले' नाही म्हणुन तुम्ही 'त्यांच्यातले' अशा कृष्ण धवल द्विमितीतील विचारश्रेणी मुळे ग्रे एरिया कडे दुर्लक्ष होते.

ता.क वरील प्रतिसाद अस्थानी वाटणार नाही अशी आशा करतो.

काहींच्या दृष्टीने
असलेल्या श्रद्धा या दुसर्याच्या दृष्टीने
अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा.
परस्परांचे विचार भिन्न असले तरी संवाद व
मैत्री होउ शकते. तेवढी प्रगल्भता निर्माण
करता येउ शकते. केवळ शारिरिक वय वाढल
म्हणजे प्रगल्भता येत नाही.
तुम्ही 'आमच्यातले' नाही म्हणुन
तुम्ही 'त्यांच्यातले' अशा कृष्ण धवल
द्विमितीतील विचारश्रेणी मुळे ग्रे
एरिया कडे दुर्लक्ष होते.>>>>>>> +1111 अतिशय उत्तम प्रतिसाद
दोन्ही बाजूनी हे पथ्य पाळल तर वाद हे फ़क्त वादविवादापुरतच मर्यादित राहतील
वैयक्तिक होणार नाहीत

>>>>>> इथे भोंदूगिरीचा प्रचार सुरू आहे, असा माझा विषय व मुद्दा आहे. तुम्ही वाट्टेल तो धागा काढून 'शीर्षकाशी सुसंगत लिहावे' म्हणाल, त्याला काय अर्थ? <<<< तुमचा विषय अन मुद्द्याकरता स्वतंत्र धागा काढा!
ही निदर्शने/मोर्चे/धरणी/दगडफेक/चिखलफेक करण्याची जागा नाही! त्याकरता अ‍ॅडमिनकडून "अन्निसवाल्यान्चा" स्वतन्त्र धागा उघडून घेणे! अन हे मी माझ्या मनचे सान्गत नसून, तसेच हा नियम भारतातील नसुन, अमेरिकन भूमीवरील अमेरिकन सर्व्हरवर अमेरिकन कायद्या अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या साईटवरील आहे याची कृपयाच नोन्द घेणे, Wink व सध्या भारतात एक अर्धवट कायदा पास करुन घेण्यात यश मिळाले असले तरी अजुन आभाळाला हात लागले नाहीत याचे भान ठेवून पाय जमिनीवरच ठेवावेत ही नम्रच विनन्ती! Proud

च्यामारी, मला तर आता असे वाटते की मायबोलि स्थापन झाली तेव्हाची कुंडली काढून काही शान्तीवगैरे करायला हवीये का ते बघायला लागणार बहुतेक! हो ना, जेव्हा तेव्हा जिथे तिथे भरल्या बासून्दीच्या पातेल्यात मुतल्याप्रमाणे एखादी धार्मिक चर्चा चालली असेल तर तिथे नेमके जाऊन आपले भिकार धर्मभ्रष्ट प्रचारी हेकट बुप्रा/ब्रिगेडी/नक्षली/कम्युनिस्ट मुद्दे घेऊन चालू विषयास ग्रहण लावु पहाणारे राहूकेतू इतक्या सन्ख्येने मायबोलीच्या कुन्डलीत कसे काय? यावर उपाय काय? Proud

मला हे देखिल मान्य आहे की "निन्दकाचे घर असावे शेजारी"! Proud
तुमच्या असण्याबद्दल माझी काहीच हरकत नाही, पण या घरस्वरुपी धार्मिक विषयाच्या धाग्यात घुसू नका, तुमचे घर स्वतंत्र "धाग्यात" आमच्या शेजारिच बान्धा!
हव तर या धाग्याचे नाव व पुढे ठळक अन्धश्रद्धा ("एक अंधश्रद्धा - नक्षत्र शांती आणि अनुभव" हे अस्से) लिहून स्वतःचे घर बान्धा, आमच्या शेजारीच लग्गेच बान्धा..... ( अन पाहुण्यान्ची वाट बघत बसा Proud )

@लिंबु-

हे सांगण्याचा अधिकार फक्त प्रशासकांना आहे. माझ्या माहितीनुसार हा ओपन फोरम आहे, आणि आपले मत शिष्टसंमत भाषेत सांगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. या चर्चेचा टोन तुम्हा 'धार्मिक' मंडळींनी बिघडवला नसता (तुमचे लेखकु) तर चर्चा चांगली चालली होती. आताची तुमची भाषा (बासुंदीत मुतणे इत्यादि) तुमच्या धार्मिकतेबद्दल बरेच काही सांगून जाते.
हा समूह तुमचे मठ चालवण्यासाठी आंदण दिलेला नाही, त्यामुळे जिथे अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न दिसेल, तिथे विरोध होईलच. सवय करून घ्या.

आणि हो, तुमच्या पुढच्या शंभरेक ओळींच्या पोस्टल प्रत्युत्तर मिळणार नाही. Happy

>>>> हे सांगण्याचा अधिकार फक्त प्रशासकांना आहे <<<< अर्थात, पण हे आधीच सुचविण्याचा अधिकार माबोचा सन्माननीय सदस्य म्हणून मलाही आहे! Proud (कृपयाच, "सान्गणे" अन "सुचविणे" यातील फरक अजुन काही लिहीण्याआधी नीट समजून घ्यालच, नै का?)

>>>> हा समूह तुमचे मठ चालवण्यासाठी आंदण दिलेला नाही, <<<< हा धागा म्हणजे "मठ" आहे की काय ते प्रशासकांना ठरवूद्यात की, हव तर तुम्ही त्यान्च्या विपुमधे जाउन त्यान्ना सान्गा तसं! माझ्यामते तरी मी इथे "धार्मिक" विषयावर व महत्वाचे म्हणजे धाग्याच्या विषयानुरूप स्वच्छंदपणे व पूर्ण वैचारिक स्वातंत्र्यानिशी लिहू शकतो!

>>>>>> त्यामुळे जिथे अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न दिसेल, तिथे विरोध होईलच. सवय करून घ्या. <<<<
त्यात काय सवय व्हायचीये? पुण्याहून मुम्बैला रात्रीच्या प्यासेन्जरने गेले तर पहाटे पहाटे मुम्बै जवळ आल्यावर आजही रेल्वेरुळाच्या शेजारी बिनबोभाटपणे/निर्लज्यपणे उघड्यावरच नागट्याने प्रातर्विधी उरकणारे दिसतातच, त्यान्ची जशी नजरेला सवय झालीये, तशीच "अन्निस/बुप्रा/ब्रिगेडी/नक्षली/कम्युनिस्ट वाल्यान्च्या अस्थानी पोस्टीन्चीही" सवय आम्हाला केव्हाच झालीये! Proud

>>>> आणि हो, तुमच्या पुढच्या शंभरेक ओळींच्या पोस्टल प्रत्युत्तर मिळणार नाही. <<<<
का हो? आमच्यावरच इत्के का रागावता? त्या तिकडे मुलांचेसंगोपनमधे (http://www.maayboli.com/node/47068?page=3 येथे) अनिष्का यान्च्या पोस्टवर "कोणाचा कल्पनाविलास" म्हणून विचारणा करून, नन्तर अनिष्कांच्या पुढच्या प्रश्नाला तुम्ही जसे केवळ "स्मायली" टाकून उत्तर दिले होतेत, अन आता "क्षमस्व.पोस्ट संपादित." असे लिहिले आहेत तुम्ही, तितकेही आमच्या कर्ता करणार नाही तुम्ही? हा आमच्यावर घोऽऽर अन्याव आहे हां! Proud अनिष्का यान्ना एक न्याय अन आमाला तेवढा वेगळा न्याय का बर? शोभत का हे तुमाला? Wink

अन आय होप सो की तुम्ची अन्निसब्रिगेड http://www.maayboli.com/node/46953#comment-2991221 या व यासारख्या धाग्यान्वर फिरकणार नाही, तितका वेळ तुम्हाला मिळेल असे वाटत नाही! Wink

भरल्या बासून्दीच्या पातेल्यात मुतल्याप्रमाणे एखादी धार्मिक चर्चा
<<
Lol
अरे काय हे लिम्बाजी राव?
रच्याकाने हे पातेलं ललित मधुन ज्योतिषात कधी अन कुणी हलवलं?

Pages